पुरणपोळी होळी स्पेश्यल :)

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
18 Mar 2011 - 1:28 am

मीली ने पुरणपोळी ची पा़कृ दिली आहे तरी सण म्हणून मीसुद्धा पुरणपोळी ची पा़कृ देत आहे. घरोघरी सगळ्यांची आवडती पुरणपोळी :)

सावधान!! डाएट सांभाळणारी मंडळी कृपया गुळ किती, साखर किती, तुप किती असे म्हणू नये, सणावारा ला गोडाने सुरुवात करा, कॅलॅरीज मोजण्याने नव्हे ;)

साहित्यः
३ कप चणाडाळ
३ कप चिरलेला गुळ
२ टेस्पून साखर
१/२ जायफळ पूड करून
१ टीस्पून वेलचीपूड
अडीच कप मैदा+१/२ कप गव्हाचे पीठ
चिमूटभर मीठ
६ टेस्पून तेल
तांदळाची पीठी पोळ्या लाटण्यासाठी

पा़कृ:

चणाडाळ स्वच्छ धुवून बोटाचेपे शिजवणे.

शिजलेल्या डाळीतून पाणी गाळून घेणे.
.

ह्याला कट म्हण्तात.

.

एका पातेल्यात डाळ चांगली घोटून घेणे.

.

गुळ आणी साखर त्यात घालून एकत्र करणे .

.

पुरण आधी पातळ होईल सतत ढवळत राहीले के ते घट्ट होईल.

.

पुरण चांगले शिजले हे झारा/मोठा चमचा मधोमध उभा राहीला की समजते.

.

त्यात वेलची-जायफळपूड घालून नीट एकत्र करून पुरणयंत्रातुन वाटून घ्यावे.

.

हे झाले पुरण तयार.

.

मैदा+ गव्हाचे पीठ+मीठ+तेल घालून सैलसर भिजवावी. तेल-पाण्याने चांगले मळून घेणे.
२ तास कणीक भिजवल्यावर चांगली बत्त्याने कुटून घ्यावी व परत मळून घ्यावी.

.

मैद्यची पारी करून त्यात पुरण भरून , पारीचे तोंड नीट बंद करुन घेणे.

.

तांदळाची पीठी लावूना हलक्या हाताने पोळी लाटणे.

.

तवा मंद गॅसवर ठेवून पोळी घालावी .

.

सारखे उलटू नये, एकीकडून नीट भाजली / शेकली की दुसरीकडून भाजावी/ शेकावी.
गरमा-गरम साजुक तुपाबरोबर किंवा दूधाबरोबर खायला द्यावी.

.

कटाच्या आमटीबरोबर पण खाऊ शकता.

.

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

18 Mar 2011 - 1:34 am | पुष्करिणी

मस्त..
तूप आणि पुरणाची पोळी प्रचंड आवडते

फोटू छान. मी पारीसाठीच्या कणकेत मैदा मिसळत नाही.
कटाच्या आमटीबरोबर काढलेला फोटू चढवून तुम्ही आमच्यावर अन्याव केलेला आहे.
मिली आणि तुम्ही शनिवारी पुरणपोळी करण्याऐवजी आज केलीत.
त्याचे कारण काय असावे हा विचार करतिये.;)
आमच्याकडे शनिवारी पुरणपोळी आहे आणि एका मुंजमुलाला केळवण रविवारी आहे त्या दिवशी श्रीखंड पुरी आहे.;)
फोटू चढवणार नाहीये हे आपलं सहज सांगतिये. हे पदार्थ कमी खायला हवेत नाहितर इतक्या दिवसांच्या डाएटवर कटाची आमटी फिरणार आहे.;)

अनामिक's picture

18 Mar 2011 - 2:37 am | अनामिक

पुरणपोळीच्या पारीसाठी आमच्या घरीपण फक्तं कणिकच वापरतात.

प्राजु's picture

18 Mar 2011 - 2:42 am | प्राजु

मीही पारी कणकेचीच करते :)

मेघवेडा's picture

18 Mar 2011 - 2:09 am | मेघवेडा

कडक!!

इथं शन्वारी कुणाकडे बनताहेत का ते शोधतो आहे.. कुणी आहे का? पोटाला घाला वो मायबाप!

रेवती's picture

18 Mar 2011 - 2:17 am | रेवती

आमच्याकडे ये मेवे!:)
कडक!!
पोळ्या मऊसूत दिसतायत, कडक नाहीत.

गणपा's picture

18 Mar 2011 - 2:19 am | गणपा

१०/१०
खालुन तिसरा आणि चौथा फोटो ती पुरणपोळीच आहे ह्याची साक्ष देतायत.
झक्कास :)

आइ शपथ क्काय झक्कास दिस्तेय !
मस्त, उद्या बेत आहेच :)

मुलूखावेगळी's picture

18 Mar 2011 - 10:50 am | मुलूखावेगळी

छान ग.
पन मैदा घातलेली पुरणपोळी कशी लागते, मी अजुन खाल्ली नाहिये. चवीत फरक पड्तो का थोडा?

माझ्या सासुबाई पण जवळजवळ याच पद्धतीने करतात.

थोडासा बदल म्हणजे... गूळ्/साखर मिक्स केल्यानंतर पुरणयंत्रातून काढणे, कुटणे झंझट नाही. डाळ शिजलेली असतानाच ती मिक्सर मध्ये व्यवस्थित वाटून घेतात (पाणी न घालता), त्यामुळे नंतर चे श्रम वाचतात.

आणि फायनल प्रॉडक्ट जे काय तयार होते... की ज्याचे नाव ते...

माझ्यासारखी गोड न आवडणारी पण दोन-दोन पोळ्या गट्टम करते!!!

सासुबाईंना विचारून... खरेतर पहिल्यांदा पूर्णपणे स्वतः पण करून... रेसिपी देत आहे.

डाळ पूर्ण शिजवून घ्यायची ( बोटचेपी नाही)..पण ती कुकर मध्ये न शिजवता...वेगळ्या भांड्यात मंद आचेवर शिजवायची..म्हणजे पहिला कढ (सासुबाईंच्या मते अशुद्धता!.. मला ते फारसे पटत नाही...असो) काढून टाकता येतो... लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकता येते... शिवाय कुकर मध्ये शिट्टी घेतल्याने जे एक्स्ट्रॉ पाणी शोषले जाते ते ही होत नाही.

मग एका वेगळ्या भांड्यात ही डाळ काढून्...उरलेले पाणी पूर्णपणे काढून टाकायचे. एका चमच्याने किंवा डावाने डाळींब्या मोडेपर्यंत डाळ चेचून घ्यायची.. मग जेवढी डाळ घेतली होती तेवढीच साखर (हवा असल्यास थोडा गूळसुद्धा..किसून) त्या चेचलेल्या डाळीत टाकायची.. थोडी गरम डाळ असल्यामुळे साखर किंचित विरघळल्यासारखी होते आणि मिक्सर मध्ये डाळ वाटली जाऊ शकेल इतपत ओलसर पण होते. मग एका वेळी थोडी थोडी.. असे करत मिक्सर वर हाय स्पीड वर मस्त बारीक बारीक करून घ्यायचे हे मिश्रण. साखर पण पूर्ण बारिक होते आणि डाळ पण वरणाला घोटल्यासारखी बारिक होते.
मग हे मिश्रण कढईमध्ये मंद आचे वर रंग बदले पर्यंत परतायचे. सर्वात शेवटी कढई गॅसवरून उतरवल्यावर साखरेबरोबर भुकटी केलेले वेलची आणि जायफळ टाकावे. पुरण तय्यार!

जुन्या पद्धतीत साखर टाकून परतल्यामुळे..साखरेचा पाक तयार झाल्यासारखे होते आणि मग तो गार होता होता कडक झाल्यामुळे मग ठेचणे.. पुरण यंत्रातून काढताना बरीच शक्ती लागते ( त्याला म्हणतातही पाकाचे पुरण - इति सासुबाई)

पण ह्या वर सांगितलेल्या पद्धतीत ते श्रम वाचतात्...चवीत काही फरक नाही आणि टिकते पण तेवढेच (८-१० दिवस!)

रेवती's picture

20 Mar 2011 - 2:00 am | रेवती

खरंतर पुरण जड बुडाच्या पातेल्यात शिजवावं म्हणजे खमंग होतं असं म्हणतात. ते खरंही असावं. माझी आजी अशी डाळ शिजवून त्यावर येणारा फेस काढून टाकत असे. ती जास्तीची आंब कि काहितरी असते म्हणे! पोळी करताना नवशिक्यांनी आधी साखरेचे पुरण करावे असे म्हणतात. त्याला जरा चिकटपणा कमी असतो आणि पोळ्या नीट लाटल्या जातात. तो सराव झाला कि मग अर्धी साखर आर्धा गूळ घेऊन पुरण करावे जे अत्यंत चवदार होते असे म्हणतात. आमच्याकडे फक्त गुळाचं पुरण आवडतं म्हणून मी तसं करते पण या सगळ्या पायर्‍या पार पाडताना पूर्वी दमछाक होत असे.:)
नेहमी तेलात कणिक तिंबून मग पुपो करणार्‍या मैत्रिणीचा आज सकाळीच मैद्याची पारी फसली आणि काय करू म्हणून फोन आल्यावर मला आजीबाई असल्यासारखे वाटले. फारसा आनंद झाला नाही.

असे फोटु वैगरे डकवून आमच्यावर का अन्याव करता राव !! नेमका जेवणाच्या वेळी धागा उघडल्याने भूक चाळवलीये !!
वेळ मिळालाच तर आमच्या घरच्या पुरणपोळ्यांचे पण फोटु इथेच डकवेन म्हणतो उद्या !! ;)

निवेदिता-ताई's picture

18 Mar 2011 - 6:10 pm | निवेदिता-ताई

मस्तच...........आमच्याकडे पण कणीक जास्त व मैदा अगदी थोडा वापरतो..
व पुरण करताना निम्मा गुळ व निम्मी साखर वापरतो.........छानच होतात पोळ्या.

उद्या करणार आहे...

होळी रे होळी.

अम्मी ....
जबरदस्त भूक लागली !!
रात्रीचे बारा वाजलेत न जेवताच झोपणार होते पण हा धागा उघडला अन काय जबरदस्त भूक लागली
आता जेवावेच लागणार
~ वाहीदा

५० फक्त's picture

19 Mar 2011 - 11:03 am | ५० फक्त

'खा खा पुरणपोळ्या खा , मजा करा आणि मग द्या ताणुन जाउ दे अभ्यास वगैरे बोंबलत.'

माझे इंग्रजीचे सर आमच्या शेजारी रहायचे आणि दर होळीला हेच ऐकवायचे, मग आम्ही भिंतीच्या मागं उभे राहुन त्यांना चिडवत असु, त्याची आठवण झाली.

आमच्याकडे पुरण फक्त गुळाचंच असतं आणि कटाची आमटी ही फकत फुरके मारतपण्यासाठीच असते. अशा ३-४ पोळ्या खाउन मग मस्त मोकळा भात घेउन त्यात शितं तरंगतील एव्ढी आमटी घालायची कटाची आणि वरुन तुप २-३ चमचे आणि निवांत खायचा भात. शनिवारी हाच कार्यक्रम आहे.

बाकी पुरण्पोळी साठी आपण कधीही तयार असतो, आणि ह्यावर्षी एक सिक्रेट पण आहे, मिपाकर तयार रहा.

आम्ही अभिनंदन करण्यास तयार आहोत.;)

अमोल केळकर's picture

19 Mar 2011 - 4:08 pm | अमोल केळकर

खुप छान :)

अमोल केळकर

लै भारी....
उम्म्म्म्म्म्म्म

खादाड अमिता's picture

20 Mar 2011 - 2:17 pm | खादाड अमिता

सही!!

रश्मि दाते's picture

23 Mar 2011 - 10:59 pm | रश्मि दाते

मी आपली आणी मिलीची रेसेपी वाचुन १दा पुरणपोळी केली होती,छान झाली होती धन्यवाद