गाभा:
निहार ठाकरे ,आदरणिय हिंदुह्रुदयसम्राटांचे नातु ह्यांच्यावर Prevention of Immoral Trafficking Act खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदरणिय निहार ठाकरे ह्यांच्या मालकीचा सांताक्रुझ येथे लेडिज बार आहे.लेडीज बार मधील अनेक मुलीं वेश्याव्यवसायात असतात असे पोलिस अधिकार्यांचे म्हणणे आहे.
'सेक्युलर' राजकारण्यांपासून 'जातियवादी' राजकारणी अनेक लोकांचा पैसा ह्या व्यवसायात आहे.त्यामुळे सहसा ह्या प्रकरणांवर मौनच बाळगले जाते.
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Bal-Thackeray-grandson-bo...
स्त्रियांबद्दल कमालीचा आदर असणारे शिवसैनिक आता राडा करुन असले बार बंद पाडतात का ते पाहायचे.
प्रतिक्रिया
10 Mar 2011 - 3:50 pm | स्वैर परी
:|
10 Mar 2011 - 4:44 pm | अमोल केळकर
अरेरे !!!
10 Mar 2011 - 5:55 pm | वेताळ
बिचारा निहार.........त्याला धंदा देखिल नीट करु देत नाहीत लोक.
10 Mar 2011 - 6:00 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो. आणि पुन्हा मग मराठी माणूस व्यवसायात मागे का? यावर व्याख्यान द्यायला आपण मोकळे. ;)
10 Mar 2011 - 7:26 pm | रेवती
असेच म्हणते.;)
11 Mar 2011 - 9:22 am | गोगोल
जर तो स्वतः धंदा करत असेल तर आमची काही हरकत नाही :)
10 Mar 2011 - 6:22 pm | इरसाल
हि तलवार त्याच्या हातात कोणी, कधी आणि कोणत्या जाहीर कार्यक्रमात दिली. कोणी उजेड पाडेल काय ? (म्हणजे जनतेच्या खासकरून युवा आग्रहावरून आजोबांनी कि पिताजींनी ?)
इथे घराणेशाही नाही हे जाणकार जाणून आहेतच.
हृदय आणि डोळे एकदम पाणावले
10 Mar 2011 - 6:41 pm | अविनाशकुलकर्णी
निहिर निर्दोष आहे असे राज साहेबांचे म्हणणे आहे...वागळेसाहेबांच्या बरोबरची मुलाखत..
तो फिर भाईने बोल दिया ना निर्दोष तो बस..अब जादा चर्चा नाय करायची....
10 Mar 2011 - 7:22 pm | तिमा
आधी सगळीकडे 'आदरणीय' ही उपाधी लावली आहे ती आदरणीय मुली व आदरणीय वेश्याव्यवसाय इथे का लावू नये ?
11 Mar 2011 - 1:34 am | भडकमकर मास्तर
टेीवेीवाल्या च्यानमंदलेींनेी हे प्रकर्णलावोून नाय दर्ले काय?
11 Mar 2011 - 1:38 am | कुंदन
आज कवळी लावायची विसरले की काय ?
11 Mar 2011 - 10:44 am | वपाडाव
बा$$$बौ....
मा$$$$यो...
=))=))=))=))
11 Mar 2011 - 6:04 pm | रमताराम
जबरा.
11 Mar 2011 - 8:45 am | श्री गावसेना प्रमुख
आर आर आबा यान्नी बारचे उदघाटन केले तेव्हा कुठे गेले होते हो
(तीथेहि लक्ष ठेवा )
तुमच्या घरात भाडेकरु काय करता यावर लेखक लक्ष ठेवतात वाटत
11 Mar 2011 - 8:47 am | श्री गावसेना प्रमुख
नगर जिल्ह्यात कोपरगावात असे अड्डे भरपुर आहेत तिथे याव
11 Mar 2011 - 9:28 am | सुहास..
प्रसन्ना !!
बातमीतील तथ्य अजुन बाहेर यायच आहे नीटस ..सध्या त्याकडे डोळे लावुन बसलो आहे
11 Mar 2011 - 11:20 am | चिरोटा
हम्म.
सामनाच्या इंटरनेटआवृत्तीत तरी ही बातमी दिसत नाही. अपेक्षेप्रमाणे पोलिस अजुनही निहार ठाकरे ह्यांचा 'शोध' घेत आहेत.एक दोन दिवसात 'तो बार निहार ह्यांचा नव्हेच' अशी बातमी यायची शक्यता वाटते.
बघुया.
11 Mar 2011 - 12:49 pm | वेताळ
पण सख्खा काका व आजा अजुन कुठेच काही बोलले नाहीत. त्याना भिती वाटत असेल जर निहारची बाजु घेतली तर उद्या तो शिवसेनेत हिस्सा मागेल म्हणुन.
बाकी निहार हा आता कॉलेजात जातोय. तो फरार नसुन त्याच्या घरी आरामात आहे.वडील वारल्या नंतर मिळालेले बार व हॉटेल त्यानी भाड्याने चालवायला दिली आहेत्.त्यामुळे तो दोषी असावा असे वाटत नाही.
11 Mar 2011 - 4:47 pm | अविनाशकुलकर्णी
निहार ठाकरे यांचा बारमध्ये अनैतिक व्यवहार चालवण्याशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. निहार हा दिवंगत बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे. निहार यांच्या मालकीचा सांताक्रूझ येथे बार आहे. तेथे सोमवारी पोलिसांनी धाड घालून काही मुलींनी ताब्यात घेतले होते.
याबाबत राज म्हणाले की, किंबहुना पोलिसांनी निहार यांना बेपत्ता दाखवणे आणि या प्रकरणात नको तितका रस घेणे संशयास्पद आहे. निहारशी ते मोबाइलवरून संपर्क साधू शकले असते. निहार हे वांदे येथे त्यांच्या निवासस्थानी होते असेही राज म्हणाले. निहार तो बार आता चालवतच नाहीत. त्यांनी तो चालवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडे दिला आहे असे असतानाही निहार यांच्यावर ठपका ठेवणे गैर आहे असे राज म्हणाले.
निहार यांच्या बाजूने उभे राहून राज यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी केली आहे असे मानले जाते आहे. बिंदुमाधव ठाकरे यांचा भाऊ या नात्याने उद्धव यांनी निहार यांची बाजू ताबडतोब घ्यायला हवी होती असे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते. बिंदूमाधव यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी लोणावळयाजवळ अपघातात निधन झाले होते.
11 Mar 2011 - 5:24 pm | चिरोटा
आणि ह्या विधानावर लोकांनी राज ठाकरे ह्यांच्यावर विश्वास ठेवावा असे त्यांना वाटते?
मुंबईतल्या(आणि अनेक मोठ्या शहरांमध्ये) अनेक बार्समध्ये हे सगळे चालु असते .छापा २/३ कारणांसाठी घातला जातो-
१)सरकारला/पोलिसांना पैसे मिळण्यासाठी
२)राजकिय कुरघोडी करण्यासाठी
३)आजुबाजुचे रहिवासी जेव्हा जास्तच 'आवाज' करतात तेव्हा.
'संगीत' वर पडलेला छापा दुसर्या प्रकारात मोडतो असे वाटते.