अण्णांचे आंदोलन कशासाठी...?

VINODBANKHELE's picture
VINODBANKHELE in काथ्याकूट
7 Apr 2011 - 4:23 pm
गाभा: 

अण्णांचे आंदोलन कशासाठी...?

हा आपल्या सारख्या सामान्य माणसांना पडलेला प्रश्न . याच प्रश्नाचे उत्तर शोधताना मला स्टार माझा च्या ब्लॉगवर श्री जयकृष्ण नायर यांचा वरील नावाचा लेख वाचायला मिळाला .सदर लेख वाचल्यावर आपल्या लक्षात येते कि अण्णा का उपोषणाला बसलेत?आणि सरकार का चालढकल करतंय?
सादर आहे
अण्णांचे आंदोलन कशासाठी...?

http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1824

अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आमीर खान याने देखील मनमोहन सिंग यांना पत्र लिहिले आहे.

आमीरचं पंतप्रधानांना पत्र

http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1828

किती विचित्र परिस्थिती आहे हि कि ज्यांच्या वर कारवाई साठी हे विधेयक आणले जातेय त्यांच्याच मंजुरीची त्याला गरज आहे.

ग्रेट हिंदुस्तान !!!!!!!!!!!!!!!!

अण्णा हजारेंचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे अण्णांचे एकट्यासाठी नसून ते आपल्या साठी आहे , आपले आंदोलन आहे .त्याच्या कडे मिडिया सारखे तटस्थेने बघू नका , तुम्हाला जर एक रुपयाची देखील लाच देताना आणि खाताना {घेताना }लाज वाटत असेल तर आणि तरच या आंदोलनाला पाठींबा द्या , सामील व्हा . आपल्या देशातील परिस्थिती पाहता आपल्याला नाही तर निदान आपल्या पुढील पिढीला तरी याचा नक्की लाभ होईल .

प्रतिक्रिया

याच्याकडे एका व्यक्तिचे आंदोलन म्हणून न पाहता जन आंदोलन म्हणूनच पाहिले जावे. तुमच्या आमच्या सारखी सामान्य माणसे विटली आहेत या बजबजपुरीला त्यामुळे विवक्षित वेळी कोण उभा राहतो हे महत्वाचे नसून सामान्य माणसाच्या कोंडमारयाचा तो उद्रेक आहे असे मानले तरच या जन आंदोलनाला यश मिळेल.

भ्रष्टसत्ता बदल हे उद्दिष्ट न मानता सिस्टिम मध्ये मूलभूत बदल व्हावेत ही अपेक्षा आहे. सिस्टिम मध्ये कितपत बदल होइल हे सांगता येणे अवघड आहे पण जन-लोकपाल बिल ही त्या दिशेने टाकलेले एक पाउल ठरु शकेल.

स्वामी अग्निवेश यांनी " मध्यममार्ग निघू शकेल " असे काल उपोषणाच्या अवघ्या दुसरया दिवशीच सांगून मनात शंका मात्र निर्माण केल्या आहेत.

आगामी काळात वाटचाल दिसेलच कशी आहे ती.

पण आता माघार घेतली जाउ नये असे मात्र वाटते आहे.

प्यासा's picture

9 Apr 2011 - 11:38 am | प्यासा

खुपच धक्कादायक -

कोण आहेत हे शांती भूषण? १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील २ आरोपींचे वकील म्हणून काम करणारे शांती भूषण..अहो इतकेच काय या शांती भूषण साहेबांनी २००१ साली संसद हल्ल्यातील आरोपी शौकत हुसेन गुरूला झालेल्या १० वर्षांच्या शीक्षेविरुद्ध चक्क अपील केले होते ...अनेक घोटाळ्यांचे आरोप या शांती भूषण साहेबांवर आहेत !!!

शांति भूषण यानी राज नारायण यांच्या वतीने इंदिरा गांधींच्या विरुद्ध खटला जिंकला होता तेंव्हा जगमोहन लाल सिन्हा हे जज होते!

२००२ मध्ये यानी अरुंधती रॉयच्या वतीने सरकार विरुद्ध दावा दाखल केला होता .

बेंगलोर म्हैसूर इन्फ्रा स्ट्रक्चर स्कम मध्ये देवेगौडा यांच्या वतीने ते कोर्टात कौन्सेलर म्हणून होते !!!

sagarparadkar's picture

7 Apr 2011 - 5:55 pm | sagarparadkar

>> स्वामी अग्निवेश यांनी " मध्यममार्ग निघू शकेल " असे काल उपोषणाच्या अवघ्या दुसरया दिवशीच सांगून मनात शंका मात्र निर्माण केल्या आहेत.

अरे कसलं काय आणि कसलं काय ... अजून फक्त १/२ दिवस थांबा. सरकार एखादं अगदी फडतूस आश्वासन देईल आणि आणा 'मोठ्या मनाने' उपोषण सोडून देतील. राजघाटावरून सुरुवात केलेय ह्यातच काय ते आलं.

'जालियनवालाबाग' हत्या़कांड करणार्‍या इंग्रज सरकारविरुद्ध 'चले जाव' म्हणून उभं केलेलं आंदोलन केवळ चार पोलिस कर्मचारी चौरीचुरात्ल्या दंगलीत मरण पावले म्हणून 'त्यां'नी मागे घेतलं होतं. तुरुंगातल्या खोलीत गाद्या-गिरद्या मांडून होईपर्यंत लापशी पिवून लाक्षणिक उपोषण करणार, असले तर आपले महात्मे ....

ह्यावेळी 'मोसंबी ज्यूस' कोण पाजणार एव्ह्ढाच काय तो प्रश्न आहे ... बघालच आता.

अवांतरः काही लोकांना उगाचच ट्युनिशिया आणि मध्य्-पूर्वेतल्या कुठल्या कुठल्या क्रांत्यांची आठवण होत आहे .... :)

अप्पा जोगळेकर's picture

7 Apr 2011 - 8:39 pm | अप्पा जोगळेकर

ओक्के. मग काय कराव असं तुमचं म्हणण आहे ? तलवार घेउन कुठे जाणार का तुम्ही लढाई मारायला?
बोलाची कढी ......

खालील लिंक पहा, केवळ 'लोकसत्ता'मधील लेख म्हणून सोडून देवू नये ही विनंति:

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=148...

अविनाशकुलकर्णी's picture

7 Apr 2011 - 10:55 pm | अविनाशकुलकर्णी

अण्णा हजारे हिरो झाले..
लाखो तरुण तरुणीच्या आदराचे प्रेमाचे स्थान झाले यात शंका नाहि..
टाईम्स टी.व्ही वरील कव्हरेज मी रोज सातत्याने बघत आहे..फेसबुक व इतर साईट्स वर अण्णांना लक्षावधी तरुण तरुणींचा व सामान्य ..मध्यमवर्गी......शाळेतल्या लहान मुले मुलींचा प्रतिसाद अभुत पुर्व आहे यात शंकाच नाहि..
बुद्धिबादी..सिनेनट..लेखक..वकिल..डॉक्टर्स अनेक लोकांनी पाठिंबा
दिला आहे.
बघता बघता अण्णांनी सारा भारत जिंकला..परदेषात लोकांनी दांडी मार्च काढला..
पुणे मुंबई अहमदाबाद..बंगलोर दिल्ली व अनेक शहरात वृद्ध...गृहिणी..मुले.. सारे आण्णांच्या समर्थनार्थ उतरले आहेत..
आमच्या पिढिने कै.जयप्रकाश यांचे आंदोलन पाहिलेले आहे..पण त्या आंदोलनात अनेक राजकिय पक्ष होते..अनेक मान्यवर दिग्गज त्यात सामील होते..
अण्णांच्या आंदोलनात तरुणांचा सहभाग व जनतेचा सहभाग हे वैशिष्ठ्य ठळक पणे दिसुन येते..अनेक इंजिनीअर..सॉफ्ट वेअर प्रोफेशन्स मधली मुले व मुली दिसुन आल्या..
कै.जय प्रकाश यांच्या नंतर एव्हढे मोठे जन आंदोलन बघावयास मिळेल असे वाटले नव्हते...
प्रत्येक तरुण तरुणी व शाळ्करी मुलांना आण्णा आपल्या भविष्या साठी लढा देत आहेत याची पक्कि खात्री आहे..
भ्रष्टाचारा बद्दलची चिड सा~यांनाच होति..पण आण्णांच्या नेत्रुत्वा मुळे व स्वछ्य भुमिका सा~यांनाच आपलेपणाची वाटते..
सरकाचे तेवर बदलले..नरमले..
अण्णांना डावलण वा बे दखल करणे आता शक्य नाहि..आता ते एकटे नाहित..
यातुन काहितरी चांगले घडेल व पैसे खाण्याला आळा बसेल असे वाटते.

अण्णा साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.
५ एप्रील ला ऊपवास केला होता. ऊद्या पुन्हा करणार्.समस,मेल द्वारे मित्रांना जाग्रुक करणे चालुच आहे.भ्रष्टाचाराविरुद्ध ही आग खुप लोकांच्या मनात खुप दीवसांपासुण खदखदत होती,बस कुणी तरी समोर होऊन लिडरशीप घेणारा पाहीजे होता.आ़ज अण्णा हजारे च्या नावाने तो लिडर समोर आला आहे आता आपल्याला त्यांना फक्त सपोर्ट करायचे आहे.

भारताला एक प्रगत देश झालेला बघायचे असेल ,भारताला जर उद्याचा सुपरपावर देश म्हणुन बघायचे असेल तर भ्रष्टाचार थांबवणे मस्ट आहे त्याशीवाय आपण प्रगत व्हायचे स्वप्न देखील बघु शकत नाही.

मान्य आहे की भारतात खुप प्रॉब्लेम आहे पण त्या सर्व प्रॉब्लेम ला साफ करायचे असेल तर कुठुन तरी सुरवात करणे गरजेचे आहे. जगातला कुठ्लाही देश असो,कुठ्लीही क्रांती असो ही त्या देशाच्या जनतेच्या सपोर्ट शिवाय घडुच शकत नाही आणि जर जनता फुल सपोर्ट ने बाहेर आली तर कुठ्लीही क्रांती घडू शकते हे ही तितकेच खरे,हे आपण ईजिप्त मधे बघीतलेच आहे.

ईतके दिवस आपण ह्या देशाच काहीच होऊ शकत नाही, ह्या भ्रष्टाचाराच काही होऊ शकत नाही असे म्हणतच आलो आहे आणी आज तुम्हाला एक संधी मिळाली आहे तर तुम्ही काय करणार आहे नुसतेच बोलत राहणार की काही करणार चॉईस तुमचा आहे.

आय एम सपोर्टींग अण्णा हजारे आर यु???

अविनाश कदम's picture

8 Apr 2011 - 2:05 am | अविनाश कदम

अण्णा हजारेंनी ज्या जनलोकपाल बिलासाठी आंदोलन चालवले आहे ते बील म्हणजे भ्रष्टाचारावरचा एकमेव व रामबाण उपाय नव्हे हे जनतेला माहित आहे. पण हे आंदोलन एकूण भ्रष्टाचाराविरुद्धच्या लोकांच्या असंतोषाचे प्रतिक बनले आहे. झेंडा बनले आहे. हे जनलोकपालबिलाच्या आंदोलनाबाबत विविध तांत्रिक व तात्त्विक मुद्दे उपस्थित करणार्‍या तथाकथित बुद्धिवाद्यांनी लक्षात घ्यायला हवे आहे. हे आंदोलन वाढले तर केवळ जनलोकपाल बिलापुरते मर्यादित न राहता एकूणच भ्रष्ट यंत्रणेविरुद्धच्या लोकाच्या असंतोषाचा उद्रेक होण्यामध्ये रुपांतरित होण्यास वेळ लागणार नाही. तसे होणे हेच या देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ठरेल.
एकूणच बाजारू, भ्रष्ट व मोकाट (मुक्त) अर्थव्यवस्थेच्या परिणामी जगभर जे आंदोलनाचे पेव फुटले आहे त्याची आता भारतीय राज्यकर्त्यांनी दखल घेण्याची गरज आहे.

आत्मशून्य's picture

8 Apr 2011 - 5:28 am | आत्मशून्य

.

विनायक बेलापुरे's picture

8 Apr 2011 - 9:35 am | विनायक बेलापुरे

आंदोलन एका व्यक्तीसाठी किंवा व्यक्तीचे नाही तर ते जनअंदोलन आहे. तसे जर ते चालले तर लवकरच मोठे अपयश पहावे लागेल. आणि भ्रष्टाचारी पुन्हा सुखनैव आपापल्या कामांत दंग होतील.

पिवळा डांबिस's picture

8 Apr 2011 - 9:48 am | पिवळा डांबिस

अण्णांचे आंदोलन कशासाठी...?
कशासाठी, इज्जतीसाठी.,,
सामाजिक प्रतिष्ठेसाठी.....
बाकी अण्णांनी आजवर इतकी आमरण उपोषणे सुरू केलीयेत आणि सोडलीयेत की या नव्या उपोषणातून समाजासाठी काही नवीन निघेल असं वाटत नाही!!!
अण्णांचं उपोषण सोडवायचंय ना, मग तिथे आपल्या पवारसायबांना पाठवा.....
त्यांनाही नाही जमलं तर मग आमच्या मनोहर जोशी मास्तरांना पाठवा.....
पार्टी कुठलीही असो, अण्णांच उपोषण सोडवणं सगळ्यांनाच जमतंय!!!!!
(सॉरी फॉर बीईंग हार्श बट ट्रू!!!!)
******
(गांधी इज रियली व्हेरी पुअर! बट इट कॉस्ट्स अ लॉट टू इंडियन गव्ह्र्नमेंट टू कीप हिम पुअर...... सरोजिनी नायडू)

अलख निरंजन's picture

8 Apr 2011 - 5:31 pm | अलख निरंजन

अरे भल्या माणसा निदान तू तरी असे म्हणु नकोस!!! माहितीचा कायदा कुणामुळे आला? संबंध भारतात हा भ्रष्टाचाराचा विषय ऐरणिवर कुनी आणला? राळेगणसिधी मधे उपाशी झोपायची लोकं. तिथुन आता परदेशात निर्यात करण्यापर्यंत स्थिती आली आहे. आणी काय मिळाले समाजाला असा प्रश्न विचारता?

आण्णा अजूनही देवळामधल्या एका खोलीत राहतत. पैसे कमवायला अमेरिकेला पळून गेले नाहीत.

पिवळा डांबिस's picture

8 Apr 2011 - 11:10 pm | पिवळा डांबिस

सर्वप्रथम 'भला म।णूस' म्हटल्याबद्दल धन्यवाद!

अण्णा हजारे हे एक वंदनीय समाजसेवक आहेत यात काहीच संशय नाही. ते निरिच्छ आहेत याविषयीही माझी पूर्ण खात्री आहे. मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे. माझी प्रतिक्रिया ही फक्त त्यांच्या आमरण उपोषणांच्या संदर्भात आहे...

माझ्या मते आमरण उपोषण हे अत्यंत तेज असं दुधारी हत्यार आहे. ते लोकांची मनं वळवण्याचं काम करू शकतं तसंच उपास जर नुसत्या आश्वासनांवर सोडला गेला तर ते उपोषणकर्त्यावरही उलटू शकतं. असं सारखं व्हायला लगलं की मग ते हास्यास्पद होतं. अंमळनेरच्या गिरणीतली टाळेबंदी उठावी म्हणून सानेगुरुजींनी आमरण उपोषण (मला वाटतं ४० दिवसांचं, चूभूद्याघ्या) केलं होतं. त्यांनाही अनेक नेते येऊन आश्वासनं देऊन गेले. पण त्यांनी टाळेबंदी प्रत्यक्ष उठेपर्यंत उपोषण जारी ठेवलं होतं, नुसत्या राजकीय नेत्यांच्या आश्वासनावर विश्वासून थांबवलं नव्हतं. राजकीय नेत्यांच्या आश्वासनावर जो विसंबतो त्याचा अपेक्षाभंग हा ठरलेला असतो...

राळेगणसिद्धी गावाची त्यांच्यामुळे प्रगती झाली याबद्दल मला आनंद आहे. पण अशीच प्रगती इतर काही नेत्यांनी आमरण उपोषणे वगैरे न करता आपापल्या मतदारसंघांची करून दाखवली नाहीये का? आणि त्यांनी जनजागॄती केली तर ते चांगलंच आहे. समाजसेवकांचं ते कार्यक्षेत्रच आहे जसं कायदे करायचं कार्यक्षेत्र हे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं आहे...

आता भ्रष्टाचाराच्या विषयाबद्दल! अण्णांनी हे उपोषण करून हा विषय ऐरणीवर आणला असं तुम्ही म्हणता. म्हणजे नेमकं काय केलं? भ्रष्टाचाराबद्द्ल देशातली लोकं यापूर्वी अनभिज्ञ होती का? या विषयावर त्यांच्यासारख्या समाजसेवकाने जनमत जागृत करणं मी समजू शकतो पण त्यासाठी आमरण उपोषण हे हत्यार प्रभावी होऊ शकतं का? सगळा भ्रष्टाचार नाहीसा होईपर्यंत उपोषण करत रहाणं शक्य आहे का? ते टँजिबल टार्गेट आहे का? म्हणजे मग कोणीतरी आश्वासन दिल्यावर त्यावर विश्वास ठेवून आमरण उपोषणाची सांगता करायची का? मग त्यांची विश्वसनीयता कमी होत नाही का?
जे आमच्यासारख्या अडाण्यांना सुचतं त्याचा अण्णांसारख्या जाणत्या माणसाने विचार करायला नको का?

अर्थात हे फक्त माझे विचार आहेत. ते सगळ्यांना पटलेच पाहिजेत असे नाही. आणि हे विचार फक्त आमरण उपोषणाच्या संदर्भात आहेत. ते कुणी केलं यावर नाहीत. आज या जागी अण्णा नसते, दुसरा कुणीही असता तरी ते बदलले नसते.

पैसे कमवायला अमेरिकेला पळून गेले नाहीत.
हे मस्त आहे!!:)
जे पळून गेलेले नाहीत त्यापैकी किती जण अण्णांच्या शेजारी बसून " अण्णा, तुम्ही या वयात असे हाल सोसून उपोषण करताय ते बघवत नाही मला, चला मीही तुमच्या शेजारी बसून आमरण उपोषण करतो!!" असं म्हणतायत? आमरण उपोषण हं, बाकी लाक्षणिक उपोषण, चक्री उपोषण, साखळी उपोषण वगैरे नाही कारण त्यात माझ्या मते काही अर्थ नाही...
कोणी अमेरिकेला पळून गेले असतील तर कुणी राअळेगणसिद्धीसारखी आपापली खेडी सोडून शहरात पळून गेले!!
शेवटी फरक फक्त मैलांचा!!!!

विकास's picture

8 Apr 2011 - 11:52 pm | विकास

सर्वप्रथम, अण्णांच्या आंदोलनाला माझा पाठींबा आहे आणि त्या अर्थाने कदाचीत पिडांशी मी असहमत आहे असे देखील कोणी म्हणू शकेल.

माझ्या मते आमरण उपोषण हे अत्यंत तेज असं दुधारी हत्यार आहे. ते लोकांची मनं वळवण्याचं काम करू शकतं तसंच उपास जर नुसत्या आश्वासनांवर सोडला गेला तर ते उपोषणकर्त्यावरही उलटू शकतं.
सहमत. साने गुरुजींची गोष्ट माहीत नव्हती. पण याचा अर्थ त्यांचे उपोषण यशस्वी झाले का? (हा खरा प्रश्न आहे, उपरोधीक नाही! हल्ली असे कुठेही लिहीताना स्पष्ट करावे लागते! :-) )

राळेगणसिद्धी गावाची त्यांच्यामुळे प्रगती झाली याबद्दल मला आनंद आहे. पण अशीच प्रगती इतर काही नेत्यांनी आमरण उपोषणे वगैरे न करता आपापल्या मतदारसंघांची करून दाखवली नाहीये का?

मला वाटते राळेगणसिद्धीपेक्षाही माहीतीच्या अधिकारासंदर्भातील अण्णांचे काम महत्वाचे आहे आणि ते इतर कोणी करायला गेल्याचे मला तरी माहित नाही.

आता भ्रष्टाचाराच्या विषयाबद्दल! अण्णांनी हे उपोषण करून हा विषय ऐरणीवर आणला असं तुम्ही म्हणता. म्हणजे नेमकं काय केलं?
"याला काही पर्याय नाही... हे असेच चालायचे" अशा प्रकारातील या संदर्भातील जी काही निराशा सामान्य मनाला होते, तिथे थोडी आशा पल्लवीत झाली आहे की यावर आवाज उठवून काहीतरी हादरे बसवू शकतो.

सगळा भ्रष्टाचार नाहीसा होईपर्यंत उपोषण करत रहाणं शक्य आहे का? ते टँजिबल टार्गेट आहे का? म्हणजे मग कोणीतरी आश्वासन दिल्यावर त्यावर विश्वास ठेवून आमरण उपोषणाची सांगता करायची का? मग त्यांची विश्वसनीयता कमी होत नाही का?

अहो अगदी उद्या अण्णांच्या म्हणण्यानुसार सगळे झाले तरी सर्व भ्रष्टाचार थांबणार नाही. तो कर्व अ‍ॅसेम्प्टोटीकच असणार (एव्हर अ‍ॅप्रोचेस बट नेव्हर रीचेस!). पण तरी देखील अशा डिकेइंग कर्वमुळे भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होत जाईल. मात्र अण्णा म्हणतात ते मान्य करणे राजकारण्यांना औपचारीक करार करावा लागेल आणि तेथे तो पूर्ण होण्यासाठी दबाव राहू शकतो. माझ्या दृष्टीकोनातून हे कुठे फसू शकेल? तर ते राजकारण्यांपेक्षा अण्णांच्या अनुयायांकडूनच फसू शकेल असे वाटते. कारण शेवटी अनुयायीच जास्त गोची करतात. :( तरी देखील ग्यानबा-तुकाराम म्हणत एक पाऊल पुढे आणि एक मागे करत पण ही दिंडी योग्य मार्गावर आणि ध्येयावर राहू शकेल असेच वाटते. म्हणून पाठींबा देयचा. कारण आत्ता पण जर काही झाले नाही, तर किमान नजीकच्या भविष्यापर्यंत जनतेत सिनिकलपणा वाढेल जे मारक ठरू शकते.

जसं कायदे करायचं कार्यक्षेत्र हे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं आहे...

पण योग्य कायद्यासाठी दबाव आणणे हे जनतेचे कार्यक्षेत्र/कर्तव्य आहे. तुम्ही-आम्ही अमेरिकेत बघत असतो काँग्रेसमन/सिनेटर्सना कसे इमेल, फॅक्सेस, फोन्सनी चावले जाते ते. आपल्याकडे ते शक्य नाही कारण पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत मत काय देयचे हा निर्णय त्या आमदार-खासदाराला नसतोच. त्यामुळे पक्षश्रेष्ठी ठरवणार म्हणून जनतेकडूनही असेच श्रेष्ठी लागतात...

जे आमच्यासारख्या अडाण्यांना...

सहमत. फक्त हा शब्दप्रयोग प्रथमपुरूष एकवचनी असावा अशी विनंती... ;) (ह.घ्या. जाता जात उगाच टपलीत मारत आहे!)

हे विचार फक्त आमरण उपोषणाच्या संदर्भात आहेत. ते कुणी केलं यावर नाहीत. आज या जागी अण्णा नसते, दुसरा कुणीही असता तरी ते बदलले नसते.

सहमत! फक्त त्याच्या उलट, म्हणजे "मरे पर्यंत खाऊ" अशी चळवळ आपले सत्ताधारी करत आहेत त्याचं काय? :( त्याला विरोध करण्यासाठी जो पर्यंत दुसरे शस्त्र, चळवळ तयार होत नाही तो पर्यंत चालूंदेत. यात कुठे हिंसाचार चालू नाही हे महत्वाचे.

कोणी अमेरिकेला पळून गेले असतील तर कुणी राअळेगणसिद्धीसारखी आपापली खेडी सोडून शहरात पळून गेले!! शेवटी फरक फक्त मैलांचा!!!!

सहमतच. कदाचीत बॉस्टनला असल्याने मी भारताच्या अधिक जवळ आहे म्हणेन. :) बाकी सध्या भारतात असलात तरी केवळ स्थानिक प्रश्नांकडेच लक्ष दिले पाहीजे असा सत्याग्रह चालू आहे. म्हणजे तुम्ही पश्चिमेतील (मुंबईकडील) असाल तर इशान्येकडे बघायचे नाही वगैरे. ;)

पिवळा डांबिस's picture

9 Apr 2011 - 12:08 am | पिवळा डांबिस

विकासव्या बर्‍याचश्या मुद्द्यांशी सहमत आहे! अगदी टपली सकट!!

आत्ताच वाचलेल्या बातमीनुसार केन्द्र सरकारने सुधारीत लोकपाल विधेयक पुढे आणायचे मान्य केल्यामुळे अण्णा आपले उपोषण शनिवारी सोडणार असे जाहीर झाले आहे....
अण्णा हजारेंचे हार्दिक अभिनंदन!!

प्रदीप's picture

9 Apr 2011 - 9:05 am | प्रदीप

प्रतिसाद आवडला. एक सोडून इतर सर्व विधानांशी १०० %सहमत.

हे विचार फक्त आमरण उपोषणाच्या संदर्भात आहेत. ते कुणी केलं यावर नाहीत. आज या जागी अण्णा नसते, दुसरा कुणीही असता तरी ते बदलले नसते.

सहमत! फक्त त्याच्या उलट, म्हणजे "मरे पर्यंत खाऊ" अशी चळवळ......

ह्याच्याशी असहमत आहे. "आमरण उपोषणाच्या संदर्भातील हे अगदी जनरल विधान आहे. ते कुणी केलं ह्यावर नाही"!! असे जनरलायझेन कसे करता येते? अगदी ट्रिव्हीयल उदाहरण द्यायचे झाले तर ह्याच अजब तर्कटानुसार सध्या मिपावर येणारी पिवळा डांबिसांची 'क्रमशः' कथा वाचण्यालायक नाही, कारण ह्यापूर्वी मिपावर अनेकांनी लिहील्या 'क्रमशः' कथा वाचनीय नव्हत्या, असे म्हणण्यासारखे झाले.

या विषयावर त्यांच्यासारख्या समाजसेवकाने जनमत जागृत करणं मी समजू शकतो पण त्यासाठी आमरण उपोषण हे हत्यार प्रभावी होऊ शकतं का? सगळा भ्रष्टाचार नाहीसा होईपर्यंत उपोषण करत रहाणं शक्य आहे का? ते टँजिबल टार्गेट आहे का? म्हणजे मग कोणीतरी आश्वासन दिल्यावर त्यावर विश्वास ठेवून आमरण उपोषणाची सांगता करायची का? मग त्यांची विश्वसनीयता कमी होत नाही का?

हा भ्रष्टाचार वर ऊपाय नाही तर तुम्ही सांगा ना काय ऊपाय आहे यावर तर??? आता तुम्ही म्हणाल मला माहीत नाही मि काय सांगु तर जो कोणी करत असेल त्याच्यावर असले प्रतीसाद देऊन ताशेरे ओढण्याचा तुम्हाला काही एक अधीकार नाही.

स्वॉरी फॉर बिईंग हार्श ;-)

आय एम विथ अण्णा आर यु??

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Apr 2011 - 12:48 am | निनाद मुक्काम प...

@पैसे कमवायला अमेरिकेला पळून गेले नाहीत.
इंग्रज जर स्वताच्या देशात राहिले असते .( काही पळून भारतात व्यापार किंवा नोकरी निमित्त गेले नसते )तर आज त्यांच्या भाषेत उच्च शिक्षण घ्यायची आपल्याला नौबत आली नसती .
आज युकेमध्ये सर्वात जास्त रोजगार टाटा पुरवतात हा काव्यगत न्याय आहे .अर्थात त्या कंपनीत भारतीय लोक भारतातून काम करायला टाटा ह्यांनी नेले तर त्या लोकांनी भारता बाहेर पळून गेले असे म्हणायचे की भारताचा मान देशात वाढवला .असे म्हणायचे .

तिसरीतील इतिहासातील वाक्य '' व्यापारी म्हणून आले नी राज्यकर्ते झाले ''
अमेरिकेत बलाढ्य ज्यू समूह अमरिकेत स्वधर्मियांसाठी देशाकरीता काय काय यत्न करतो. ह्याची कल्पना बहुतेक जणांना नाही आहे .
''अनिवासी भारतीयांनी भ्रष्टाचाराविरुद्ध दबाव गट बनवावा '',असे केनेडा मध्ये मेघा ताई म्हणाल्या ते योग्य आहे
.
कोणतेही चळवळ एका व्यक्तीच्या केन्द्री मर्यादित राहिली कि व्यक्तीपुजेचे स्तोम माजते, .
दबावगट( ज्यात अनेक मान्यवर व्यक्ती व संस्था कार्यरत असतात ) ते
परदेश व देशांतर्गत उभे राहिले पाहिजे ( मदतीला सोशल नेटवर्किंग चे दुधारी शस्त्र आहे .
आज अनेक अनिवासी भारतीयांनी आपल्यापरीने अण्णा हजारे ह्यांना आभसी जगतातून पाठिंबा दिला .व राहत्या देशात हा मुद्दा पोहोचवला .
आता ४जि चे तंत्रांद्यान अप्लावधीत भारतात येईन .त्यावेळी घोटाळा होणार नाही म्हणून डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे .
हजारे ह्यांचे अभिनंदन ( अहिंसक मार्गाने आंदोलन यशस्वी झाल्याचे दुसरे उदाहरण डोळ्यासमोर आहे .)
अवांतर - कुणी सांगावे जसा ओबामा राष्टाध्यक्ष झाला तसा एखादा विक्रम किंवा विजय सुद्धा अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर जाऊ शकतो .

प्रदीप's picture

9 Apr 2011 - 8:47 am | प्रदीप

आमरण उपोषण हे अत्यंत तेज असं दुधारी हत्यार आहे. ते लोकांची मनं वळवण्याचं काम करू शकतं तसंच उपास जर नुसत्या आश्वासनांवर सोडला गेला तर ते उपोषणकर्त्यावरही उलटू शकतं. असं सारखं व्हायला लगलं की मग ते हास्यास्पद होतं.

अण्णांच्या ह्याअगोदरच्या कुठल्या उपोषणांच्या बाबतीत हे लागू होते हे स्पष्ट करावे.

सगळा भ्रष्टाचार नाहीसा होईपर्यंत उपोषण करत रहाणं शक्य आहे का? ते टँजिबल टार्गेट आहे का?

उपोषणाचे ते टँजिबल टार्गेट नाही. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दिशेने काही ठोस पाउले उचलली जावीत. त्यासंबंधित जो कार्यक्रम आखायचा आहे, त्याबद्दल सरकारची जी भूमिका आहे, तिच्या निषेधार्थ उपोषण आहे, असा माझा समज आहे. तो चूक आहे तर तसे स्पष्ट सांगावे, आणि हजारेंनी भ्रष्टाचार निर्मूलन होईपर्यंत आपण उपोषण करू असे कुठेही म्हटले असेल तर ते कृपया निदर्शनास आणावे.

वपाडाव's picture

8 Apr 2011 - 5:54 pm | वपाडाव

(गांधी इज रियली व्हेरी पुअर! बट इट कॉस्ट्स अ लॉट टू इंडियन गव्ह्र्नमेंट टू कीप हिम पुअर...... सरोजिनी नायडू)

हे सर्वश्रुत आहे.
अन पिडाकाका +१०१ सहमती.
शेणाने सारवलेल्या घरात रोज बकरीचे दुध अन झोपण्यास ताडपत्री अन टिंबटिंबटिंबटिंब...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Apr 2011 - 6:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

काका, त्यांनी आमरण नाही तर निदान २-३ दिवसांची उपोषणे केली असतील, आपण (तुम्ही, आम्ही, सगळे) अर्धा दिवस तरी राहतो का उपाशी? लाक्षणिक का होईना एका दिवसाचे तरी उपोषण करतो का कधी? मिपावर येऊन मत टाकणे खूप सोपे आहे. अण्णा गेले साडे तीन दिवस उपाशी आहेत. आपण तीन पूर्ण दिवस उपाशी ज्या दिवशी राहून दाखवू, त्या दिवशी अण्णा सामाजिक प्रतिष्ठेसाठी हे करताहेत असा पर्याय वरील प्रश्नाला ठेवायचा हक्क मिळेल.

ज्या लोकांनी समाजसेवेसाठी आयुष्ये दिली आहेत त्यांच्या बद्दल तरी चांगले बोलूया ना.

(सॉरी फॉर नॉट बीईंग हार्श !!!!)

वि.मे.

मराठी_माणूस's picture

8 Apr 2011 - 7:17 pm | मराठी_माणूस

अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे , हा उपवास ते ईतरां साठी करत आहेत .

मिपावर येऊन मत टाकणे खूप सोपे आहे

वरील वाक्यात एक सुधारणा सुचवावीशी वाटते ती म्हणजे "मत टाकणे" ऐवजी "मताची पींक टाकणे"

sagarparadkar's picture

9 Apr 2011 - 9:04 am | sagarparadkar

>> अण्णा गेले साडे तीन दिवस उपाशी आहेत. आपण तीन पूर्ण दिवस उपाशी ज्या दिवशी राहून दाखवू, त्या दिवशी अण्णा सामाजिक प्रतिष्ठेसाठी हे करताहेत असा पर्याय वरील प्रश्नाला ठेवायचा हक्क मिळेल. <<

अण्णांविषयी पूर्ण आदर ठेवून एक विचारतो:

'टाईम्स नाऊ' वरील लाईव्ह कव्हरेज मधे ते ग्लासमधून कुठलेसे पेय पिताना दाखवले होते .... हल्लीची एकूण तर्‍हा पाहू जाता त्याबद्दल नाही म्हट्लं तरी जरा ... जाऊ दे शेवटी आम्ही पडलो पुणेकर ... :) :)

बरं वर आमरण उपोषणाचा विषय निघालाच आहे तर इथे उल्लेख करावासा वाटतोय.

"स्वातंत्र्यलढ्यादरम्यान कुठल्याशा मागण्यांसाठी गांधींनी नव्हे तर नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी खरोखरच प्राणांतिक उपोषण आरंभले होते. ह्या एकाच नेत्याची इंग्रजांना खरी भीती असल्याने इंग्रजांनी त्यांना तुरुंगात डांबून, जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न केला. त्यात ते दूध म्हणे त्याण्च्या फुफ्फुसांत शिरले आणि त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली ..." असं वाचल्याचं आठवतंय. अधिक प्रकाश आणि खंडन स्वाभाविकपणेच *त्ते चाचांकडून अपेक्षित आहे :)

प्रदीप's picture

9 Apr 2011 - 9:07 am | प्रदीप

नितीन थत्त्यांचे नाव घ्यायला तुम्ही का बुवा लाजता?

sagarparadkar's picture

9 Apr 2011 - 9:14 am | sagarparadkar

पण पूर्ण नामोल्लेख टाळून फक्त 'अंगुलिनिर्देश' करण्याची पुणेकरांची महान परंपरा टाळणं अजून तरी शक्य होत नाहीये ... :)

शिवाय उगाचच भलतं झेंगट कशालाओढवून घ्यावं? असा सूज्ञ (पक्षी पुणेकरी) विचार असतोच ना मनात कायम :)

अण्णांना जो प्रचंड पाठिंबा मिळाला तो त्यांच्या उपवासाच्या अस्त्राला समर्थन म्हणून नसावा तर भ्रष्टपणाचा जो नवा उच्चांक राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा, २-जी घोटाळा आणि आदर्श इमारत यातून सामान्य जनतेच्या डोळ्यापुढे आला त्याबद्दलचा तिचा तिरस्कार व त्याबद्दलची तिडीक याचे प्रतिबिंब होते असे मला वाटते.
एक शंका! लोकपालाने जर एकाद्या नेत्याला किंवा सनदी नोकराला शिक्षा सुनावली तर त्याला सत्र न्यायालयात, नंतर उच्च न्यायालयात व शेवटी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा हक्क असेलच. हे खरे असेल तर कुठलाही खटला १५-२० वर्षे subjudice राहील कारण भ्रष्ट मंत्र्यांकडे 'मोप' पैसा असल्याने ते कितीही खर्च करायला मागे-पुढे पहाणार नाहींत. मग लोकपाल या संस्थेच्या सार्‍या खर्चाचा भुर्दंड सामान्य माणसावरच नाहीं का पडणार?
त्या दृष्टीने काल विनोद बाणखेलेंनी जोडलेला श्री नायर यांचा लेख सर्वांनी नीट वाचावा. यातले काय साध्य झाले आणि काय नाहीं हे तपासावे आणि मग जया-पराजयाबद्दल काय ते ठरवावे.
आता तर भारताचे सरन्यायाधीश बालकृष्णन यांच्यावरही अनेक आरोप होत आहेतच! आज आपली न्यायसंस्थाही भ्रष्ट असल्याचे अनेक दुवे जालावर सापडतात.
आज चीनसारख्या लोकशाही नसलेल्या देशांतसुद्धा भ्रष्ट लोक आहेत व त्यांना गोळ्या घातल्या जातात, पण तरीही भ्रष्टाचार बंद होत नसावा कारण अशा गोळ्या घातल्याच्या बातम्या बर्‍याचदा वाचायला मिळतात.
जिथे एकाद्याला राजा किंवा रंक बनविण्याचा अधिकार नेत्यांना किंवा सनदी नोकरांना मिळतो तिथे भ्रष्टाचार येणारच! एका 'राजा'ने अलीकडेच कांहींना 'राजा' आणि भारत सरकारला 'रंक' नाहीं का बनवले?

नगरीनिरंजन's picture

8 Apr 2011 - 10:27 am | नगरीनिरंजन

दि ग्रेट इंडियन हायपोक्रसी!

प्रशु's picture

8 Apr 2011 - 10:37 am | प्रशु

सुमार केतकरांनी आपल्या निष्ठांशी जागत आजच्या लोकसत्तेत लेख लिहिला आहे....

बाकी अण्णांना पाठींबा...

VINODBANKHELE's picture

8 Apr 2011 - 10:48 am | VINODBANKHELE

सुमार केतकरांनी

खरोखरच सुमार आहे . १ नं . भिकार.....

अण्णांनी लिहिलेले पत्र.

http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1832

मराठी_माणूस's picture

8 Apr 2011 - 2:53 pm | मराठी_माणूस

आपल्या सर्वांच्या भल्यासाठी

रामपुरी's picture

8 Apr 2011 - 7:42 pm | रामपुरी

अध्यक्षपदासाठी.. गेला बाजार समितीत वर्णी लागण्यासाठी... तो सुरेश जैन एवढा बेंबीच्या देठापासून कोकलतोय . धूर दिसतोय तर कुठेतरी आग असणारच. गैरव्यवहाराचे आरोप तर सिद्ध झालेलेच आहेत. आणखी कुणाकुणाचं काय काय बाहेर येतय बघू...

रामपुरी's picture

9 Apr 2011 - 12:47 am | रामपुरी

मिळाली एकदाची अण्णाना पोळी.. अध्यक्षपद नसेना का समितीत तरी वर्णी लागली. सरकारी भत्ते आणि इतर सुविधा लागू झाल्या... अभिनंदन

कलंत्री's picture

8 Apr 2011 - 8:14 pm | कलंत्री

अण्णाबद्दल उलट्सुलट काहीही विचारप्रवाह असो, अण्णाच्या चांगुलपनाबद्दल मात्र सर्वांनाच खात्री असेल. एक सामान्य व्यक्ति सर्व देशात गांधींच्या मार्गाने एखादे आंदोलन जर निर्माण करत असेल तर त्यांना शुभेच्छा द्याव्यात असेच माझे मत असेल.

लक्षावधी लोकांनी एकत्र येऊन पणत्या लावल्या कि दिवाळी होते ,आणि सगळ्यांनी मिळुन पेटवायच ठरवलं कि कुणाचीही होळी करता येते.
चारुदत्त आफळे..

शेवटी अण्णांचा आणी जनतेचा विजय झाला.सरकारने अण्णां च्या ५ ही मागण्या पुर्ण मान्य केल्या.

अण्णा उद्या सकाळी १०:३० वाजता आपला ऊपवास सोडणार्.

अवांतार : मला ऊद्या ऊपवास करावा लागणार नाही ;-)

छोटा डॉन's picture

9 Apr 2011 - 12:18 am | छोटा डॉन

आण्णांचा विजय झाला ही चांगलीच गोष्ट आहे, अभिनंदन !

मात्र आण्णा हजारेंचा विजय साजरा करताना प्रत्येकाने हा लोकशाही तत्वांचा विजय आहे न की लोकशाहीने निवडुन आलेल्या सरकारचा पराभव आहे हे लक्षात ठेवले पाहिजे ...
लोकशाही आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरणाचा आग्रह धरताना लोकशाही पद्धतीने निवडुन आलेल्या सरकारच्या पराभवाचा दावा करण्याचा अभिनिवेष चुकीचा आणि हास्यास्पद आहे ...

- छोटा डॉन

लोकशाही आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरणाचा आग्रह धरताना लोकशाही पद्धतीने निवडुन आलेल्या सरकारच्या पराभवाचा दावा करण्याचा अभिनिवेष चुकीचा आणि हास्यास्पद आहे ...

मला तरी असे ईथे कोणी म्हटलेले दीसत नाही.

छोटा डॉन's picture

9 Apr 2011 - 12:40 am | छोटा डॉन

इथे कोणी लिहले आहे असे मी म्हणले नाही.

मात्र गेल्या काही तासात काही संकेतस्थळे ( मराठीच असे नव्हे, इतरही ), फेसबुक आणि ट्विटरवरचे अतिउत्साही स्टेटस मेसेजेस ह्यावरुन 'केंद्र सरकार झुकले, दिल्ली नमली, आण्णांसमोर दिल्लीचे लोटांगण' असे गंमतशीर मेसेजेस दिसले म्हणुन आम्ही लिहले.
असो, वाक्याचा अर्थ समजुन घ्या प्लीज, धन्यवाद :)

- छोटा डॉन

नि३'s picture

9 Apr 2011 - 1:02 am | नि३

ओके...भापो..

धन्यवाद :-)

सूर्याजीपंत's picture

9 Apr 2011 - 6:33 am | सूर्याजीपंत

या सगळ्या प्रकारात अण्णांचा आणि लोकांचा विजय झाला असा मला काहीही वाटत नाही. उलट यात कॉंग्रेसच्या राजकारणाचाच विजय आहे. कॉंग्रेसनी एवढी मोठी होत असलेली चळवळ फक्त ४/५ दिवसात गुंडाळली. आता एकदा समिती गठीत झाली कि हा विषय पूर्णपणे बंद होईल. आणि अण्णांच्या मागण्या आणि त्यांचा मार्ग म्हणाल तर मला काही ते पटलेलं नाहीये. अण्णा लोकपालाला संसदेपेक्षा मोठा करायला निघालेत जे देशाच्या संविधानाच्या मुळावर येणारं आहे. आणि समजा असा अनिर्बंध अधिकार असलेला लोकपाल उद्या जन्माला आला आणि त्यांनी काही नवीन गोंधळ घातला तर त्याची जबाबदारी अण्णा घेणार का ? लोकांना त्यांनी नवीन मार्ग दाखवून दिलाय, आपल्या काहीही मनाविरुद्ध झाला किंवा मनासारखा झाला नाही कि बसा उपोषणाला आणि धरा सरकारला वेठीस. अण्णा हजारेंचा हेतू स्वच्छच आहे, पण त्यांचा मार्ग काही पटत नाही बुवा.

sagarparadkar's picture

9 Apr 2011 - 8:51 am | sagarparadkar

असंच म्हणतो.

उलट आता ह्या लोकपाल विधेयकाचे दोन्ही मसुदे पुढील ५०-६० वर्षं बासनांत गुंडाळून ठेवले जातील :)

अविनाशकुलकर्णी's picture

10 Apr 2011 - 10:20 am | अविनाशकुलकर्णी

समजा असा अनिर्बंध अधिकार असलेला लोकपाल उद्या जन्माला आला आणि त्यांनी काही नवीन गोंधळ घातला तर त्याची जबाबदारी अण्णा घेणार का ?
...............................................................
अनिर्बंध अधिकार असलेल्या संसदेने कईक लाख कोटी रुपये हडपले कईक रु परदेशी देशी ब्यंकेत..जमीनि हदडल्या..हदड हदद हादडल....त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यांना शिक्शा झाली का? कोणत्या मंत्र्याला अटक वा पैशाची वसुली झाली का?
जबाबदारी कुणी घेत नाहि..म्हणुन लोकपाल हवाच..

भ्रष्टाचार विरोधात मी आणि माझे मित्र अण्णांच्या विचारांच्या सोबत आहोत. UK वरून आमचा त्यांना पाठींबा आहे.

अण्णांनी अन्नग्रहण केल्यानंतरच आम्ही अन्नग्रहण करू. तोपर्यंत आम्ही देखील इथे उपोषणावर आहोत.

मराठी_माणूस's picture

10 Apr 2011 - 9:45 pm | मराठी_माणूस

वर काही लोकांचे प्रतीसाद वाचुन असे वाटते की बरे झाले असे लोक गांधींच्या काळात नव्हते , नाहीतर त्यानी गांधींचे असे उपोषण म्हणजे ब्रिटीशांवर अन्याय आहे , ह्यातुन काय साध्य होणार वगैरे ...

उपोषण हा एकप्रकारे आत्महत्येचाच प्रकार. उपोषण केल्यावर सरकारवर किती दबाव येतो? उपोषणाच्या आंदोलनावर बंदीच घातली पाहिजे. किंवा त्याविरोधात कडक कायदा करायला हवा. गांधीच्या काळात ठिक होते. इंग्रज इतके निर्लज्ज आणि बनेल व गेंड्याच्या कातडीचे नव्हते. हे सरकार एखाद्याचा जीवच जाऊ देईल. म्हणून आता हा उपोषणाचा मार्ग कुणी अवलंबू नव्हे. अण्णांना यश मिळलं आता उपोषणाची लाटच येईल.

माझ्या आधीच्या एका प्रश्नाला कुणीच उत्तर दिलेले नाहीं. तो प्रश्न होता कीं लोकपालाने दोषी ठरवून एकाद्याला शि़क्षा सुनावल्यास त्या व्यक्तीला या लोकपालाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे काय? असल्यास त्याच्या निकालाचे ’भिजत घोंगडे’ होणार नाहीं यासाठी कांहीं तरतूद आहे काय? नसल्यास या पदाचा काय उपयोग?
तसेच जर खरोखरच लोकपालाचे पद निर्माण झाले तर त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत (Agenda) संयुक्त राष्ट्रसंघाच्या भ्रष्टाचारविरोधी परिषदेने (UN convention against corruption) केलेल्या ठरावाचे अनुसमर्थन (Ratification) करण्याचा मुद्दा सर्वप्रथम घ्यायला हवा म्हणजे आपल्या ’आदरणीय’ नेत्यांनी स्विस बॅंकेत ठेवलेले पैसे परत आणायला मदत होईल!
तसेच या प्रकारात उद्योगपतींनासुद्धा सोडता कामा नये कारण भ्रष्टाचाराचे मूळ तिथेच आहे कारण लांच द्यायला पैसे त्यांच्याचकडेच असतात!