आँ?! हे काय हो तुकोबा?

मन's picture
मन in काथ्याकूट
17 Mar 2011 - 9:49 pm
गाभा: 

अहो हे काय हो तुकोबा?
मी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्‍याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय.

तुमच्या लिखाणात एकदम "अल्ला " हा शब्द दिसला आणि आश्चर्य वाटलं. त्याकाळातली हिंदी भाषा ही दिसली.
अहो खरचः- tukaram.com वर सापडलं हे मला:-

’’ अल्ला करे सो होय बाबा, करतार का सिरताज। गाऊ बछरे तिस चलावे यारी बाधो न सात ।।१।।
ख्याल मेरा साहेबका बाब हुवा करतार। व्हांटे आघे चढे पीठ आपे हुवा असवार।।२।।
जिकिर करो अल्लाकी बाबा, सबल्यां अंदर भेस। तुका जो नर बुझे सोहि भया दरवेस।।३।।’’
(-गाथा, मुसलमानी अभंग क्र. ३,९८३)

हे त्याच्या पुढचं एक बघा:-

’’तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे। सीर काटे ऊर कुटे ताहां झडकरे।।१।।
ताहां एक तु ही ताहां एक तुही। ताहां एक तु ही रे बाबा हम तुम नही।।२।।
दिदार देखो भले नहीं किसे पछाने कोये। सचा नहीं पकड सके झुटा झुटे रोये।।३।।
किसे कहे मेरा किन्हे सात लिया भास। नही मेलो मिले जीवना झुटा किया नास।।४।।
सुनो भाई कैसा तो ही होय तैसा होय। बाट खाना अल्ला कहना एकबारां तो ही।।५।।
भला लिया भेक मुंढे अपना नफा देख। कहे तुका सो ही सखा हाक अल्ला एक।।६।।

शिवायः-

’’अल्ला देवे अल्ला दिलावे, अल्ला दारू अल्ला खिलावे।
अल्ला बिगर नही कोय, अल्ला करे सोही होय।।१।।
मर्द होये वो खडा फीर नामर्दकु नही धीर। आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी।।२।।

"’’अबाल नाम अल्ला बडा लेते भुल न जाये। इलाम त्या कालजमुपरताही तुंब बजाये।।१।।
अल्ला एक तूं, नबी एक तूं। काटते सिर पावों हाते नहीं जीव डराये।।२।।
आगले देखो पिछे बुझो, आपे हजुर आये।।३।।"

इथं आम्ही तर समजत होतो की राम आणि अल्ला चा दृष्टांत एकाच वेळी देउन उपदेश करणारे केवळ कबीर, गुरु नानक होते म्हणुन. तुमच्या ह्या रचनांचा अजिबातच पत्ता नव्हता.

--आपलाच
(चकित) मनोबा.
संदर्भः- http://www.tukaram.com

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

17 Mar 2011 - 10:34 pm | निवेदिता-ताई

आँ?! हे काय हो मनोबा.....

छान छान....

शिल्पा ब's picture

17 Mar 2011 - 10:38 pm | शिल्पा ब

हे काय नविनच? मिपावरचे लोक भारीच संशोधक वृत्तीचे बै!!

jaydip.kulkarni's picture

17 Mar 2011 - 10:43 pm | jaydip.kulkarni

पहिल्यान्दाच ऐकले ...........
यावर चर्चा झाली पहिजे .................

चित्रा's picture

17 Mar 2011 - 11:16 pm | चित्रा

तुकोबांचे गुरु राघवचैतन्य ह्यांची समाधी लाडले मशायख यांच्या नावाने ओळखली जाते. त्यांच्या (चैतन्यांच्या) शिष्यपरंपरेमध्ये काही सूफी संतांची नावेही आहेत. अधिक माहिती येथे मिळेल. मुसलमान सुलतानांच्या काळात सूफी परंपरा महाराष्ट्रात प्रबळ होते का याबद्दल मला विशेष कल्पना नाही. पण असे वाटते की हा कोसंबी म्हणतात तसा (दोन संस्कृतींच्या) समन्वयाचा किंवा "reconciliation" चा काळ असावा. दोन विचारप्रवाह एकत्र येण्याची राजकीय/सामाजिक गरज तत्कालिन अल्पसंख्य मुस्लिम राज्यकर्त्यांना वाटलेली असू शकते. यातूनच सूफी विचारांना प्राधान्य मिळाले असू शकते. तुकाराम, बुद्ध, आणि ज्ञानेश्वर यांसारखे सगळेचजण बहुतेक वेळा प्रयोगशील असतात असे दिसते आणि त्यातूनच प्रेरित होऊन तुकारामांनी वरील काव्य लिहीले असू शकते.

मध्यंतरी तुम्हीच (मन) यांनी दिलेल्या दुव्यात मी एक गंमतीशीर कविता वाचली. हे दोन भाषांचे मीलन समन्वयाच्या या गरजेतून आले आहे.

एकस्मिन् दिवसे अवसानसमये
मैं था गया बागमें।
काचित् तत्र कुरंगबाळनयना
गुल तोडती थी खडी।
त्वां दृष्टवा नवयौवनाम् शशिमुखीम्
मै मोहमे जा पडा।
नो जीवामि त्वयाविना श्रृणु सखे
तू यार कैसे मिले।

मूळ कवी - जहांगीरच्या दरबारातील खानइखनान हे कवी.
संदर्भ डॉ. यशवंत रायकर यांचा लेख- http://www.loksatta.com/lokprabha/diwali2009/lp03.htm

पिवळा डांबिस's picture

18 Mar 2011 - 3:33 am | पिवळा डांबिस

एकस्मिन् दिवसे अवसानसमये
मैं था गया बागमें।
काचित् तत्र कुरंगबाळनयना
गुल तोडती थी खडी।
हम्म!
गोष्तकबाब बासुंदीत बुडवून खाल्ल्यासारखं वाटलं!!!
:)

चित्रा's picture

18 Mar 2011 - 7:40 am | चित्रा

समन्वय. :)

अवांतर - वरील काव्य रामो राजमणि सदा विजयते च्या चालीवरही म्हणता येते. किंवा अगदीच झाले तर मंगलाष्टकांच्याही चालीत आवाज वरखाली फिरवून.. ;) करून पहा.

पंगा's picture

18 Mar 2011 - 10:23 am | पंगा

...शार्दूलविक्रीडित आहे, 'रामो राजमणि'च्या किंवा मंगलाष्टकांच्या चालीवर म्हणता येणारच!

यावरून, शाळेत असताना मराठीच्या तोंडी परीक्षेत आम्ही...

'युद्धांचे भडकून घोर वणवे, राज्ये जळाली किती,
लोकक्षोभ कुठेकुठे पसरुनी तख्ते किती भंगली
अंबारीतुनि हिंडता तुडविली ज्यांनी प्रजा लेकरे
अंबारी उलटी करी धरुनि ते रस्त्यांतुनी हिंडती'

अशांसारखे शब्द असलेल्या कविता काय, किंवा केशवसुतांचे (आणि केशवकुमारांचेसुद्धा!) 'आम्ही कोण' काय, एकजात मंगलाष्टकांच्या चालीत (आणि तसाच हेल काढून - कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार? (संदर्भ: पु.ल.)) म्हणून परीक्षकांच्या तोंडास फेस आणत असू (दाढीचा नव्हे!), त्याची आठवण झाली.

(हिंदीची तोंडी परीक्षा असल्यास 'भीगा भीगा है समाँ, ऐसे में है तू कहाँ, मेरा दिल यह पुकारे आजा' ही चाल वाटेल ती कविता म्हणण्यास कामी येत असे, असेही आठवते.)

ते जाऊ द्या. अनेक इंग्रजी बालगीतांच्या चाली एकमेकांना फिट्ट बसतात, हे आपल्याला कधी जाणवले आहे काय? नसल्यास, अगोदर 'ट्विंकल, ट्विंकल, लिट्ल स्टार, हौ आय वंडर व्हॉट यू आर' हे चालीत म्हणून झाल्यावर, त्यानंतर मग त्याच चालीवर 'ए बी सी डी ई एफ जी, एच्च आय जे के एलेमेनोपी' किंवा 'ज्याक्कन् जिल वेंटप्दऽ हिल, टू फेच्चऽ पेऽलॉफ वॉऽटर' किंवा अगदी 'हम्टी डम्टी सॅट्टॉनंवॉल, हम्टी डम्टी हॅडेग्रेट फॉल' हेदेखील म्हणून पहावे. (जमल्यास ल्युइस कॅरॉलच्या 'अ‍ॅलिस थ्रू द लूकिंग ग्लास'मधील 'जॅबरवॉकी'* या 'आरशातील कविते'वरसुद्धा प्रयोग करून पाहावयास हरकत नसावी.) मुद्दा लगेच लक्षात येईल. ('ट्विंकल, ट्विंकल' आणि 'ए बी सी डी' या तशाही अधिकृतरीत्या एकाच चालीवर म्हटल्या जातात, असे वाटते. याच संदर्भातील मोत्सार्टच्या रचनेसंबंधीचे दोन रोचक दुवे: एक वाचनासाठी/माहितीसाठी आणि एक श्रवणसौख्यासाठी.)

फार कशाला, 'गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा' (किंवा 'मनाच्या श्लोकां'पैकी कुठलाही श्लोक), 'सदा सर्वदा योग तूझा घडावा', 'नको भव्य वाडा, नको गाऽडिघोडा, अनाडी असे मी तुझा प्रेमवेडा', 'प्रिया आज माझी नसे साथ** द्याया', 'पहाटे पहाटे मला जाग आली' हे सर्व 'अकेले अकेले कहाँ जा रहे हो'च्या चालीवर म्हणता येते याची कल्पना आहे का तुम्हाला?*** किंवा 'कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या' आणि 'मुहब्बत ऐसी धड़कन है, जो समझायी नहीं जाती' या गाण्यांच्या चालींची अदलाबदल करून पाहिली आहेत काय कधी?

सारांश, बर्‍यावाईट चालींचा कवितेच्या आशयाशी काहीही संबंध नसतो, फक्त वृत्ताशी असतो, हेच अतिपरिचित तत्त्व यातून अधोरेखित होते.

उपसंहार: उत्साह असल्यास 'बाऽ बाऽ ब्ल्याक शीप हॅव यू एनी वूल' हे एकदा 'याद किया दिल ने कहाँ हो तुम'च्या मुखड्याच्या चालीवर गाऊन परिणाम पहावा.

तळटीपा:

* प्रयोग करून पाहायचाच असेल, तर याचे सुरुवातीचे शब्द काहीसे पुढीलप्रमाणे आहेत:
'Twas brillig, and the slithy toves
Did gyre and gimble in the wabe
All mimsy were the borogoves
And all the mome raths outgrabe

"Beware the Jabberwock, my son!
The jaws that bite, the claws that catch!
Beware the Jubjub bird, and shun
The frumious Bandersnatch!"

यापुढील शब्द प्रयोगाकरिता हवे असल्यास सदर कवितेबद्दलचा वर दिलेला दुवा पहावा. (मला आठवत नाहीत.)

** 'त्रास द्याया' असाही एक खोडसाळ पाठभेद ऐकलेला आहे.

*** 'अकेले अकेले कहाँ जा रहे हो' हे 'तुम्हें याद होगा, कभी हम मिले थे'च्या चालीवर - आणि याउलट - म्हणता येते. मात्र 'मनाचे श्लोक' हे 'तुम्हें याद होगा, कभी हम मिले थे'च्या चालीवर - शब्द नको तेथे तोडल्याशिवाय - म्हणता येत नाहीत. आणि 'मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे' हे दुसर्‍या ओळीतल्या अक्षरगणांत एका गुरु अक्षराने कमी पडते म्हणून, नाहीतर तेही 'अकेले अकेले'च्या बरेच जवळचे आहे.

मैत्र's picture

18 Mar 2011 - 1:12 pm | मैत्र

एकदा कोणीतरी मिपावर याचा मस्त स्वैर अनुवाद टाकला होता. बरेच दिवस शोधतो आहे मिळाला नाही
"जबडोबा" असं मस्त मराठीकरण केलं होतं.
जाणकारांनी त्या लेखाचा / प्रतिसादाचा दुवा दिल्यास आनंद होईल...
झकास कविता होती..

चित्रा's picture

18 Mar 2011 - 6:16 pm | चित्रा

'अकेले अकेले कहाँ जा रहे हो'च्या चालीवर म्हणता येते याची कल्पना आहे का तुम्हाला?

होय, कल्पना आहे. :)

ट्विंकल ट्विंकल वरून एका हुन्नरी स्त्रीने यू-ट्यूबवर केलेले प्रयोग माहिती असतीलच.

(तुम्ही हे नुसतेच माहितीपूर्ण प्रतिसाद म्हणून टाकण्याऐवजी थोडे अधिक विस्ताराने लेख म्हणून लिहावेत असे वाटते).

पंगा's picture

22 Mar 2011 - 11:25 am | पंगा

(तुम्ही हे नुसतेच माहितीपूर्ण प्रतिसाद म्हणून टाकण्याऐवजी थोडे अधिक विस्ताराने लेख म्हणून लिहावेत असे वाटते).

यावरून एक विनोद आठवला.

एकदा एक मनुष्य असाच गात असतो तर त्याचा मित्र त्याला म्हणतो, "तू रेडियोवर का रे गात नाहीस?"

मनुष्य हुरळून जाऊन म्हणतो, "काय रे, इतका का रे मी चांगला गातो?"

मित्र म्हणतो, "नाही, पण रेडियो बंद करता येतो."

थोडक्यात, मुद्दा लक्षात आला.

ट्विंकल ट्विंकल वरून एका हुन्नरी स्त्रीने यू-ट्यूबवर केलेले प्रयोग माहिती असतीलच.

नाही, कल्पना नाही.

यू-ट्यूबवर केलेले प्रयोग

ओ बै...
पंगाशेठ प्रतिक्रिया लिहोत अथवा लेख पण तुम्ही जरा उदाहरणांसोबत दुवे देत चला....

धमाल मुलगा's picture

18 Mar 2011 - 6:29 pm | धमाल मुलगा

जरा योग्य तिथं शब्दांत स्पेस द्या ना.
मी आपलं पाच मिनिटं विचार करतोय की हा 'गोष्तक बाब' नावाचा कोणचा पदार्थ असावा!

-धमालमु लगा.

वपाडाव's picture

22 Mar 2011 - 3:58 pm | वपाडाव

>>>>जरा योग्य तिथं शब्दांत स्पेस द्या ना.
मी आपलं पाच मिनिटं विचार करतोय की हा 'गोष्तक बाब' नावाचा कोणचा पदार्थ असावा!
-धमालमु लगा.
>>>>>
ह्यावर मी धमुचं नाव कसं वाचलं असेल....
-ध माल मु लगा

पुष्करिणी's picture

17 Mar 2011 - 11:20 pm | पुष्करिणी

नविनच माहिती.

आत्मशून्य's picture

18 Mar 2011 - 1:09 am | आत्मशून्य

नोव डॅट्स अ‍ॅन इंटरेस्टींग अपडेट्स.

अडगळ's picture

18 Mar 2011 - 1:17 am | अडगळ

फक्त तुकारामच नाही तर त्यापूर्वी नामदेव आणि मग एकनाथांनी हिंदी (की दख्खनी ) मध्ये रचना केल्या आहेत. आता हाताशी पुस्तक नाही पण या रचनांमध्ये राम्-रहीम ऐक्याचा संदेश असल्याचा आठवतो.
अधिक माहिती सकलसंतगाथे मध्ये मिळू शकेल.

अवलिया's picture

18 Mar 2011 - 10:51 am | अवलिया

अल्ला रखेगा वैसा भी रहेना ।

मौला रख्खेगा वैसा भी रहेना ॥ धृ. ॥

कोई दिन सिरपर छतर उडावे ।

कोई दिन सिरपर घडा चढावे ।

कोई दिन तुरंग उपर चढावे ।

कोई दिन पावस खासा चलावे ॥ १ ॥

कोई दिन शक्कर दूध मलिदा ।

कोई दिन अल्ला मारता गदा ।

कोई दिन सेवक हात जोड खडे ।

कोई दिन नजिक न आवे धेडे ॥ २ ॥

कोई दिन राजा बडा अधिकारी ।

एक दिन होय कंगाल भिकारी ।

एका जनार्दनी करत कर तारी ।

गाफल केंव करता मगरूरी ॥ ३ ॥

अरुण मनोहर's picture

18 Mar 2011 - 6:07 am | अरुण मनोहर

विचारवंतांचे विष्लेशण* वाचण्यास व्याकूळ.

(*शब्द बरोबर लिहिला, की चुक?)

"अल्ला दारू अल्ला खिलावे।" हे थोरच.
पिलावे हवे होते का?

सविता's picture

18 Mar 2011 - 11:15 am | सविता

>विचारवंतांचे विष्लेशण* वाचण्यास व्याकूळ.

>(*शब्द बरोबर लिहिला, की चुक?)

चूक... "विश्लेषण" हवा तो!

मन१'s picture

18 Mar 2011 - 1:23 pm | मन१

थँक्स.

चित्रा तै, डीट्टेलवार माहिती महत्वाची वाटली. लोकसत्तामधेही डोकावलो.
तशाच अर्थाचा अजुन एक लेख इथेही http://khattamitha.blogspot.com/2008/04/blog-post.html सापडला.
@ अडागळ --> नामदेवांनी गुरबाणीत, पंजाबात जाउन रचना केल्याचं ऐकलं होतं.
एकनाथांचं माहित नव्हतं.

@ पंगा -->

बोला श्री पंगा महाराज की जय. _______/\______
सर्व ओव्यांकडे बघायची एक नवीच, अत्युत्तम दृष्टी आपण आम्हाला दिलित. माझ्या जन्माचं त्या गाण्ञांचं आणि सगळ्या संतांच्या ओव्यांचं सार्थक केलत. ;- )
आता ग्यानबा-तुकाराम च्याच चालीवर असं म्हणुयातः-
ग्यानबा तुकाराम --पंगाराम पंगाराम

आपलाच मनोबा.

सुहास..'s picture

18 Mar 2011 - 6:39 pm | सुहास..

बोला श्री पंगा महाराज की जय >>>

अगदी असेच म्हणतो ..