अक्षय तृतियेच्या दिवशी काय ठरवले नविन करायचे??

ऋचा's picture
ऋचा in काथ्याकूट
7 May 2008 - 10:04 am
गाभा: 

आज साडे तीन मुहुर्तां तील एक मुहुर्त आहे.

आज दान करतात . पुण्य लाभतं पाण्याचं दान करुन ..

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

7 May 2008 - 10:14 am | आनंदयात्री

अमुकच दिवशी अमुक केले किंवा तमुक ठरवले तर उत्तम होईल अशा भोळसट कल्पनांवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे आम्ही काहीही ठरवलेले नाही.

क्.लो.अ.

-आपलाच
आनंदयात्री

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 10:24 am | विसोबा खेचर

आज सकाळीच आमच्या म्हातारीने 'मुहुर्ताचं सोनं घेऊन ये रे, येणार्‍या सुनबाईकरता होईल!' असा हुकुम सोडला आहे! :)

सबब, आजच्या अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर आता सोनाराडे जाऊन ५ किंवा १० ग्रॅमचं एक सोन्याचं वळं विकत घेईन. म्हातारीचा हुकुम कसा टाळणार? अभ्यंकरांच्या भावी सुनेकरता सोनं घेऊन ठेवलं पाहिजे बाब्बा!

अनुष्का, गधडे ऐकते आहेस ना? :)

तात्या.

आण्याबा's picture

7 May 2008 - 10:42 am | आण्याबा

आजच्या शुभमुहूर्तावर ४ डझनाची पेटी घेइन म्हणतोय. नाहीतरी हापुस आंबा हा आजकाल चैनीचीच वस्तू झाला आहे.

ऋचा's picture

7 May 2008 - 10:57 am | ऋचा

चांगली कल्पना आहे..

मी आज सोनं घेइन अस ठरवतेय (बघु खिशाला परवडल तर.....)

बाकि आब्यांची पेटि ... (खाण्यात कोण हात धरणारेय????) :))

विवेकवि's picture

7 May 2008 - 11:08 am | विवेकवि

आज माझ्या साठी चा॑गला दिवस आहे कारण
आज २५ वर्षा॑नी दुग्ध शर्करा योग आला आहे... (आजच्या दिवशी आमचा जन्म झाला होता)

विचार करतोय काहि तरी वस्तु घ्यावी ...

पण काय तेच कळत नाहिये...

असो....

आपलाच
विवेक वि.

ऋचा's picture

7 May 2008 - 11:18 am | ऋचा

आजच्याच दिवशी का?

अम्ही पण आजच्याच दिवशी (तिथीने) >:D<

तुम्हाला शुभेच्छा !!!

आज दान करतात . पुण्य लाभतं पाण्याचं दान करुन ..

बाकी वाढदिवसानिमित्त पाण्याचं दान करण्यापूर्वी आम्हाला मिसळपाव , आमरस याची मेजवानीदेखील चालेल. तेवढीच तुमच्या पुण्यात अजून भर पडेल. ह्.घ्या.

कुंदन

पक्या's picture

7 May 2008 - 11:40 am | पक्या

सर्वांना अक्षय तृतियेच्या शुभेच्छा !!!
विवेकवि ला डबल शुभेच्छा. (अक्षय तृतिया आणि वाढदिवस)
--पक्या

ऋचा's picture

7 May 2008 - 11:40 am | ऋचा

धन्यवाद!!!

पक्या's picture

7 May 2008 - 11:44 am | पक्या

अरे ऋचा राही ली की... तुलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा !

पक्या

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 2:39 pm | धमाल मुलगा

विवेक आणि ॠचा, दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

विवेक,

विचार करतोय काहि तरी वस्तु घ्यावी ...

पण काय तेच कळत नाहिये...

कुंदनशेठच्या मताशी सहमत...

'सात्विक थाळी' ला पोहोचतो...घाल जेवायला आणि वर दक्षिणाही दे पान-सुपारीसोबत...
अक्षय तृतिया आणि वाढदिवस दोन्हींसाठी तोंडभरुन आशिर्वाद देइल हा ब्रम्हराक्षस तुला :))

काळा_पहाड's picture

7 May 2008 - 1:01 pm | काळा_पहाड

विवेकवि आणि ॠचा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. >:D<
आज ठरवावं म्हटलं तरी शक्य नाही. कारण आजच ठरवण्याचं स्वातंत्र्य गमावण्याची पुण्यतिथी आहे.
सर्वांना अक्षयतृतीयेच्या मनःपुर्वक शुभेच्छा.
सदासर्वदा तो मी नव्हेच
एक शंका : अक्षय तृतीया म्हणजे ज्या तिथीचा कधीही क्षय होत नाही असे काही आहे का ?
तो मी न

बा ते मीन ....

स्वातंत्र्य गमावण्याची पुण्यतिथी
काय नक्की अर्थबोध होत नाही ... याच दिवशी तुमचे लग्न झाले होते असे म्हणायचे आहे काय तुम्हाला ? ह. घ्या.

..कुंदन

ऋचा's picture

7 May 2008 - 1:35 pm | ऋचा

अगदी बरोबर
फक्त ज्या तिथीचा कधीही क्षय होत नाही असे नाही आज तुम्ही काही दान केल्यास ते क्षय (संपत ) होत नाही..

कंटाळा आला बा आता ईजिप्त मध्ये ....
तसे गेल्या २ महिन्यात काही विशेष कामही नव्हते.
पण मीटर डाउन असल्याने काही जास्त नखरे करता येत नाहीत ....

शितल's picture

7 May 2008 - 5:21 pm | शितल

ऋचा आणि विविकवी या॑ना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
आणि सर्व मिपाकरा॑ना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.

विवेकवि आणि ॠचा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बाकी आमच्यासाठी रोजचाच दिवस "अक्षय तृतीया" असो ............

पक्या's picture

7 May 2008 - 11:23 pm | पक्या

बाकी आमच्यासाठी रोजचाच दिवस "अक्षय तृतीया" असो ............

तुम्ही रोज दान करतात वाटतं. फारच दानशूर आहात . :)
पक्या

झकासराव's picture

7 May 2008 - 11:33 pm | झकासराव

थोड कमी खायच अस तिसरी पुरणपोळी चापताना ठरवल :)
...........
http://picasaweb.google.co.in/zakasrao