ठाणे खादाडी कट्टा

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
7 Apr 2011 - 10:48 am
गाभा: 

ठाण्यात कोल्हापुरी मटणताटे आणि तांबडा पांढरा रस्सा ओरपण्यासाठी मिपाकरांना ठाणेरी निमंत्रण.

("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे. ;))

ठिकाण : पुरेपूर कोल्हापूर, राम जानकी हाउसिंग सोसायटी, घंटाळी मंदिरानजीक, घंटाळी रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) पिन - ४००६०२
दिवस : शनिवार ९ एप्रिल २०११
वेळः संध्या ८ वाजता.

मेनू: अनलिमिटेड थाळ्या :

शाकाहारी थाळीही अत्यंत उत्तम असते. ठेचा / खर्डा / झुणका आणि ऑफबीट काहीतरी, तेव्हा शाकाहारींनी मागे राहण्याची अजिबात गरज नाही.

प्लीज प्लीज प्लीज, येणार हे मला व्यनीने आणि "९८१९४२३४०६" या क्रमांकावर फोन किंवा सरल मोबाईल संदेशाने कळवावे.

१५ एप्रिल रोजी संध्याकाळी फायनल यादी क्लोज केली (केल्या) जाईल. या हाटेलीत जागा मर्यादित असल्याने त्या आधी अडवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपली उपस्थिती आधीच कन्फर्म करणे अनिवार्य होऊन बसले आहे.

पुण्यातील मंडल्लीना सुद्धा मानाचे निमंत्रण :D

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Apr 2011 - 11:00 am | प्रचेतस

पुणे कट्टयाच्या एक दिवस आधी ठाणे कट्ट्याचे आयोजन केल्याबद्दल स्पा यांचा जाहिर निषेध.
आम्हास आदल्या दिवसापासून उपास करणे असल्यामुळे ठाणेरी आमंत्रणाचा स्वीकार करणे अशक्य आहे.
शाकाहारी थाळीत फक्त इतकाच मेनू असल्याने एकंदरीत शाकाहारी मंडळींचे हाल होणार हे तर उघड आहे.:)

शाकाहारी थाळी अत्यंत उत्तम असते.

त्यात भरली वांगी, झुणका, झणझणीत उसळ, पुलाव, भाकरी आणि इतरही चांगले आयटेम असतात. शिवाय या ठिकाणी न दिलेले काही आयटेम्स सेपरेटही मागवता येतात ज्याला हवे तसे.

शिवाय सर्व थाळ्यांना सोबत अनलिमिटेड पोह्याचे पापड / कुर्डया / तळलेली मिरगुंडे अशी झकास अकंपनीमेंट असते.

थाळीमधे तांबडा /पांढरा रस्सा / चपात्या / भाकरी वगैरे अनलिमिटेड असल्याने ती सोयीची पडते.

धनगरी मटणताट रेकमेंडेड.

शिवाय "निशाणा तुला दिसला ना.. , मंगला ग मंगला.." अशी मराठमोळी झकास गाणीही असतात.. ;)

प्रचेतस's picture

7 Apr 2011 - 11:09 am | प्रचेतस

शाकाहारी थाळी अत्यंत उत्तम असते.

मग तर यायलाच पाहिजे. पापड, मिरगुंडे झकासच.

धनगरी मटणताट रेकमेंडेड.

:( शाकाहारी असल्यामुळे उपयोग नाही.

शिवाय

पुरेपुर कोल्हापूर मध्ये मिसळ नाही का मिळत?

शिंच्या वल्ल्या, तु शाकाहारी हैस का?
हे कधी सांगणार !!!
नाय्तर मला लैच एक्टं एक्टं झाल्यागत वाटत हुतं न बे...
मले एक मैतर गटल्याचा लैच आणंद होउन राहिला ना...

प्रचेतस's picture

7 Apr 2011 - 12:42 pm | प्रचेतस

शाकाहारीबी बरेच हैत. सरुटॉबानेला कळलंच तुला. :)

वपाडाव's picture

7 Apr 2011 - 11:42 am | वपाडाव

.

मृत्युन्जय's picture

7 Apr 2011 - 12:36 pm | मृत्युन्जय

पुण्यात गल्लोगल्ली उघडलेत रे हे पुरेपुर कोल्हापुरवाले.

१. पौड रोडवर - राज मोटर्स शेजारी

२. सदशिव पेठ - नागपुर खानावळ लेन, पेरुगेट पोलिस चौकीपाशी

३. एरंडवणे - अभिषेक होटेल च्या बाजुला, मेहेंदळे गॅरेज जवळ.

४. कोथरुड - हॉटेल मिर्च मसाला शेजारी, डहाणुकर कॉलनीपासुन २०० मीटर वर

अजुन १-२ ठिकाणी आहे. पण आत्ता नीटसे आठवत नाही. शिवाय नळ स्टॉपला त्यांचे मिसळ जॉइंट पण आहे (जे पुण्याच्या परंपरेला जागुन बहुधा सकाळी ११ वाजताच बंद होते)

शाकाहारी जेवण मात्र सुरेख.

प्रचेतस's picture

7 Apr 2011 - 12:44 pm | प्रचेतस

चिंचवडला पण नुकतेच उघडलेले आहे. पदमजी पेपरमिलच्या समोर.

शिवाय जगातभारी कोल्हापुरी म्हणून पण कायसे ते आहे. अख्खा मसूरसाठी प्रसिद्ध.

नाव नका काढु त्या अख्खा मसूरचं. मागेच आपल्या अभिजितांनीं त्याच रसभरीत अनुभव वर्णन केलय.

वपाडाव's picture

7 Apr 2011 - 6:04 pm | वपाडाव

शप्पथ गणपाराव... येक लंबर बक्वास वाटलं मला ते होटेल...
पुन्हातिकडं जाणार नाही.. वाटल्यास उपाशी राहीन..
अन आता त्या डिशची किंमत (प्रत्येकी) १००/- येइल इतकी वाढलीये..

ठाणे कट्टा उद्या ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे
आज कृपया १२ वाजेपर्यंत नावे नोंदवावीत.

आतापर्यंतची लिस्ट

गवि
रामदास काका
खादाड अमिता
सर्वसाक्षी
लीमौजेट
स्पा
सुधांशू देवरुखकर
विश्वनाथ मेहेंदळे
विजुभाऊ
मिसळलेला काव्यप्रेमी

तात्या
वपाडाव
फिक्स

आता निखील देशपांडे, प्रभू गुर्जी होल्ड वर आहेत

हे व्हायरल मार्केटिंग तर नव्हे?
कारण हर्षद भाऊंनी 'सरूटॉबाने'चे निमंत्रण देताच लगेचच त्याच्या आदल्या दिवशीसाठी हे निमंत्रण आले. :)

असं वाटण्याचं कारण म्हणजे मेनु कार्ड दिलेलेच आहे. बरं निमंत्रकांना स्वत:च्या खिशातून काहीच द्यायचं नाहिये, उलट जेव्ह्ढी अधिकाधिक माणसं ह्या आमंत्रणावरून तेथे येतील तेव्ह्ढे .... जाऊ दे शेवटी आम्ही पडलो पुणेकर ... :-) :-) :-)

गवि's picture

7 Apr 2011 - 12:33 pm | गवि

जाऊ दे शेवटी आम्ही पडलो पुणेकर

+१००००००००

मेनु कार्ड दिलेलेच आहे.
याला म्हणायचे टोटल ट्रान्स्परन्सी

स्पा's picture

8 Apr 2011 - 9:04 am | स्पा

.

विनायक बेलापुरे's picture

7 Apr 2011 - 11:05 am | विनायक बेलापुरे

धन्यवाद निमंत्रणाबद्दल.

'पुणेरी' असून त्यादिवशी सरुटॉबा ला जाउ शकत नाही आहे तर 'ठाणेरी' बेत गाठणे केवळ अशक्यच .

पण त्यादिवशी खुद्द (पुरेपुर) कोल्हापुरातच आहे त्यामुळे तिथे तुमच्या नावाने जेवेन.
(पण बिल मात्र तुमच्या खात्यावर चढवणार नाही ) ;)

तुम्ही पण मस्त जेवा, मजा करा आणि सचित्र-सटीप वृत्तांत येउद्या.

नन्दादीप's picture

7 Apr 2011 - 11:10 am | नन्दादीप

धन्यवाद निमंत्रणाबद्दल.

यायच होत पण मरोळ हून ७.३० ला निघून ८ पर्यंत नौपाड्याला पोचणे केवळ अशक्य...!!!!

तरीपण ठाणेरी कट्ट्याला जोर्दार पाठिंबा.........!!!! हाणा तिज्यायला...

यायच होत पण मरोळ हून ७.३० ला निघून ८ पर्यंत नौपाड्याला पोचणे केवळ अशक्य...!!!!

तेजायला कारण कशाला देतोय बे
६ ला निघ ना :)

नन्दादीप's picture

7 Apr 2011 - 11:20 am | नन्दादीप

बघतो.... आता पोट दुखवायला लागणार बहुतेक....नायतर दुपारपासून डोस्क्याला बाम फासून बसाव लागणार बहुतेक...

सखी's picture

7 Apr 2011 - 7:17 pm | सखी

अय्या! तुम्ही पोट दुखायला लागल्यावर डोक्याला बाम लावता? मग थांबत का पोट? :)

सुहास..'s picture

7 Apr 2011 - 7:35 pm | सुहास..

अय्या! तुम्ही पोट दुखायला लागल्यावर डोक्याला बाम लावता? मग थांबत का पोट? >>>

=))=))=))=))=))
=))=))=))=))
=))=))=))
=))=))
=))

संदीप चित्रे's picture

8 Apr 2011 - 1:08 am | संदीप चित्रे

गाणं पाहिल्यापासून मला वाटायचं की बाम डोक्याला नाही आणि पोटालाही नाही , भलत्याच जागी लावायचा असतो ;)

सहमत आहे . पण मुन्नीसारखा बाम लावताना ज्यांचे हात थरथरतात त्यांनी काळजी घ्यायला हवी. .. उगाच थरथरत्या हाताने भलतीकडे झंडुबाम लागायचा आणि बामस्फोट व्हायचा .. का हो चित्रेसाहेब :)

- मुन्ना बदमाश

गवि's picture

7 Apr 2011 - 11:16 am | गवि

तिथे मी अनेकदा जेवलो तेव्हा ती थाळी (सुके मटण , मुख्य डिश सोडून) अनलिमिटेड असल्याचंच मला दिसलं. कारण ते गरम गरम पोळ्या आणि रस्से आणून वाढत होते. मी लागेल तेवढ्या खाल्ल्या आणि तरीही बिल मेन्यूतल्या किंमती एवढेच आले.

पण हा मेन्यू बघता त्यात स्पेसिफिकली २ चपात्या / १ भाकरी असं काही लिहिलेलं दिसतंय. तेव्हा अनलिमिटेडपणाबद्दल खात्री नाही म्हणून डिक्लेरेशन देत आहे..

पण जे काही थाळीत असते ते संपत नाही आणि पोटभर होते एवढे नक्की. तांबडा आणि पांढरा रस्सा अनलिमिटेड असतो एवढं नक्की.

मृत्युन्जय's picture

7 Apr 2011 - 12:38 pm | मृत्युन्जय

अर्रे त्या ३ चपात्या ६ के बराबर असतात रे. मीए कधी २ च्या वरती नाही खाउ शकलो तिथे.

वपाडाव's picture

7 Apr 2011 - 11:46 am | वपाडाव

मले बी येउ वाटुन राहिलं तिकडे...
तुमी बोलावलंय पण कसं जमन...
काहीतरी करायलाच फैजे...
(मायला बिल लैच कमी है ना राव तुमचं , पन तरीबी जाणं-येणं खाणं ७०० च्या घरात जौन राहिलं..)

स्पा's picture

7 Apr 2011 - 11:48 am | स्पा

हर्षद साहेब येतायेत
त्यांच्याबरोबर ये...

कमी खर्चात येशील

माझे घर पुण्याला ..( सयाजी चय जवळच )
आणि माझी रुम ऐरोली मध्ये ...( ठाण्या जवळ)

पण दोन्ही निमंत्रणामध्ये फक्त १ दिवस अंतर असल्याने बरोबर वाटले नाही..
एक आठवडा अंतर हवे होते म्हणजे दोन्हीकडची मज्जा घेता आली असती ..
बाकी पुणे -मुंबई- ठाणे असल्या गोष्टींमध्ये न पडता दोन्ही कडची मज्जा घेत राहायला आवडते ...
बघु कसे मॅनेज होते ते

- गणेशा

येईनसं दिसतंय, कळवूच काय ते!! :D

बाकी नाव पुरेपूर कोल्हापूर असल्याने शंका होती तिथं काही घासफूस असतं का नाही !! आता स्पावड्याने अख्खं मेन्युकार्डच दिलंयन् म्हणताना विचार करायला हरकत नाही.

काही मंडल्लीना दोन्हीकडचा कट्टा अटेंड करायचा आहे
अशा वेळी जर ठाणे कट्टा एक आठवडा पुढे टाकला टाकला, तर ती मंडळीही येऊ शकतील
शिवाय काही साहेबांना १६ ला मिटींग्स आहेत, सो त्यांनी सुद्धा एक आठवडा पुढची तारीख मागितली आहे

काय करायचं बोला

सूड's picture

7 Apr 2011 - 1:01 pm | सूड

सगळ्यांच्या अडचणी (पक्षी: प्रॉब्लेम्स) सांभाळून घ्यायला हवेत, उद्याच्या शन्वारीच कट्टा केला तर ??

वपाडाव's picture

7 Apr 2011 - 6:06 pm | वपाडाव

आम्ही १२वी पास झालेलो आहेत..
त्यामुळं आम्हाला अडचणी येत नाहीत..

स्पा's picture

7 Apr 2011 - 1:03 pm | स्पा

क्या बात क्या बात .....

शुभस्य शीघ्रम

बाकी गवि सुद्धा प्लानिंग कमिटी मध्ये असल्याने त्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल

परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत हा निरोप पोचणार नाही (रोज मिपावर न येणारे मिपाकर).

खूप शॉर्ट नोटीस होईल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Apr 2011 - 2:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काय ते लवकर ठरवा बॉ!!

परवा भेटल्याने अनेकजणांपर्यंत हा निरोप पोचणार नाही (रोज मिपावर न येणारे मिपाकर).

खूप शॉर्ट नोटीस होईल.
मला काही तसे वाटत नाही.
शक्य असेल त्याना फोनवरून निरोप देता येईल की.
मी दिल्लीऊन ठाण्याला येवू शकतो तर तिथले मेंबर्स सहज येवू शकतील की

गवि's picture

7 Apr 2011 - 2:45 pm | गवि

या शनिवारचं ठरलंच आहे.

स्पावड्या थोड्यावेळात अद्ययावत करेल ही पोस्ट.

वेळ ठिकाण तेच, दिवस बदलला.

मी दिल्लीऊन ठाण्याला येवू शकतो तर तिथले मेंबर्स सहज येवू शकतील की

आहो विजुभाऊ .. तुमच्या डोक्यावर सोनियाजींचा हात आहे .. शिवाय तुम्ही णारद मुणी .. "नारायण नारायण " म्हणता हवं तिथे प्रकट होउ शकता .. :)
बाकी सामान्य लोक आहेत हो :)

दिल्लीत उपोषण सत्र सुरु झाले तर विजु भाऊ नी थेट ठाणे गाठले.

स्पा's picture

8 Apr 2011 - 3:26 pm | स्पा

हा हा हा हा

स्पा's picture

7 Apr 2011 - 2:29 pm | स्पा

या शनिवारीच ठरलं आहे

आतापर्यंतचे मेंबर

गवि
विजुभाऊ
स्पा
सुधांशू
लीमौजेट
हर्षद (५०% चान्सिस)
गणेशा

कुंदन's picture

7 Apr 2011 - 2:54 pm | कुंदन

खूप शॉर्ट नोटीस झालीये.
मी २१ एप्रिला ला येतोय , तेंव्हा करा की.

आयला कुंड्या तू पण येतोस का काय?

आपण नंदी प्यालेस ला जाऊ मग खादाडीला

सूड's picture

7 Apr 2011 - 2:59 pm | सूड

३% नी स्पॉन्सर करत असाल तर विचार करु !! काय स्पा ?? ;)

वा कुंद्या ३% तू देत अशील तर धमाल येईल बे :D

धमाल ने होकार दिलाय का येण्याबद्दल ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Apr 2011 - 3:32 pm | बिपिन कार्यकर्ते

गप र्‍हाय रे भौ! कुढं कट्टागिट्टा करते? पैशे द्यावे लागतीन ना बे!

;)

कुंदन's picture

12 Apr 2011 - 5:35 pm | कुंदन

ब्वॉर.......
दुबैला येशीन तेंव्हा सांगजो , अढीच करु कट्टा.

मला यायचेच होते ,, विशेषकरुन सर्वांना भेटायचे होते ..
पण आधीच्याच प्लॅन नुसार आज मुंबईवरुन पुण्यात आनि नंतर बारामतीला जाणार असल्याने या शनिवारी जमणार नाही.
२३-२४ किंवा ३०-१ या तारखेला प्लॅन असता तर तसे कामे पुढे मागे केली असती नक्की.

असो शुभेच्छा.. एकट्याच्या म्हणण्याने काही बदलवु नका..
बेटर लक नेक्स्ट टाईम ...

- गणेशा

गवि's picture

7 Apr 2011 - 3:01 pm | गवि

लागले खात्रीचे मेंबर गळायला... :(

गवि फिकीर नोट...
जे मेंबर खात्रीदायक नव्हते ते येत आहेत

गणेशा's picture

7 Apr 2011 - 3:08 pm | गणेशा

नाहि हो गवि ...
माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन मी एकदा येणार म्हंटल्यावर कधीच नाहि म्हणुन पलटत नाही.
पण मला खरेच माहित नव्हते या शनिवारी तुम्ही ठरवत आहात ते .. स्पा ने आत्ता सांगितल्यावरच कळाले. मला वाटले तुम्ही नेक्ट शनिवारी ठरविनार असाल.
तरीही एकट्यासाठी प्लॅन चेंज करावा हे माझे मत कधीच नसते... त्यामुळॅ काहीच बोलत नाही. असे बरेचसे ऑर्गनाईज केलेले आहेत गेट टुगेदर त्यामुळे सगळॅ अनुभव आहेत.
उलट १६ लाच ठेवले असते तर मी सयाजी कॅन्सल करणार असे ठरवले होते .. असो ..
शुभेच्छा...
भेटत तर राहुच ...

येथे आज आल्या आल्याच तसा रिप्लाय दिला होताच ( http://www.misalpav.com/node/17555#comment-304535) की सोमवार पर्यंत नाहीये ते.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Apr 2011 - 3:10 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अहो, कांदेपोह्यांचा कार्यक्रम सोडून कसा येईल तो?
तुम्ही पण ना गवि....

कसले काय .. गावाला काम आहे म्हणुन जातो आहे.
कांदेपोह्याचे कार्यक्रम नाहियेत आता येव्हड्यात .. जरा नंतर बघणार आहे.

उलट ज्यांना बारामतीला ला यायचे असल्यास चला .
पवार साहेबांकडे नाही न्हेणार .. आधीच ते अन्न आनि अण्णा यांच्यामुळे काळजीत आहेत

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Apr 2011 - 3:24 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अरे बाबा नुसते काळजीत नाही. फेफरे यायची वेळ आली आहे त्यांना.
(वरील प्रतिसाद अवांतर असल्यास उडविला तरी हरकत नाही!!)

तू येणार आहेस का ते सांग आधी, नुसतं अवांतर टाकत बसू नकोस

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Apr 2011 - 3:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

येणार तर!! ठाण्यात राहायचे आहे मला अजुन बरीच वर्षे...
तुमची आज्ञा खाली पाडून कसे चालेल? :-|

स्पा's picture

7 Apr 2011 - 3:48 pm | स्पा

आतापर्यंतचे मेंबर

गवि
विजुभाऊ
स्पा
सुधांशू
लीमौजेट
हर्षद (५०% चान्सिस)
रामदास काका
मिसळलेला काव्यप्रेमी
विश्वनाथ मेहेंदळे
बिका

पप्पुपेजर's picture

7 Apr 2011 - 2:47 pm | पप्पुपेजर

मेनू पाहून तर राहवले जात नाही आहे असुदे कट्याला शुभेच्छा !!!!!

कट्टा या शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता जमत आहे
जे कोण येणार असतील त्यांनी फायनल काय ते मला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कळवा
कारण सीट्स आधी बुक कराव्या लागतील
ओक्के?

सूड's picture

7 Apr 2011 - 2:53 pm | सूड

>>जे कोण येणार असतील त्यांनी फायनल काय ते मला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कळवा

सूचना का धमकी म्हणायची ही ?? ठाकुर्लीचं पाणी !! दुसरं काही नाही . :D

मृत्युन्जय's picture

7 Apr 2011 - 3:01 pm | मृत्युन्जय

जे कोण येणार असतील त्यांनी फायनल काय ते मला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कळवा
कारण सीट्स आधी बुक कराव्या लागतील

हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ . हेच कोणी पुणेकराने म्हटले असते तर पुणेद्वेष्टे बाह्य सरसावुन पुढे निघाले असते. (आणि आता तेच पुणेद्वेष्टे पुणेरी लोक याहुन जास्त खडुस कसे बोलले असते याबद्दल लिहितील)

"जास्तीत जास्त मित्रांनी यावे अशी विनंती करतो. अगत्याचे निमंत्रण दिले आहे. अगदी हातातले एखादे काम जितके टाळता येईल तितके टाळूनही या दोस्तांच्या कट्ट्यावर यावे. सर्व गावांहून जे दोस्तलोक येणार आहेत त्यांनी उद्या सकळी अकरापर्यंत स्पा कडे नावे कळवल्यास सर्वांनाच फारच सोयीचे होईल..यामुळे सर्वांना आरामात बसता येण्याची खात्री करुन घेता येईल..."

(ठाणेरी) गवि.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Apr 2011 - 3:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे

वा गवि. छान प्रतिसाद.

@मृत्युंजय
हा बघा ठाणेरी आणि पुणेरी माणसातील फरक. इथे एखाद्या पुणेकराने (to be precise माझ्या माहितीतील काही पुणेकरांनी) "वर लिहिले तेच बरोबर आहे. हे असेच लिहायला हवे........" असे बरेच काही लिहिले असते. ठाणेरी माणसाने पटकन सुधारून घेतले की नाही. आत्ता बोला ;-)
(समस्त पुणेरी मित्र हलके घेतील अशी अपेक्षा किंवा त्यांनी हलके घ्यावे ही विनंती)

मुंबैकर
वि.मे.

यामुळे सर्वांना आरामात बसता येण्याची खात्री करुन घेता येईल..."

गवि.. बघा पुन्हा शब्द वळवु नका...

यामुळे सर्वांना आरामात टेकता येण्याची खात्री करुन घेता येईल..."

अशी सुधारणा करतो.. :)

मृत्या पिस्तुल से काट दाळूंगा :D

हें कधीपासनं सुरु केलं म्हणें ??

विजुभाऊ's picture

7 Apr 2011 - 5:39 pm | विजुभाऊ

हॅ हॅ हॅ हॅ हॅ हॅ . हेच कोणी पुणेकराने म्हटले असते तर पुणेद्वेष्टे बाह्य सरसावुन पुढे निघाले असते.
तेच वाकु पुणेकरानी असे म्हंटले असते." ज्याने त्याने आपापल्या जबदारीवर येण्या आणि जाण्याची व्यवस्था करावी.
आयोजक ७:१५ पर्यन्त पोहोचतील. ७:१७ नन्तर आलेल्या पाहुण्यांची खुर्चीची व्यवस्था होणार नाही . सबब ज्याना उशीर होणार असेल त्यानी स्वतःची खुर्ची आणावी. ही अट आयोजकाना लागू होत नाही. मागाहून तक्रार करू नये

कुंदन's picture

7 Apr 2011 - 2:58 pm | कुंदन

बाकी "अर्ध्या अंड्याची करी" हे असे अर्धवट का ?
बाकी अर्धे अंडे हवे असेल तर वाढीव पैसे का?

मुलूखावेगळी's picture

7 Apr 2011 - 3:21 pm | मुलूखावेगळी

बाकी अर्धे अंडे हवे असेल तर वाढीव पैसे का?

नाही ३% सवलतीच्या दरात ;)

३% ने अंडी तुम्ही देणार काय? :ऑ :ऑ ?

मुलूखावेगळी's picture

7 Apr 2011 - 3:52 pm | मुलूखावेगळी

आलात चोंबडेपना करायला? कोनी बोलावलेले नसताना.
अंडी देनारे आनि खानारे बघतील ना?
कुंदन उत्तर देतीलच ना ह्यवर
बाकि अरबट,वाह्यत, मर्यादा सोडुन बोलायला , अचरट्पना करायला तुम्हाला तर सोडत दिलेलीच आहे.

टारझन's picture

7 Apr 2011 - 3:54 pm | टारझन

उगी उगी .. चिडु नका ... वाक्याचा संदर्भ पहाता माझे वाक्य अरबट वाह्यत (?) मर्यादा सोडलेले , अचरट वगैरे आहे असे मला वाटत नाही .. पण म्हणतात ना .. जैसी दृष्टी तैसी ..

मुलूखावेगळी's picture

7 Apr 2011 - 3:58 pm | मुलूखावेगळी

वाक्याचा संदर्भ पहाता माझे वाक्य अरबट वाह्यत (?) मर्यादा सोडलेले , अचरट वगैरे आहे असे मला वाटत नाही .. पण म्हणतात ना .. जैसी दृष्टी तैसी ..

हे कोन बोलतेय बघा आता?
वाल्याचा वाल्मिकी झाला का?

वाल्याचा वाल्मिकी झाला का?

तुला टाऱ्याचा टाल्मिकी म्हणायचय का ? ;)

कुंदन's picture

7 Apr 2011 - 4:08 pm | कुंदन

कृपया या गप्पा खरडवहीत माराव्यात. धाग्याचा खरडफळा करु नका.

सूड's picture

7 Apr 2011 - 4:10 pm | सूड

अगदी !! कारण हे लेखन तीन दिवसात उडविल्या जाणार नाहीये !! :)

प्रभाकर पेठकर's picture

7 Apr 2011 - 3:25 pm | प्रभाकर पेठकर

कोल्हापुरी थाळी म्हण्टल्यावर जीभ जमीनी पर्यंत खाली घरंगळली ती परत गुंढाळून घेतली कारण ह्याच काय पुढच्या शनिवारीही येणे शक्य नाही .मी साधारण पणे २३च्या शनिवारी भारतात येऊ शकेन. पुढे महिनाभर आहे भारतात. तेवढ्या कालावधीत दुसरा कट्टा (पुण्यात - मुंबईत - ठाण्यात) कुठेतरी ठरवा बुवा!

तुर्तास तुमच्या ठाणे आणि पुणे दोन्ही कट्ट्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा..........!

नक्कीच ..

माझे असे ठाणे टिमला म्हणने आहे ...

येथे आलेल्या रिप्लाय वरुन ..
बरेच जण २३ ला येवु शकत आहेत ... व्यक्तीशः माहित नाहीत
पण कुंदन आणि आनखिन कोणीतरी पण तसेच बोलले आहेत.
जास्त जनांना सामावुन घेण्यासाठी बघा पुढे ढकलता येते काय ते ...
नसेल तर शुभेच्छा आहेतच .. तुमेहे या जावुन पुन्हा एकदा जावू .. काही हरकत नाही ...

मुलूखावेगळी's picture

7 Apr 2011 - 3:35 pm | मुलूखावेगळी

२२-२४ मधे असेल तर मी ३३ % ;)

विलासराव's picture

11 Apr 2011 - 9:08 pm | विलासराव

पण येउ शकतो.
बघा कसं ठरतय ते.

जीभ जमीनी पर्यंत खाली घरंगळली ती परत गुंढाळून घेतली

मला "द मास्क" चित्रपटातील जिम कॅरीची आठौण झाली..

चिंतामणी's picture

7 Apr 2011 - 3:39 pm | चिंतामणी

("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे) असे लिहून पुणेकारांवर दुगण्या झाडणा-यांच्या लक्षात पुढील गोष्टी आल्या नाहीत काय????

१)कट्टा या शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता जमत आहे
जे कोण येणार असतील त्यांनी फायनल काय ते मला उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कळवा
कारण सीट्स आधी बुक कराव्या लागतील
ओक्के?

२)"अर्ध्या अंड्याची करी"

पुणेरी कट्ट्याच्या धाग्यात असल्या सुचना नक्कीच नाहीत.

स्वच्छ भाषेत लिहीले आहे

तुम्हाला जास्त माहिती धाग्याच्या शेवटी दिलेल्या दुव्यावरुन पाहता येईल.

दिवस - १७ एप्रिल २०११
वेळ - संध्याकाळी ७.३० ते ११.००
प्रकार - व्हेज आणि नॉनव्हेज
खर्च - व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/-

गवि's picture

7 Apr 2011 - 3:40 pm | गवि

नुसती मैत्रीपूर्ण थट्टा.. :)

कृपया ती ह.घ्या.

(काहीसा बचावः अर्ध्या अंड्याचा उल्लेख हॉटेलचा आहे.. निमंत्रकांचा नाही..ती डिश अफलातून असते. खिमाच असतो ताटलीत. तर्रीसारखा. जहाल असल्याने थोडासाच असतो आणि तेवढाही संपवता येत नाही. कधीकधी त्या खिम्याऐवजी त्याच प्रसिद्ध तर्रीत अर्धे अंडे देतात. त्याचा भाग आणि उपयोग लोणच्यासारखा आणि तितकाच असतो. बाकीची मेन डिश भरपूर असते.)

चिंतामणी's picture

7 Apr 2011 - 3:41 pm | चिंतामणी

शुभेच्छा.

ती कोपरखळी पुणे कट्ट्याला नसून पुणेरी सर्वसामान्य घरगुती निमंत्रणाच्या पद्धतीला आहे.

हे आता इथे म्हणून स्पष्ट झाल्याने आणि शिवाय ठाणे मित्रांनी पुणे कट्ट्याच्या तारखेशी क्लॅश येऊ नये म्हणून केवळ लक्षात येताक्षणीच तारीखही बदलली आहे. एकाच मिपा परिवारात पुणे ठाणे चकमक होऊ नये आणि यावर आता पडदा पडावा अशी इच्छा.. :)

पडदा टाकल्या गेल्या आहे

-स्पाकांत

कुंदन's picture

7 Apr 2011 - 5:53 pm | कुंदन

..फार च चिंता करतात बुवा , चिंतामणी राव.

( "ओन्ली चिंता , नो मनी" वाला ) कुंदन. ;-)

चिंतामणी's picture

7 Apr 2011 - 6:05 pm | चिंतामणी

गवींचा "दुगाण्या नाही हो." या १५.४० च्या पोस्टला १५.४१ला प्रतीसाद दिलेला वाचलेला दिसत नाही.

लगेचच १५.४१ला पडदा टाकला होता.

पुन्हा एकदा कट्टयासाठी शुभेच्छा.

सुनील's picture

7 Apr 2011 - 3:37 pm | सुनील

शुभेच्छा!

स्पावड्या तु आणी हर्षद्...कुठ फेडाल ही पाप?

आम्ही नुसत गरीबा सारख बघत जिभल्या चाटायच्या.

मरु दे...आम्ही धागा उघडला नाही...मेन्यु कार्ड वाचल नाही....धनगरी मटण चांगल असत अस गवी म्हणतात ..मला माहिती नाही.....

कशाला त्यांना फेडायला लावता ... पापं ? तुम्ही पण जा की ? तुम्हाला बॅन नाही केलेलं त्यांनी :)

तुम्ही एक शब्द तर टाका .. आमचा स्पा मोठा दिलदार माणुस .. तुमच्या प्रवासपाण्याची सोय पण करुन देइल तो :)

आमचा स्पा मोठा दिलदार माणुस .. तुमच्या प्रवासपाण्याची सोय पण करुन देइल तो

तेजायला टार्या, तो काय शेअर रिक्षाचा प्रवास आहे काबे , प्रवास खर्च करायला :D

तो काय शेअर रिक्षाचा प्रवास आहे काबे , प्रवास खर्च करायला

मुंबैची मोठ्या दिलाची मान्सं अन त्यांची दिलं दिसली रे बाबा...
(पुण्यात या आता..)

निखिल देशपांडे's picture

7 Apr 2011 - 4:31 pm | निखिल देशपांडे

शनीवारी उपलब्ध असणार नाही हे आधीच स्पा ला सांगितले होते.
त्यामुळे चालुद्या

कुंदन's picture

8 Apr 2011 - 1:17 am | कुंदन

तुमची अनुपलब्धता यापुढील काही महिने गृहित धरुन चालतो.

जालावरुन साभार..

आत्ताच फोनवरुन कन्फर्म केल्याप्रमाणे ते दोन्ही (तांबडा आणि पांढरा) रस्से अमर्यादित आहेत.

चिंतामणी's picture

7 Apr 2011 - 5:20 pm | चिंतामणी

पोळी ऐवजी भाकरी असेल तर जास्त छान लागेल जेवण.

गवि's picture

7 Apr 2011 - 5:24 pm | गवि

पोळी भाकरी असे दोन्ही ऑप्शन्स आहेत.

भात आणि पुलाव असेही..

जळजळ वाढवल्याबद्दल आभार :D

यशोधरा's picture

7 Apr 2011 - 5:20 pm | यशोधरा

ठाण्याच्या कट्ट्याला शुभेच्छा.
अवांतरः कोणी ठाणेकरांनी पुणे कट्ट्याला दिल्यात का शुभेच्छा?
पळा....

दिल्या तरी त्या पुणेकरांना चालतील का ? नाही तिकडचं सगळं स्वयंभू असतं. त्यामुळे शुभेच्छांची गरज नाहीं; हे हुश्शांर मुबैकरांनी ताडलं असावं !!
;)

यशोधरा's picture

7 Apr 2011 - 5:34 pm | यशोधरा

कारणं बरी आहेत :P

चिंतामणी's picture

7 Apr 2011 - 5:42 pm | चिंतामणी

पडलो तरी नाक वर.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Apr 2011 - 8:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

१००वी धाव !!!!!!

पुण्याच्या कट्ट्याच्या धाग्याचे केवळ अर्धशतक झाले असताना मुंबई-ठाण्याच्या धाग्याने मागून येऊन शतक झळकावले त्याचा तर हा राग नाही ना ?? (ह. घ्या हो)

नाही हो, राग कसला त्यात! पुण्याच्या कट्ट्याचे जे काय ठरवायचे होते ते ५० प्रतिसादात ठरवून झालेच की!
ठाणे कट्ट्याचे १०० प्रतिसाद झाले तरी अजून ग्यानबा-तुकाराम चालूच आहे याबद्दल अभिनंदन!! शनिवारपर्यंत ठरले तर भेटतीलच की मिपाकर!! :-)

स्पायलूला अजून एका धाग्याच्या शंभरीबद्दल अभिनंदन आणि ह्याप्पी बर्डेच्या शुभेच्छा!! ;-)

--असुर

पुणे कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा..

येण्याची इच्छा आहे पण खरोखरच रविवारी रात्री तिकडे चेपून जेवायचे आणि लगेच मुम्बैस परत मध्यरात्री येऊन सकाळी हपीसला पळायचे यात वेन्जॉयमेंट नाही. नुसती हजेरी ठरेल.

मनापासून शुभेच्छा..वृत्तांत वाचण्यास उत्सुक. पुढच्या वेळी शनिवारी रात्री ठेवावा ही विनंती.

विसोबा खेचर's picture

7 Apr 2011 - 5:44 pm | विसोबा खेचर

शुभेच्छा..! :)

गवि's picture

7 Apr 2011 - 5:46 pm | गवि

धन्यवाद.. पण म्हणजे ..? तुम्ही येताय ना?

प्लीज यावे ही विनंती..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2011 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ठाणे खादाडी कट्ट्याला शुभेच्छा. :)

-दिलीप बिरुटे

चिंतामणी's picture

7 Apr 2011 - 8:31 pm | चिंतामणी

आणि कट्टयासाठी जास्तीत जास्त मिपाकर येण्यासाठी शुभेच्छा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2011 - 9:18 pm | निनाद मुक्काम प...

खादाडी कट्ट्यात मेनू तपशीलवार देणे.
स्पा च्या भाषेत कहर आहे .
दादरचे सिंधू दुर्गाचे आता फक्त नाव उरले आहे .पुढच्या भारत भेटीत ठाणे अजेंड्यावर वर राहीन ( हरी ओमं नगर मध्ये वास्तव्य असल्याने ठाण्याला पर्याय नाही .)
मजा करा
शुभेच्छा

सर्वसाक्षी's picture

7 Apr 2011 - 11:21 pm | सर्वसाक्षी

कदाचित उशीर होईल, पण येणार हे नक्की

गवि's picture

8 Apr 2011 - 1:57 am | गवि

Welcome... Confirmed.. Great...

कुंदन's picture

8 Apr 2011 - 6:56 am | कुंदन

>>कदाचित उशीर होईल, पण येणार हे नक्की

बिल द्यायच्या वेळी उपस्थित र्‍हावा , म्हणजे झाले.

मजा करा लेकोहो!

:-D

वपाडाव's picture

8 Apr 2011 - 11:03 am | वपाडाव

याला माज करा लेकेहो असे वाचलेले आहे....

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Apr 2011 - 12:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मग सदर कट्ट्यासाठी "तांबडा माज" आणि "पांढरा माज" अश्या संज्ञा कॉईन कराव्यात का?

नगरीनिरंजन's picture

8 Apr 2011 - 10:52 am | नगरीनिरंजन

लई जळजळ झालेली आहे.

मितभाषी's picture

8 Apr 2011 - 11:08 am | मितभाषी

शुभेच्छा!!!!!

भावश्या.

अरुण मनोहर's picture

8 Apr 2011 - 3:28 pm | अरुण मनोहर

अलिकडे, पलिकडे, खलीकडे होणार्र्या सगळ्या कट्ट्यांना शुभेच्छा.

तेजायला... आपण इथे नुसतेच फोटो आणि लेख बघून जळजळ करून घ्यायची.....

जकार्ता किती लांब आहे तुमच्या पासुन ? :)

अरुण मनोहर's picture

8 Apr 2011 - 4:15 pm | अरुण मनोहर

का, का?
सुका ओला कट्टा भरवणार आहेत का?

हो तर .. त्यात मग डिश ही तशाच ..
१. पत्र तंदुर
२. पत्र सिझलर
३. पत्र मसाला
४. पत्रा रोटी

असा पत्रसंपन्न कट्टा करायची तुम्हाला संधी आहे . आणि मुख्य म्हनजे कोणत्या मिपाकराची जळजळही होणार नाही हे पाहुन :)

- पत्रेआळीचा पत्र्या मारुती

अरुण मनोहर's picture

8 Apr 2011 - 4:55 pm | अरुण मनोहर

आजकाल टारूबाळाचे प्रतिसाद वाचून वाटायला लागले होते, बाळ काका होण्याच्या मार्गाला लागले बहुदा. नक्कीच लवकर इतर दोन नामवंत आय डी सारखे हे वात्रट बाळ देखील अकाली सन्यास घेते की काय असे वाटत होते.

आता कसे नाव राखलेस!

टारझन's picture

8 Apr 2011 - 4:58 pm | टारझन

खि खि खि .. . बाकी एखाद्या डिश मधलं पत्र लक्की ड्रॉ म्हणुन उघडा .. आणि तुमच्या सिंगापोर च्या राष्ट्रपतीला दाखवा .. न जाणो तुम्हाला सिंगापुर रत्न बनवतील :) शुभेच्छा :)

बाकी कोणत्या पत्रीक्रीया काका टाईप वाटल्या हो ? :)

स्मिता.'s picture

8 Apr 2011 - 6:04 pm | स्मिता.

कट्ट्यासाठी शुभेच्छा! त्याचे सचित्र वर्णन येथे द्यायला विसरू नका.

ना रिपोर्ट. ना फटु.

नरेशकुमार's picture

11 Apr 2011 - 11:51 am | नरेशकुमार

स्पा, पार पडला का नाय मंग कट्टा ?

५० फक्त's picture

11 Apr 2011 - 12:41 pm | ५० फक्त

मा. श्री. स्पा , कट्टा तर छानच केला असणार त्याचे फोटो आणि रिपोर्ट टाकण्याचे काम निखिल वागळे यांना देण्यात आले आहे काय ? तुमच्या कार्यालयाच्या जवळच त्यांचे कार्यालय आहे म्हणुन एक शंका आली.