नमस्कार मंडळी ! मी पल्लवी..
मिपाचं सदस्यत्व घेउन २-३ आठवडे झालेत आणि ह्या दिवसांत इथे मनसोक्त भटकंती केली आणि हापिसातली टाळकी माझ्यावर हसेपर्यंत खो खो खिदळून घेतलं.. :)
म्हटलं आज औपचारिक राम-राम करुनच टाकावा..
खरंच, इथे आल्यापासुन ते आत्तापर्यंत त्रयस्थपणा कधी वाटलाच नाही. काय मनमुराद दंगा घालता तुम्ही सगळे.. लै आवडलं आपल्याला.. :)
आता इथे हिंडताना भेटलेल्या आणि आवडलेल्या (;)) लोकांबद्दल.
सुरुवात कुठुन करावी ह्या विचारात असताना, आधी डोक्यात आला धमुदादा.. ("दादा" म्हणताना म'णा'ला काय वेद'णा' होतात. :< पण काय करणार ? धमुदादाचं लग्न (३ भागांत) उरकलंनीत की तुम्ही.. :( ) जाउ द्या झालं .. धमुदादा, ही "तैलबुद्धी "कुठुन मिळवलीस बुवा !? इथे आम्ही तुझ्या जोक्स वर फिदीफिदी हसतो आणि लोक आम्हावर हसतात. इथे लांबट चेहरे बघुन काव आलेला असताना तुझे एक-एक विनोद ऐकुन लै लै फरेश वाटतं बघ !
डांबिस काका ! खरंतर "काका" च्या आधी डाम्बिस लावायला कसंनुसं वाटतं हो ! 8| काय सुरेख लिहिता तुम्ही. विशेष करुन "अब्दुल खान्"..अप्रतिम ! केवळ अप्रतिम !! तुमच्याकडून अजुन खुप खुप वाचायला मिळेल ही आशा.. पण खर सांगा, अब्दुल खान काल्पनिक वगैरे नाहिये ना??:>
पेठेकर काका-तुमच्या पाककृती आणि वन लायनर्स. व्वा.. सगळंच लै भारी.
मला खरंतर इनोबा म्हने, प्राजुताई,चतुरंग, छोटा डॉन,केशवसुमार,विजुभाउ,आनंदयात्री इ.इ. बद्दल लिहायचं होतं. पण माझा म्यानेजर बघतोय मेला डोम्-कावळ्यासारखा. आता जरा काम करत असल्याचं नाटक करत बसावं लागणार.. X( (|:
असो. पण तात्यांना नमस्कार केल्याशिवाय कसं जाणार ? तर, श्री. श्री.श्री. प.पू. तात्यारामजी बापू यांचे चरणी शतशः नमन !! :) मी तुमचा ब्लॉगही अथपासुन इतिपर्यंत वाचला. नितांत सुन्दर लिहिता तुम्ही तात्या. आणि त्यात पु.लं. ची झाक येत असली तरी, येउ द्यात कि हो.. तेवढाच पुनःप्रत्ययाचा आनंद !!
मी पण येणार मिपा कट्ट्यावर गप्पा झोडायला. तुम्ही सगळे (वर उल्लेख असलेले आणि नसलेले ) मला बापडीला सामावून घ्याल अशी आशा नव्हे, खात्री आहे. ;;) :):)
ता.क. : काही आदरणीय अपवाद सोडता,मी इथे 'डायरेक' अरे-तुरे केलंय. चालेल ना ?
प्रतिक्रिया
9 May 2008 - 11:40 am | स्वाती दिनेश
पल्लवी,मिपावर स्वागत आहे!
9 May 2008 - 11:41 am | आनंदयात्री
धमुदादा बद्दलचे मत पटले :)
आमच्या वैनीबाईंना आज फोन टाकणार आहे :) फार दिवस झाले त्यांच्याशी गपा मारुन .. विचारीन लग्नाची तयारी कुठपर्यन्त आली ... सांगिन म्हणतो मिपावरच्या ४ गोष्टी ...
(धमुदादा ... एक .. दोन .. तीन )
नवागतांसाठी: वैनीबाई म्हणजे सौभाग्यकांक्षिणी धमाल हो (थोडक्यात धमी) =))
9 May 2008 - 12:14 pm | धमाल मुलगा
निवांत गप्पा मार...पण लेका कागाळ्या करु नकोस...आजच चाललोय पुण्याला...पोचल्यापोचल्या जोडे खावे लागतील ;)
=)) अ...श...क्य आहेस रे बबड्या तू!!!
आता तिला अशीच हाक मारेन :))
9 May 2008 - 12:31 pm | धमाल मुलगा
पल्लवीताई ,
आपलं मिपावर हार्दिक्क स्वाग्गत्त्त असो!! :) अशीच येत रहा, हसत रहा, खेळत रहा, सगळ्या चिंता विसरुन आनंदी रहा!!!!
सुरुवात तुझ्याच ता.क. ने करतो :)
मला नाही चालणार अरे तुरे केलेलं........धावेल...पळेल :)
नाहीच म्हणायचं मग...धम्या म्हण..धमाल्या म्हण... :)
तैलबुध्दी???? हे काय असतं बॉ? आमच्या ल्हानपणी म्हातारीनं टाळू भरली त्यानंतर तेलच नाही लावलं, मग बुध्दीपर्यंत पोचेलच कसं ?
काही नाही, अखिल भारतीय टवाळ मित्रमंडळाचा आजीवन सदस्य आहे, उगाच मारायच्या काहीतरी कोलांट्या झालं!
हे वाचून जिवाचं सार्थक झालं बॉ!
वयाचा आदर ठेवायचा असतो म्हणून काका म्हणायचं नाहीतर....पोरासोरांना लाजवेल असा धूडगुस घालतो हा माणूस. तेव्हढाच तरलही लिहितो.
अग्ग्ग्गायायाया.....तात्या मला तुम्ही आसारामशेठ सारखे दिसायला लागलात हो :))
बाकी पल्लवीताई, आपल्या दोन दोन स्वातीताई पण सुगरण नंबर वन आहेत हो. आणि भडकमकर मास्तरांना बरी विसरलीस?
लिही लिही, ह्यांच्यावरपण काहीतरी छान लिही :)
मनोबा पण छान लिहितो हं...झालंच तर....(छ्या: प्रतिसाद देतोय का श्रेयनामावली? किती किती म्हणून नावं सांगू?) आपल्या प्रमोदकाकांचे लेख वाचलेस का? नितांत सुंदर लिहितात हो ते!
हॅट्ट! हे असं फॉर्मॅलिटीत विचारलंस तर कोणीच नाही घेणार तुला :) यायचं आणि सुरु व्हायचं, कसें ? :D
-(मोकळाढाकळा) ध मा ल.
9 May 2008 - 1:04 pm | मन
सुस्वागतम पल्लवी.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
9 May 2008 - 1:16 pm | इनोबा म्हणे
हॅट्ट! हे असं फॉर्मॅलिटीत विचारलंस तर कोणीच नाही घेणार तुला यायचं आणि सुरु व्हायचं, कसें ?
इनोबा पण हेच म्हणे
वैनीबाई म्हणजे सौभाग्यकांक्षिणी धमाल हो (थोडक्यात धमी) =))
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
9 May 2008 - 1:48 pm | प्रभाकर पेठकर
व्वा...! वसंत संपला आणि मिपाला पालवी फुटली.
ह्या इवल्या नवचैतन्याचे स्वागत असो.
9 May 2008 - 3:41 pm | विसोबा खेचर
असो. पण तात्यांना नमस्कार केल्याशिवाय कसं जाणार ? तर, श्री. श्री.श्री. प.पू. तात्यारामजी बापू यांचे चरणी शतशः नमन !! मी तुमचा ब्लॉगही अथपासुन इतिपर्यंत वाचला. नितांत सुन्दर लिहिता तुम्ही तात्या. आणि त्यात पु.लं. ची झाक येत असली तरी, येउ द्यात कि हो.. तेवढाच पुनःप्रत्ययाचा आनंद !!
धन्यवाद पल्लवी, मिपावर मनापासून स्वागत...!
आपला,
(भाईकाकांचा शिष्य) तात्यारामजी बापू.
:)
9 May 2008 - 4:43 pm | मनस्वी
नमस्कार! मिपावर दंगा घालायला तुझे स्वागत आहे.
9 May 2008 - 5:29 pm | यशोधरा
मी पण येणार दंगा करायला इथे!!! :P
9 May 2008 - 5:40 pm | शितल
द॑गेखोरा॑च्या टोळीत तुझे स्वागत आहे. नियम मात्र एक स्वतः आन॑द(कोणाचे नाव नव्हे) घ्या आणि दुसर्याला आन॑द द्या.
9 May 2008 - 6:03 pm | चतुरंग
मिपा वर चौरंगी स्वागत!
(स्वगत - माझ्यावर लिहायचं म्हणते आहे, काय लिहितेय कोण जाणे? चिंता लागून राहिली आहे! :? )
चतुरंग
10 May 2008 - 2:06 am | पिवळा डांबिस
तुमचं मिपाअड्डयावर स्वागत आहे.
तुम्ही नवीन आहांत म्हणून सांगतो, इथे तसे दोन ग्रुप आहेत.
एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका,
आणि मग मी, डॉन्या, धमाल्या, इनोबा, विजुभाऊ, इत्यादि टवाळखोरांचं टोळकं!!:))
तात्याश्री महाराज प्रसंग पाहून तळ्यात-मळ्यात करतात!! हल्ली त्यांचा बराचसा वेळ सरपंचांची लाठी फिरवण्यातच जातो!!:)
तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चारोळ्या (अरे देवा! आयडिया तर देत नाही ना मी कोणाला!!), रेसेपी, वगैरेचाही वर्ग आहे. "दोन सुलट्-तीन उलट" वगैरे विणकाम अजून तरी पहिलं नाही!!:)
डांबिस काका ! खरंतर "काका" च्या आधी डाम्बिस लावायला कसंनुसं वाटतं हो !
मग नका लावू! सरळ "डांबिस" म्हणा! हे काका वगैरे काय खरं नाय हो!! त्या प्राजुची करणी आणि भोगायला फळं लागतायत आम्हांला!!
वैनीबाई म्हणजे सौभाग्यकांक्षिणी धमाल हो (थोडक्यात धमी)
हा, हा, हा!!!:))
धम्याची धमी!!
हा धम्या जोडे खाणार आज! ते ही लेडीज खेटरं!!:))
पोरासोरांना लाजवेल असा धूडगुस घालतो हा माणूस.
कोण म्हणतोय रे ते असं? खोट्टं-नाट्टं सांगतात मेले!!
मी कधीपासून इथे आपला हाताची घडी-तोंडावर बोट घेऊन उभा आहे!!
असो. पल्लवी तुमचे पुन्हा स्वागत! ही मिसळ तुम्हांला (तर्रीसकट) आवडो!
-पिवळा डांबिस
10 May 2008 - 8:44 am | प्रभाकर पेठकर
एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका,
च्यायला, आता काहीतरी झणझणीत आणि खणखणीत लिहावं लागणार. लोकांचा फारच गैरसमज व्हायला लागलाय की....
11 May 2008 - 1:30 pm | विसोबा खेचर
तात्याश्री महाराज प्रसंग पाहून तळ्यात-मळ्यात करतात!! हल्ली त्यांचा बराचसा वेळ सरपंचांची लाठी फिरवण्यातच जातो!!
सह्ही रे डांबिसा.. :)
11 May 2008 - 8:24 pm | चतुरंग
एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका
गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर काय!? ओ, डांबिसकाका, डांबिसपंत, डांबिसराव, डांबिसअण्णा तुम्हाला कोणत्या अँगलमधून मी गंभीर दिसलो हो?
हे म्हणजे कसं झालं माहीत आहे का, आम्ही दंगाधोपा करायला येणार आणि हे म्हणणार आता आमची धुळवड करुन झाली, आता काय उपयोग!
(स्वगत - गैरसमज दूर करायला काय करावं बरं? एखादं विडंबन टाकू की काय? कच्चा माल शोधायला हवा... :W )
चतुरंग
12 May 2008 - 8:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका
डांबिसराव,
आम्ही गंभीर / विद्वत्ताप्रचुर आहोत असे म्हणुन आपण आमच्यावर जो गंभीर आरोप करत आहात त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. :)
आम्हाला लवकरच संकेतस्थळावरील संत दिलीप बिरुटे यांच्याशी संकेतस्थळावरील रामेश्वर भट, मंबाजी गोसावी यांचा असामाजिक व्यवहार अशा एका विषयावर अभ्यासपुर्ण लिहिण्याची वेळ आले आहे असे वाटते. ;)
10 May 2008 - 2:22 am | वरदा
डांबिस "काका"...मला तर मज्जा वाटते काका म्हणायला..
10 May 2008 - 8:59 am | पिवळा डांबिस
मला तर मज्जा वाटते काका म्हणायला..
तुला तर फटके मारले पाहिजेत!
आता या नव्या पल्लवींबरोबर सांगणं ठीक होणार नाही म्हणून!!!:)
10 May 2008 - 12:34 pm | छोटा डॉन
पल्लवी , आपलं मिपावर सहर्ष स्वागत आहे ! अशीच येत रहा, हसत रहा, खेळत रहा, सगळ्या चिंता विसरुन आनंदी रहा!!!! मिपा त्यासाठीच तर आहे ...
खरंच, इथे आल्यापासुन ते आत्तापर्यंत त्रयस्थपणा कधी वाटलाच नाही.
त्रयस्थपणा वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदम मोकळढाकळं रहा , कसे !
काय मनमुराद दंगा घालता तुम्ही सगळे.. लै आवडलं आपल्याला..
ही गोष्ट खरी आहे की मस्त मज्जा करतो, दंगा घालतो, झालच तर गजाल्या करतो पण हाच एकमेव उद्देश नाही मिपाचा, त्याचबरोबर आपल्याला असलेले ज्ञान दुसर्याला वाटतो, समाजकारण; राजकारण; अर्थकारण ह्यावरही अत्यंत सखोल आणि मार्गदर्शक चर्चा पण इथे होते हे पण आपल्या निदर्शनास आले असेलच ....
बाकी कुणाला दादा, काका, मामा म्हणून आदर द्यायची गरज नाही, तो तुमच्या लिहण्यातुन व वागण्यातुन दिसणे अपेक्षित आहे ...
स्वगत : च्यायला एकेकाळी लोकांनी "डॉनकाका" करुन डोक्याला काव आणला होता
बाकी आमच्या "डांबिसकाका " [ च्यायला काका शब्दावर काट मारलेली दाखवायची सोय करायला निलकांतला सांगायला हवे ] मिपाच्या इतर टोळक्यांबद्दल व टवाळखोरांबद्दल सांगितलेच आहे. त्यापेक्षा मी अधिक काय बोलणार ?
श्री. श्री.श्री. प.पू. संत तात्याकाम जाबाली ह्यांच्याबद्दल मी काय लिहणार ? आपण त्यांचा ब्लॉग व इथले लिखाण वाचले आहेच, त्यावरून त्यांच्या सामर्थ्याची कल्पना आलीच असेल.
आता वर समावेश नसलेल्या परंतु चांगले लिहणारे एकदम मनमोकळे लोक म्हणजे "सर्कीट, प्राजू, आजानुकर्ण, निलकांत, आंद्या, जपानवाल्या स्वातीताई, ऑफीसात टाईमपासवाली वरदा, कोण काय खाते विचारणारी मनस्वी, स्वयंभू, अबबराव " ही पण मिपाच्या अनेक "रत्नांपैकी" काही नावे आहेत ....
मी पण येणार मिपा कट्ट्यावर गप्पा झोडायला. तुम्ही सगळे (वर उल्लेख असलेले आणि नसलेले ) मला बापडीला सामावून घ्याल अशी आशा नव्हे, खात्री आहे.
बस क्या, यहीच इज्जत की क्या आपुनकी ?
आनेका, पढनेका, लिखनेका, हसनेका, रोनेका, टेन्शन नही लेनेका एकदम मोकळढाकळ रहनेका ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
10 May 2008 - 5:45 pm | अवलिया
च्यायला
:''(
आजकाल मी जरा कमी येतो तर मला विसरुनच चालले लोक?
हे काय खरे नाही
एक नवीन भविष्यवाणी केलीच पाहिजे <:P
नाना
11 May 2008 - 11:56 pm | संजय अभ्यंकर
मार्केटबद्दल काही लिहिले नाहीत.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
12 May 2008 - 8:56 am | पल्लवी
किती पटर-पटर करता रे... येवढाले रिप्लाय.. आपलं ते प्रतिसाद हो..
<च्यायला, मागे २ कविता टाकल्या, त्याकडे कुनि ढुंकुन नाय पायलं ओ.. आता गप्पा हाणायला, सगळे पुढे लेकाचे.. :) डांबिस कुठले.. ओ काका तुम्हाला नाय बरका>
आपलं मन कसं भरुन आलं बघा.. वा वा.. येवढं कौतिक होत नाय न कुणिकडं...
असो..
आणि मी अत्ताच सान्गुन ठेवते काय.. (डिसक्लेमर कि काय म्हणतात ते)
मला "पल्लवी ताई", "अहो पल्लवी", "तुम्ही" असलं विचित्र काय म्हणु नका बुआ.. यु सी.. यु सी.. आय अम जस्ट १६ यु सी.. सरळ पल्लवी म्हणा.. किंवा गेला बाजार, पल्ल + (ए/ई/आय/ओ/यु) ही चालेल.
तसं तर सगळे म्हणजे सगळे प्रतिसाद वाचुन झ्याक वाटलं.. व्वा.. एवढ्या सगळ्या जणांचा मराठी ग्रुप..माझा ग्रुप !!
बाकी, पेठकर काका,
व्वा...! वसंत संपला आणि मिपाला पालवी फुटली.
ह्या इवल्या नवचैतन्याचे स्वागत असो.
हेहेहेहेहेहेहेहे.. हसुन हसुन पुरेवाट झाली हो..
अहो, इथे बसुन बसुन "वाढता वाढता वाढे" चाललय अहो.. आय्.टी मधे अजुन काय होणार म्हणा? पैसा बक्कळ देतात.. (किंवा असं बाकीच्यांना वाटतं) आणि तब्येतीची लागते वाट.. असो.. विषयांतर जहाले..
चला, मी आत्तापुरती कटते इथुन.. येइन अधेमधे.. टाटू... चांगला दिवस.. गुड-डे !!! :) :)