आदर्श महिला

मुलूखावेगळी's picture
मुलूखावेगळी in काथ्याकूट
8 Mar 2011 - 11:20 am
गाभा: 

सर्वप्रथम महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!!!!
हा धागा एवढ्यासाठी आहे कि आपण आज इथे आपल्याला आदरणीय आणि स्फुर्तीदायक वाटणार्‍या महिलांची नावे इथे शेअर करुया आणि त्या तुम्हाला आदरणीय आणि स्फुर्तीदायक का वाटतात त्याची कारणं पण.
माझ्या आयुष्यातील-
१. माझी आई - माझी खुप्प्प प्रिय ,माझ्या आयुष्यातील पहिले मानाचे स्थान असलेली . हिने मला खुप काही शिकवलंय.अडचणींवर मात करुन गोष्टी पुर्णत्वाला नेणे,सगळ्यांना वेळ देउन स्वतःसाठी ही वेळ काढणे.
२. झाशीची राणी- शौर्याचे प्रतिक आहे म्हणुन
३.जिजामाता- आदर्श माता म्हणुन.
तुम्ही पण सांगा .

प्रतिक्रिया

मिपा वर असतो तेंव्हा तरी मिपाकर महिलाच माझ्यासाठी आदर्श असतात . कसे भांडावे कसे वाकडे प्रतिसाद द्यावे इथपासुन ते स्वतःची बौद्धिक क्षमता दाखवणे , इथपर्यंत मायबाप मिपाकर म्हैला वर्ग मला मार्गदर्शन करत असतो :)

काही आदरणिय मिपाकर म्हैला आहेत ( कोण ते त्यांना माहित आहे , नावं घेणं जरुरी वाटत नाही ) त्यांना मनापासुन प्रणाम करुन त्यांचे आशिर्वाद घेतो , त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले , पडत्या किंवा नैराश्याच्या काळात त्यांचे मार्गदर्शन अनमोल ठरले , आणि येणार्‍या आव्हानांसाठी त्यांनी आम्हाला वेळोवेळी मौलिक सल्ले देऊन ऑलरेडी तयार केले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आपली ह्या धाग्यावरुन रजा घेतो .

- रजा मुराद मेरी पुरी करो या मरो तो जानो मेरी जान अब्राहम लिंकन

आजच्या घडीला एक अग्रगण्य नाव : "सिन्धुताई सपकाळ" !

___________

आणि त्याबरोबरच "सावित्री बाई फुले", " आनन्दी बाई गोपाळ जोशी", "बाया कर्वे", "चितोडची महाराणी पद्मिनी", "अरूणा शानबाग- यांचे दयामरण टाळण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या केइएम्'चा समस्त सिस्टर वर्ग", आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा समस्त स्री वर्ग... यांना मानाचा मुजरा! :)

रजा मुराद मेरी पुरी करो या मरो तो जानो मेरी जान अब्राहम लिंकन

लैच अशक्य आहेस रे टारबा.......
___/\___

५० फक्त's picture

8 Mar 2011 - 1:27 pm | ५० फक्त

मुवे प्रमाणेच, प्रथम मान माझ्या आईचा - तिच्यासाठी काही कारणं देण्याची गरज नाही.

माझी बायको, - माझ्यासारख्या बरोबर संसार करणं म्हणजे...... कळलं. बास.

माझ्या बहिणी, ज्यांनी मला माझ्या मोठं होण्यात खुप मदत केली, माझा खोड्या, चुका आई बाबांपर्यंत पोहोचु न देता मला शिस्त लावली.

माझी आत्या, १९४० ते १९७८ या काळात एका पोलिसाचं घर सांभाळणं आणि कॅन्सरवर मात करुन ९ वर्षे मरणाला असं घाबरवणं की त्यानं जव़ळ भटकु पण नये हे तिचं मोठेपण.

आणि पाटिल काकु, माझ्या शाळेतल्या मैत्रिणिची आई. नव-याच्या मागं (१९७९ मध्ये पाटिल काका गेले,) वय वर्षे ३ ते वय वर्षे ९ अशा तीन मुलींना मोठं करणं आणि त्यांना व्यवस्थित संसाराला लावणं हे येरागबाळ्याचं काम नाही. या तिघी जणि आता संगित क्षेत्रात आहेत तसेच शालेय अभ्यासात पण मागे नव्हत्या. माझी मैत्रिण आणि तिचा नवरा संगित शिकवंण्याच्या क्षेत्रात आहेत सध्या.

अविनाशकुलकर्णी's picture

8 Mar 2011 - 1:34 pm | अविनाशकुलकर्णी

डॉ आनंदी बाई जोशी...भारतातल्या पहिल्या डॉक्टर महिला...
त्यांची जिद्द व संघर्ष पाहुन मन थक्क होते..
विनम्र प्रणाम

तुम्हालाही शुभेच्छा,

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, त्यामुळे तिचा मान हा पहिलाच.

तुम्हालाही शुभेच्छा,

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, त्यामुळे तिचा मान हा पहिलाच.

एक -दोन नावे सांगणे खरेच अवघड आहे ..

आदर्श महिला म्हंटले की बर्याच आदरणीय महिला डोळ्यासमोर येतात ..
अगदी रशियन क्रांतीची उगमदात्री .. जिजामाता .. मदर तेरेसा .. डॉ. आनंदीबाई .. सावित्री बाई फुले आणि अतिशय परिश्रम करुन काही तरी नविन करणार्याची जिद्द असणार्या सर्व महिला डोळ्यासमोर येवुन जातात ... काहिंचा जीवनप्रवास कधी पुस्तकातुन कळालेला असतो काही रोजच्या जीवनातील अवती भोवती असणार्या ही असतात ..

जीवनाला वळण देणार्‍या या सर्व महिलांना प्रणाम .. मनपुर्वक प्रणाम

मुलूखावेगळी's picture

8 Mar 2011 - 2:45 pm | मुलूखावेगळी

एक -दोन नावे सांगणे खरेच अवघड आहे ..

मग कितीही लिहि ना .लिमिट दिली नाहीये.

जगातील समस्त महिला आमच्यासाठी आदर्श आहेत :)

काही त्यांच्या आचरणातुन, विचारातुन आयुष्य कसे जगावे, कसे असावे हे शिकवतात :)

तर उरलेल्या कसे जगु नये हे !! :)

Dhananjay Borgaonkar's picture

8 Mar 2011 - 3:10 pm | Dhananjay Borgaonkar

या प्रतिक्रियेवर जोरदार टाळ्या झाल्या पहिजेत. = )) = ))

तर उरलेल्या कसे जगु नये हे !!

ह्यावर एक विस्तृत मार्गदर्शनपर लेख पाडावा असे सुचवु इच्छितो आज जागतिक महिला दिनी. बाकी "जागतिक महिला " ची व्याख्या काय ? :)

- ट्रोजन

तर उरलेल्या कसे जगु नये हे !! >>

=)) =))

अगदी असेच म्हणतो ..

नान्याची गोळी चुकत नाही सहसा ;)

हिरकणी- सकाळपासुन सन्ध्याकाळ पर्यन्त घरासाठी राबणारी आणि बाळाच्या ओढीने डोन्गर उतरुन येणारी. तिच्या सारख्या अनेक हिरकण्याना सलाम

अहिल्या, द्रोपदी, सीता, तारा, मंदोदरी,शर्मिष्ठा, दमयंती, सावित्री, अंजनी, अदिती, विदुला, काली, विनता, मैत्रेयी, विश्पला, गार्गी, शची, गौतमी, संघमित्रा, सुमित्रा, अनुसूया, अरुंधती, मीरा, चेन्नम्मा, रुद्रमाम्बा, सुविक्रमा, महादेवी, जयमती, भवानी, वीणा दत्त, कल्पना, प्रीती, शारदामाता, निवेदिता, येसूबाई, लक्ष्मीबाई, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी पद्मिनी, कृष्णाकुमारी.....

अजून खूप मोठी यादी आहे.. वेळ मिळाला की सविस्तर लिहिते..

टारझन's picture

8 Mar 2011 - 3:50 pm | टारझन

सिमा , रुपाली , अनघा , प्रियांका , अशिमा, शिला , चारुशिला , मनाली , मेघा , प्रमिला , सारिका , लतिका , हृतिका , गौतमी , गौरवी , रश्मी , अश्विनी , गौरी , हेमा , हेमांगिनी , पुलत्स्यरोमा , कुंडलीनी , ओवी , कादंबरी , गितांजली , अंजली , रोहिनी , रेखा , स्मिता , हरमायनी , कमोलिका , पायल , उतरन , चन्द्रमुखी चौटाला , बबिता , दया , कामिनी , रागिनी , गिता विश्वास , मेखला , रेश्मा कहा है , बसंती , महेश्वरी , बालेश्वरी , गुड्डी , मकुली , ललिता पवार , जेनिफर लोपेझ , शकिरा , मारिया शिरापोहा , स्टेफी ऑटोग्राफ , मोनिका , सोनिका , सोनाक्षी , मिनाक्षी , रुद्राक्षी , केमिला ,पामेला , रमोला सिकंद , तुलसी विराणी , पार्वती आग्रवाल , राखी ( णॉट सावंत , ओके ? "आयेंगे ... मेरे करन-अर्जुन आयेंगे .. वाली ) , डॅबी , नमिता ,सुमिता , मधुमिता ,अमिता , रसिका , कन्याकुमारी, जेनेलिया , करिना , करिश्मा, ऐश्वर्या , कत्रिना , अनुश्का , प्रिती , रेणुका , सानिया , सोनिया , नेहा , स्नेहा , सुप्रिया , जॅस्मिन, सारिका , शमिता , शुभांगी , हेमलता , संपदा , केवडा , सखु , प्रमिला , गिता , मंजुळा ,बकुळा , तेजस्विनी , अश्मिता , सुश्मिता, आशा , उशा , लता , डायना , नयनतारा , रविना , रेहाना , समता , समिधा , ...

खरंच खुप मोठी यादी आहे .. डोळे पांढरे होतील सविस्तर लिहायचे तर .

- (कोना कोपर्‍यात हवा) खेतान
असं एखादं शिंगरु नाठाळ | आवरता येईना डॉस्क्याव घेतंया आभाळ ||

सुहास..'s picture

8 Mar 2011 - 4:04 pm | सुहास..

_/\_

काय अभ्यास ? काय अभ्यास ;)

राखी ( णॉट सावंत , ओके ? "आयेंगे ... मेरे करन-अर्जुन आयेंगे .. वाली ) >>>

=)) =))

फू ट लो !!

माधुरी (दिक्षितांची) ह्यांना वगळ्ल्या बद्दल निषेध! निषेध!! निषेध

मितान's picture

8 Mar 2011 - 4:48 pm | मितान

टार्‍या, मी लिहिलेल्या यादीतली नावं माझी श्रद्धास्थानं आहेत. या प्रत्येकीवर मी एक स्वतंत्र लेख लिहू शकेन.
असो. आता इथे त्याबद्दल लिहिण्याची इच्छा किंवा गरजही वाटत नाही.

माझ्या भावना दुखावल्या गेल्या. आणि हे मी खूप गंभीरपणे सांगतेय.

तुमच्या भावना दुखावण्याचा दुरदुर पर्यंत हेतु नाही . तुमच्या भावना का दुखावल्या गेल्या हे सांगा . कारण बाकी लिहीलेली नावं ही महिलांचीच आहे . आणि त्या सगळ्या महिलांना मी प्रत्यक्षपणे ओळखतो , आणि त्यांच्या विषयी आदरही आहेच. शिव्या किंवा अपशब्द लिहील्या असत्या तर भावना दुखावणे समजु शकतो. पण फक्त महिलांची नावे लिहील्याने भावना दुखल्या जाणे अचंभित करणारे आहे.
तरी देखिल दुखावल्या गेल्या असल्यास तेवढ्याच गंभीरपणे माफी मागतो.

बाकी काही बोलणे नाही. साला हल्ली साधं लिहीणंही सोयीचं राहीलेलं नाही.

- टारझन

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2011 - 5:08 pm | प्रीत-मोहर

टार्‍या मितानताई काय म्हणतेय हे तुझ्या चांगलच लक्षात आल असताना मुद्दामुन अश्या प्रतिक्रिया देणे तुला शोभत नाही...

असो.

महिला दिन आहे म्हणुन पुन्हा एकदा गुस्ताखी माफ केली आहे. अन्यथा प्रतिसाद वेगळा आला असता.
वर लिहीलेल्यां नावांपैकी बर्‍याच माझ्या नात्यातली नावं आहेत, काही कलिग्ज ची नावं आहेत .उरलेल्या काही माझ्या हिरॉइन्स आहेत . आणि त्या सर्वांवर मी एकेक लेख लिहु शकतो. आता ह्या मधे तोंड खुपसण्याचे कारण स्पष्ट करा.
अन्यथा बघुन घेऊ (उद्या) .

-(संयमी) टारझन

Dhananjay Borgaonkar's picture

8 Mar 2011 - 6:02 pm | Dhananjay Borgaonkar

- (कोना कोपर्‍यात हवा) खेतान
असं एखादं शिंगरु नाठाळ | आवरता येईना डॉस्क्याव घेतंया आभाळ ||

=)) =)) =)) लै भारी...मेलो हसुन हसुन =)) =)) =))

नरेशकुमार's picture

8 Mar 2011 - 3:46 pm | नरेशकुमार

एक आनी एकंच माझी प्रिय राणी

पर्नल नेने मराठे's picture

8 Mar 2011 - 4:00 pm | पर्नल नेने मराठे

घ्या झाला ह्यांचा आचरटपणा सुरु (इथे डोळे विस्फारल्याची स्मायली मनात आणावी)
ह्यांच्या राणीला असला राजा मिळाला म्हणुन माझी सहानुभुती कायमच असेल.

We are Cool as Vodka,Hard as Tequila,Warm as Cognac,Exotic as Malibu,Mixed as a Cocktail & as Special as a Champagne.Cheers to us.....!!!!!

मृगनयनी's picture

8 Mar 2011 - 4:27 pm | मृगनयनी

मला "मृत्यूदन्ड" मधली मोहन जोशीला मारणारी माधुरी आठवतेय...
किन्वा शक्ती'मधली करिष्मा!... आणि 'आख्खा 'लज्जा' पिक्चर... आणि आख्खी "लज्जा" सिरियल! आठवतेय!

त्या सगळ्या स्त्री शक्तींना त्रिवार प्रणाम!

ह्यावरुन मंदीरा बेदी ची "शांती " आणि प्रतिक्षा लोणकर ची "दामिनी" आठवली . त्यावरुन दामिनीचे सह्याद्री चॅनल वर बरोबर पाच वाजता घुमणारे सुर आठवले ..
"दामिनी ... दामिनी ... " ( पुढचे सुर विसरल्या आहेत )

- परमवीर
जो करी जिवाची होळी , छातीवर झेलुनी गोळी

मृगनयनी's picture

8 Mar 2011 - 4:56 pm | मृगनयनी

स्व. प्रिया तेन्डुलकरांची "रजनी" पण अशीच तडफदार होती....
किन्वा चन्द्रकान्ता, रमिया, सभिया, साजिश करणारी "शिखा स्वरूप",...
सगळ्याच चेतनादायी होत्या...
किन्वा "इन्दिरा गान्धी!... द ग्रेट्ट! सोनिया, प्रियान्का, यामिनि... सगळ्याच ग्रेट्ट!

कुन्कु मधली "जानकी", पिन्जरामधली "आनन्दी" पण ग्रेट्ट!!!

टारझन's picture

8 Mar 2011 - 5:02 pm | टारझन

तिसरा डोळा ह्या डीडी सह्याद्री वर लागणार्‍या सुपर अफलातुन डिटेक्टिव्ह सिरियल ची मुख्य अभिनेत्री "सुप्रिया कर्णिक" ची आठवण झाली . त्या काळी सुप्रिया कर्णिक खरोखर चेतनादायी होत्या.
त्यांनी ताल , जिस देश मे गंगा रेहता है, वेलकम वगैरे सिनेमांमधुन काम केले आहे.

पाषाणभेद's picture

8 Mar 2011 - 9:56 pm | पाषाणभेद

एखाद्या सिरीयल मधल्या महिला कशा काय आदर्श होवू शकतात बुवा?

बाकी टारझनच्या प्रतिक्रीया खुप वाचनीय आहेत.

बाकी टारझनच्या प्रतिक्रीया खुप वाचनीय आहेत.

ओ चुचुकाकु, हे we म्हणजे किती असतात हो जनरली? नाय म्हणजे फकस्त कोन्याक घ्यायची विच्छा झाली तर ...? ;-)

बाकी इतक्या दारवांसारख्या (म्हणजे लगेच मादक नाही हां) असतील तर साला कितीतरी पुरुष रोज महिला दिन साजरा करताना. चला आपण पण चाल्लो दिन साजरा करायला...

एक आनी एकंच माझी प्रिय राणी >>>

=))=))
अश्याच स्वरुपाचा (ईथे स्वरुपा हे नाव नाही ; ) ) प्रतिसाद येणार असे अपेक्षित होता. ;)

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2011 - 4:33 pm | नगरीनिरंजन

आदर्श महिला ही द्विरुक्ती कशाला? बाकी नानासाहेबांशी सहमत.

विनायक बेलापुरे's picture

8 Mar 2011 - 5:04 pm | विनायक बेलापुरे

२-४ आदर्श महिला सांगणे अवघड आहे.

आयुष्यात पाहिलेली पहिली आदर्श स्त्री - स्वतःची आई असते यात शंका नाही.
(आणि पहिला आदर्श पुरुष - वडिल असतात)

इतर स्त्रीया त्यात्या परिस्थितीत आदर्श वाटत राहतात.
भावविश्व विस्तारत जातील तसे आदर्श बदलत जातात.
पण आई-वडिल यांची स्थाने कायम राहतात.

मला तर कष्ट करणार्‍या - टॅक्सी ड्रायव्हर, आमच्या ऑफीसमधील जॅनिटर अशा स्त्रिया आदर्श वाटतात कारण या स्त्रिया अतिशय गलीच्छ (संडास साफ करणे) यासारखी कामे हसतमुखाने करत असतात. थोडे फार पैसे मिळवून जगत असतात. मी या स्त्रियांकडून श्रमप्रतिष्ठा तसेच पैशाचे महत्त्व शिकले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

12 Mar 2011 - 4:12 pm | निनाद मुक्काम प...

अशा स्त्रिया आदर्श वाटतात कारण या स्त्रिया अतिशय गलीच्छ (संडास साफ करणे) यासारखी कामे हसतमुखाने करत असतात. थोडे फार पैसे मिळवून जगत असतात. मी या स्त्रियांकडून श्रमप्रतिष्ठा तसेच पैशाचे महत्त्व शिकले.

सहमत

आमच्या हॉटेलात सुद्धा ह्यांच्या कडून कामे करून घ्यावी लागतात .( ह्या देशात निर्वासित म्हणून आले असतात .)
त्यांच्याकडून खरच खूप शिकण्यासारखे असते .
आमच्या कडे रोजे चालू असताना अनेक खडतर कामे करणाऱ्या भगिनी वर्गास सलाम.
बाकी
झाशीची राणी /सुद्धा मूर्ती / लालन सारंग / कल्पना चावला / सावित्री फुले / २५ हून जास्त भाषा जाणणारी व शिकवणारी अमृता जोशी /
किरण बेदी /जिजामाता / मदर तेरेसा / सिंधुताई

आई तर आहेच!!
किरण बेदी!!
माझी आजी.. कोल्हापूरातल्या नामांकित एम एल जी हायस्कूलची प्रिस्नीपल होती तिच्या लग्नाच्या आधी. शी एज जस्ट ग्रेट!!

अग्रजा's picture

8 Mar 2011 - 8:52 pm | अग्रजा

स्त्री म्हणजेच आदर्श

नाहीतर "स्त्री म्हणजेच आदर्श" हे असलं संबोधून स्त्रीयांचा कीमान आज तरी जाणते/अजाणतेपणी अपमान करू धजला नस्ता.

बाकी केवळ महीला दीन आहे म्हणून ज्यांचा व्यक्तीशः ऊल्लेख करावा अशा स्त्रीया माझ्या जीवनात अजून आल्या नाहीयेत याच खेद प्रकट करतो :(.

कलंत्री's picture

8 Mar 2011 - 10:40 pm | कलंत्री

भारतासारख्या देशात अनेक वादविवाद, पंथ, प्रांत यांना साभाळत आणि आपल्या मर्यांदाचे भान ठेवणार्‍या सोनियाजी बद्दल मला मात्र आदर वाटतो.

दुसर्‍या माझ्या आवडत्या महिला व्यक्तिमत्व म्हणजे माधुरी दिक्षीत नेने बाई या आहेत. एका क्षेत्रातील अव्वल यश आणि संसारातील सुद्धा यश असे सांभाळणार्‍या माधेरी बाई.

विकास's picture

8 Mar 2011 - 11:16 pm | विकास

मायावती, राबडी देवी आणि जयललीतांना विसरल्याबद्दल निषेध! :-)

वपाडाव's picture

9 Mar 2011 - 6:35 pm | वपाडाव

तुम्ही उमा भारती विसरल्याबद्दल तुमचा जास्त निषेध....

विकास's picture

9 Mar 2011 - 11:07 pm | विकास

तुम्ही उमा भारती विसरल्याबद्दल तुमचा जास्त निषेध....

खरचं की! तुमच्या भावना मी समजू शकतो आणि त्या दुखवण्याचा उद्देश नव्हता, पण काय आहे माझा प्रतिसाद हा खालील वाक्यासंदर्भात होता:

भारतासारख्या देशात अनेक वादविवाद, पंथ, प्रांत यांना साभाळत आणि आपल्या मर्यांदाचे भान ठेवणार्‍या सोनियाजी बद्दल मला मात्र आदर वाटतो.

असे सांभाळणे माझ्या लेखी "हाथी नही गणेश है" म्हणणार्‍या मायावतीजी आणि मर्यादांचे भानच काय, पण मर्यांदांना भानावर ठेवणार्‍या जयललीताजी आणि राबडीदेवीजींनी करून दाखवले आहे असे मला वाटते.

त्याबाबतीत इतर सर्व फिकेच... उमा भारतीच काय पण सुषमा स्वराज अथवा वृंदा कारथ पण लांबच! फारतर अजून एक "ता"कारान्त जवळ आहेत, त्या म्हणजे, "ममता"जी! :-)

जोशी's picture

8 Mar 2011 - 10:50 pm | जोशी

आज मटा मध्ये ऐका जहीरातीत बर्याच लोकप्रीय स्त्रीयांची यादी बघीतली. त्यातील ऐक (का दोन ?) उल्लेखनीय नाव म्हणजे,
" सोनाली कुलकर्णी (दोन्ही )"

जहीरातकारच्या (कारीच्या) कल्पनेला दाद आणि भरपूर टाळ्या!!

ऐकच जोशी.

इंटरनेटस्नेही's picture

9 Mar 2011 - 2:14 am | इंटरनेटस्नेही

आमच्या काही कॉलेज टीर्चस. त्यांनी खुप ममतेने आमच्या सारख्या कार्ट्यांचा सांभाळ केला.
मिस यु मॅम!

वाहीदा's picture

12 Mar 2011 - 3:10 pm | वाहीदा

तुझ्या सारख्या कार्ट्यांचा सांभाळ केला म्हणजे खरंच ग्रेट ;-)
मानलं तुमच्या सगळ्या टिचर्स ना .. :-)