संडे स्पेशल (सॅलड)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
11 May 2008 - 8:11 pm

पाककृती साठी वेगळे सदर उघडल्याबद्दल मि.पा.च्या संचालकांचे आभार!!!!!!!!

सॅलेड ची व्याख्या करणे इतके सोपे नाही. कारण पुर्वी सॅलेड म्हटले कि हिरव्या भाज्या आणि त्यावर मीठ भुरभुरले कि झाले सॅलड.
पण आता त्यातील प्रत्येक पदार्थ हा कल्पना करून त्यात वेगवेगळे बदल करून वापरला जातो. तसेच त्यावरील ड्रेसिंग, सॉस, नट्स इत्यादी वेगवेगळे बदल करून सॅलड हे फर्स्ट कोर्स किंवा पुर्ण जेवण म्हणून बनवू शकतो.

टीप्सः
१. हिरव्या पालेभाज्या वापरताना, त्याची पाने थंड पाण्यात १५-२० मिनिटे ठेवावीत, क्रीस्पी राहतात.
नंतर थंड पाण्याखाली धुवून स्वच्छ करावीत, पाणी निथळून ती पेपर टॉवेल किंवा टी टॉवेल मधे ठेवावीत.
एक दिवस अगोदर धुवून फ्रिज मधे ठेवली तर दुसर्‍यादिवशी लगेच वापरता येतात.

२. व्हिनेग्रेट ड्रेसिंगः
१भाग व्हिनेगर, ३ भाग तेल मीठ, काळीमिरी पूड, मोहरी पेस्ट.
एका बाउल मधे व्हिनेगर, मीठ, मिरीपूड, मोहरी पेस्ट फेटणे. हळूहळू त्यात तेल मिक्स करणे.
हे ड्रेसिंग हवाबंद बरणीत १ आठवडा फ्रीज शिवाय राहते.

३.अंड्याचे डेकोरेशनः
अंडे उकडून, सोलावे. त्याचे अर्धे भाग करावे. पांढरे व पिवळे वेगवेगळे करावे.
पांढर्‍याचे बारीक काप करावेत.
पिवळे गाळण्यामधे टाकावे व चमच्याने वरुन दाब द्यावा. व हलक्याहाताने काढावे. व डेकोरेशन साठी वापरावे.
उकडलेल्या अंड्याचे काप सुद्धा वापरू शकतो.

४.टोर्टीला चे डेकोरेशन
टोर्टीलाला तेल लावून त्यावर तिखट भुरभुरावे. त्याचे १इंच पट्ट्या कापाव्यात, प्रीहिटेड ओव्हन किंवा ग्रील मधे क्रीस्पी होईपर्यंत गरम करावे. डेकोरेशन साठी पट्ट्या सेपेरेट करून वापराव्यात.शक्यतो कॉर्न चे टोर्टीला वापरावे.

फर्स्ट कोर्स मधे खालील सॅलड बनवू शकतो.
१.क्रिएटीव्ह गार्डन सॅलडः हिरव्या पालेभाज्या घेऊन त्यात व्हिनेग्रेट चे ड्रेसिंग मिक्स करावे.
२.लिक्स व्हिनेग्रेटः लिक्सचे मुळ कापून, त्याचे वरचे एक आवरण काढावे (ट्रीमिंग).उभा काप द्यावा.दोर्‍याने एकत्र बांधून उकळ्त्या पाण्यात मीठ घालून १५-२० मि.उकळावे. शिजले आहे कि नाही हे पाहावे. नंतर त्यातील पाणी काढून लिक्स थंड पाण्याखाली धरावे, त्याचे काप करावेत.नंतर व्हिनेग्रेट मिक्स करावे व उकडलेल्या अंड्यांने डेकोरेट करावे.
३.ग्रीक सॅलडः काकडी, टोमॅटो,लाल कांदा, ढब्बू मिरची, काळे ऑलीव्ह,feta चीज, व्हिनेग्रेट ड्रेसिंग मधे पुदिना, पार्स्ले, ओरेगनो ची पाने बारीक चिरून टाकणे. व त्यातमिक्स करणे.
४.राजमा, मका, ढब्बू मिरची, टोमॅटो, व्हिनेग्रेट मधे बारीक हिरवी मिरची, जिरे पावडर घालून मिक्स करणे.राजमा भिजवून, त्यात कांदा आख्खा, लवंग घालून उकडावा(कांदा नंतर काढून टाकावा). हे फ्रिजमधे करून ठेवले तरी चालते, ऐनवेळी टोर्टीलाचे डेकोरेशन करावे.
५.क्रॅब सॅलडः२-३ कुर्ल्या, १/२ वा.मेयॉनीज सॉस्,थोडा वुस्टर सॉस,मीठ , मिरपूड
कुर्ल्या धुवून कवचातून काढून साफ कराव्यात. थोड्या पाण्यात शिजवाव्यात, गार झाल्या कि कवचातून मांसल भाग काढून घ्यावा.
माशाच्या आकाराचा साचा मिळतो. त्याला थोडे लोणी लावावे. त्यात कुर्लीचे मांस, मेयॉनिज सॉस व वुस्टर सॉस, मीठ, मिरपूड एकत्र करून ते मिश्रण साच्यात डाबून बसवावे. थोडावेल फ्रीजमधे ठेवावे. डिशमधे कोबीचा किस, लेट्युसची पानेटाकावीत्.कुर्ल्याचे सॅलड साच्यातून काढून त्यावर ठेवावे. हिरवा वाटाणा, गाजर चकत्या ने डेकोरेशन करावे.

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

11 May 2008 - 10:22 pm | प्रभाकर पेठकर

मस्त आणि आकर्षक सॅलड पाककॄती. मला वाटत माझ्या साठी फक्त पहिलं सॅलड चालू शकेल. (तसं ३ नंबरचे सॅलडही आवडेल मला).
व्हिनेग्रेट ड्रेसिंग साठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट राहील. ऑलिव्ह ऑईल मध्ये कॅलरीज इतर तेलांइतक्याच असल्या तरी कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी लाभदायक आहे.

चकली's picture

13 May 2008 - 11:34 pm | चकली

अतिशय चांगली माहिती.
राजमा सॅलेड मा़झे आवड्ते सॅलेड. सॅलेड मध्ये अननस , संत्रे, जरदाळू पण मस्त लागते !
चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

13 May 2008 - 11:43 pm | विसोबा खेचर

सॅलडमध्ये देखील क्रमश:? धन्य आहे! :)

स्वातीताई, छान आहेत सॅलडच्या पाकृ!

आपला,
(कोशिंबिरभक्त) तात्या.

स्वाती दिनेश's picture

13 May 2008 - 11:44 pm | स्वाती दिनेश

मस्तच पाकृ स्वाती..मलाही सॅलडस खूप आवडतात,:)आणि मी भरपूरदा करत असते..काहीच नाही तर काकडी,गाजर,टोमॅटो,कांदा इ.सगळे चिरून चाट मसाला घालते.
कोबी लांब,पातळ चिरून त्यात एक हिरवी सिमला मिरची आणि डाळिंबाचे दाणे घालायचे,मीठ,चाट मसाला किवा मिरपूड घालायची आणि लिंबू पिळायचे,ते ही मस्त लागते.

वरदा's picture

14 May 2008 - 12:29 am | वरदा

छे तुमच्या प्रांतात ढवळाढवळ करतेय मी....पण चालेल ना एखाद वेळी
बीन सॅलेड
१०-१५ फरसबीच्या शेंगा
२ चमचे डिजॉन मस्टर्ड (मोहोरी पेस्ट + मध) हे तयार पण मिळतं वास खूप छान येतो ह्याने
१/२ कप इ व्ही ओ ओ (एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट)
१/४ कप रेड व्हिनेगर
१ कॅन साधारण (२००-२५० ग्रॅ. असेल ) राजमा (उअकडलेला)
तेवढेच छोले (उकडलेले)
पिंटो बिन्स, ब्लॅक बिन्स, वाटाणे अशा हव्या त्या बिन्स सगळ्या उकडून
त्यात टॉमेटो, किंचित साखर, मीठ, कांदा, कोथंबीर, मिरपूड, थोडी कैरी
सगळं मिक्स करा आणि खा....मस्त लंच होतो..

स्वाती राजेश's picture

14 May 2008 - 1:52 am | स्वाती राजेश

मस्त आहे गं रेसिपी..:)
छे तुमच्या प्रांतात ढवळाढवळ करतेय मी....पण चालेल ना एखाद वेळी
आम्हाला एखादा पदार्थ चांगला येत असेल तर, तुला दुसरा कोणता तरी येत असेल? तो आम्ही तुझ्याकडून शिकू....
आता तू वरचीच रसिपी पाहा ना किती छान लिहिली आहेस. त्यातून नविन आम्ही सुद्धा शिकत असतो...
ही तू पाकक्रिये मधे घाल.....म्हणजे नंतर शोधत बसायला नको:)

वाट पाहात आहे तुझ्या नविन रेसिपींची.....

वरदा's picture

14 May 2008 - 2:54 am | वरदा

मला एवढ्या मस्त सुगरणीकडून सर्टीफीकेट मिळावं म्हणजे....ढीन्चॅक ढीचॅक ढीन्चॅक ढीचॅक......तात्या जरा बघा.......

सहज's picture

14 May 2008 - 7:19 am | सहज

सॅलेड म्हणजे क्रियेटिव्हीटीला जबरदस्त वाव. जो जे वांछील तो ते घालो! :-)

अजुन माहीती येऊ द्या.

स्वाती राजेश, चकली, स्वाती दिनेश, वरदा धन्यवाद!!

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 9:10 am | पिलीयन रायडर

सध्या सॅलड्स करण्याचे वेड लागले आहे. मिपावर मिळणार नाही असं होणं शक्य नाही म्हणुन सहज शोधले तर हा एक मस्त धागा मिळाला. परवा खफवर बरीच चर्चा झाली. जुइ आणि इतरांनी खुप चांगल्या टिप्स दिल्या. ज्या सापडल्या त्या इथे देत आहे. जाणकारांनी अजुन द्याव्यात!

झटपट सॅलडः लाल आणि पिवळे मध्यम आकाराचे टोमॅटो. त्याच्या ४ फोडी करायच्या. ऑलीव्ह ऑइल, अर्ध्या लाईमचा रस, मीठ, थोडे आले आणि लसुन बारीक करुन. हे सर्व एकत्र करुन टोमॅटो वर घालायचे. वाटले तर थोड्यावेळ फ्रिझ मध्ये ठेवायचे.

अगदी साध्या सोप्या १० मिनिटात बनणाऱ्या सलाड साठी ऑलिव्ह ऑइल, चिली फ्लेक्स, एखादे nuts/उकडलेले छोले/राजमा असतील तर घरातील कोणत्याही भाज्या (ब्रोकोली, झुकिनी, टोमॅटो, अवाकाडो,पालक वगैरे) आणि एखादा पास्ता किंवा उरलेला मोकळा भात वापरून छान सलाड बनते.

अगदि थोडक्यात गोडी हवी असल्यास. ऑलिव्ह ऑइल, आंबटप्नासाठी विनेगर अथवा लिंबाच रस, मिरपवा, मीठ थोडा थखटाचा झट्का पाहिजे अस्ल्यास रेड चिली फेल्क्स(याही कराब होणार नाहीत.) लिंबु/ व्हिनेगर वगरे जरा जपुन कारण भार आंबट होते नाहीतर ड्रेसिंग. खरेतर अगदी थोडे हनी घाल कारण चव जबरदस्त येते.
कधी आंबटपनाच्या वेगळ्या चवीसाठी लिंबाची साल किसावी, संत्र सुद्धा अशा प्रकारे चालते. थोडक्यात काय तरी चवींची एक्सपेरिमेन्ट करावे.

balsamic vinegar, Maple Syrup/ ब्रॉउन शुगर, Apple Cider Vinger, ऑलिव्ह ऑइल, थोडे लसुन बारीक चिरुन, आले बारीक किसुन यापैकी पाहिजे ते आणि प्रमाण यांचे प्रयोग करुन पहा ड्रेसिंग कारायचे एकदम झक्कास होते ! शिवाय मिरपुड मीठ इत्यादी. कधी मियोनिज, हनी मस्टरड, रेग्युलर मस्टरड इत्यादीही वापरुन पाहा.