श्री. परिकथेतील राजकुमारच या बाबतीत तुमची मदत करु शकतात. मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
श्री. स्नेही मी रोज मिपावर येतो आणि सर्व धागे देखील वाचतो. माझी खरडही व व्यनी सुविधा देखील चालु आहे, असे असताना आपण मला न विचारता माझा संपर्क क्रमांक कोणा अनोळखी व्यक्तीला कसा देऊ शकता ?
मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
एकतर तुम्ही परस्पर दुसर्याचा नंबर तिसर्याला दिला. वर पुन्हा तो दुसर्याचा नंबर माझ्याकडे आहे ही दवंडी पिटण्याची काय गरज होती ? प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाशी जोडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
घटं भिंद्यांत पटं छिंद्यांत कश्चित गर्दभारोहणं |
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषः भवेत ||
ही प्रसिद्धी म्हणजे मोह-माया आहे असे तुमच्या त्या विपश्यना की काय म्हणतात त्या थेरांबरोबर शिकवलेले नाही असे वाटते. बाकी तुम्ही सूज्ञ आहात. असले प्रकार थांबवावेत अशी मनापासून विनंती.
- रोखठोक
३०-४० रु प्रतिदिनात आरामात राहु शकाल अशी यक जागा माहीतीये...
ठेशण... दर २ तासाला प्लॅटफॉर्म तिकिट मात्र काढावे लागेल...
तिथं कसे रहायचे या संबंधी विचाराल तर हे बघा. http://www.youtube.com/watch?v=hsik0DzgFdw
प्रतिक्रिया
8 Mar 2011 - 11:54 pm | मी-सौरभ
असे धागे काढण्यापेक्शा गूगलून बगा की :)
11 Mar 2011 - 2:42 pm | आवशीचो घोव्
गुगलून बघितलं आधीच, एक दोन ब्रोकर्सशी बोलून सुद्धा पाहिले. पण इथे बरेच पुणेकर असावेत असे वाटल्याने विचारले.
9 Mar 2011 - 12:15 am | रेवती
सकाळ वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये पहावे लागेल.
साधारणपणे नोकरीचे ठिकाण कोठे आहे?
आपल्याला कोणत्या भागात राहणे शक्य आहे?
11 Mar 2011 - 2:44 pm | आवशीचो घोव्
नोकरीचे ठिकाण : ढोले पाटील रोड
पुणे शहरात कुठेही चालेल. ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात
11 Mar 2011 - 3:24 pm | वपाडाव
२ परस्पर विरोधी वाक्ये एकाच ओळीत.
पुणं हे २० किमी त्रिज्येचं वर्तुळ आहे साहेब. आता बोला.
11 Mar 2011 - 4:17 pm | आवशीचो घोव्
ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात कुठेही चालेल. आता बोला
11 Mar 2011 - 4:26 pm | धमाल मुलगा
५-७ कि.मी.च्या पट्ट्यात म्हणताय तर सदाशिव पेठ झिंदाबाद. बक्कळ खोल्या मिळतील. एस.पी.कॉलेजच्या आसपास ढीग जागा आहेत अशा. :)
9 Mar 2011 - 12:22 am | अँग्री बर्ड
शिरा रे पडानेत तुझ्यार.मिसळपाव चो बरो उपयोग करत तिया ..मानलो तुका..मी पण येउच्या इचारात असंय रे !!!
11 Mar 2011 - 2:45 pm | आवशीचो घोव्
येनाऱ्यांचा स्वागत आसा.
9 Mar 2011 - 12:35 am | नि३
व्यनी करा..
माझा ब्लॉग
http://www.db2guide.blogspot.com/
9 Mar 2011 - 9:36 am | सूर्यपुत्र
ब्लॉग ला व्यनी कसा करायचा?
-सूर्यपुत्र.
9 Mar 2011 - 12:06 pm | नि३
अरे सुर्यपुत्रा ....
ब्लॉग ला व्यनी नाही रे..मिसळ्पाव वरील व्यनी..
माझा ब्लॉग : http://www.db2guide.blogspot.com/
9 Mar 2011 - 6:09 pm | मालोजीराव
9 Mar 2011 - 1:29 am | इंटरनेटस्नेही
श्री. परिकथेतील राजकुमारच या बाबतीत तुमची मदत करु शकतात. मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
9 Mar 2011 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. स्नेही मी रोज मिपावर येतो आणि सर्व धागे देखील वाचतो. माझी खरडही व व्यनी सुविधा देखील चालु आहे, असे असताना आपण मला न विचारता माझा संपर्क क्रमांक कोणा अनोळखी व्यक्तीला कसा देऊ शकता ?
9 Mar 2011 - 12:21 pm | ५० फक्त
+१ टु परा, काही दिवसापुर्वी हे माझ्या बाबतीत पण झाले आहे, त्यावेळी मलापण बराच त्रास झाला होता.
हे प्रकार टाळावेत ही नम्र विनंती सर्व सदस्यांना.
9 Mar 2011 - 12:34 pm | शिल्पा ब
+१
न विचारता कोणीही दुसर्याची माहीती तिसर्याला द्यायचे काहीच कारण नाही.
9 Mar 2011 - 5:10 pm | Nile
काय रे चोच्या पर्या, तुला तुझा नंबर इंट्याला द्यायला कोणी सांगितलं होतं रे?
असो, तुझा नंबर मला व्यनी कर बरं तेव्हढा. ;-)
9 Mar 2011 - 5:18 pm | कुंदन
इंट्याकडुन घेणे. ;-)
9 Mar 2011 - 8:14 pm | अप्पा जोगळेकर
मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
एकतर तुम्ही परस्पर दुसर्याचा नंबर तिसर्याला दिला. वर पुन्हा तो दुसर्याचा नंबर माझ्याकडे आहे ही दवंडी पिटण्याची काय गरज होती ? प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाशी जोडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
घटं भिंद्यांत पटं छिंद्यांत कश्चित गर्दभारोहणं |
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषः भवेत ||
ही प्रसिद्धी म्हणजे मोह-माया आहे असे तुमच्या त्या विपश्यना की काय म्हणतात त्या थेरांबरोबर शिकवलेले नाही असे वाटते. बाकी तुम्ही सूज्ञ आहात. असले प्रकार थांबवावेत अशी मनापासून विनंती.
- रोखठोक
9 Mar 2011 - 9:09 am | श्री गावसेना प्रमुख
हसन अली चा बन्गला रिकामा आहे.(जेल मध्ये गेल्या मुळे)वापर करुन घ्या
9 Mar 2011 - 9:40 am | ५० फक्त
गावात हवे असेल तर एरंड्वण्यात कलमाडि भवन पण रिकामेच आहे.
9 Mar 2011 - 12:50 pm | प्यारे१
वर म्हणताय तुमचा मोबाईल नंबर इतरांना न विचारता दिल्याचा त्रास झाला.
आणि इथे दुसर्याचे आक्खे भवनच तिसर्याला देताय????? काय पीडा, यातना, क्लेष होतील त्या सन्माननीय व्यक्तिला??????
9 Mar 2011 - 12:56 pm | अवलिया
आमच्या एका मित्राचा १बीएचके होता ब्वा !!
9 Mar 2011 - 12:58 pm | गणेशा
पुण्यात जास्त माहित नाही.. पिंपरी चिंचवड मध्ये हवे असल्यास सांगा
9 Mar 2011 - 1:01 pm | मुलूखावेगळी
ओ एकोळी धागा काय लिहिलात.
तिथे लिहा ना काय हवेय ते नीट.
एकट्याला च रुम हवीये का शेअर करनार फ्लॅट का पेईन्गगेस्ट? आनि एरीआ.?
11 Mar 2011 - 3:16 pm | आवशीचो घोव्
एकट्याला चालेल , शेअरिंग चालेल, पेईन्गगेस्ट पण चालेल, मात्र राहण्याची सोय व्यवस्थित हवी.
9 Mar 2011 - 5:50 pm | वपाडाव
३०-४० रु प्रतिदिनात आरामात राहु शकाल अशी यक जागा माहीतीये...
ठेशण... दर २ तासाला प्लॅटफॉर्म तिकिट मात्र काढावे लागेल...
तिथं कसे रहायचे या संबंधी विचाराल तर हे बघा.
http://www.youtube.com/watch?v=hsik0DzgFdw
फुल्ल ह. घ्या. ;-)
9 Mar 2011 - 6:16 pm | मालोजीराव
तुमचं नोकरीचं अथवा शैक्षणिक ठिकाण सांगितलत तर कदाचित सुचवू शकेन ..
बाकी एखादी स्लीपिंग bag आणि कॅरीम्याट असेल तर सिंहगडावर सुद्धा राहू शकता ;)