आमार बांगला सोनार बांगला

भोचक's picture
भोचक in काथ्याकूट
10 May 2008 - 2:48 pm
गाभा: 

मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत. मराठी मन मात्र या विषयावर विभागले गेल्यासारखे दिसते. वर्तमानपत्रातील प्रतिक्रिया, ब्लॉग्ज यावरून ते दिसतेय. पण बंगाली लोकांचा भाषाभिमान याविषयी एक चांगला लेख येथे वाचला. मला तो आवडला आणि पटलाही.
http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/mumbai/0805/10/10805...

प्रतिक्रिया

विजय भांबेरे's picture

10 May 2008 - 3:38 pm | विजय भांबेरे

लेख चांगला आहे ...!

मराठी भाषेबद्दल सर्वात म्हत्वाचं म्हणजे आम्हीच इतरांना त्यांच्याभाषे मध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांना मराठी शिकणे गरजेचे वाटत नाही.
आपण हिंदीभाषीकांना त्यांच्याभाषे मध्ये उपलब्ध जर नसलो तर त्यांना मराठी शिकवीच लागेल.

अभिज्ञ's picture

10 May 2008 - 4:42 pm | अभिज्ञ

लेख थोडासा तोकडा वाटला.
मुळात मराठी आणि बंगालि समाजातच नव्हे तर भाषेत सुद्धा कमालिचे साधर्म्य आहे.
प्रस्तुत लेखात लेखकाने ह्याबाबत बंगालि भाषेला थोडेसे झुकते माप दिलेले आहे असे भासते.
परंतु दोन्ही कडे होत असलेल्या परप्रांतीय आक्रमणात कमालीचा फरक आढळतो.
महाराष्ट्रात विशेषतः मुंबई-पुणे येथे जास्त करून बिहार युपी इथलिच लोके जास्त येतात.
त्याप्रमाणात मराठी माणूस इथून बाहेर जाताना दिसत नाही.या उलट बंगाली माणूस हा मोठ्या संख्येने
बंगाल बाहेर पडलेला आढळतो. त्याबद्दल इथे कसलाहि उल्लेख आढळला नाही.

रवींद्रनाथ, बंकिमचंद्र, शरदचंद्र, जीवनानंद दास, मायकल मधुसूदन, सुकांत भट्टाचार्य (सध्याचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे काका. स्वतः बुद्धदेवही साहित्यिक आहेत. शिवाय व्यासंगीही), सुनीलकुमार गांगुली अशी थोर व ख्यातनाम साहित्यिकांची मोठी परंपरा बंगालीत आहे. या साहित्याचा प्रभाव पूर्ण भारतावर पडला आहे. रवींद्रनाथांना नोबेल मिळाले हे तर विख्यात आहेच. त्यामुळे एकेकाळी तर देशातील अनेक मान्यवर लोक बंगाली शिकणे अभिमानाचे मानत. अगदी आजही परप्रांतातून येणाऱ्या समाजाच्या उच्च स्तरातील व्यक्तीला बंगाली शिकणे हा अभिमानाची बाब वाटते. बंगालीतील उच्च दर्जाचे साहित्य आपल्याला वाचता येईल हा आनंद त्यात असतोच, पण या थोर साहित्यपरंपरेच्या आस्वादकांत आपण सामील झालो याचाही एक अभिमान तयार होतो. म्हणूनच क्रिकेटपटू अरूण लाल, अशोक मल्होत्रा ही मंडळी बाहेरून कोलकत्यात आली, पण ती चांगली बंगाली बोलतात.

मराठीत सुध्दा अतिशय दर्जेदार वाङमय निर्माण झालेले आहे.बाहेरून आलेली मंडळी स्थानिक भाषा चांगली बोलतात ही उदाहरणे महाराष्ट्रात देखील पहायला मिळतात.
फरक फक्त येवढाच आहे कि समाजवादी पक्षासारखे फक्त युपी बिहार च्या लोकांच्या मतांवर राजकारण करणारे पक्ष जेव्हा युपी बिहारेतर राज्यात तिथल्या परप्रांतीयांच्या जीवावर राजकारण सुरु करतिल तेंव्हा तिथली परिस्थिती हि आजच्या महाराष्ट्राहून वेगळी नसेल.
आज महाराष्ट्र /मराठी विरोधाचा डंका सर्वत्र वाजत आहे.
समजा उद्या एखाद्या दुस-याच राज्यात उदा. हरियाना ,तमीळ किंवा तेलगु लोकसंख्या जास्त आहे हे पाहून तिथे डि.एम्,के किंवा
तेलगु देसम पक्षाने आपला उमेदवार निवडणुकित उभा केला तर काय होइल्?तिथल्या स्थानिक जनतेला काय वाटेल?
तिथली परिस्थिती हि आजच्या महाराष्ट्राहून वेगळी नसेल.

मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत.

इथे मुळ मुद्दा हा राजकीय आक्रमण हाच आहे.मराठी अस्मितेबद्दल कुठल्याही मराठी माणसाच्या मनात काहिही संदेह नाहि.
विरोध हा फक्त परप्रांतीय राजकीय आक्रमणालाच आहे.आक्रमण होते आहे असे वाटले कि मगच अस्मिता जाग्या होतात.
बाकिच्या राज्यात हा प्रकार आधिच झाला असता.महाराष्ट्रातील षंढ राजकारण्यांमुळे हा प्रकार इथे व्हायला बराच वेळ लागलाय.

असो.
एक चांगला दुवा दिल्याबद्दल, आपले धन्यवाद.

अबब

अभिरत भिरभि-या's picture

10 May 2008 - 5:40 pm | अभिरत भिरभि-या

महाराष्ट्र व इतर राज्यांमधे फरक आहे म्हणून परिस्थिती नक्की च वेगळी असणार आहे ..
उदा:
आज बंगळुरात स्थानिक ३८% च्या जवळपास आहेत .. तमिळी बालेकिल्ला चेन्नई मध्ये निम्मे तेलगु आहेत. कलकत्यापासून बिहार/झारखंड अतिशय जवळ असल्याने बिहार्‍यांचे कलकत्ता स्थलांतराला अक्षरशः शतकांचा इतिहास आहे .. तुलनेने त्यांचे मुंबई स्थलांतर ही काही दशकांची बाब ...

मला प्रश्न पडतो संख्याशास्त्रिय दृष्टीकोनातुन ही मंडळी त्या त्या ठिकाणी अल्प संख्य असूनही स्वतःचा प्रभाव कसा टिकऊ शकतात ?
एकमेव कारण ... इतरांना विरोध नसतो .. पण आग्रह स्वभाषेचा असतो ..
उदा: बंगळुरात कानडी संघटना FM वर "हिंदी" गाणी का लावता असे म्हणून हल्ला करुन देश्पातळी वर स्वतःचे हसू करून घेणार नाहीत .. पण कानडी गाणी इतकी कंमी का म्हणून जाब विचारतील . अर्थ एकच .. पण मनसे हून नक्कीच शहाणपणाची गोष्ट ... त्याहून्ही पुढ्ची गोष्ट म्हणजे कानडी गाणी लावतात म्हणून जनता ही प्रतिसाद देईल .. परिणाम रेडिओ वाल्यालाही economic incentive ... आज पुण्यात किती जण यासाठी प्रयत्न करतात ?
अहो मराठी बनुन राहा असे राज ठाकरे सांगतात पण इतरांना "मराठी" बनवणार्‍या किती गोष्टी आजु बाजुला असतात ???

थोडक्यात इतरांना मारण्यापलिकडे आपला "बाणा" पोचत नाही .. मारामारिने आपले च हसु होते.
मराठीची भाषि़क संख्या तब्बल दहा कोटी आहे .. केवळ स्वभाषेचा आग्रह नसल्याने नडते ..

अभिरत भिरभि-या's picture

10 May 2008 - 4:59 pm | अभिरत भिरभि-या

"आपल्या भाषेतील लोकांशी मातृभाषेतच बोलायला हवे. " .. केवळ ही एकमेव गोष्ट आपल्यात हवी ... बाकी सर्व काही आपोआप सुरळित होईल ...
होस्टेल मधे असताना कॉन्व्हेण्ट मध्ये शिकलेला बंगाली मुलाला सुद्धा बंगाली कादंबर्‍या वाचताना मी पाहिले होते ...
त्याच वेळी इचलकरंजीचा आमचा "आंतर-भारती" दोस्त आमच्याशी सुद्धा हिंदी तून बोलायचा प्रयत्न करायचा ...

अवांतर :
एइ लेखे बांगाली आतिशजोक्ति ओ प्रचुर आछे ..
लेखातील बर्‍याचशा गोष्टीं आता कलकत्यातही वेगाने कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत ... बंगाली हिंदीला मराठी पेक्षा ही जवळची असल्याने नव्या पिढीला हिंदी येते च येते .. बॉलीवुडने मराठी, गुजराती सोबत बंगाली वरही भरपुर धुरळा उडवला आहे. पण "भारतीय " होणे म्हणजे मराठीला ( मायबोलीला) मारणे अशा खुळ्या समजुती सर्वसामान्य बंगाली धरत नसल्याने कलकत्याची मुंबई होणॅ अजुन दूर आहे.

टीपः
मात्रुभाषा हा शब्द कसा लिहितात हो ? ( आम्हाला येत नसल्याने मायबोली शब्द वापरला .. :-C ;) )
--- सर्वज्ञ पुणेकर
अभिरत

स्वाती दिनेश's picture

10 May 2008 - 6:40 pm | स्वाती दिनेश

maatRubhaashhaa..मातृभाषा

इनोबा म्हणे's picture

11 May 2008 - 2:34 am | इनोबा म्हणे

वेबदूनिया हे संस्थळही(मूळचे) अमराठीच असावे. कारण इथे प्रत्येकवेळी मराठी आणि महाराष्ट्रालाच फोडून काढले जातेय. परप्रांतियांच्या महाराष्ट्रातील राजकीय आक्रमणाबाबत अथवा अबू आझमी व अमरसिंगांबाबत मात्र काहीच लिहीले जात नाही. राज आणि मनसेवर मात्र आवर्जुन चिखलफेक केली जातेय.

"राज नव्हे;चाळीस वर्षांपूर्वीचे बाळासाहेब" या लेखावर व त्यापूर्वीही काही लेखांवर मी प्रतिसाद दिले होते. मात्र ते प्रसिद्ध केले गेलेच नाहीत.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर