मिपाच्या पाककृती विभागाचा शुभारंभ गोडाने करते.
दसर्याच्या मुहूर्तावर आम्ही नवीन घरात रहायला गेलो. चोहीकडे सामान!त्यातून हवे ते वेळेवर मिळाले तर मग आणि काय हवे? जायफळ/वेलदोडे कोणत्या बरणीत/डब्यात आहेत हे १०,१२ डबे उचकून पण सापडेनात म्हणून मी वैतागले तर इकडे दिनेशने गुलकंदाच्या बरणीतून(ती कुठून मिळाली त्याला,कुणास ठाऊक?) गुलकंद काढून त्यात घातला! आणि गुलखंड असे बारसे करुन आम्ही खाल्ले.
साहित्य-
५०० ग्राम स्पाइझं क्वार्क ४०%फॅटवाला / केफिर चीज्(लेबनी)/ क्राफ्टचे फिलाडेल्फिया क्रीम चीज किवा अर्थातच चक्का
२५०/३०० ग्राम साखर,
२ टेबल स्पून गुलकंद,बदाम/काजूतुकडे १टेबल स्पून
इथे speisequark नावाचे जे दही मिळते त्याला आम्ही "जर्मन चक्का" असे नांव दिले आहे!
स्पाईझं क्वार्क मध्ये साखर मिसळा,बदाम/काजू तुकडे घाला.गुलकंद घाला. गुलखंड तयार!
हा क्वार्क पुरणयंत्रातून काढावा लागत नाही.
पण चक्का असेल तर नेहमी श्रीखंड करतो तसेच करा परंतु स्वादाला गुलकंद घाला.
पोळी/पुरी बरोबर खा.वेगळी चव छान लागते.सध्याच्या उन्हाळ्यात गुलकंदाने गारवा येईल,:)
प्रतिक्रिया
10 May 2008 - 6:31 pm | प्रभाकर पेठकर
मिपच्या पाककृती विभागाच्या पहिल्या पाककृतीला प्रतिसाद देताना आनंद होतो आहे.
अभिनंदन.
10 May 2008 - 6:32 pm | विजुभाऊ
स्पाइझं क्वार्क हे काय असते.
भारतात याला काय नावाने ओळखातात
एक अज्ञानी विजुभाऊ
10 May 2008 - 6:36 pm | स्वाती दिनेश
विजुभाऊ,भारतात चक्का मिळतो हो.. आम्हाला इथे तो मिळत नाही म्हणून असे काही शोधावे लागते त्यासाठीच तर वर बरेच पर्याय दिलेत ना. उदा- अमेरिकावासी क्राफ्ट चीज किवा केफिर चीज वापरु शकतात.
याप्रमाणे भूतलावर कोठेही असाल तर श्रीखंड खाऊ शकता,:)
10 May 2008 - 6:42 pm | मन
तोंडाला पाणी सुटलय नुसतं.....
अरे कुणी तरी त्या गुल खंडाला इथे आणा रे....
(नाय तर मला तरी गुल खंडाकडे घेउन चला रे...)
मस्त मस्त....
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
10 May 2008 - 6:47 pm | शितल
>>>अरे कुणी तरी त्या गुल खंडाला इथे आणा रे....
>>>>(नाय तर मला तरी गुल खंडाकडे घेउन चला रे...)
अरे मन ना तु मग काय तुला कोठे ही जाता येते, विनातिकिट.
बाकी, स्वाती ताई तुमचा गुलख॑ड करून पहाते,
इथे अमेरिकेत एकदा श्रीख॑ड विकत आणले आणि भारतात परत जाइ पर्य॑त परत श्रीख॑ड घरात आणायचे नाही असे ठरवले.
10 May 2008 - 7:08 pm | विद्याधर३१
नवीन विभागाची सुरुवात तर छान गोडाने झाली.
पन फोटु नाही का टाकता येणार... <:P
विद्याधर
10 May 2008 - 8:03 pm | यशोधरा
मस्तच पाककृती :)
10 May 2008 - 8:15 pm | वरदा
आयडीया सॉलीड आवडली आधीच मला गुलकंद आवडतो आणि त्यात माझ्या न्यूजर्सीत अगदी मस्त चक्का मिळतो...
स्वाती पाकक्रीया विभागात पहीलीच गोडधोड आणि मस्त पाकक्रुती लिहिल्याबद्दल तुझं अभिनंदन!!!
इथे अमेरिकेत एकदा श्रीख॑ड विकत आणले आणि भारतात परत जाइ पर्य॑त परत श्रीख॑ड घरात आणायचे नाही असे ठरवले.
शितल अगं इथे तर चक्का घरी सुद्धा करता येतो..."देसी दही" कुठेही मिळतं ते आण आणि बांधून ठेव एका पंचात ५-६ तासात सुंदर घट्टं चक्का होतो तयार्...मला तर उद्या इथे "हापूस" मिळणारे...मी आम्रखंड करुन खाणार कोण कोण येतय माझ्याकडे?
10 May 2008 - 11:55 pm | भाग्यश्री
सावर क्रीम आणि यॉगर्ट एकत्र करून एका कापडात बांधून ठेवायचे.(रात्रभर). सगळं पाणी निघून गेलं की चक्का तयार होतो.. मग दुसर्या दिवशी सकाळी साखर,वेलदोडा,केशर, जाय्फ्ळ घातलं की सुंदर आणि झटपट श्रीखंड तयार! काहीच फारसं करावं लागत नाही.. भारीय ही पद्धत...खूप टिकतं, त्यामुळे भरपुर करून ठेवलं तरी चालून जातं! नक्की करून बघ शितल!
बाकी, गुलखंड पण सहीय! नक्की करून बघणार... !
11 May 2008 - 7:06 pm | शितल
सावर क्रीम आणि यॉगर्ट एकत्र करून एका कापडात बांधून ठेवायचे.(रात्रभर). सगळं पाणी निघून गेलं की चक्का तयार होतो.. मग दुसर्या दिवशी सकाळी साखर,वेलदोडा,केशर, जाय्फ्ळ घातलं की सुंदर आणि झटपट श्रीखंड तयार! काहीच फारसं करावं लागत नाही.. भारीय ही पद्धत...खूप टिकतं, त्यामुळे भरपुर करून ठेवलं तरी चालून जातं! नक्की करून बघ शितल!
भाग्यश्री,
छान टिप्स दिली आहेस. धन्य. :D
हो मी श्रीख॑ड आणि गुलख॑ड ही नक्की करून पहाणार आहेच.
11 May 2008 - 6:24 pm | चतुरंग
एकदा करुनच बघायला हवे! :)
चक्क्यासाठी 'देसी दही'च लागते असेही नाही.
'मार्केट बास्केट्'चे होल मिल्क योगर्ट आणणे. एक संपूर्ण दिवस आणि एक रात्र बांधून ठेवणे. दुसर्या दिवशी झकास चक्का तयार.
चवीनुसार साखर घालून पुरणयंत्रातून घोटून घेतले की श्रीखंड तयार!
रात्रीच वाटीभर दुधात थोडे केशर भिजत घालणे आणि ते श्रीखंड घोटताना त्यात मिसळले की झकास रंग आणि स्वाद येतो.
आम्रखंड हवे असेल तर इथे हापूस येतो त्यावेळी फोडी घोटून घेऊन मिसळता येतात. नाहीतर तयार मँगो पल्प मिळतो तो घातला तरीही उत्तम आम्रखंड मिळते.
सोबत वेलदोड्याची पूड, थोडे बदाम, पिस्त्याचे काप असे सजवलेत तर एकदम शाहीच!
(स्वगत - चला मार्केट बास्केटला जाण्याची वेळ झाली होल मिल्क योगर्ट हवंय ना! ;) )
चतुरंग
7 Jun 2008 - 1:25 pm | विसुनाना
'दही / योगर्ट स्वच्छ कापडात घट्ट बांधून वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये २ मिनिटे स्पिन केले की चक्का तयार होतो' असे कुठेतरी वाचले आहे.
खरेच असे करतात का???
- (आचंबित) मी
11 May 2008 - 6:58 pm | शितल
L) मी, मी येणार वरदाताई कडे.
हार्टफोर्ट ते न्युजर्सी फारसे ला॑ब नाही त्यामुळे मी येणार तुझ्याकडे आणि आ॑बे स॑पेपर्य॑त राहणार.
(तेवढ॑ तिकीटाच पहा.) ;)
11 May 2008 - 1:24 pm | विसोबा खेचर
स्वाती,
झकास पाकृ! फोटू का नाही दिलास?
बाय द वे, 'जर्मन चक्का' हे नांव मस्त आहे! :)
आपला,
जर्मन तात्या.
11 May 2008 - 1:48 pm | स्वाती दिनेश
काल सरपंचांचे निवेदन वाचले की पाकृ चा वेगळा विभाग सुरू झाला..म्हणून लगेचच ओपनिंग पाकृ टाकली...गुलखंड करून फोटू टाकण्यात वेळ घालवला नाही,:) पण तुला सवडीने फोटू पाठवला तर टाकशील का त्यात तू?
11 May 2008 - 1:58 pm | विसोबा खेचर
पण तुला सवडीने फोटू पाठवला तर टाकशील का त्यात तू?
नक्की! :)
12 May 2008 - 1:46 pm | ऋचा
साही आहे ग तुझी पाकृ
पाहीन करुन..... :P
5 Jun 2008 - 11:55 pm | शितल
फोटो ही मस्त बर का स्वाती ताई.