मोहाली सामना आणि राष्ट्रगीते

अलख निरंजन's picture
अलख निरंजन in काथ्याकूट
29 Mar 2011 - 10:33 pm
गाभा: 

उद्याच्या मोहालीतील सामन्यात पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायले जावे का? पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या येण्यावरुन तात्या वगैरेंनी निषेध नोंदवला आहे, उद्या त्यांच्या राष्ट्रगीताला मोहालीतील प्रेक्षकांनी उभे राहावे का? एक वडा दोन पाव लोकांचे मत काय आहे?

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

29 Mar 2011 - 10:38 pm | नितिन थत्ते

पण्णास नक्की. :)

गणपा's picture

29 Mar 2011 - 10:56 pm | गणपा

सामना नको पण धागे आवरा म्हणायची पाळी येणार आहे.
जी काही तुमची मतं आहेत ती एकाच ठिकाणी मांडा की लेको. नाही तरी एवी तेवी आवांतर होतच असतं.

विकास's picture

30 Mar 2011 - 12:17 am | विकास

सामना नको पण धागे आवरा म्हणायची पाळी येणार आहे.

१००% सहमत! :-)

बाकी मूळ प्रश्नासंदर्भात... पाकीस्तानशी आजही आपले राजनैतिक संबंध आहेत. त्यामुळे आंतर्राष्ट्रीय रितीरिवाजाप्रमाणे (प्रोटोकोल) जे होयचे असेल ते होउंदेत.

मुक्तसुनीत's picture

30 Mar 2011 - 1:07 am | मुक्तसुनीत

पाकीस्तानशी आजही आपले राजनैतिक संबंध आहेत. त्यामुळे आंतर्राष्ट्रीय रितीरिवाजाप्रमाणे (प्रोटोकोल) जे होयचे असेल ते होउंदेत.

असेच म्हणतो !

५० फक्त's picture

30 Mar 2011 - 8:02 am | ५० फक्त

+१, काहीही झालं तरी अतिशय अपवादात्मक परिस्थिती वगळता सध्या लागु असलेले सर्व आंतरराष्ट्रीय नियम व प्रोटोकॅल पाळ्णं हे योग्यच आहे.

आणि आता सगळ्यांनीच या मॅच कडं मॅच म्हणुन पाहणं गरजेचं झालंय, उगाच महायुद्ध, रनभुमी असले बिनकामाचे शब्द वापरुन हाइप करण्यात काही अर्थ नाही.

प्रास's picture

29 Mar 2011 - 10:57 pm | प्रास

.

इंटरनेटस्नेही's picture

30 Mar 2011 - 3:07 am | इंटरनेटस्नेही

प्रतिसाद स्वसंपादित.

शेखर's picture

30 Mar 2011 - 1:01 am | शेखर

आधी तुमचे मत सांगा आणी मग लोकांना विचारा

प्रश्नच येत नाही पाकीस्तानचे राश्ट्रगीत वाजवायचा

सामन्याच्या वेळी पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजवायचं की नाही याचा निर्णय लवकरच घेतला जावा. बर्‍याच लोकांनी लाख लाख रुपयांची टिकीटं काढलीत त्यांची उगाच अडचण व्हायला नको.
भारतीय बुकींनी हजारो कोटी रुपये सामन्यावर लावलेत नसते वाद काढून ‘आपल्या’ बुकींचं नुकसान करणं योग्य होईल काय?

वेदनयन's picture

30 Mar 2011 - 2:55 am | वेदनयन

तुम्ही कितीही गळा काढला तर काय फरक पडणार आहे. त्यांना जे करायचे त करतीलच. तुम्ही गप मॅच पहा.

आणी हो, आता ह्या प्रश्नाचा कौल नका काढु.

अलख निरंजन's picture

30 Mar 2011 - 3:18 am | अलख निरंजन

माझ्या मते तात्यांचा धागा वेगळा आहे. माझा प्रश्न हा वेगळा असल्याने मी स्वतंत्र धागा काढला. मिपाकरांचा रोष ओढवून घ्यायला नको होते असे आता वाटत आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष भारतात येणार ह्यापेक्षा त्यांचे राष्ट्रगीत आपल्या भुमिवर गायले जाणार तेव्हा उन्नीकृष्णन आणि इतर अनेक शहिद भारतीयांच्या आत्म्याला किती यातना होतील. असे मला इथल्या लोकांकडून जाणून घ्यायचे होते. अर्थात मी काही तात्यांसारखा प्रसिद्ध मिपाकर नाही त्यामूळे मिपाकरांना माझा प्रश्न रुचलेला दिसत नाही आणि त्याबद्दल मी दिलगीर आहे.

पुन्हा एकदा सर्व दुखावकेल्या मिपकरांची माफी मागतो आणि माझ्याकडून फक्त वाचनच होत राहील ह्याची ग्वाही देतो.

इंटरनेटस्नेही's picture

30 Mar 2011 - 3:22 am | इंटरनेटस्नेही

पुन्हा एकदा सर्व दुखावकेल्या मिपकरांची माफी मागतो आणि माझ्याकडून फक्त वाचनच होत राहील ह्याची ग्वाही देतो.

शाब्बास रे मित्रा!

-
(प्रसिद्ध मिपाकर) इंट्या.

गणेशा's picture

31 Mar 2011 - 8:33 pm | गणेशा

प्र.का.टा.आ.