ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का?

ऋचा's picture
ऋचा in काथ्याकूट
8 May 2008 - 1:56 pm
गाभा: 

ऑफीस मध्ये दुपारचे जेवण झाले की झोप न यायचे काही उपाय ...

(बाहेर जायचा उपाय सांगू नका खुप ऊन असतं..

(खुप झोप अलेली मी) I)

प्रतिक्रिया

ध्रुव's picture

8 May 2008 - 1:58 pm | ध्रुव

खरं सांगू का? कुठलाही उपाय न करता झोपुन जायचे. :)

--
ध्रुव

लबाड मुलगा's picture

8 May 2008 - 2:00 pm | लबाड मुलगा

ओफिस मधे न जाणे

पक्या

कुंदन's picture

8 May 2008 - 2:10 pm | कुंदन

ऑफीस काय घर बसल्या पगार देणार आहे काय ...?
ह. घ्या.

ऋचा's picture

8 May 2008 - 2:03 pm | ऋचा

नावाप्रमाणे उपाय सुचऊ नका
उपाय वाचुन सुन्न झाले पक्या भाऊ

:O

कुंदन's picture

8 May 2008 - 2:07 pm | कुंदन

कळफलक दूर सारून मेजावर प्रकल्पासंबंधीचे बाड ठेवा. हाताचे कोपर मेजावर टेकवा. तळहातावर हनुवटी टेकवून गंभीर पणे प्रकल्पासंबंधीचे कागद वाचत आहात असा आभास निर्माण करा. आणि मग हळूच डुलकी काढा. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पण हळू हळू सवयीने जमून जाईल.
मी असेच करतो ...

अन्जलि's picture

8 May 2008 - 2:09 pm | अन्जलि

मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल

हे तर लै भारी....
अंजली ताईंचे नेहेमीचे प्रतिसाद वाचा.
अंजली ताईंच्या खरडवहीत काहीतरी खरडा , त्यावर त्यांचे प्रतिसाद येतील , ते ही वाचा ...
अक्षरे जुळवता जुळवता झोप उडून जाईल....
मात्र ते प्रतिसाद घरी गेल्यावर अजिबात आठवू नका , नाही तर घरी देखील रात्री झोप येणार नाही ...

अंजली ताईं : ह. घ्या.

सुधीर कांदळकर's picture

9 May 2008 - 1:18 pm | सुधीर कांदळकर

जुलव्ता जुलव्ता झोप उदुन जईल असे शुद्ध पाहिजे.

सुधीर कांदळकर.

नारदाचार्य's picture

8 May 2008 - 3:09 pm | नारदाचार्य

माझी झोप पार उडाली. कसे काय विचारताय? हे जे लिहिले आहे ते वाचून त्यातील शब्द समजून घेऊन आणि मग त्यांचा अर्थ समजून घेऊन...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2008 - 4:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल

असेच मनतो.
मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं. :)

अवांतर : संस्कृत भाषेला घरघर लागल्यावर 'प्राकृत' बोली अशीच असेल असे वाटते.

छोटा डॉन's picture

8 May 2008 - 4:26 pm | छोटा डॉन

>>मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं.
सर कय राव गरिभाचि घेतय...
बकि म्हल पन हे वचुण असच लै येद्यासारख वातत...

प्राकॄत बोलीवाला छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मैत्र's picture

8 May 2008 - 4:19 pm | मैत्र

दोले मोथे ... :) मला प्रिन्स वाटुंग पिन पिन ची आठवण झाली...

जाधव's picture

8 May 2008 - 2:10 pm | जाधव

पर्यायच नाही

मन's picture

8 May 2008 - 2:11 pm | मन

१.कंपनी सोडणारा पुढला कोण?
ह्य प्रश्नाच उत्तर शोधण्यासठी एक गुप्त हेर एजन्सी सुरु करा.
२. तुमच्या बॉस ला "ब्लँक कॉल" करा.
३.तुम्ही बसता तिथले फर्निचर पार हल्वुन सोडा.
शेजार्‍याच्या खुर्चिशी तो पार चवताळॅ पर्यंत काड्या करा.
४.कंटाळा येइस्तोवर, हाता पायाची बोटे आधि सरळ आणि मग उलट क्रमाने मोजा.
५.मीटिंग मध्ये फालतु प्रश्न विचारुन त्या लांबवा.
६.लोकांचे काम करतान्चे विचित्र हाव भावाचे निरिक्षण करुन, स्वतः ही तस्सेच करण्याचा प्रयत्न करा.
७.शिट्ट्या मारत सुटा.
८.कॉफी कप बरोअबर कचरापेटीत फेकायचा सराव करा.
९. तुमचा पी सी एका वेळेस किती जास्तित जास्त किती ऍप्लिकशन उघडु शकतो हे शोधा.(खुप सार्‍याअ विंडोज् उघडुन)

१०.एखाद्या कडे पाहुन कल्पना करा:-
हे कार्ट ५ वर्षाचं असताना कसं असेल?
लग्नाच्या वेळेस कसं वेंधळेपणा करेल(केलेला असेल)?
११. चाहाच्या वेळेतुन "वर्क ब्रेक्स" घ्या!
१२.लोकंचे डोके खात चला.
म्हंजे टेंशन त्यांना.आपल्याला नाही.
आणि हो.
बालिके, हे सर्व करताना काही क्षुद्र तथाकथित "मॅच्युअर्ड" लोक विचित्र पाहतील्.तिकडे साफ दुर्लक्ष कर.शेवटी आपला दिवस चांगला जाने महत्वाचे.
काय?
:-)
:-))
;-०
;-)

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

ऋचा's picture

8 May 2008 - 2:13 pm | ऋचा

अहो अंजली देवी.
काय आहे हे???

वाचता येइल अस खरडा की काहीतरी ~X(

डोळे फुटले की अक्षर जुळवुन जुळवुन

ऋचा's picture

8 May 2008 - 2:15 pm | ऋचा

तुम्हाला फार सवय आहे का?

"तुम्हाला फार सवय आहे का?"

कुणासाठी आहे प्रश्न?
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

केशवसुमार's picture

8 May 2008 - 2:19 pm | केशवसुमार

ऋचाताई,
तुमच्यासाहेबाचा इमेल आयडी द्या B) .. मग बघू कशी झोप येते :W
(साहेब)केशवसुमार
स्वगतः- हिचा साहेब माझ्या सारखा झोपणारा (|: असला तर काय करवे ?? :\

अभिज्ञ's picture

8 May 2008 - 2:23 pm | अभिज्ञ

उगाच काहितरी...
म्हणे
ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का?

कशाला?मला तर अजिबात जमणार नाही. X(
कारण,
अलिकडेच डॉक्टरांनी मला दुपारचे जागरण बंद करायला सांगितले आहे. :D

अबब

कुंदन's picture

8 May 2008 - 2:27 pm | कुंदन

लई भारी बुवा...

आयला , धमु वगैरेंचे प्रतिसाद यायच्या आतच कॉफी उडाली....

केशवसुमार's picture

8 May 2008 - 2:28 pm | केशवसुमार

ऑफिसमधे जायचे आणि झोपायचे (|: नाही? :O
मग ऑफिसला जायचे कशाला? :W (|: (|:
(बुचकळ्यात)केशवसुमार

एकदम सही ....
माझेही हेच मत आहे. विकांताला घरची कामे उरकल्यावर श्रमपरिहार ऑफिसमधे नाही करणार तर कुठे करणार.
शिवाय घरी असताना भार नियमनामुळे पंखा नाही चालत , मग झोप नाही होत बा नीट आपली. =))

अन्जलि's picture

8 May 2008 - 2:32 pm | अन्जलि

केशव्कुमार अगदि बरोबर. मि किति बरोबर लिहिलेय न? बाल हलुहलु शिक्तेय चुकाचि मफि असवि

मनस्वी's picture

8 May 2008 - 2:39 pm | मनस्वी

ह------------------------------------------लु------------------------------------------ह------------------------------------------लु------------------------------------------!

ऋचा's picture

8 May 2008 - 2:37 pm | ऋचा

ते बरोबर आहे
पण मी जेंव्हा झोपते तेव्हाच नेमका येतो हो तो ~X(

झोप डोळ्यात असते आणि तो काय बोलत असतो ते शुंभा सारख ऐकाव लागतं..

डोक्यात काही शीरत नाही :(

शेखर's picture

8 May 2008 - 2:43 pm | शेखर

जी संस्था आपल्याला कामा साठी पैसे देते , त्या पैश्याला जागुन काम करा. म्हणजे झोप येणार नाही.

- (कामसु) शेखर

मनस्वी's picture

8 May 2008 - 2:57 pm | मनस्वी

मग आपण स्वतः त्याचे आचरण का करत नाही??

शेखर's picture

8 May 2008 - 3:22 pm | शेखर

कारण मला झोप येत नाही......

एक's picture

8 May 2008 - 9:48 pm | एक

मॅनेजर झाले की झोप उडते..

स्वःता झोपत नाहीत आणि दुसर्‍याला पण झोपू देत नाहीत..पुढच्या जन्मी अजगर व्हाल..

ह. घ्या.. मी झोपेत आहे.

जादू's picture

8 May 2008 - 2:51 pm | जादू

मन यांचे उपाय फार छान आहेत करुन पहा झोप येणार नाही.

यशोधरा's picture

8 May 2008 - 2:52 pm | यशोधरा

मला तर झोप येतेय... त्यामुळे उपाय नंतर सांगते, झोप झाल्यावर!! ;)

कुंदन's picture

8 May 2008 - 2:57 pm | कुंदन

हे बाकी खरे आहे.
मी हा उपाय करून बघितला : सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार हा व्यायाम करतो. ऑफिसला येण्यापूर्वीच सकाळी (७:३० ला) घरून जेवणच करून येतो. दुपारचे जेवणाला सुट्टी. दुपारी एखादे सफरचंद खातो. झोप येत नाही.

-- ( काम असेल तेव्हां २४ * ७ काम करणारा ) कुंदन

ऋचा's picture

8 May 2008 - 3:08 pm | ऋचा

कुंदन तुमचा उपाय छान आहे
पण दुसरा जेवण करणार असेल तर.....

:W

मग अवघड आहे बा ...
आयला ... आमरस चापायचा , ए. सी. मध्ये बसायचे मग झोप येणार नाही तर काय होणार ...
जरा २ घास कमी जेवा ,

जेवू द्या की त्याला ...
की तो तुम्हालाही आग्रह करतोय जेवायला चला म्हणून ?

मन's picture

8 May 2008 - 3:08 pm | मन

काम असताना कुणीही काम करेल.
काम नसताना कुणीही आराम करेल.
त्यात काय एवढं?

खरी मजा ह्यातच की, काम भरपूर आहे,भन्नाट लोड ने सगळ्यांनी हाय खाल्ल्लीए,आणि आपण मात्र तरीही संतांच्या शिकवणीनुसार
स्थित्प्रज्ञ राहुन आराम करतोय.

समर्थ म्हणतातः-

"दास डोंगरी राहतो
उत्सव रामाचा पाहतो."

तर तात्पर्य हेच की:-
तुम्ही मनाए एखाद्या हिल स्तेशन ला जा.(डोंगरावर)
आणि रामाचा उत्सव पहा.(ही सृष्ती,त्यात होणारे बदल्,पाउस्,वर्षा ,वसंत्,सारं सारं काही)
पहा प्रसन्न वाटतं की नाही.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वरदा's picture

8 May 2008 - 5:20 pm | वरदा

ही तर माझ्या वर निघाली..झकास गं रूचा....मी नुसताच टाईमपास करते ही तर झोपतेच..... :D

काही उदाहरणे द्या ना ....
आमच्याही ज्ञानात थोडी भर पडेल....

( ज्ञानाचा भुकेला ) ...कुंदन

वरदा's picture

8 May 2008 - 5:35 pm | वरदा
कैलासराजा's picture

9 May 2008 - 12:25 pm | कैलासराजा

आयुर्वेदात
दुपारी झोप येवू नये
यासाटी "निद्रानाशान्तक" गोल्या हायेत
झ्वापातून उटण्यापूरवी दोन अन् झ्वाप लागल्यावर् चार पाटणकराच्या काड्यात घे पोरी
आयूरवैदू..........कैलासराजा

छोटा डॉन's picture

8 May 2008 - 5:40 pm | छोटा डॉन

हम्म् , झोप न येण्याचा उपाय !!!
आत्ता लगेच सांगायला हवा का ? सध्या मला अंमळ कंटाळा येऊन झोप येते आहे ...
तेवढी क्षणिक डूलकी झाली की सांगतो ...

पण समजा ऑफीसमध्ये झोपले नाही तर करणार काय ८-१० तास ?
त्या "डॉर्मेट्रीत" काय "मधमाश्यापालनकेंद्र" उघडायचे काय ?

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ईश्वरी's picture

9 May 2008 - 1:42 am | ईश्वरी

अग ऋचा,

ऑफीस मध्ये झोप येते म्हणजे रात्री तुला पुरेशी झोप मिळत नसावी . रात्री ही मीपावरच पडी क असते का?
रोज सलग ७ ते ८ तास झोप उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक असते.
झोपेचे नीट नियोजन कर म्हणजे ऑफीस मध्ये झोप येणार नाही.
ईश्वरी

वेलदोडा's picture

9 May 2008 - 2:16 am | वेलदोडा

दिवसा ऑफीस ...रात्री मीपा
झोप काढणार कधी?
त्यासाठी एक काम करा... रात्री झोपत जा. आणि ऑफीस मध्ये मीपा वाचत जा. नाहीतरी तुम्ही ऑफीस मध्ये झोपतातच . मग मीपा वाचत जा. झोपलेले दिसण्यापेक्षा atleast काहीतरी काम करीत आहात असे तरी boss ला वाटेल.

-- वेलदोडा

ऋचा's picture

9 May 2008 - 9:36 am | ऋचा

:) अरे दादा...

काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते...

वेलदोडा's picture

9 May 2008 - 11:18 am | वेलदोडा

अरे दादा...

काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते...

मग एक काम करा ताई...रात्री व्यवस्थित झोप काढा.
(झोप की मीपा ह्यात कशाला प्राधान्य दयायचे ते ठरवा.)

चिन्मय's picture

9 May 2008 - 11:47 pm | चिन्मय

साहेबाला मनात्ल्या मनात १० शिव्या द्या.

पान्डू हवालदार's picture

15 May 2008 - 11:45 pm | पान्डू हवालदार

फ्लोपी डिस्क ला केळ लाउन कन्पुटर मधे टाका .. परत बाहेर काढुन हेल्प देस्क ला फोन करा . ...