चिकन मसाला आणी बटर रोटी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
5 Mar 2011 - 1:36 am

.साहित्य चिकन मसाला:
५०० ग्राम साफ करून ठेवलेले चिकनचे तुकडे
२ मोठे कांदे चिरलेले
२ टोमॅटो चिरलेले
२ टेस्पून आलं+लसूण+कोथिंबीर वाटून
२ चमचे खसखस भिजवून वाटणे
३ मोठे चमचे दही
१ चमचा हळद
२ चमचे लाल तिखट
१ १/२ चमचे गरम मसाला
मीठ चवीनुसार
पाव वाटी तेल+ २ चमचे तुप
२-३ तमालपत्र
२-३ दालचिनी
१ छोटा चमचा शहाजिरे
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

पाकृ:
साफ करून ठेवलेले चिकनचे तुकड्याना दही , आलं+लसूण+कोथिंबीर च्या वाटणमधील थोडे वाटण, थोडी हळद लावून एक तास झाकून ठेवणे.
प्रेशर कुकरमध्ये तेल+तुप गरम करून त्यात तमालपत्र , दालचिनी व शहाजिरे घालणे.
चिरलेले कांदे घालून ते लालसर परतणे.
त्यात आलं+लसूण+कोथिंबीर वाटण, चिरलेले टोमॅटो घालून तेल सूटेपर्यत परतणे.
वाटलेली खसखस आणी वरील सर्व मसाले घालून खमंग परतणे.
दही लावून ठेवलेले चिकन घालून गुलाबी होईपर्यत परतावे.
दीड ते दोन वाट्या पाणी घालावे ( रस्सा अंगासरशी असावा)
पुर्ण प्रेशर आले की गॅस बारीक करून ३-४ मिनिटे शिजवावे.
चिरलेली कोथिंबीर घालून सजवावे.

साहित्य बटर रोटी:

३ कप चाळून घेतलेला मैदा
३/४ कप कोमट पाणी
३/४ टेस्पून ड्राईड यीस्ट
२ टीस्पून साखर
मीठ चवीनुसार
१ टेस्पून ऑलिव्ह ऑइल

पाकृ:

कोमट पाण्यात साखर्+यीस्ट घालून विरघळून घेणे.
मैद्यात मीठ व यीस्ट चे मिश्रण घालून खूप मळावे.
ऑलिव्ह ऑइलचा हात लावून मऊसर कणीक मळणे.
तेल लावलेल्या भांड्यात भिजवलेली कणीक ठेवून ,वरून ओल्या फडक्याने झाकून उबेच्या ठिकाणी एक तास ठेवणे.
एका तासाने कणीक फुगून दुप्पट झालेले असेल.
मुक्के मारून कणीक खुप मळून घेणे.
सारखे गोळे करून रोटी लाटणे.
नोन-स्टीक तव्यावर दोन्ही बाजूने तुप लावून शेकून घेणे.
खाली उतरवून पण तुप लावणे.
गरम-गरम चिकन मसालाबरोबर खायला देणे :)

प्रतिक्रिया

खुप छान. तोंडाला पाणी सुटले. :)

लय बेस्ट आहे रेशिपि :)
पन यीस्ट काय आहे?
कुटे मिळ्ते ते?

शिल्पा ब's picture

6 Mar 2011 - 12:20 pm | शिल्पा ब

गावठी तेज्यायला!!
इंटरनेट वापरायला शिका अन शोध यीस्ट काय ते..

चालेल गावठी तर गावठी;)
शेवटी तुमच्याच गावचे आम्हि ;)

म्हणुनच म्हणते सगळीकडं आपली अशी दवंडी कशाला पिटायची? खरडवह्या दिल्यात ना? फुकटात!!

ज्योति प्रकाश's picture

6 Mar 2011 - 11:28 pm | ज्योति प्रकाश

बेकरीत विचारलात कि मिळेल नाहीतर सुपर मार्केट मध्ये विचारा.

ऊद्याचा बेत :)

मुलूखावेगळी's picture

5 Mar 2011 - 9:33 am | मुलूखावेगळी

मस्त ग
चिकन तर खात नाही रोटी खाते नुसती छान दिसतेय. :)

खा बटर रोट्या अन वाढवा वजनं .. :)

असो ,हल्ली फक्त उकडलेलं चिकन खात असल्यामुळे चिकन मसाले बघुन मन भरुन घेतो , रोटी मात्र चार हात लांब :) फोटु पाहुणंच वजन वाढले

- मल्लखांबगडी

गुड्डु's picture

5 Mar 2011 - 11:26 am | गुड्डु

मस्तच एकदम भन्नाट दिसतय

कच्ची कैरी's picture

5 Mar 2011 - 2:40 pm | कच्ची कैरी

मस्त हं!रोटीच्या पाकृ.बद्दल धन्यवाद ,रेसेपी आवडली :)

ज्योति प्रकाश's picture

5 Mar 2011 - 3:07 pm | ज्योति प्रकाश

झक्कासच्,उद्याचा मेनू ठरला.काय करावं या विचारात होते.धन्यवाद.

स्वाती२'s picture

5 Mar 2011 - 5:29 pm | स्वाती२

मस्त! रोटीची पाकृ आवडली.

रेवती's picture

5 Mar 2011 - 7:07 pm | रेवती

मस्त पाकृ आणि भन्नाट फोटू!
भलतीच सुगरण दिसतीयेस तू!

चिंतामणी's picture

6 Mar 2011 - 1:13 pm | चिंतामणी

पण एक सांग "३ कप चाळून घेतलेला मैदा" ऐवजी गव्हाचे पीठ वापरायचे असल्यास किती आणि कसे वापरावे? कृतीत काही फरक होइल का?

सानिकास्वप्निल's picture

6 Mar 2011 - 6:23 pm | सानिकास्वप्निल

"३ कप चाळून घेतलेला मैदा" ऐवजी गव्हाचे पीठ आणी मैदा असे मिळून वापरू शकतो पण पाकृ पुर्ण बदलून जाईल आणी चवीतदेखील फरक पडेल.
खाली प्रमाण देत आहे , ह्या प्रमाणे करून बघा आवडते का :))
१ कप गव्हाचे पीठ +१/४ कप मैदा
१/४ कप दही
१/४ चमचा खायचा सोडा
मीठ चवीनुसार
तेल घालून एकत्र करून २ तास झाकून उबेच्या ठिकाणी ठेवणे.पुढील कृती वरीलप्रमाणेच आहे .

ज्योति प्रकाश's picture

6 Mar 2011 - 11:32 pm | ज्योति प्रकाश

आजच हा मेनु केला आणि रविवार मस्त साजरा झाला.पन रोटी थोडी कडक झाली,त्यावर उपाय काय?
झक्कासच पाककॄती.

सुष's picture

7 Mar 2011 - 5:03 pm | सुष

सुन्दर रेसिपि......

सानिकास्वप्निल's picture

7 Mar 2011 - 5:26 pm | सानिकास्वप्निल

रोटी कडक होण्यामागे कारण :
१. कणीक नीट फुगली होती का?
२. मुक्के मारुन त्यातील हवा काढून खुप मळणे, मऊसर(अगदी ब्रेड, पिझ्झा च्या कणकेप्रमाणे).
३. तव्यावर शेकताना मध्यम आचेवर तुप लावून दोन्ही बाजूने शेकणे.

मैद्याचि रोटी असल्याकारणाने गरम-गरम खाणे .

सानिकास्वप्निल's picture

7 Mar 2011 - 5:28 pm | सानिकास्वप्निल

आभार सगळ्यांचे :)

बटर रोटी सहीच दिसते आहे. असं वाटतं आहे की चित्रातून उचलून ताटात घ्यावी :-)
आणि बटर रोटीच्या पा.कृ. बद्दल धन्स.

(वेजिटेरियन) पर्ल