अंडा भुर्जी आणि चपाती

कुंदन's picture
कुंदन in पाककृती
28 Mar 2011 - 5:51 pm

सकाळ पासुन लाईट नव्हते ( नाही अर्थ अवर नव्हता) , म्हटले आता लाईट्या आल्यात तर काही तरी खायला बनवावे...

साहित्य :
२ मध्यम कांदे
२ अंडी ( कोंबडीची )
३-४ हिरव्या मिरच्या
१ टी स्पुन हळद.
मिठ चवीनुसार.
लाल तिखट झेपेल तेव्हढे.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

Bhurji

Chapati

क्रमाश:

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

28 Mar 2011 - 5:54 pm | कच्ची कैरी

हे काय पाकृ कुठेये?अस मी विचारणार नाही कारण खाली क्रमशः लिहिले आहेच
पर ये बात कुच हजम नही हुई -)हाजमोला घ्यायला सांगु नका ,नका नका सांगु नका ;)

मेघवेडा's picture

28 Mar 2011 - 6:04 pm | मेघवेडा

तेज्यायला 'क्रामशः'?

जय हो कुंदनभौ!

स्पा's picture

28 Mar 2011 - 6:19 pm | स्पा

हे काय आहे???

हा हा हा :D

पुढील भागाच्या प्रतीक्षेत

सुहास..'s picture

28 Mar 2011 - 6:21 pm | सुहास..

मेव्या , लेका 'क्रामशः' नाय रे क्रमाश ...आता कुठ-कुठले मास..आय मीन...माश दाखवतो हा काय माहीत पुढे ;)

अवांतर : मॅच बघायला येतो आहेस ना बे ?

असो कुंद्या, लेका चपात्या.
पण या
यला लागल्या व्हय तुला आता . पुन्यांदा बाप झाल्यावर सुधारलास लेका ;)

पैसा's picture

28 Mar 2011 - 7:24 pm | पैसा

पुढच्या पाकृच्या प्रतीक्षेत...

>>२ अंडी ( कोंबडीची )
=)) =))

(चपात्या छान झालेल्या दिसतायत हो! कोणी केल्यात तेवढं सांग.)

सविता's picture

28 Mar 2011 - 9:50 pm | सविता

अच्रत बावल्त..... काहीही लिहितो....

सविता's picture

29 Mar 2011 - 8:06 pm | सविता

माझा हा प्रतिसाद.. टार्‍याच्या प्रतिक्रियेला होता. त्याची प्रतिक्रिया कुठे गेली?

पंगा's picture

29 Mar 2011 - 8:11 pm | पंगा

माझा हा प्रतिसाद.. टार्‍याच्या प्रतिक्रियेला होता. त्याची प्रतिक्रिया कुठे गेली?

काऊने नेली.

टारझन's picture

29 Mar 2011 - 8:32 pm | टारझन

जाउ द्या , प्रतिक्रीयेतले सिख कबाब प्रतिक्रीया उडवणार्‍याला फार आवडले , आणि त्याने ते खाऊन टाकले असावेत :) सो , हॅपी फॉर उडवणारे !

अवांतर : आत्ताच कुंद्याला जी-टॉक वर प्रतिक्रीयेबद्दल काही अक्षेप असल्याचे विचारले . त्याला त्यात काही एक वाटलं नव्हतं :)

वा वा.
कुंदनशेठ फॉर्मात आलेले दिसतात.
बादवे,
ही पाकृ अंडे न वापरता कशी करता येईल?

अभिज्ञ.
अवांतर : नानाचे ५०० रुपये दिलेस का रे त्याला?

कुंदन's picture

28 Mar 2011 - 9:06 pm | कुंदन

>>ही पाकृ अंडे न वापरता कशी करता येईल?

तुम्ही अंड्या ऐवजी पनीर वापरु शकता.
मात्र पनीर भुर्जी ची पा कृ मी देणार नाही. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Mar 2011 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली प्रगती आहे. :)

अंडाभूर्जी तव्यावरुन काढली की चपाती तव्यावर फिरवून घ्यायची
चपाती लै भारी लागते. :)

-दिलीप बिरुटे

पर्नल नेने मराठे's picture

29 Mar 2011 - 1:37 pm | पर्नल नेने मराठे

एवढे एन्ग्लिश नका बोलु ;) चपाती काय =)) पोळी म्हणा कि मराठित :)

कुंदन's picture

29 Mar 2011 - 10:29 pm | कुंदन

तुम्ही तव्यावर फिरवून घेतलेली चपाती खा अन अंडाभूर्जी मला द्या.

व्हेजकडुन अंड्याकडे, आणि अंड्याकडुन चिकनकडे उत्तरोत्तर प्रगती होणार असे दिसतेय.

बाकी मला आधी वाटलं की लंबुच्या पाउलांवर पाउल टाकत कुंद्याने याचं विडंबन टाकलय की काय?

इरसाल's picture

28 Mar 2011 - 8:29 pm | इरसाल

हे पोहे दिसत आहेत

कदाचित....................

५० फक्त's picture

29 Mar 2011 - 7:34 am | ५० फक्त

+१ टु इरसाल,

मला पण पोहेच वाटले, म्हणजे काय अजुनही वाटत आहेत. जो पर्यंत कढई किंवा तव्याच्या काठावर अंडे फोडुन ते परतलेल्या कांद्यावर टाकल्याचा फोटो येत नाही, तो पर्यंत ही अंडा भुर्जी वाटणार नाही.

दादर पुर्वेला नितिनची गाडी आणि पुण्यात कर्वे रोडवर हर्षल हॉलजवळ अप्पाची गाडी या ठिकाणि अंडा भुर्जी हा पदार्थ अक्षरक्ष: हाव-यासारखा खाल्लेला आहे.

स्पंदना's picture

29 Mar 2011 - 10:24 am | स्पंदना

त्या भुर्जीच्या प्लेटला 'क्रुस' का लावलेत? खाल्लात तर सुळावर देउ म्हणुन?

sneharani's picture

29 Mar 2011 - 10:39 am | sneharani

लेख क्रमशः येतात पण चक्क पाककृती क्रमाश:?
क्रमाशः ठेवलीये म्हंटल्यावर..... पाककृतीत अंडी कशी फोडायची पासून कणीक कशी मळायची याची डिटेल कृती येणार आहे की काय? ;)

स्मिता.'s picture

29 Mar 2011 - 1:50 pm | स्मिता.

२ अंड्यांसाठी ३-४ हिरव्या मिरच्या + झेपेल तेव्हढे लाल तिखट, २ कांदे, १ टी स्पून हळद!! ये प्रमाण कुछ हजम नही हुवा...

क्रमाशः म्हटलेले असल्याने अपेक्षा करते की पुढच्या भागात आणखी अंडी असतील ;)

नगरीनिरंजन's picture

29 Mar 2011 - 1:57 pm | नगरीनिरंजन

:-D
अंड्यांच्या मानाने तिखट आणि मिरच्या जास्त झाल्याने कदाचित पाकृ क्रमश: ठेवून पाचवी खोली गाठावी लागली असावी असा आमचा कयास आहे. ;-)

कुंदनभौ, ह.घ्या.

सहज's picture

29 Mar 2011 - 2:06 pm | सहज

कुंदनसेठ तुम्ही शाकाहारी आहात ना? पहिला फोटो पाहून तरी ती अजिबात अंडाभुर्जी वाटत नाही आहे. लाल तिखटाचा रंग गेला आहे. का आता लाल तिखट झेपत नाही हो कुंदनसेठ?

खालच्या फोटोतील पोळीची, फोडणीची पोळी (पोळीचा चिवडा का भाजी अजुन काय म्हणत असतील ते.) केली आहे असे वाटते आहे.

कुंदन's picture

29 Mar 2011 - 2:09 pm | कुंदन

धन्यवाद सेहेज राव.
अंमळ इनो घ्या.
पाकृ आवडली नसेल तर , फलाहार करा.

प्रीत-मोहर's picture

29 Mar 2011 - 5:46 pm | प्रीत-मोहर

हाहा कुन्द्या =))

विसोबा खेचर's picture

29 Mar 2011 - 7:20 pm | विसोबा खेचर

लै भारी..

अजून येऊ द्या साहेब..

तात्या.