फ्री ऑनलाईन चित्रपट दाखवणार्‍या लिगल वेबसाईटस

नेत्रेश's picture
नेत्रेश in काथ्याकूट
8 Mar 2011 - 6:10 am
गाभा: 

ईंटरनेटवर नवे-जुने चित्रपट पहाण्यासाठी बर्‍याच वेबसाईटस उपलब्द्ध अहेत. पण बहुतेक वेबसाईटवर पायरेटेड चित्रपट, वाईट क्वालिटी, व्हायरस आणी मालवेअर्स असे बरेच प्रोब्लेम असतात.

पण राजश्री, सोनी सारख्या काही मोठ्या चित्रपट निर्मीती करणार्‍या संस्थांच्या उत्तम वेबसाईटसही आहेत. मला माहीत असलेल्या काही चांगल्या आणी लिगल वेबसाईटस ईथे देत आहे. बर्‍याचजणांना यातील बहुतेक वेब्साईटस माहीत असतील. तुम्हाला आणखी काही चांगल्या वेबसाईटस माहीत असतील तर यात भर घालावी.

इंग्लिश
http://www.crackle.com/ (सोनी टी व्ही ची सबसिडरी)

मराठी, हिंदी

http://www.rajshri.com/
http://www.rajshrimarathi.com/Home/Free-Marathi-Regional-Videos-Online-M...
http://www.rajshri.com/Home/Free-Bollywood-Videos-Watch-Your-Favorite-In...

खालिल वेबसाईटस वरचे चित्रपट पायरेटेड असावेत असे वाटते:

http://apalimarathi.com/ (मराठी)
http://www.apnaview.com/ (हिंदी)
http://www.film.fm/ (इंग्लिश)(या वेबसाईटवरुन काही जणांनी मालवेअर इन्फेक्शन रिपोर्ट केले आहे, तेव्हा जरा जपुन)

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

8 Mar 2011 - 6:31 am | नेत्रेश

www.tv.com (इंग्लिश)

अवांतर : काथ्याकुट संपादन करता येत नाही काय? अजुन लिंक प्रतिसादात टाकाव्या लागणार असे दिसते.

अविनाशकुलकर्णी's picture

8 Mar 2011 - 12:16 pm | अविनाशकुलकर्णी

म टोरेंत वरुन दाउन लोद करावेत व पहावेत हा एक चांगला परयाय आहे..चांगले सिनेमे असलेले बरेच तोरेंत आहेत..ओन लाइन सिनेमे बघताना सिनेमा एकसंध पणे बघता येत नाहि..बुफरिंग मधे वेळ जातो...

नरेशकुमार's picture

8 Mar 2011 - 3:47 pm | नरेशकुमार

www.extratorrent.com एक्दम बेस्ट !

भडकमकर मास्तर's picture

8 Mar 2011 - 4:02 pm | भडकमकर मास्तर

कोनाला लीगल तोरेन्त
म्हैती हैत का?

कोनाला लीगल तोरेन्त

ह्याच पठडीतले काही शब्द आठवले
१. कर्णकर्कश्य शांतता
२. भयानक सुंदर
३. वाचनिय निबंध
४. वॉटरप्रुफ टॉवेल
५. सिरियस टारझन
६. रंगकर्मी भडकमकर
७. उपक्रमी अवलिया
८. सुवचनी पर्‍या
९. सरकारमान्य गांजा हाऊस
१०. सुपरस्टार अभिशेक
११. विचारवंत थत्ते
१२. हुषार सुंदरी

-(१२ चा ) विषनाथ नागोबाळे
मला गोल्फ खेळता येतं की नाही माहित नाही . पण मी जालावर निरिक्षणं नोंदवत फिरतो.

गोगोल's picture

9 Mar 2011 - 5:09 am | गोगोल

अनॅलजी चुकल्या आहेत. लीगल टाअ‍ॅरेंट असू शकतात.

पंगा's picture

11 Mar 2011 - 5:02 am | पंगा

कर्णकर्कश शांतता असू शकते. (शांततेची सवय नसलेल्या मनुष्यास एकदम निरव शांततेचा अनुभव आल्यास कान असह्यपणे वाजू शकतात. कानाचे खेळ, दुसरे काय?)

सरकारमान्य गांजा हाउस (किंवा तत्सम एंटिटी) असू शकते. नेदरलंड्ज़मध्ये अशी हौसे असावीत अशी शंका आहे.

भीषण सौंदर्य बंगाल्यांना ठाऊक आहे,

निबंध कधीमधी वाचनीयही असू शकतात.

बाकी चालू द्या. ;)

पुण्याचे वटवाघूळ's picture

11 Mar 2011 - 4:37 pm | पुण्याचे वटवाघूळ

टार्झन्द्दादा, छान लिहिता हो तुमी. आवडला प्रतिसाद तुमचा.

(उल्टे लतकणारे) पुण्याचे वटवाघूळ

नरेशकुमार's picture

8 Mar 2011 - 4:31 pm | नरेशकुमार

आपन स्वतः घरात आप्ल्याच कॉम्पुटर वर एक तोरेन्त बनवायचा, तो आपनच अपलोड / डाउन्लोड करायचा, मग तो लिगल असतो.

आत्मशून्य's picture

8 Mar 2011 - 9:38 pm | आत्मशून्य

इल्लीगल फकस्त त्यातून अपलोड्/डाऊनलोड होणारे कॉन्टेंट अस्तू शक्ते.

टिलू's picture

8 Mar 2011 - 5:25 pm | टिलू

या पठडीतला अजून एक शब्द -'तेजस्वी हलकट'

नेत्रेश's picture

8 Mar 2011 - 10:57 pm | नेत्रेश

१. टॉरांटवर चित्रपट संपुर्ण डाउनलोड झाल्याशिवाय पहाता येत नाही. वर दिलेल्या वेबसाईटवर ताबडतोब स्ट्रीमिंग सुरु होते आणी चित्रपट कुठूनही (सुरवातीपासुन किंवा मधुनच) पहाता येतो.
२. टोरांटवरुन चित्रपट तुमच्या पीसीवर डाउनलोड करावे लागतात त्यात व्हायरस यायचा बराच संभव असतो.
३. तसेच परदेशात रहाणार्‍या भारतीय लोकांना टोरांट वापरणे कधी कधी प्रोब्लेम करु शकते. माझ्या मित्राची ब्रॉडबँड सर्वीस टोरांट वापरल्यामुळे दोन वेळा सस्पेंड झाली होती.
४. टोरांट वरुन चित्रपट डाउनलोड करणे बेकायदेशीर आणी अनैतीक आहे (यावर बरेचजण हसतील)

म्हणुन चित्रपट पहाण्यासाठी सेफ आणी लिगल वेबसाईटसची माहीती एकत्रित जमा करायला हा धागा चालु केला होता.

विकास's picture

9 Mar 2011 - 12:43 am | विकास

http://www.hulu.com/

(मला नक्की कल्पना नाही, पण बहुदा हे फक्त अमेरिका आणि कॅनडातच दिसू शकते असे वाटते... तसे असेल तर त्याला "वर्ल्डवाईड वेब" का म्हणावे हा मोठ्ठा प्रश्नच आहे! :-) )

बरोबर आहे. पण त्याचे कारण "वर्ल्डवाईड वेब" नसून ज्या त्या देशांचे काअ‍ॅपिराईट लाअ‍ॅज आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Mar 2011 - 10:17 pm | निनाद मुक्काम प...

मेगा वीडियो /स्टेज view ह्या दोन साईट वर हमखास नवीन सिनेमे पाहून शकतो .
तू नळी वर पण खूप जुने इंग्रजी /हिंदी सिनेमे असतात .

अविनाशकुलकर्णी's picture

9 Mar 2011 - 11:04 pm | अविनाशकुलकर्णी

माझ्या मित्राची ब्रॉडबँड सर्वीस टोरांट वापरल्यामुळे दोन वेळा सस्पेंड झाली होती...
बापरे..............भारतात पण असे आहे का?

विकास's picture

10 Mar 2011 - 2:39 am | विकास

ह्याचा चित्रपट दाखवण्याशी संबंध नाही, पण भारतीय चित्रपट (आणि इतर) संगिताशी आहे. गुगल लॅबने जालावरील भारतीय गाणी शोधण्यासाठी म्हणून एक नवीन प्रकल्प चालू केला आहे. ते बघण्यासारखे आहे:

http://www.google.co.in/music

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Mar 2011 - 10:15 am | निनाद मुक्काम प...

येथे जर्मनीत
डाउनलोड केले तर असे सर्रास होते .
कोर्टाची नोटीस सुद्धा येते .
पण ऑन लाईन सिनेमे पहिले तर काहीच प्रोब्लेम येत नाही .
भारतात आमच्याकडे एम टी एन ल चे नेट आहे .
त्यामुळे सिनेमे पाहता यायचे .
बाकी अनेक फुकटात सिनेमे दाखवणाऱ्या साईट आता पे साईट झाल्या आहेत .