निमंत्रण

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
9 Apr 2011 - 11:18 am
गाभा: 

मिपावर लोकांना वादविवाद घालायला अथवा काथ्याकूट करायला फार आवडते. अशांसाठी आज एक कार्यक्रम आहे
आज दि. ९ एप्रिल २०११ रोजी राजीव साने यांची पहिली मांडणी खालील विषयावर असेल.

“युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज)

वेळ: संध्याकाळी ६.०० वाजता मांडणीला सुरुवात होईल. त्यापूर्वी पोचावे ही विनंती.

स्थळ: मनीषा सोसायटीचे सभागृह, नवसह्याद्री जवळील अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर `देवेश, (चितळे बंधू अधिकृत विक्रेते)” या दुकानाच्या रस्त्याला वळावे. व त्यानंतर लगेच उजव्या रस्त्याला वळून लगेचच्या डाव्या गल्लीत सभागृह आहे.

पार्किंग : अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंग करणे सोयीचे ठरेल.

येणार असल्याची सूचना व्यनी अथवा खरड वही तुन दिल्यास संयोजकास सोयीचे जाईल.

प्रतिक्रिया

पक्का इडियट's picture

9 Apr 2011 - 11:24 am | पक्का इडियट

>>>>>“युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज)

सध्या वादविवाद करतांना ज्या व्यक्तीच्या मतांचा विचार चालू आहे त्या व्यक्तीच्या कार्य किंवा विचारांपेक्षा सदर व्यक्त्ती समलैंगिक होती की काय अशा पद्धतीच्या चर्चांना भरकटवणार्‍या युक्त्यांचा वापर केला जात आहे.

मनिम्याऊ's picture

9 Apr 2011 - 11:32 am | मनिम्याऊ

कोणत्या शहरात आहे हा कार्यक्रम?

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2011 - 11:36 am | प्रकाश घाटपांडे

शहर पुणे

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2011 - 11:54 am | प्रकाश घाटपांडे

राजीव साने हे पुण्यातील मुक्त विचारवंत आहेत. ते कामगार चळवळीचे विश्लेषक असुन तत्वज्ञान व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीत चालणार्‍या जनतंत्र - उद्बोधन मंच ( राषट्रवाद अभ्यास मंडळ) हे विचारव्यासपीठाचे संयोजक आहेत. आजचा सुधारक तसेच अन्य वैचारिक विषयांना वाहिलेल्या नियतकालिके. वर्तमानपत्र यात सामाजिक विषयावर सातत्याने लेखन करतात

कुंदन's picture

9 Apr 2011 - 12:12 pm | कुंदन

म्हटल पका काकांनी विद्रोहि कट्टा आयोजित केला की काय ?

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2011 - 12:15 pm | प्रकाश घाटपांडे

कार्यक्रमाचे संयोजन आमच्या मित्रमंडळींचेच आहे. नंतर श्रमपरिहारा बाबत वेगळा विचार....

विनायक बेलापुरे's picture

9 Apr 2011 - 12:46 pm | विनायक बेलापुरे

श्रमपरिहार हा अल्प आहे की उप आहे की साग्रसंगीत आहे ?
श्रमपरिहार नेमका काय वेळेला सुरु होईल हे सांगता येईल का ?
धन्यवाद.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Apr 2011 - 12:56 pm | प्रकाश घाटपांडे

ती मप्ल्याकडली वायली बाब हाये