साहित्यः
२ कप कैरीची सालं काढून केलेले तुकडे
१ कप चिरलेला गूळ
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून मेथीदाणे
१ टीस्पून लाल तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करणे)
चिमूटभर हिंग (फोटोत साहित्यासाठी चमच्यात हिंग दाखविले आहे) :)
मीठ चवीप्रमाणे
तेल
पा़कृ:
जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी व मेथीदाणे टाकावे. तडतडले की त्यात हिंग घालावे.
त्यात कैरीचे तुकडे, लाल तिखट व मीठ घालावे. गरज वाटल्यास २ टेस्पून पाणी घालावे व शिजु द्यावे.
कैरी मऊ झाली की त्यात गूळ घालावा व मिश्रण थोडे घट्ट होऊ द्यावे.
गार झाले की मेथांबा हवाबंद डब्यात / बर्णीत भरावा. ७-८ दिवस टिकतो पण फ्रिजमधे ठेवावा लागतो.
प्रतिक्रिया
8 Apr 2011 - 7:36 pm | गणपा
8 Apr 2011 - 7:39 pm | दीविरा
आवडले :)
शेवटचा फोटो छान
लगेच खायला घ्यावे असे वाटले.
8 Apr 2011 - 7:46 pm | विकास
मस्त दिसतोय...
आधी फक्त शिर्षकामुळे जरा गोंधळायला झाले! ;)
9 Apr 2011 - 1:12 pm | नितिन थत्ते
पदार्थ लाल रंगाकडे झुकणारा आहे हेही साहजिकच आहे. ;)
8 Apr 2011 - 8:01 pm | चित्रा
मस्त दिसतो आहे मेथांबा.
8 Apr 2011 - 8:31 pm | मदनबाण
आयला !!! हे काही तरी नविन दिसतय बाँ... खी खी खी. चला मला यक नविन प्रकार समजला. :)
पण मी हा प्रकार अजुन चाखलाच नाय ना !!! छ्या.
असो. पहिला फोटु मस्त आलाय ( अगदी हिंगा सकट हो.);)
(आंबा प्रेमी) :)
8 Apr 2011 - 8:46 pm | अनामिक
मागच्याच आठवड्यात केलाय मेथांबा! मस्तं लागतो!!
8 Apr 2011 - 8:48 pm | प्राजु
सॉल्लिड लागतो मेथांबा..!
खूप आवडतो. फोटो क्लास आला आहे.
9 Apr 2011 - 8:34 am | निवेदिता-ताई
मस्तच........मला खूप खूप आवडतो...
तयार मेथ्यांब्याचा फ़ोटो मस्त....लगेचच खावे असे वाटतेय
8 Apr 2011 - 10:46 pm | रेवती
मला तोंडीलावणे म्हणून आवडतो.
काहीजणांना अगदी भाजीऐवजीही आवडतो तितका नाही आवडत.
अगदी जोरदार उन्हाळ्यात मेथांबा आणखी छान वाटतो.
9 Apr 2011 - 2:57 am | योगप्रभू
मेथांब्याच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले.
कर्हाडे ब्राह्मण घरांतील गृहिणींची स्वयंपाकातील एक खासियत म्हणजे मेथांबा, असे पूर्वी ऐकिवात होते.
सगळ्यात शेवटचा फोटो बघून समाधान झाले. मेथांबा समोर यावा तो असा. ताटात उगा बोटभर तोंडी लावण्यात काही मजा नाही.
9 Apr 2011 - 8:48 pm | निवेदिता-ताई
मी पण करुन पाहिला ग ............मस्त झालाय...
9 Apr 2011 - 4:02 pm | सानिकास्वप्निल
निवेदिता-ताई धन्यवाद मेथांबा करून प्रतिक्रिया दिल्याबद्दल :)
सगळयांचे आभार :)
9 Apr 2011 - 4:20 pm | परिकथेतील राजकुमार
शॉल्लेट !!
9 Apr 2011 - 4:24 pm | sneharani
मस्त दिसतोय मेथांबा!
9 Apr 2011 - 5:08 pm | डावखुरा
सध्या घरीपण कैरीचा गोडड भडिमार आहे..त्यामुळे नाहीतर ईनो घ्यायची पाळी आली असती...
9 Apr 2011 - 8:27 pm | दीविरा
हा फोटो
"
9 Apr 2011 - 8:40 pm | सानिकास्वप्निल
:)
धन्यवाद दीविरा
9 Apr 2011 - 8:56 pm | निवेदिता-ताई
9 Apr 2011 - 8:59 pm | सानिकास्वप्निल
आज काही खरं नाही , सगळ्यांनीच बनवला वाटते मेथांबा :)
खूप खूप छान आणी आभार :)
9 Apr 2011 - 9:10 pm | स्मिता.
मला पण खूप आवडतो मेथांबा. सगळ्यांनी टाकलेले फोटो बघून तोंडाला पाणी सुटले.
मल पण इकडे कुठे कैरी मिळते का बघायला हवे.
11 Apr 2011 - 7:18 pm | वाहीदा
मस्त ! मस्त ! मस्त !
18 Jan 2012 - 8:57 pm | गणेशा
भारी पाकृ.
माहित नव्हती !
सेव्ह केली आहे.
15 Mar 2016 - 1:56 pm | विनटूविन
मी हा वर्षभर (फ्रिजमध्ये अर्थात)टिकवलाय आणि मस्त टिकला आणि अतिशय चवदार झाला.