साहित्यः
१/२ किलो ताजा गोड चक्का
१/२ किलो साखर
दीड कप ताजा आंब्याचा रस (तुम्ही कॅन मधे मिळणारा आंब्याचा रस वापरु शकता)
चारोळ्या
आवडत असल्यास किंचित वेलची-जायफळपूड (ऐच्छिक)
पाकृ:
चक्क्यात साखर मिसळून २ तास झाकून ठेवावे.
त्यात मग आंब्याचा रस , वेलची-जायफळपूड घालून, पुरण यंत्राला बारीक चाळणी लावून त्यातून फिरवून घ्या म्हणजे नीट एकजीव होईल.
चारोळ्या घाला, वरून केशरकाड्या घालून सजवा.
प्रतिक्रिया
7 Apr 2011 - 12:02 am | प्राजक्ता पवार
मस्तं !
7 Apr 2011 - 12:24 am | अन्या दातार
पुरणपोळी यंत्राला कि पुरण यंत्राला? पुरणपोळीचे यंत्र कधी वाचनात्/बघण्यात नाही आलेलं
बाकी, पाकृ उत्तम आहे. फोटो बघताक्षणीच ओरबाडावे वाटतेय आम्रखंड.......
7 Apr 2011 - 12:54 am | सानिकास्वप्निल
धन्यवाद चूक सुधारण्यात आली आहे :)
7 Apr 2011 - 12:25 am | रेवती
आकर्षक फोटू!
7 Apr 2011 - 12:38 am | ज्योति प्रकाश
यम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्,तों.पा.सु.
7 Apr 2011 - 12:40 am | विनायक बेलापुरे
जेव्हडा चक्का तितकी साखर हे प्रमाण श्रीखंडासाठी योग्य आहे पण आम्रखंडा साठी जास्त वाटते आहे.
फोटोमध्ये जो जिलेटीन घातल्यासारखा चकचकित रंग आला आहे तो ही त्यामुळे कमी होइल.
7 Apr 2011 - 12:59 am | सानिकास्वप्निल
प्रमाण बरोबर आहे, तरी जर हवे असल्यास आपल्या चवीप्रमाणे साखर कमी-जास्त करावी :)
श्रीखंड /आम्रखंड चकचकित दिसले तरी चवीत काही फरक पडत नाही :)
7 Apr 2011 - 1:07 am | विनायक बेलापुरे
फार गुळमट लागेल हो ताई ! (आधीच आंब्यात नको इतकी साखर असते.)
त्यात जास्त साखर झाली तर तार येईल त्याला. फोटो पाहिल्यावर वाटते आहे की जास्त चिकट झाले आहे. डाव घेउन वाढताना मस्त लपका पडला पाहिजे ... तार आली की ओळखा , बिनसले साखरेत .....
( दुरुस्ती सुचवतोय म्हणून राग मानू नका )
अर्थात ज्याची त्याची आवड ....
7 Apr 2011 - 1:25 am | सानिकास्वप्निल
अहो विनायक भाऊ,
मी हे आम्रखंड नेहेमी बनवते ह्याच प्रमाणे, तरीही मी सांगितले आहे की साखर आपल्या चवीप्रमाणे घालावी.
तार आली असती तर मी चुकीची किंवा फसलेली पाकृ इथे दिली नसती.
फोटो पाहिल्यावर तुम्हाला चिकट कुठून व कसे दिसले मला नाही माहीत...पण ताजे आम्रखंड तयार करुन मी त्याचा फोटो काढला होता (फ्रिजमधे आम्रखंड गार करून फोटो काढला असता तर लपका पडलेला फोटो आला असता), घरच्यांनी ही तृप्ततेचा ढेकर देऊन कौतुक केले ते वेगळेचे, तार आली असती तर त्यांनी ही खायला नाक मुरडलं असतं.
असो,
बाकी तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
7 Apr 2011 - 2:03 am | विनायक बेलापुरे
सनिकाताई ,
तुम्हाला दुखविण्याचा हेतू अजिबात नव्हता. मला प्रथम दर्शनी वाटले ते मी सांगितले. तुम्ही दुखावल्या गेला असलात तर मनःपूर्वक क्षमस्व.
7 Apr 2011 - 3:11 am | सानिकास्वप्निल
विनायक भाऊ अहो मी तुमच्या शंकेचे निरसन केले इतकंच :)
मला काही राग वगैरे आला नाहीये, जे काही मला थोडेबहुत पाककलेबद्दल माहीत आहे ते मी आपल्या मि.पा.करांबरोबर शेअर करते इतकेच :) हा मी स्पष्टवक्ती आहे एवढेच :)
तुमचे प्रतिसाद येऊ द्या,मला आवडेल....त्यातून जे शिकण्यासारखे असेल ते मी नक्कीच शिकेन.
7 Apr 2011 - 1:49 am | प्राजु
मस्त फोटो!!
7 Apr 2011 - 2:40 am | वेदनयन
श्या थोडी उशिरा टाकली बुवा तुम्ही हि पाकृ. नायतर गुढीपाडव्याला केलीच असती. असो, फोटो लई सुंदर!!!
7 Apr 2011 - 8:31 am | मदनबाण
आह्ह... सकाळच्याला हा धागा उघडल्याचा आनंद झाला. :)
पायनॅपल श्रीखंड पण लयं भारी लागतं बघा. :)
7 Apr 2011 - 11:43 am | निवेदिता-ताई
पायनॅपल श्रीखंड ची पा.कॄ. येवु द्यात इथे
7 Apr 2011 - 9:54 am | पियुशा
व्व्वा वा !
आम्रखंड एकदम यम्मि
7 Apr 2011 - 10:00 am | चावटमेला
वा.. जीभेला खाज सुटली :)
एक शंका - घरी पुरण यंत्र नसल्यास फूड प्रोसेसर मधून चक्का काढून चांगले होईल का?
7 Apr 2011 - 11:44 am | टारझन
पाककृतीच्या साहीत्यात कुठे "विजुभाऊ " दिसले नाहीत ? :)
7 Apr 2011 - 12:01 pm | स्नेहश्री
मला खुप आवडत.. खुप सुरेख दिसत आहे...
7 Apr 2011 - 3:50 pm | प्रभाकर पेठकर
पायनॅपल श्रीखंडा साठी अननसाच्या फोडी, अननसाचा अर्क, (पायनॅपल एसेन्स), किंचित पिवळारंग.
बटरस्कॉच श्रीखंडासाठी बटरस्कॉच एसेन्स, आणि पिच कलर (लाल + पिवळा) वापरावा.
आम्रखंडाची पाककृती मस्तच आहे.
8 Apr 2011 - 7:40 pm | विंजिनेर
दिलखेचक फटु! व्वा!