टक्कू..

ऋचा's picture
ऋचा in पाककृती
12 May 2008 - 2:04 pm

(आंबट-गोड टक्कू)

कैर्‍या-३
कांदे-२
साखर-५ चमचे
मीठ-३ चमचे (चहाचे असतात ते)

कृती- कैरी आणि कांदा कीसून घ्यायचा. एकत्र करुन त्यात साखर आणि मीठ घालायचं .
झाला तुमचा टक्कू तय्यार..

पोळी बरोबर किंवा नुसता पण छान लागतो.

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

12 May 2008 - 2:17 pm | आनंदयात्री

आम्ही तक्कु म्हणतो त्याला :) .. आवडतो लै लै !

विशाल कुलकर्णी's picture

7 Apr 2010 - 5:21 pm | विशाल कुलकर्णी

आमीबी ! लै आवाडतो आमास्नी ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुचेल तसं's picture

8 Apr 2010 - 4:37 am | सुचेल तसं

एकदम बरोबर आनंदयात्री... त्याला बरेच लोक तक्कू म्हणतात. आमच्याइकडे नगर साईडला काही जण त्याला (कैरीचं) गोजं म्हणतात... पाकृ सेमच....

मनस्वी's picture

12 May 2008 - 2:23 pm | मनस्वी

ऋचा, छान पाककृती टाकलीस.
मी साखरेऐवजी गूळ टाकते. छान चव येते.
वाटल्यास वरून मोहरीची फोडणी पण द्यावी.
३ टीस्पून मीठ जरा जास्तच वाटते. १/२ टीस्पून पुरेसे होईल बहुतेक.

छोटा डॉन's picture

12 May 2008 - 5:35 pm | छोटा डॉन

आम्ही त्याला तक्कू म्हणतो ...
बाकी आमच्याकडे पण आई त्यामध्ये सारखेऐवजी "गुळ" टाकते ...

अवांतर : मागच्या महिन्यात घरीच्या ट्रीपमध्ये परत येताना चांगली मोठी बाटली भरून "तक्कू" घेऊन बेंगलोरला आलो. इकडे "राईस्-सांबार" च्या ऐवजी "राईस्-तक्कू" हा चांगला पर्याय होऊ शकतो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

नितिन थत्ते's picture

8 Apr 2010 - 1:25 pm | नितिन थत्ते

>>३ टीस्पून मीठ जरा जास्तच वाटते. १/२ टीस्पून पुरेसे होईल बहुतेक

अगदी अस्सेच म्हणतो.

नितिन थत्ते

मन's picture

12 May 2008 - 2:23 pm | मन

रेसिपी...
आम्ही पण तक्कु च म्हणतो.
(बाकी काही म्हणा त्याला, पण मस्त चवदार आसतो!)

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

विसोबा खेचर's picture

12 May 2008 - 4:03 pm | विसोबा खेचर

बाई गं ऋचा, तुझा टक्कू सहीच आहे हो! लवकरच करून पाहतो..

तात्या.

स्वाती दिनेश's picture

12 May 2008 - 4:33 pm | स्वाती दिनेश

मस्त...वाचूनच पाणी सुटले... मी पण मनस्वी करते तसा करते,म्हणजे गूळ घालून आणि वरुन फोडणी!
अवांतर- आता इंडियन शॉप मध्ये कैर्‍यांचा शोध घ्यायलाच हवा, :)
स्वाती

वेदश्री's picture

12 May 2008 - 4:40 pm | वेदश्री

हा टक्कू तर काही माहिती नाही पण चुंद्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तिखटपावडर, मीठ भिरभिरून टाकून हे मिश्रण पोळीमध्ये टाकून तिची सुरळी खायला किंवा ब्रेडमध्ये भरून सँडविच खायला तूफान मजा येते.

घरी गेले की टक्कू नक्की करून खाईन. पाककृतीचं नाव एकदम आवड्या.

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2008 - 6:48 pm | प्रभाकर पेठकर

चुंद्यामध्ये
चुंदा की छुंदा?? माझ्या मते छुंदा.

शितल's picture

12 May 2008 - 5:43 pm | शितल

>>>>हा टक्कू तर काही माहिती नाही पण चुंद्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तिखटपावडर, मीठ भिरभिरून टाकून हे मिश्रण पोळीमध्ये टाकून तिची सुरळी खायला किंवा ब्रेडमध्ये भरून सँडविच खायला तूफान मजा येते.

हो मी ही टक्कु हे नाव पहिल्यादा ऐकले,
वेदश्रीने सा॑गितल्या साखरखे चु॑द्या आम्ही करतो.
कदाचित नावे वेगळी आणि पदार्थ एकच असे असावे.

नितिनभालेराव's picture

7 Apr 2010 - 4:37 pm | नितिनभालेराव

मला हि फार आवडतो

देवदत्त's picture

8 Apr 2010 - 12:12 am | देवदत्त

चांगले तर वाटतेय... साधे सोपे...कधी तरी खाऊन पाहीन....
पण फोटो कुठाय? :)

अरुंधती's picture

8 Apr 2010 - 12:20 am | अरुंधती

=P~

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/