ब्रेकिंग न्यूज : जपानमध्ये सुनामीचा तडाखा

सागर's picture
सागर in काथ्याकूट
11 Mar 2011 - 12:57 pm
गाभा: 

सीएनएन वाहीनीचा दुवा

बीबीसी वाहीनीचा दुवा

८.८ रिश्टर स्केल चा भुकंप झाला आणि या सुनामीने हाहाकार सुरु केला.
आत्ताच लाईव्ह फुटेज न्यूज चॅनेलवर पाहिलेत.

From General

जपान मध्ये वास्तव्य करणार्‍या सदस्यांनी काळजी घ्यावी

प्रतिक्रिया

सागर's picture

11 Mar 2011 - 1:05 pm | सागर

संपादित करता येत नाहिये म्हणून इथे देतोय
भूकंप ८.९ रिश्टर स्केलचा आहे

१९ ला चंद्र फार जवऴ येणार आहे त्याचा कर्टन रेझर का काय तसं हाय का हे ?

चिरोटा's picture

11 Mar 2011 - 1:12 pm | चिरोटा

हाहाकारच आहे.

मृत्युन्जय's picture

11 Mar 2011 - 1:11 pm | मृत्युन्जय

आधी ७.९ चा सांगत होते. मग ८.८ चा सांगायला लागले. आता ८.९ म्हणत आहेत. जे काही टीव्हीवर दाखवत आहेत ते भयानक आहे. एक आख्खे गाव वाहुन गेले. पाण्याच्या तडाख्यात घरं, बोटी, इंडस्ट्रियल शेड्स सगळेच्या सगळे वाहुन गेले आहे.

५० फक्त's picture

11 Mar 2011 - 1:19 pm | ५० फक्त

श्री. सुनिल पाटिल - http://misalpav.com/user/13796/guestbook

हे मिपाचे सदस्य सध्या टोकियो येथे असतात. आपण सगळे त्यांच्यासाठी तसेच या आपत्तित सापडलेल्या सगळ्यांच्याच सुरक्षित असण्यासाठी प्रार्थना करु.

पिलीयन रायडर's picture

11 Mar 2011 - 1:35 pm | पिलीयन रायडर

माझे एक नातेवाइक शेप कार्पोरेशन मध्ये आहेत. ते निट अस्तिल न?

वपाडाव's picture

11 Mar 2011 - 2:03 pm | वपाडाव

जपान सरकारने २ दिवस आधीच ही माहीती / पुर्वसुचना प्रसारीत केली होती.
मी सुद्धा काल याहुवर वाचली होती.
त्यांना ही आधीच माहिती असेल.

स्वानन्द's picture

11 Mar 2011 - 3:09 pm | स्वानन्द

जमल्यास, तुमची सही ही सही वाटेल; प्रतीसादाचाच भाग वाटणार नाही अशी लिहीता आली तर बघा. :)

वपाडाव's picture

11 Mar 2011 - 4:12 pm | वपाडाव

सही है .... सह्ह्ही
स्वानंदाची सही, आहे रे दबंग

भयानक!! कारस पाण्यावर एखद्या खेळण्या सारख्या तरंगताहेत.

टिलू's picture

11 Mar 2011 - 2:10 pm | टिलू

रक्षण कर बाबा लो़कान्च !!

विसोबा खेचर's picture

11 Mar 2011 - 2:49 pm | विसोबा खेचर

या भयानक नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या सर्व जपानी नागरिकांना सावरण्यासाठी सर्वतोपरी मनोबल मिळे, साहाय्य मिळो, अशी मनापासून पार्थना..

जपानी माणूस हा मुळातच अत्यंत चिवट व कष्टाळू असल्यामुळे तो या आपत्तीतून लौकरात लौकर उभा राहील याची खात्री आहेच..

सर्व जपान्यांकरता ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना..

तात्या.

अभिज्ञ's picture

11 Mar 2011 - 2:53 pm | अभिज्ञ

अगदि हेच म्हणतो.
रिअली शॉकिंग...

अभिज्ञ.

अवलिया's picture

11 Mar 2011 - 3:16 pm | अवलिया

हेच म्हणतो.

विनायक बेलापुरे's picture

11 Mar 2011 - 4:31 pm | विनायक बेलापुरे

अगदी हेच आहे मनात. :(

विनायक बेलापुरे's picture

11 Mar 2011 - 4:31 pm | विनायक बेलापुरे

अगदी हेच आहे मनात. :(

अप्पा जोगळेकर's picture

11 Mar 2011 - 8:22 pm | अप्पा जोगळेकर

हेच म्हणतो.

इन्द्र्राज पवार's picture

11 Mar 2011 - 4:13 pm | इन्द्र्राज पवार

सुनामीची दृष्ये तर अंगावर शहारे आणणारी आहेत. एका जपानी न्यूज चॅनेलवर तर प्रत्यक्ष भूकंपाचे हादरे बसू लागल्यावर तिथे माजलेल्या गोंधळाचे दृष्य दाखवित होते त्यावेळेची परिस्थिती पाहता रिश्टर (की रिक्टर) स्केलवर तो किती तीव्र असेल याची काहीसा अंदाज आला.

आता तर सुनामी तैवान, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या मार्गावर आहे असे वारंवार जाहीर केले जात आहे.

इन्द्रा

अविनाशकुलकर्णी's picture

11 Mar 2011 - 4:16 pm | अविनाशकुलकर्णी

२०१२ जवळ येत आहे..सावधान.......

नितिन थत्ते's picture

11 Mar 2011 - 5:33 pm | नितिन थत्ते

आँ.

दरवर्षी या तीव्रतेचा १ भूकंप होतो असे म्हणतात.

मिपाकर किंवा त्यांचे नातेवाईक सुखरूप असावेत अशी आशा करतो.

देवा तेथील जणतेच रक्षण कर ...

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2011 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार

सध्या गुगलच्या मेनपेजवर हे लिहुन येत आहे :-

Tsunami Alert for New Zealand, the Philippines, Indonesia, Papua New Guinea, Hawaii, and others. Waves expected over the next few hours, caused by 8.9 earthquake in Japan.

प्रदीप's picture

11 Mar 2011 - 7:02 pm | प्रदीप

भूकंपाची अनेक दृष्ये टी. व्ही. वर दिसली ती भयानक आहेत. सेंदाई शहराच्या जवळ समुद्रात भूकंपकेंद्र होते. ह्या शहरातील एन. एच. के. च्या टी. व्ही. केंद्राच्या ऑफिसातील दृष्ये, त्याच्या बाहेरील रस्त्यावरील दृष्ये, तोक्योमधील बहुधा संसद असावे (अधिवेशन सुरू होते) अशा स्थळातील दृष्ये... सगळे जोरदार हलत आहे, शेल्फमधून वस्तू खाली पडत आहेत, क्यूबिकल्सच्या पार्टिशनवर ठेवलेले एल. सी. डी. मॉनिटर्स धडपडत आहेत, एका सुमरमार्केटमधील शेल्फ्स हलत राहिल्याने सामान खाली पडत आहे.... ह्या सर्वात तेथील माणसे शांत आहेत, ऑफिसातील तसेच सुपरमार्केटातील बहुतेक सर्व जण धडपडणार्‍या शेल्फ्स अथवा पार्टिशन्सना पकडून ठेऊन पडू न देण्याच्या प्रयत्नात आहेत.. अशा प्रसंगी जनतेने काय करावे ह्या सूचना दिल्या असल्याने शिस्तीने त्याचे ते लोक पालन करीत असणार.... इतके सर्व होउनही लोक उंदरांसारखे सैरावैरा पळत सुटलेले दिसत नाहीत.....

पण त्सुमानीची दृष्ये, विशेषतः हेलिकॉप्टरमधून घेतलेले शॉट्स अत्यंत हृदयद्रावक होते. हळूहळू पाण्याची प्रचंड लाट पुढे सरकत येत आहे (१० मी. पेक्षा उंच होती असे सांगितले जाते), त्या लाटेने वाटेतील जे काही असेल ते गिळंकृत करण्याचा सपाटा चालवला आहे. गाड्या, घरे, सगळे क्षुल्लक होऊन लाटेबरोबर पुढे ढकलले जात आहे.... अगदी मोठ्या बोटी, सेलबोटी... सगळ्या आडव्यातिडव्या होऊन लाटेबरोबर खेचल्या गेल्या आहेत.... शहराच्या एका रस्त्यावरून एक- दोन गाड्या चाललेल्या आहेत. वरून दिसते आहे, की लाट जवळ येतांना आकांताने त्या गाड्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण लाट जिंकते, गाड्या क्षणार्धात खेचल्या जातात, पराभूत होतात.

हे सगळे पाहिले ते अगदी विदीर्ण करणारे आहे. आपण माणसे निसर्गापुढे किती चिल्लर असतो, ह्याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. ही खरे तर 'थंड धारदार सुरी'.. निसर्गाने मानवनिर्मीत जगावर चालवलेली.

रिक्स्टर स्केलवर ८.९ क्षमतेचा हा भूकंप जपानमधे गेल्या १४० वर्षांपासून भूकंपाचे मोजमाप करावयास लागले तेव्हापासून सर्वात मोठा आहे, असे सांगितले जात आहे.

तात्यांनी म्हटल्याप्रमाणे जपानी माणसे कष्टाळू व हुशार तर आहेतच (म्हणूनच त्यांनी घरे भूकंपाचा विचार करून बनवलेली आहेत), पण शिस्तप्रियही आहेत. आता व ह्यापुढील काळांत आपल्याल्या त्याचे प्रत्यंतर येत राहील. 'वाहून गेलेल्या दशका'तून नुकताच कुठे वर उठत असलेला हा देश ह्या दुर्घटनेमुळे आर्थिकदृष्ट्या पुन्हा मार खाणार आहे. जपान्यांना ह्या आपत्तितून अजून सक्षम होऊन, लवकर वर उठायची प्रेरणा मिळो.

आताच पाहिल खरच भयंकर प्रकार आहे हा.

आपण माणसे निसर्गापुढे किती चिल्लर असतो, ह्याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले.

अगदी.

विकास's picture

11 Mar 2011 - 10:06 pm | विकास

वर प्रदीप यांनी वर्णन केले आहेच, त्यात अजून एक भर म्हणजे तेथी अणूशक्ती केंद्राना लागलेली आग आणि कुलींग सिस्टीम नीट न चालल्याने तयार झालेला धोका. जपान सरकारने हे होण्याआधीच अणूशक्तीसंदर्भात आणीबाणी जाहीर केल्याने, भूकंपक्षेत्रातली चार आण्विक शक्ती केंद्रे बंद करण्यात आली होती. तरी देखील आग लागल्याने तेथील ३ किमी त्रिज्ज्येतील रहीवाशांना त्याबाहेर जाण्यास सांगितले आणि ३-१० किमी मधील रहीवाशांना घरातच रहायला सांगितले. आता देखील जरी धोका टळला असे तज्ञ म्हणत असले तरी रहीवाशांसाठी स्पष्टपणे सुचना बदलल्या गेलेल्या नाहीत. या संदर्भात जैतापूरचा प्रकल्प जर होणारच असेल तर अधिक विचारपूर्वक होउंदेत - इंजिनियरींग डीझाईन, आपत्कालीन व्यवस्थेचे धोरण आणि स्थानिक जनतेस त्याचे शिक्षण, सराव वगैरे करणे महत्वाचे आहे असेच वाटते.

म्हणूनच त्यांनी घरे भूकंपाचा विचार करून बनवलेली आहेत

हवाई मध्ये या संदर्भात "व्हर्टीकल इवॅक्युएशन" हा नवीनच शब्द ऐकला. म्हणजे तिथल्या त्सुनामीप्रवण क्षेत्रातील इमरातींचे पहीले दोन मजले हे पाणी येईल आणि सर्व खराब होऊ शकेल हे गृहीत धरूनच बांधलेले असतात. पण बाकी बिल्डींग डीझाईन हे भूकंपाचा तडाखा सहन करू शकणारे केलेले असते. म्हणून धोक्याची सूचना मिळताच तेथील रहीवाशांना अशा धोक्याच्या प्रसंगी वरील मजल्यांवर हलवले जाते.

फार फार फार फार वाईट वाटले . गहीवरुन आले.

- ( देवा मला जिवंत ठेव रे) टारझन
कसं का असेना , मी जिवंत राहिलो पाहिजे. असं निसर्गाचं रुप पाहुन घाबरलोय

किशोरअहिरे's picture

11 Mar 2011 - 9:42 pm | किशोरअहिरे

जगबुडी होईल असे वाटत आहे..
लवकरच चंगळ्वाद सुरु करावा म्हणतोय :)

पिवळा डांबिस's picture

11 Mar 2011 - 9:45 pm | पिवळा डांबिस

आमच्याकडे पुढल्या तासाभरात त्सुनामी पोचणार असं म्हणताहेत...
वाट बघतोय!!

टारझन's picture

11 Mar 2011 - 10:31 pm | टारझन

मुक्तसुनीत यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत :)

मुक्तसुनीत's picture

11 Mar 2011 - 10:42 pm | मुक्तसुनीत

येलो, टेक केअर मॅन.

टारुबाळासारख्यानी थोडे प्रसंगावधान राखून बोलणे केले असते तर अजून काय हवे होते ? पण असोच.

आनंदयात्री's picture

11 Mar 2011 - 10:48 pm | आनंदयात्री

टार्‍याच्या प्रतिक्रियांबाबत मुसुंशी सहमत आहे.

पिडाकाकांना काळजी घ्या म्हणतो.

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2011 - 2:34 am | पिवळा डांबिस

त्सुनामी येऊन गेली सुद्धा!!
पण म्हणे समुद्राला त्यावेळेस ओहोटी होती म्हणून त्सुनामीला कायसुद्धा ड्रामा करता आला नाय!
:(

टार्‍याच्या प्रतिक्रियांबाबत मुसुंशी सहमत आहे.
"शुभ बोल रे टार्‍या, तर पिडांकाका बुडाला त्सुनामीत!!!"
आयडी बदलला म्हणून मूळ स्वभाव थोडीच जातो?
:)

टारझन's picture

12 Mar 2011 - 8:57 am | टारझन

म्हण आवडली :) बाकी प्रतिक्रीयेचं तात्पर्य फक्त एवढंच होतं , की जर त्सुणामी आला , तर आपण सगळे हेल्पलेस आहोत . काही करु शकत नाही बघा. त्यामुळे जेवढं जगु हसत खेळत जगु असा आमचा षिंपल फंडा होता. :) बाकी आनंदयात्री आणि मुसु ह्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करुन आटोपतो.

- मुक्तसुनामी

शिल्पा ब's picture

11 Mar 2011 - 9:47 pm | शिल्पा ब

भयंकर आहे :(

दिपाली पाटिल's picture

11 Mar 2011 - 11:28 pm | दिपाली पाटिल

भयंकर आहे... त्या सर्व लोकांना मनोबल आणि आवश्यक मदत लवकरात लवकर मिळो...हे सगळं बघून डोकं अक्षरशः सुन्न झालंय.

:(

भीमाईचा पिपळ्या.'s picture

11 Mar 2011 - 11:49 pm | भीमाईचा पिपळ्या.

हेच बोल्तो.

रत्नागिरीकर१'s picture

12 Mar 2011 - 7:39 am | रत्नागिरीकर१

ह्या भयानक अनुभवातुन अजुन बाहेर आलो नाहि आहोत.. दर ५ मि. अजुन धक्के बसत आहेत.... धीरा बद्दल आभार....

मदनबाण's picture

12 Mar 2011 - 8:05 am | मदनबाण

फार भयानक !!! :(
परमेश्वर तेथील लोकांना या आपत्तीस तोंड देण्यास मनोबल देवो.
सर्व जपानी लोकांच्या सुरक्षतेसाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो...

आता जपान आणि जपानी जनतेला सर्वात मोठा धोका न्युक्लियर रिअ‍ॅक्टर मधुन होणार्‍या गळतीचा आहे,
फुकुशिमा दायची प्लांट मधील उत्सर्जन पातळी, त्याच्या सामान्य पातळीच्या १००० पटीने वाढली आहे. या प्लांटच्या १० किमी मधील परिसर खाली करण्यात यावा असे जपानी पंतप्रधानांनी सांगितले आहे.

जे कोणी जपान स्थित मिपाकर आहेत ते सुखरुप असावेत अशी आशा करतो, त्यांची आम्हाला काळजी वाटत आहे.

जे होवु नये असे वाटत होते तेच झाले, जपान मधे फुकुशिमा येथील आण्विक केंद्रात स्फोट झाला असुन,आता मोठ्या प्रमाणात रेडियेशन (विकरण) होवुन जपानच्या संकटात मोठी भर पडली आहे.

उगा काहितरीच's picture

12 Mar 2011 - 6:52 pm | उगा काहितरीच

भारतात याच्यापेक्षा कमी क्षमतेचा भुकंप (विदाउट सुनामी ) झाला तरी पण या पेक्षा कित्येक पट अधिक नुकसान का होते ?
( किल्लारी , भूज )
.
.
जपानला यातुन लवकर बाहेर पडावा अशी ईश्वर चरणी प्रार्थना!!!

निसर्गापुढे माणूस काहीही करू शकत नाही.. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला..

देवा, सगळ्या लोकांच रक्षण कर..!
सई मुंडले/ सुबक ठेंगणी.. तिथेच होती.. कुठे आहे सध्या?

शक्य आहे या जगात काहीही घडणे शक्य आहे.
आत्ताच रेडीफवर वाचल... तीथे ज्वालमूखीचा पण ऊद्रेक झाला आहे.

http://edition.cnn.com/interactive/2011/03/world/slider.japan.photos/ind...

बिफोर आफ्टर चे या पेक्षा वाईट फोटो नसतील.

सुनील's picture

15 Mar 2011 - 11:55 pm | सुनील

जपानने अद्याप राष्ट्रपातळीवरील मदत स्वीकारणे सुरू केले किंवा नाही ह्याबद्दल कल्पना नाही परंतु वैयक्तिक पातळीवरील मदत (इच्छा असल्यास) येथून करता येईल.

कोणाचे रक्त स्वीकारले जाणार नाही ह्याची सुची अभ्यासण्याजोगी!

विकास's picture

16 Mar 2011 - 12:06 am | विकास

परंतु वैयक्तिक पातळीवरील मदत (इच्छा असल्यास) येथून करता येईल.

या उलट या परीस्थितीचा लाभ घेणारे चोर जालावर झाले आहेत. त्या संदर्भात रिडीफ मधील ही बातमी वाचनीय आहे. त्सुनामी होताच क्षणी खालील प्रमाणे अनेक जणांनी डोमेन नेम्स विकत घेतली:

3-11-2011-[removed].com

3-11[removed].com

earthquake-[removed].com

earthquaketsunami[removed].com

earthquakerelief[removed].com

त्यांचा गैरवापर सहज होऊ शकतो.... त्यामुळे अनोळख्या व्यक्तींकडून काही इमेल आली तर उघडू देखील नये असे सांगावेसे वाटते....

मदनबाण's picture

16 Mar 2011 - 6:51 pm | मदनबाण

चंबा काका ( http://www.misalpav.com/user/245) बहुतेक जपान मधेच असतात, बहुधा बोटीवर काम असते त्यांचे...ते अजुन इथे दिसले नाहीत. :(

निनाद's picture

17 Mar 2011 - 11:23 am | निनाद

परिस्थिती अजून गंभीर होते आहे. सुमारे १४,००० लोक आत ३० किमीच्या पट्ट्यात अडकलेले आहेत. काही इमारतींमध्ये आधीच्या घटनांनी अडकलेल्या पण आता किरणोत्सर्गातही आलेल्या लोकांनी विनंती केली सोडवायलाही येऊ नका. :(

आता इंधनाच्या नळकांड्या वातावरणात आल्याने किरणोत्सर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. १०० जणांचा एक चमू तेथे गेला आहे पण हा जवळपास आत्मघाती मार्गच आहे असे म्हणायला हरकत नाही.

एकुणच कोणत्याही अणुभट्टीतील प्रक्रिया बंद करण्याचा तसा कोणताही सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही असेच दिसून येते. :(