क्रमशः

नारदाचार्य's picture
नारदाचार्य in काथ्याकूट
12 May 2008 - 5:20 pm
गाभा: 

दीर्घ लेखन मालिकेच्या स्वरूपात टाकण्याची एक पद्धत रूढ होऊन गेली आहे. क्रमशः हा त्यासाठी अगदी सोप्पा मार्ग ठरतो की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. काही मालिका उचितच असतात; पण प्रत्येक लेखन हे मालिकेच्या साच्यात बसते असे नाही. अशा वेळी तुकड्यांमध्ये मांडले जाणारे पण कालबद्धता नसणारे लेखन आस्वादाची गंमत घालवून टाकते. लेखनाच्या सोयीसाठी लेखनाचे तुकडे करणे उचितच आहे, पण त्यासाठी आस्वादाच्या बाबीचाही विचार होणे आवश्यक नाही का? लेखनाचा आस्वाददेखील तुकड्यांमधून अधिक चांगल्या पद्धतीने वाचकाला घेऊ द्यावा याची खूणगाठ लेखकानीही मनाशी बांधलेली असावीच. त्यासाठी लेखकांना एक सूचना करतो आहे
लेखन पूर्ण करावे आणि मग त्याचे सोयीनुसार तुकडे करून भागशः एकाचवेळी प्रसिद्ध करावे. लेखमाला असेल तर ही सूचना अर्थातच लागू होणार नाही. पण त्यातही काही कालबद्धतेचे बंधन स्वतःवर घालून घ्यावे.
एक वाचक म्हणून तुम्हाला काय वाटते?
वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे.

प्रतिक्रिया

राजे's picture

12 May 2008 - 5:22 pm | राजे (not verified)

काहीच मत नाही कारण माझी सफर चे मी १५ भाग क्रमशः प्रसिध्द येथेच केले आहेत.....

:$

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन's picture

12 May 2008 - 5:35 pm | मन

म्हणजे, काहिच मत नाही , ह्याच्याशी सहमत.
आपल्याला तर बुवा तो "क्रमशः" मधला पि.डा. काकांचा "अब्दुल खान" लै आवडला होता.
""क्रमशः " लिखाणाच्या दॄष्टीने तर ते सगळ्यांनी आदर्श ठेवावा असे लिखाण आहे.)
त्यामुळे वाचक म्हणुन "क्रमशः " ला आपल्याला काय बी हरकत नाय.
(व्यक्तिशः माझं जे काही उद्बोधन पर, विचार्प्रवर्तक , सार गर्भ ,भव्य दिव्य लिखाण ;-) असतं
ते पान भरात सहज बसतं. त्यामुळं मला स्वतः ला हा लेख लागु होत नाही.(मी लिहायचं म्हटलं तर.)
)

आपलाच,

जोर्ज बर्नाड शॉ,शेक्स्पियर,वुडहाउस,कालिदास ह्यांचे महत्व टिकुन रहावे ह्यासाठी कमित कमी लिहिणारा,
आणि स्वतः ची प्रतिभा दाबुन ठेवणारा
मनोबा

:-)

बट्ट्याबोळ's picture

12 May 2008 - 5:32 pm | बट्ट्याबोळ

भा. पो.
पुढचा भाग लिहून तयार आहे. मि.पा. वर प्रसिद्ध करण्याची आमची पहिलीच वेळ
असल्याने प्रतिक्रिया घेऊन पुढील लेखन प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे.

तरीही आपल्या सूचनेप्रमाणे लवकरच प्रसिद्ध केलं जाईल.

नारायण नारायण :)

क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा
क्रमशः वाचणे मलासुद्धा आवडत नाही.
आपण एरव्ही छापील वाचतो आणि जालावर वाचतो यात फरक आहे . आपल्याला वाचनाची सवय असते ती मुख्यतः पान जमीनीला समांतर ठेउन वाचतो .जालावरुन/मॉनिटर वर वाचताना हा कोण बदलतो. लेख तीस ओळींपेक्षा मोठा असल्यास वाचताना लेखाची संलग्नता /वाचकाची एकाग्रता रहात नाही.
त्यामुळे मोठे लिखाण क्रमशः च लिहावे लागते.
तीन वेगवेगळ्या विषयावरचे लिखाण क्रमशः लिहिणारा विजुभाऊ

नारदाचार्य's picture

12 May 2008 - 5:50 pm | नारदाचार्य

चर्चा प्रस्तावात आम्ही क्रमशः लेखनाला विरोध केलेला नाही. क्रमशः लेखन एकाचवेळी प्रसिद्ध करावे असे मत आम्ही मांडले आहे. ३० ओळींबाबत विजूभाऊंनी केलेला खुलासा पूर्ण मान्य आहे. चर्चा प्रस्तावातही लेखनाच्या सोयीसाठी तुकडे करणे उचितच आहे, असे म्हटले आहे. एक भाग आज वाचायचा, दुसरा चार दिवसांनी, तिसरा पुढं काही दिवसांनी यातून जी गंमत जाते तिचाच फक्त मुद्दा आहे.
अब्दुल खानचा विशेष उल्लेख करावयाचा झाला तर त्यांनी कालबद्धतेची मर्यादा बरीचशी सांभाळत ते भाग प्रसिद्ध केले त्यामुळे खुमारी कायम राहिली.

भडकमकर मास्तर's picture

13 May 2008 - 10:27 am | भडकमकर मास्तर

क्रमशः लेखन एकाचवेळी प्रसिद्ध करावे असे मत आम्ही मांडले आहे
अगदी हजार टक्के सहमत...

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 11:50 am | विसोबा खेचर

वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे.

हम्म! आपले विचार स्पृहणीय आहेत! :)

आपला,
(क्रमश:) तात्या.