सांगितिक तुकडे

चित्रा's picture
चित्रा in काथ्याकूट
9 Oct 2007 - 8:47 pm
गाभा: 

NPR - National Public Radio - Music Interludes अर्थात एन पी आर (नॅशनल पब्लिक रेडिओ) वरील सांगितिक तुकडे -

जगभरच्या बातम्या अमेरिकेत राहणार्‍या भारतीयांना एन पी आर म्हणजे काय याची बहुदा कल्पना असेलच. पण ज्यांना ते माहिती नाही, त्यांच्यासाठी - हा एक असा रेडिओ आहे जो बर्‍याच अंशी श्रोत्यांनी दिलेल्या आर्थिक सहाय्यावर चालतो. त्यांचे जवळजवळ ५०% उत्पन्न हे व्यक्ती, संस्था आणि उद्योग यांनी दिलेल्या अनुदाने, स्पॉन्सरशिप, आणि देणग्या यांवर चालते. सरकारी अनुदानांमधून त्यांच्या संपूर्ण बजेटच्या केवळ १ ते २ % एवढेच त्यांना मिळतात. त्याही दॄष्टीने ही एक संस्था स्वतंत्र अशी एक बिगर सरकारी संस्था आहे (काहीशी डावीकडची, पण तरी स्वतंत्र) आणि त्यांच्या नुसत्या, घडामोडी, कला, विज्ञान, पुस्तके इत्यादी विषयांचा नुसता आवाका बघून थक्क व्हायला होते. ऱोबर्ट सीगल, मिशेल नॉरीस, (एके काळी) ख्रिस्तोफर लायडन, टेरी ग्रोस, ऱोबिन यंग हे माझे काही आवडते आवाज. हे सूत्रसंचालक लोक संभाषणकलेत चतुर तर आहेतच, पण अनेक विषयांत गती असणारे आहेत. पण या कार्यक्रमांत गंमत येते ती त्यांच्या दोन कार्यक्रमांच्या किंवा एकाच कार्यक्रमातील दोन तुकड्यांमधे असलेल्या गाण्यांच्या (खरे तर बर्‍याचदा इन्स्ट्रुमेंटल ) तुकड्यांमुळे. याला musical interludes म्हणतात. असेच एक इथे ऐका. अजून एक Awakenings

ऐकता ऐकता हे संगीत काय आहे, कोणी तयार केलंय अशी उत्सुकता चाळवून एकदम हे संगीत थांबते, आणि कार्यक्रमाचा दुसरा तुकडा सुरू होतो. काहीसे आपल्याकडच्या नाटकातील दोन प्रवेशांमधील वेळ जसा संगीतासाठी वापरला जातो तसेच काहीसे हे आहे. ही पद्धत काय आहे, कधी सुरू झाली असेल आणि याची वेगवेगळी रूपे जगभर कुठे दिसतात का यावर येथील संगीत, इतिहास किंवा कलांचे जाणकार काही प्रकाश पाडू शकतील काय? याला "सांगितिक तुमडे" यापेक्षा चांगले दुसरे नाव आहे का? किंवा सुचू शकते का?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Oct 2007 - 1:04 am | विसोबा खेचर

ही पद्धत काय आहे, कधी सुरू झाली असेल आणि याची वेगवेगळी रूपे जगभर कुठे दिसतात का यावर येथील संगीत, इतिहास किंवा कलांचे जाणकार काही प्रकाश पाडू शकतील काय? याला "सांगितिक तुमडे" यापेक्षा चांगले दुसरे नाव आहे का? किंवा सुचू शकते का?

असे वेगवेगळे तुकडे जोडून केलेल्या एकसंध गाण्याचा प्रकार आपल्या हिंदुस्थानी संगीतात 'रागमाला' या नांवाने ओळखला जातो..

रागमालेमध्ये एकच बंदिशसदृष रचना असते परंतु ती कोणत्या एका रागावर आधारीत नसून त्यात एकापेक्षा अनेक रागांचे रंग मिसळलेले असतात. 'रागमाला' हा प्रकार गाण्याकरता स्वरलयीवर अतिशय हुकुमत तर हवीच परंतु त्या रागमालेतील सर्व राग गळ्यावर व्यवस्थितपणे चढलेलेही असावे लागतात.

असो,

चित्राताई,

मला जेवढी माहिती होती ती मी दिली. इतरांनी अधिक प्रकाश टाकावा. सौ मालिनीबाई राजूरकारांच्या एका रागमालेचे ध्वनिमुद्रण माझ्याकडे आहे. ते मी लवकरच जालावर चढवून त्याबद्दल इथे लिहीन. त्यातून मला जे काय म्हणायचे आहे तो मुद्दा स्पष्ट व्हावा...

तात्या.

चित्रा's picture

10 Oct 2007 - 1:43 am | चित्रा

असे वेगवेगळे तुकडे जोडून केलेल्या एकसंध गाण्याचा प्रकार आपल्या हिंदुस्थानी संगीतात 'रागमाला' या नांवाने ओळखला जातो..

हे तुकडे जोडलेले नसतात. नुसती जागा भरायला असतात. आपल्याकडेही ही पद्धत असावी, तिच्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का ते विचारत होते.

रागमाला प्रकार काय असतो हे ऐकायला आवडेल. जरूर लिहा.

अजून एक म्हणजे वरचा दुवा website चुकीच्या ठिकाणी नेतो हे लक्षात आले म्हणून इथे परत देते आहे. Awakening

सर्किट's picture

10 Oct 2007 - 4:33 am | सर्किट (not verified)

सौ मालिनीबाई राजूरकारांच्या एका रागमालेचे ध्वनिमुद्रण माझ्याकडे आहे.

दुर्गा माता दयानी देवी ?

- सर्किट

विसोबा खेचर's picture

10 Oct 2007 - 8:55 am | विसोबा खेचर

दुर्गा माता दयानी देवी ?

येस सर! :)

अमित.कुलकर्णी's picture

11 Oct 2007 - 2:37 am | अमित.कुलकर्णी

http://www.esnips.com/doc/afc46235-13e4-46a2-a6ea-513aaf69be3b/Pratham-D...(Raag-Maala)---Umraao-Jaan-1981---Ustad-Ghulam-Mustafa-Khan,-Shahida-Khan--Runa-Prasad

ही पण रागमालाच आहे ना?