साहित्य--चिरलेले कांदा एक वाटी, चिंचेचा कोळ एक चमचा व गुळ चवीनुसार, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, लाल तिखट, मीठ.फ़ोडणीचे साहित्य.शेंगदाणा कुट दोन चमचे.
कृती-- कांदा मिक्सरमधुन काढावा , चिंचेचा कोळ व गुळ, किसलेले सुके खोबरे ,शेंगदाणा कुट, लाल तिखट, मीठ चवीनुसार.सर्व एक्त्र मिसळून
वरुन खमंग फ़ोडणी द्यावी.
प्रतिक्रिया
4 Mar 2011 - 12:01 pm | स्पंदना
अशी करतात होय?
धन्यवाद. करुन बघेन.
4 Mar 2011 - 1:15 pm | स्वैर परी
मस्त झणझणीत असेल शंका नाही! :)
पण फोटो तर द्या!!!
4 Mar 2011 - 3:58 pm | कच्ची कैरी
रेसेपीच नाव वाचुनच तिचे लेखक कोण असेल्?हे कळले होते :)
4 Mar 2011 - 4:31 pm | योगप्रभू
कांद्याची चटणी फार टिकत नाही त्यामुळे लगेच संपवावी लागते किंवा एका जेवणापुरतीच करावी लागते कारण दुसर्या दिवशी कांद्याच्या चटणीचा वास बदलतो.
दोन दिवस पुरवून खायची असेल तर कैरी-कांद्याची चटणी मस्त. कच्च्या कैरीचा आंबटपणा, कांद्याची चव आणि लाल तिखटाची फोडणी. उन्हाळ्यातील सुख. :)
4 Mar 2011 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार
ह्यात कैरी किसुन घातली की कैरीची चटणी ;) बरोबर का न्हाय ?
फोटू न टाकल्याबद्दल निषेध !!
4 Mar 2011 - 9:08 pm | निवेदिता-ताई
अगदी बरोबर....पण त्या वेळी कांदा नाही घालायचा...
5 Mar 2011 - 9:46 am | मुलूखावेगळी
आमच्याकडे तर कांदा अनि कैरी ची एकत्र चटनी करतात
खाउन बघ
१ नम्बर लागते.
4 Mar 2011 - 7:41 pm | jaydip.kulkarni
तोन्डाला पाणी सुटले ..................
मि पा वर अनुस्वार कसा देतात ते महित नाही ?