सोयाबीन मंचुरीयन (Soyabean manchurian)

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
1 Mar 2011 - 3:51 am

साहित्यः

सोया चंक्स - १ कप
अंडे - १
कांदा - १/२ कप बारीक चिरुन
कोबी - १/४ कप बारीक चिरुन
ढोबळी मिरची - १/४ कप बारीक चिरुन
कांद्याची पात - १/४ कप बारीक चिरुन
लसुण - १ मोठा चमचा बारीक चिरुन
आले - १ मोठा चमचा बारीक चिरुन
हिरवी मिरची - १ मोठा चमचा बारीक चिरुन
काळी मिरी पावडर - १ मोठा चमचा
सोया सॉस - १ मोठा चमचा
व्हिनेगर - १ मोठा चमचा
रेड चिली सॉस - १ मोठा चमचा
कॉर्नफ्लोअर - २ मोठे चमचे
साखर - १/२ चमचा
तेल - १/२ कप
मिठ चवीनुसार

कॄती:

१. पातेल्यामधे ३ कप पाणी उकळावे. त्यात सोयाबीन टाकुन २ मिनिटे उकळावे. हे सोया चंक्स गाळुन त्यातले पाणी पिळुन काढावे.
२. ह्या चंक्स मधे १ चमचा कॉर्नफ्लोअर, १ अंडे, १/२ चमचा आले, लसुण, काळी मिरी पावडर, सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस व मिठ टाकुन मिक्स करावे.
३. कढईत ३ चमचे तेल गरम करावे. त्यात हे चंक्स टाकुन high flame वर ३ मिनिटे परतावेत व दुसर्‍या भांड्यात काढावेत.
४. कढईत २ चमचे तेल टाकुन गरम करावे. त्यात आले, लसुण व हिरवी मिरची टाकुन परतावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोबी, ढोबळी मिरची टाकुन परतावे.
५. हे सर्व २ मिनिटे high flame वर परतल्यावर त्यात सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस टाकावा. हे परतल्यावर त्यात सोया चंक्स टा़कुन मिक्स करावे. त्यात कांद्याची पात, साखर व चवीप्रमाणे मिठ टाकुन मिक्स करावे.
६. तयार झालेले सोयाबीन मंचुरीयन प्लेट मधे घेउन, वरती बारील चिरलेली कांद्याची पात टाकुन गरम serve करावे.

soyabean

soyabean2

प्रतिक्रिया

मृणालताई, यातील अंडे वगळून दुसरं काही वापरता येईल काय? बाकी मांचुरियन फर्मास..

- (मांचुरियनप्रेमी) पिंगू

thank you :)
अंड्याच्या जागी तुम्ही कोर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिक्स करुन ते सोयाबीन मधे टाकु शकता.

टारझन's picture

1 Mar 2011 - 5:04 pm | टारझन

तुमचे णाव आज पासुन "मंच्युरिनी" :)

- तुमबीन

:(
इटिंग सोयाबीन चंक्स इज नॉट मच बेटर दॅन इटिंग पॅकेजिंग फोम.
देअर आर फार बेटर टेस्टिंग फॉर्मस ऑफ सोयाबीन इफ यु आर ट्रायींग टु इनक्ल्युड प्रोटीन इन युअर डाएट.

चित्रा's picture

1 Mar 2011 - 5:09 am | चित्रा

बहुतेक सोया-चंक्सच मिळत असतील. पण पाककृती झकास, चविष्ट होईल असे दिसते आहे.

अवांतर - विंजीनेर साहेबांनी सगळा प्रतिसाद इंग्रजीत का बरे लिहीला असेल? :)

हो.. तसे आपण ह्या जागी सोयाचे granuels चे कोफ्ते करुन वापरु शकतो. किंवा टोफु सुद्धा वापरु शकतो.

सानिकास्वप्निल's picture

1 Mar 2011 - 5:35 am | सानिकास्वप्निल

मस्त :)
लवकरच बनवून बघेन

परत एकदा पिंगूशी सहमत...
बाकी मला सोयाबीन आवडतं... ते चावायला चिकन सारखं असतं म्हणे !!! खरचं काय ?

हो, मला पण सोयाबीन आवडत. मला तरी ते चिकन सारखेच लागते. ;)

५० फक्त's picture

1 Mar 2011 - 7:43 am | ५० फक्त

अरे हा काय छळ मांडला आहे, तुम्ही लोकांनी. एक तर करता, खाता ते ठिक आहे, पण इथे टाकता ते पण ओके पण फोटोसहित.

पॉवर प्ले मि़ळाला म्हणुन लगेच सुरु चौकार षटकार.

एक सांग, तु आणि सानिका, पातिचा कांदा एकाच भाजीवाल्याकडुन घेता काय , कित्ति सेम आहे.

हा हा हा... नाही हो... इथे भाजीवाला बसतच नाही.. मॉल मधे जाउन आणावा लागतो. ;)

प्राजु's picture

1 Mar 2011 - 9:12 pm | प्राजु

लय भारी.. :)