एका स्पाम मेल मध्ये ठाणे कट्ट्याचा मेनु पाहिल्यापासुन अंमळ त्रास होत होता.
विकांताचा सदुपयोग करावा म्हणुन मग शेव भाजी न चपाती चा एक प्रयत्न करुन पाहिला.
भाजी साठी साहित्यः
१ वाटी सुके खोबरे.
१ मोठा कांदा.
२ मिरच्या
२ लसुण पाकळ्या ( सोलुन)
छोटा आल्याचा तुकडा
१/२ टि स्पुन लाल तिखट
१ टि स्पुन मसाला.
१ वाटी लाल शेव
सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे.
भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे.
एका कढईमध्ये तेल तापवत ठेवणे. तेल चांगले तापले की जिरे - मोहोरी टाकणे.
मग मिक्सर मध्ये वाटलेला मसाला या गरम तेलात मस्त परतवा.
आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालुन , कढईवर झाकण ठेवावे.
अधुन मधुन झाकण उचलुन चांगली उकळी आलीये की नाही हे बघावे.
मस्त उकळी आली की , शेव टाकावेत अन ग्यास बंद करुन कढईवर झाकण ठेवावे.
मागच्या वेळी "मसालेदार हरबरा बटाटा उसळ" अंमळ जास्त लालसर दिस्त होता , म्हणुन यावेळी तिखट जरा कमी टाकलेय. म्हणुन यावेळी नीट रंगली नाही भाजी. जरा समजुन घ्यावे.
प्रतिक्रिया
8 Apr 2011 - 5:12 pm | गणपा
दुसर्या दिवशी जाळ निघाल होता ना रे. खर सांग. ;)
भापो कुंद्या. :)
8 Apr 2011 - 5:12 pm | स्पा
प्रयत्न झकास कुंड्या भाऊ :)
8 Apr 2011 - 5:19 pm | सुहास..
तु का अंमळ जळजळ करतो आहेस रे ..;)
२१ ला आहेस ना ठाण्यात , तु आला की उडवु या की बारी ...आपल हे ...बार ;)
असो ..शेव असे मॅगी सारखे का दिसत आहेत ? ;)
बाकी छान प्रयत्न !
8 Apr 2011 - 5:35 pm | नगरीनिरंजन
>>यावेळी तिखट जरा कमी टाकलेय
त्यामुळेच 'क्रमाशः' नाहीये वाटतं यावेळी. ;-)
8 Apr 2011 - 5:55 pm | मुलूखावेगळी
अरे वा!!
पन हा उतारा पुरेसा आहे का? ;)
8 Apr 2011 - 6:46 pm | पक्का इडियट
शेवभाजीचं नंतर पिठलं झालं की चकली ?
8 Apr 2011 - 7:05 pm | कुंदन
दर वेळी नावाला जागलेच पाहिजे का प्.इ.?
8 Apr 2011 - 7:10 pm | पक्का इडियट
आम्ही पक्का इडियट आहोत हे आम्हाला माहित आहे आणि ते आम्ही आधीच जाहिर केले आहे.
कृपया त्यावरुन टोमणे मारू नये ही नम्र आणि आग्रहाची विनंती.
धन्यवाद.
8 Apr 2011 - 10:32 pm | शेखर
=)) कुंद्या, दे आता उत्तर
8 Apr 2011 - 6:51 pm | पैसा
गणपा, निवेदिता वगैरे मंडळीना कॉम्प्लेक्स देणार तू हळूहळू! पण मागच्या वेळसारख्या कुंदन पेश्शल सूचना आणि 'क्रमशः' याचा अभाव जाणवला!
8 Apr 2011 - 9:01 pm | प्रीत-मोहर
वर्ड टु वर्ड सहमत!!!
8 Apr 2011 - 7:10 pm | सानिकास्वप्निल
:)
8 Apr 2011 - 9:49 pm | प्राजु
>>फिरबुन घेणे.
म्हणजे काय रे भौ??
यावेळी नीट रंगली नाही भाजी. जरा समजुन घ्यावे.
हम्म! एकदा लाल भडक, एकदा पिवळी धमक.. एकदा कच्चीच भुर्जी(तिचा पुढचा भाग आला नाही म्हणून)...! आणि शेवटी म्हणे 'घ्या समजून'. बरं तर बरं नुसता कच्चा माल दाखवून 'घ्या करून" असं नाही म्हणाला.
आवांतर : फोटो छान.
9 Apr 2011 - 12:55 am | मराठमोळा
>>'घ्या समजून'. बरं तर बरं नुसता कच्चा माल दाखवून 'घ्या करून" असं नाही म्हणाला.
हाहाहा =)) =))
9 Apr 2011 - 12:59 am | कुंदन
पा. कृ. मध्ये "क्रमशः" प्रथमच बघत असल्याने तुमचा अंमळ गोंधळ झालेला दिसतोय. ;-)
9 Apr 2011 - 12:54 am | मराठमोळा
ठाण्याच्या धनगरी मटण जेवणात असलेल्या कट्ट्याला हा शेवभाजीचा उतारा.. छे छे.. काय हे कुंदन शेट..
:)
असो बाकी प्रयत्न चांगला आहे. :)
9 Apr 2011 - 1:02 am | कुंदन
हे बघा , म मो सायेब.
उपलब्ध असलेल्या साधन सामग्री मध्ये वेळात वेळ काढुन बनवलेली ही भाजी आहे.
खायची तर खा , नाही तर पाणचट इडल्या आहेतच ( संदर्भ : चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -२ ) ;-)
9 Apr 2011 - 1:07 am | मराठमोळा
>>नाही तर पाणचट इडल्या आहेतच
टाका.. जखमेवर मीठ टाका.. ;)
त्या ईडल्यांपेक्षा कोणतीही महाराष्टीयन डिश केव्हाही चांगली.. :)
9 Apr 2011 - 7:49 am | प्राजु
मग रोज बचक भर गोडा मसाला खात जा.. नुसताच! ;)
10 Apr 2011 - 4:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नुसताच बचक भर गोडा मसाला ही महाराष्ट्रीयन डिश आहे ?? कुठे बनते ??
9 Apr 2011 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा !
सध्या कुंदोपरावांचा 'मिसेस तेंडुलकर' झालेला दिसतोय ;)
पाकृ च्या कडेला ग्लेन फिडिच वैग्रे न दिसल्याने अंमळ दु:ख दाटुन आले.
9 Apr 2011 - 11:52 pm | कुंदन
एका हिंदी मालिकेची मराठी सं स्थळावर जाहिरात करण्याचा क्षीण प्रयत्न.
9 Apr 2011 - 12:46 pm | sneharani
पा.कृ. क्रमाशः करायची राहिली की काय?
अवांतर : फोटोवरून तुम्हीच केलेली दिसतेय! छान ! मस्त प्रयत्न!!
16 Apr 2011 - 6:08 pm | पक्का इडियट
स्वैंपाक करणे बंद केले का ? पुढे काही प्रगती कळली नाही !
18 Apr 2011 - 11:01 am | विसोबा खेचर
मस्त.. :)