साहित्य- दोन मध्यम आकाराची रताळी, एक चमचा तूप, दोन चमचे शेंगदाणा कुट, मीठ, साखर चविनुसार, तिन-चार मिरच्या.
कॄती-- प्रथम रताळे स्वच्छ धुवुन-पुसुन घ्या, नंतर खिसुन घ्या, कढईत तुप गरम करुन त्यात थोडेशे जिरे(चालत असल्यास) घालावेत, तडतडले की मिरच्या तुकडे टाकावेत, खिस टाका, त्यात मिठ व साखर घाला, त्यावर झाकण ठेवा, खिस चांगला वाफ़ेलला की त्यात थोडे कुट टाका, पुन्हा परता,
गरम गरम खायला घ्या...
प्रतिक्रिया
2 Mar 2011 - 3:06 pm | टारझन
रताळं तसंही आवडत नाही , पण फोटु पाहुन तर उरली सुरली इच्छा देखील मेली :(
सॉरी शक्तिमान :( :( :(
मैने धागा क्यु खोला !!
3 Mar 2011 - 2:06 am | चित्रा
निवेदिता ताई, एखादा छानसा कॅमेरा घ्या पाहू. म्हणजे टारझनबुवांची उपासमार व्हायला नको.
2 Mar 2011 - 3:17 pm | निवेदिता-ताई
हा हा हा
2 Mar 2011 - 4:29 pm | अवलिया
खिस का किस?
इंद्राचा उपवास सुटायचा उगाचच
2 Mar 2011 - 10:19 pm | निवेदिता-ताई
इंद्र कधीपासून उपवास करायला लागला रे.....
मराठी शब्दांचाच किस पाडता येतो फक्त.
2 Mar 2011 - 4:59 pm | कच्ची कैरी
मला रताळ्याचा गोड किस आवड्तो .असा कधी करुन पाहिला नाही .
2 Mar 2011 - 6:10 pm | पैसा
रताळी लाल की पांढरी ग? लाल रताळी जास्त गोड असतात.
2 Mar 2011 - 10:15 pm | निवेदिता-ताई
कोणतीही रताळी घ्या...मी पांढरी रताळी घेतली आहेत.
आणी याच्या गोड काचर्या...(आता प्रत्येकाकडे काय काय नावे आहेत कुणास ठावुक)..तूप व गुळ घालून केलेल्या खुप छानच लागतात.
3 Mar 2011 - 12:59 pm | स्वैर परी
मग त्याची ही रेसीपी द्या की.
3 Mar 2011 - 6:49 pm | निवेदिता-ताई
रताळ्याच्या पातळ (काप) काचर्या चिरुन घ्या, एक चमचा साजूक तूप गरम करुन त्यावर परतून घ्या,
एक वाफ आली की त्यात गुळ घाला , त्याचा पाक होउन त्या काचर्या अजुन शिजतिल व खमंग होतील.
पुन्हा थोडावेळ परतुन झाले की गार झाल्यावर खाव्यात.
2 Mar 2011 - 6:57 pm | रेवती
माझा आवडता पदार्थ आहे.
2 Mar 2011 - 8:28 pm | प्राजु
मला जाम आवडतो.
आणखी एक खासियत अशी.. की, हा खिस उरला (सहसा उरत नाहीच) की, पोळीमध्ये त्याच सारण भरून त्याचा पराठा खूप छान होतो. लेकाच्या डब्यासाठी मी करते खूपदा. दह्यासोबत मस्त लागतो. :)
2 Mar 2011 - 10:41 pm | रेवती
अगदी!
उरलेला रताळ्याचा असो कि बटाट्याचा खीस उपासाच्या भाजणीत खपवून ;) केलेले थालीपिठ भन्नाट लागते.
छे छे छे! आजकाल मेल्या क्यालर्या मोजून खाताना हे पदार्थ विसरावे लागतात.
4 Mar 2011 - 5:15 am | कुंदन
पा कृ टाका की मग कधी तरी , आम्ही पण विकांताला करुन बघु मग.
2 Mar 2011 - 9:40 pm | पिंगू
मला उपासाच्या नावाखाली रताळ्याचा किस खायला आवडत नाय.. परिपूर्ण आहार म्हणून नक्की खातो.
- (निराहारी उपवासी) पिंगू
3 Mar 2011 - 3:39 am | आत्मशून्य
एकदम मस्त आन खमंग पदार्थ. हा बाटाट्याचा पण केला जातो.
4 Mar 2011 - 3:03 pm | वारकरि रशियात
उपवासाची पाकृ - !
अवांतर: अरे कोणीतरी कवठाच्या चटणीची ही पाकृ द्या रे ! (परवाच खाल्ली होती घरी पण ..) मला बनवता येत नसल्याने ..