मित्र हो,
आजपर्यत आपण अनेक गोष्टीं वर बोललो ,हसलो, गंभीर झालो आपापली मते दिली. आता आपण खूप मोठे नाही पण
एक छोटेसे काम करुया, आपण पण कोणाला तरी सहाय्य करुन त्यांचे जीवन घडविण्यासाठी थोडा हातभार लावूया.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी २३ डिंसे. १९७३ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात 'हेमलकसा'
या गावी माडीया गोंड या अति मागास अदिवासी लोकांच्या उत्थानासाठी "लोकबिरादरी" प्रकल्प चालू केला.
त्यांच्या जोडीला त्यांचा मुलगा डॉ. प्रकाश आमटे व त्यांची पत्नी डॉ.मंदा आमटे ह्यांनी सुद्धा आपले जीवन ह्या
माडींया साठी वाहीले. त्यांनी गवताने शाकारलेल्या बांबूच्या झोपडीत आपला संसार थाटला. गडचिरोली जिल्ह्यात इंद्रावती,
गोदावरी, वैनगंगा, प्राणहीता या नद्यानी वेढलेल्या या प्रदेशात चंद्रपुर पासून सुमारे २०० किलोमीटर वर 'हेमलकसा'
हे ठीकाण आहे.
जगाशी कुठ्लीच ओळ्ख नसलेल्या अदीवासींना " माणूस" बनविण्याचे काम या प्रकल्पाने सुरु केले.
या भागात जाण्यासाठी २० वर्षापुर्वी रस्ता नव्ह्ता , वाहने नव्ह्ती, संपर्कासाठी कुठलेही साधन नव्ह्ते वीज नवती,
आजुबाजुचा निर्सग अत्यंत रौद्र ,उन्हाळयात ४८ अंश तापमान , हिवाळ्यात नको तेवढा थंडावा. मरण तर नेहमी बरोबरच,
कधी वाघाच्या,अस्वलाच्या रुपात ,कधी नागाचं विष बनुन तर कधी भुकेचा वणवा त्यांच्या वाटयाला येतो. पावसाळ्यात पुरामुळे
उरलासुरला संपर्क तुटतो. अशा या भागात डॉ. प्रकाश व डॉ. मंदा हयांनी ३५ वर्ष काढली. व अजुनही ते अहोरात्र
अदिवासींसाठी झट्त आहेत.
प्रकाश आमटे सांगतात्,आम्ही प्रथम गेलो तेव्हा माडीया त्यांच्या जवळ येत नसत म्हणून त्यांनी त्याच्यासारखा वेष म्हणजे
बनियान व हाफ पॅट घालायला सुरुवात केली. ऑपरेशन करण्यासाठी वीज नव्हती म्हणून कंदिलाचा वापर करुन या समस्ये-
वर मात केली. (१९९० साली वीजपुरवठा सुरू झाला.)
माडींयासाठी फक्त दवाखानाच नाही तर शाळेची सुद्धा सुरुवात केली, मुले शाळेत येत नसत म्हणून खाऊचे आमिष
दाखवून शाळेत आणत. आज या शाळेतील १५० मुले शिक्षक, २५ मुले पोलीस काही वनरक्षक, वकील तर २ मुले डॉ़क्टर
होउन याच भागात काम करीत आहेत.
हे अदिवासी सगळ्याच बाबतीत मागास आहेत, दरिद्रीपणा हा शब्द स्वतःला लाजवेल त्याच्या पेक्षाही परीस्थीती
दारुण होती. उदा. मीठ हा प्रकार त्यांना माहीत नव्हता . शेती हा प्रकार माहीत नसल्यामुळे ''मुंग्यांची चटणी व ऊंदीर
भाजून खाणे" हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यामुळे प्रकाश आमटे यांनी मिठापासून सुरुवात केली व त्याचा वापर
शिकवला. सावकार एक पोती मिठाच्या बद्ल्यात त्यांच्याकडुन एक पोती चारोळी वा डिंक अशा वस्तु घेऊन माडीयांची
फसवणू़क करत.
डॉ. प्रकाश आमटे यांनी शेती करणे, पिके लावणे यांचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या सोबतीला श्री. व सौ. मनोहर ,गोपाल
व प्रभा फड्णीस, जगन व मुक्ता मचकले दादा व बबन पांचाळ, मनोहर व संध्या येम्पलवार या लोकांनीही माडीयांसाठी
अविरत कार्य केले. डॉ. प्रकाश यांचा मोठा मुलगा डॉ. दिगंत व त्यांची पत्नी डॉ. अनघा म्हणजेच बाबा आमटे यांची तिसरी पिढी
सुध्दा या कार्यात सह्भागी आहेत.
डॉ. प्रकाश आमटे यांच्या दवाखान्याचा १००० गाव विनामुल्य लाभ घेतात. साधारण २ लाखापर्यत रुग्ण
त्यांच्याकडे उपचारासाठी येतात या दवाखान्याला सरकारी अनुदान नाही त्यांचा वर्षभराचा ख्रर्च सुमारे १० लाख इतका आहे
हा ख्रर्च जनसामान्यांच्या देणगीतुन भागविला जातो.
मोनॅ़को या युरोपातील अतिसुंदर चिमुकल्या देशाने डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांच्यावर १९९५ मध्ये खास
टपाल तिकिट काढले आहे व त्या तिकिटाद्वारे येणारे उत्पन्न या प्रकल्पाला देण्यात येते.
खास टीप : या कार्यात त्यांच्या कुठ्ल्याही त्यागाचे अवडंबर दिसत नाही. भौतिक जगापासून तुटलेपण आल्याची खंत नाही
अशा प्रकल्पाचा आपल्याच नशेत असलेल्या लोकांना याचा नीटसा परीचय नाही . गेली ३५ वर्ष ही सगळी मंडळी अखंडपणे
येणारी नवनवी आव्हाने समर्थपणे पेलत आहेत. त्यांच्या साथीला त्यांची मुलेही या प्रकल्पात सह्भागी आहेत.
आपण ही त्यांच्या खांद्याला खांदा लावुन एक तरी जवाबदारी घेऊया, आपण आपले आयुष्य तिथे काढु शकत नाही परंतु
देणगी देउन त्यांच्या कार्याला हातभार तरी लावू शकतो.
कॄपया आपली देणगी
"महारोगी सेवा समिती , वरोरा " या नावाने खालील पत्त्यावर पाठवावी
लोकबिरादरी प्रकल्प मु. हेमलकसा, पो. भामरागड , जिल्हा गडचिरोली,
पिन कोड : ४४२ ७१०, महारार्ष्ट राज्य, भारत.
फोन : ++९१-७१३४-२२०००१
ई- मेल : अनिकेत_आमटे@रेडीफमेल.कॉम
प्रतिक्रिया
13 May 2008 - 5:32 pm | राजे (not verified)
धन्यवाद.
आपण खुपच उच्च्-कोटीचे काम आपण समाजासमोर आणले व त्याचे कार्य तथा महती येथे प्रकाशीत केली.
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
13 May 2008 - 5:43 pm | धमाल मुलगा
प्रगतीताई,
धन्यवाद, ही इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल.
सोबत मदत पाठवण्याचा पत्ताही दिलात हे उत्तम झालं.
आभारी आहे.
14 May 2008 - 12:09 pm | आनंदयात्री
म्हणतो, माहितीबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातही इतकी आदिवासी गाव असु शकते हे समजुन अचंबा वाटला. आमटे कुटुंबियांच्या कार्याला सलाम.
13 May 2008 - 5:46 pm | ऋचा
सुरेख लेख आहे.
13 May 2008 - 5:52 pm | मनस्वी
खरंच छान माहिती पुरवलीत.
महाराष्ट्रातील या भागाबद्दल अनभिज्ञ होते.
13 May 2008 - 6:52 pm | प्राजु
अतिशय माहितीपूर्ण लेख. सोबत निरोप्याचा पत्ता आहे हे छान.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 May 2008 - 6:59 pm | शितल
प्रगती ताई
तुम्ही धनादेश पाठविण्याच्या पत्ता सह माहिती पुरवलीत तुमचे आभार.
समाजाचा आपण ही काही भाग आहोत आणि समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही देणे आहोत याची जाणिव आहे आम्हाला.
आणि आमची तनानी नाही तर धनानी तरी मदत करू आणि ती योग्य व्यक्ती पर्य॑त पोहचते हे समाधान आहे.
13 May 2008 - 7:30 pm | मदनबाण
खरच हे खुप महान कार्य आहे.....प्रगतीजी खरच खुप माहिती पुर्ण लेख आहे .
मदनबाण.
14 May 2008 - 8:27 pm | इनोबा म्हणे
हेच म्हणतो.
आपापल्या कुवतीनुसार नक्कीच मदत पाठवायला हवी.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
13 May 2008 - 10:08 pm | प्रभाकर पेठकर
ह्या लेखामागिल हेतू नक्कीच अगदी उदात्त आहे. मदतीचे आवाहन करताना सोबत पत्ताही दिला आहे हेही खूप चांगले केलेत. संपूर्ण लेख वाचून श्री. बाबा आमटे, श्री. प्रकाश आमटे आणि सौ. मंदाकिनी आमटे ह्यांनी समर्पित भावनेने केलेले समाजकार्य वाचकांच्या नजरे समोर येते. धन्यवाद. जरूर मदत करू.
अशा प्रकल्पाचा आपल्याच नशेत असलेल्या लोकांना याचा नीटसा परीचय नाही
सर्वसामान्य माणूस कुठल्याही प्रकारच्या नशेत नसतो. तो महागाईने पिचलेला असतो. महिन्याचा खर्च कसा चालवावा ह्या विवंचनेत असतो. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील ज्येष्ठांच्या आजारपणाचा खर्च, कुटुंबप्रमुखावर अवलंबित सदस्यांच्या इच्छा-आकांक्षा आणि ह्यातील कितीतरी बाबींमध्ये आपण कमी पडत आहोत ही मन जाळणारी भावना, त्यातुन निर्माण होणारे ताण-तणाव, मानसिक दौर्बल्य, हीन-दीन आणि असहाय्यतेची भावना ह्यांनी खचत असतो. भ्रष्टाचार, जनतेच्या पैशांचा होणार अपहार, राजकारण्यांची नीती शून्यता, पोलीसांच्या पक्षपाती धोरणांमुळे असुरक्षिततेची भावना, समजातील गुंडाची दहशत, आपल्या सुंदर मुलीच्या सुरक्षिततेची काळजी अशा अनेक दडपणांखाली दडपलेला, असहाय्य, दिसून येणार नाही पण तरीही 'विकलांग' असा असतो.
तरीपण, तो त्याच्यापरीने गरीबांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना, गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करीतच असतो. रस्त्यातून येता जाता भेटणार्या, देवळासमोर बसणार्या भिकार्यांना मदत करतो. आपल्या सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीच्या आजारपणात आर्थिक मदत करतो, देवळात दानपेट्यांमध्ये मदत टाकतो, कष्टकरी गरीबांच्या सेवा घेऊन त्यांना आर्थिक हातभार लावित असतो, प्रत्येक टॅक्स भरत असतो. अशाप्रकारे तो त्याच्या क्षमतेनुसार समाजातील गरजूंना मदत करीत असतो. तो आपल्याच नशेत नसतो.
13 May 2008 - 7:52 pm | व्यंकट
ईमेल आयडी हा इंग्लीश मध्येच दिलेला बरा
व्यंकट
14 May 2008 - 12:17 am | विसोबा खेचर
या लेखामुळे मिपाचा दर्जा खूप उंचावला आहे!
सुरेख, माहितीपूर्ण लेखन...
आत्ता जरा सवडीने प्रतिसाद देत आहे, खारीच्या वाट्याचा धनादेश आज दुपारीच पाठवला. या आभाळाइतक्या मोठ्या माणसांना माझा सलाम...!
आपला,
(बाबांपुढे सदैव नतमस्तक) तात्या.
14 May 2008 - 12:25 pm | प्रगती
बाबा आमटे हे काही तरी समाजकार्य करतात(महारोगी व अदीवासींसाठि) व त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. मला फक्त एवढीच माहीती
होती. परंतु जेव्हा ठाण्याच्या 'लोक बिरादरी' प्रदर्शना ला मी भेट दिली तेव्हा त्याबद्द्ल विस्तॄत माहीती मला समजली ती सर्व मि.पा.
करांना समजावी या हेतुने आम्ही प्रस्तुत लेख लिहिला, सर्व मि.पा. करांना माझी कळकळ जाणवली त्याबद्द्ल आभारी आहे
15 May 2008 - 5:36 pm | धोंडोपंत
अत्यंत माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. सामाजिक जाणीवेतून केलेल्या लेखनाचे स्वागत आहेच.
आम्ही आमच्यापरीने या उदात्त कार्यात खारीचा वाटा उचलू या आश्वासनासह.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com