एक नीरीक्शन

नन्या's picture
नन्या in काथ्याकूट
10 May 2008 - 12:42 pm
गाभा: 

मी नन्या,
बरेच वेळा मीपा ला, पाहुणा आसतो.
पण नीरीक्शन असे की, सकाळी सदस्य बरेच पण पाहुणे कमी, दुपारी पाहुणे बरेच, सदस्य कमी. असे का?

प्रतिक्रिया

राजे's picture

10 May 2008 - 12:46 pm | राजे (not verified)

तुम्हाला मिसळपाव वर वाचण्यासाठी फक्त "हॉटेलात आलेली माणसं" ह्याचीच लिस्ट का दिसावी ?

फालतू कारणासाठी मिसळपावचा वापर करु नका... तब्येत बिघडेल (पंच साहेब ह्या लेखाची वाट लावतील)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 May 2008 - 2:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फालतू कारणासाठी मिसळपावचा वापर करु नका...

सहमत आहे !!!

(पंच साहेब ह्या लेखाची वाट लावतील)

या चर्चाप्रस्तावाबरोबर काही चर्चा प्रस्तावांची (त्याचबरोबर काही फाल्तु प्रतिसादांचीही) वाट लावली पाहिजे किंवा काही मर्यादा घातल्या पाहिजे असे वाटते.:)

छोटा डॉन's picture

10 May 2008 - 1:03 pm | छोटा डॉन

त्याच काय आहे, मी आहे मिपाचा कायमचा पडीक सदस्य, त्यामुळे हजरी तर लावावीच लागते मग ती पाहुणा म्हणून का असेना ...

सकाळी मी "सदस्य" म्हणून येतो कारण सकाळी मला भरपूर वेळ असतो. बायको सकाळ्-सकाळ चहा करून देते तो पित मस्त सदस्य म्हणून वावरतो ...
एकदा का दुपार झाली की मग माझ्या कामाला सुरवार होते. मग मला भाज्या चिरणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, भांडी घासणे यासारखी कामे करावी लागतात, सकाळीच "चहा" केल्याने बायकोचे काम संपले असते. आता ही सर्व कामे करताना मला "लॉग्-इन" करता येत नाही कारण लॅपटॉप बायकोकडे असतो. मग आपलं तिच लक्ष नाही असं पाहून मी दुपारी चोरुन "पाहूणा" म्हणून वावरतो ...
दुपारी झोप झाल्यावर संध्याकाळी बायको पोराला घेउन फिरायला बाहेर पडते मग मात्र मला टाईम भेटून मी पुन्हा "सदस्य" म्हणून वावरतो ...
रात्री पुन्हा आमच्या नशिबी "दुपारसारखे भोग" असतात, त्यामुळे पुन्हा मला "पाहुणा" म्हणून यावे लागते.
जेवणं झाल्यावर, भांडी घासून ती जागेवर ठेउन झाल्यावर, पोराला झोपवल्यावर, झालच तर बायकोला झोपवल्यावर मला पुन्हा एकदा टाईम भेटतो व मी पुन्हा "सदस्य" म्हणून अवतरतो ...

आता माझ्यासारखी "लाईफस्टाईल" बर्‍याच लोकांची असणाची शक्यता असल्याने आपले नीरीक्शन " सकाळी सदस्य बरेच पण पाहुणे कमी, दुपारी पाहुणे बरेच, सदस्य कमी. " असे झाले असेल ....

अवांतर : हा एक विनोद होता. खरे कारण मला तरी माहित नाही ...

अतिअवांतर : अशा गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा जर काही लिहले, वाचले, चर्चा केली तर कल्याणच होईल !!!

पळून पळून दमलेला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन's picture

10 May 2008 - 2:16 pm | मन

फालतू कारणासाठी मिसळपावचा वापर करु नका...

सहमत आहे !!!

बिरुटे सर्,वेताळ साअहेब आणि राजे, एक कळलं नाहे.
ह्या चर्चा प्रस्तावात "फालतु" काय आहे?
(माझ्या माहिती प्रमाणे इथे फालतु म्हण्जे वैयक्तिक रोखाने केलेलं, किंवा अश्लिल्/गचाळ उद्देशानं लिहिलेलं,
किम्वा काहितरी उगिचच आग खाउ लिहिलेलं इथलं लिखाण. बरोबर?)
मग यात फालतु काय आहे?
हा चर्चा विषय (माझ्याप्रमाअणेच) तुम्हालाही बोरिंग/कंटाळ्वणा/निरर्थक वाटु शकतो मान्य आहे.
पण "फालतु" म्हणण्यासारखं काय आहे ह्यत?

(पंच साहेब ह्या लेखाची वाट लावतील)

का वाट लावतील? किंवा का लावायला हवी?


या चर्चाप्रस्तावाबरोबर काही चर्चा प्रस्तावांची (त्याचबरोबर काही फाल्तु प्रतिसादांचीही) वाट लावली पाहिजे किंवा काही मर्यादा घातल्या पाहिजे असे वाटते.

का म्हणुन??

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

राजे's picture

10 May 2008 - 2:29 pm | राजे (not verified)

मी फालतू हा शब्द निरर्थक 8} ह्या अर्थाने वापरला आहे, मला माझ्या नजरेने वरील लिखाण निरर्थक वाटत आहे व सरपंचांनी ते नष्ट करावी ही देखील ईच्छा माझ्या मनी आहे.

का म्हणुन??

असेच रोज दोन-चार चर्चा व लेख येऊ देत मग तुम्हाला देखील कळेल की का नष्ट करावे.
त्यावेळी तुम्ही का म्हणून असे विचारणार देखील नाही ;)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन's picture

10 May 2008 - 2:43 pm | मन

ही सापेक्ष गोष्ट आहे.
तुम्हाला हे निरर्थक वाटते(माझ्याप्रमाणेच.)पण म्हणून काही ते सर्वांसाठीच निरुपयोगी किंवा कुणासाठिच घातक
सिद्ध होत नाही.
इथं येणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला (किंवा मला!) अर्थ पुर्ण वाटलिच पाहिजे असं काही नाही.
किंवा ती तुम्हाला आणि मला अर्थ पुर्ण वाटली तरच ठेवायची असही नाही.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

राजे's picture

10 May 2008 - 2:52 pm | राजे (not verified)

येथे तुमची व माझी गोष्ट चालू नाही आहे, हे सार्वजनिक संस्थळ आहे तेव्हा अश्या फालतू गोष्टी टाळल्या जाव्यात ह्याच मताचा मी आहे, तुमचे मत माझ्या मताच्या विरुध्द असले तरी मी तुमच्या मताचा आदर करत आहेच.

माझा तर्फे हा विषय संपला, एका निरर्थक चर्चेसाठी मीच फालतू मध्ये दोन-तीन प्रतिसाद दिले. :(

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन's picture

10 May 2008 - 3:06 pm | मन

माझा तर्फे हा विषय संपला, एका निरर्थक चर्चेसाठी मीच फालतू मध्ये दोन-तीन प्रतिसाद दिले
:-)

मीही आता माझ्यातर्फे थांबवतोय.
(एनी वेज् , येक शंका,ज्याच्यासाठी भांडतोय तो शिंचा लेखक कुठे गेलाय्?का मग मीच बिनडोक पणा करीत होतो इथं लिहुन? )

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 May 2008 - 3:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येथे तुमची व माझी गोष्ट चालू नाही आहे, हे सार्वजनिक संस्थळ आहे तेव्हा अश्या फालतू गोष्टी टाळल्या जाव्यात ह्याच मताचा मी आहे, तुमचे मत माझ्या मताच्या विरुध्द असले तरी मी तुमच्या मताचा आदर करत आहेच.

माझा तर्फे हा विषय संपला, एका निरर्थक चर्चेसाठी मीच फालतू मध्ये दोन-तीन प्रतिसाद दिले.

राजे, तुमच्यामुळे आम्ही या भानगडीत पडलो. नाही तर आम्ही निरर्थक प्रतिसाद आणि चर्चेकडे ढुंकूनही पाहत नाही. कधी कधी नुसताच पाहतो. पण प्रतिसाद वगैरे लिहीत नाही ;)

आपला,
प्रा.डॉ.

( निरर्थक प्रतिसाद लिहिल्यामुळे अपराधीपणाच्या भावनेने भिंतीला बुक्के मारणारा :) )

छोटा डॉन's picture

10 May 2008 - 3:43 pm | छोटा डॉन

सर तुमची , राजेंची व मनची चर्चा वाचून मला पटले की अशा फालतू विषयांसाठी हे स्थळ नाही ...
पहिल्यांदा मी "विनोदाच्या भावनेने " एक प्रतिसाद देऊन टाकला. पण तो पण नको द्यायला हवा होता असे आता माझे मत झाले आहे ...

असो. तुमच्या सर्वांचे म्हणणे पटले ...
भाविष्यात काळजी घेतली जाईल ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 May 2008 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी फालतू हा शब्द निरर्थक ह्या अर्थाने वापरला आहे.

आम्हीही निरर्थक याच अर्थाने तो शब्द वापरला आहे.

वेताळ's picture

10 May 2008 - 5:37 pm | वेताळ

आज आपण सर्व मिपा करानी दाखवुन दिले कि आपण एकाद्या फालतु व निर्रथक विषयावर किती गहन चर्चा करु शकतो.त्याबद्दल सर्व विचारवंताचे हार्दिक अभिनंदन.मलाही काही प्रश्न पडले आहेतं. नन्या मिपाचा सदस्य पण आहे आणि स्वःताला पाहुणा हि समजतो.तो नेमका कोण आहे. त्यात सकाळी तो काय म्हणुन येतो? दुपारी काय म्हणुन तो असतो?त्यात तो कसले डोंबलाचे नीरीक्शन करतो?
ह्याप्रश्नांची जर बरोबर उत्तरे दिली नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होतील.
(वैतागलेला) वेताळ

पल्लवी's picture

12 May 2008 - 9:25 am | पल्लवी

(|: