गाभा:
भारत रविंद्रनाथ टागोर ह्यांचे १५० वी जयंती साजरी करत आहे. रिजर्व बॅंक ऑफ इंडिया नोवेल पुरस्कार विजेत्या टागोरांच्या जयंती निमित्ताने १५० रुपयाचे नाणे चलनात आणत आहे. हे नवीन नाणे ४० मिमी व्यासाचे असून जवळपास ३५ ग्राम वजनाचे असेल. ह्या नाण्याच्या एका बाजूस रविंद्रनाथ टागोरांचे चित्र असेल तर दुसऱ्या बाजूस अशोक स्तंभ असेल.
कालीदास्..भवभुति..कवि कुसुमाग्रज्...पु.ल ..आचार्य् अत्रे ह्या थोर् साहित्यिकांची नाणी यावित् या साठी सा~यांनी प्रयत्न् करणे गरजेचे आपणास् वाटते का?
आपल्या मनात् जर् या व्यतिरिक्त् नावे असतिल् तर् ति सांगावित्..
प्रतिक्रिया
27 Feb 2011 - 6:37 am | अरुण मनोहर
स्तुत्य उपक्रम.
१००० कोटी रुपयांच्या नाण्यांची मालीका काढावी. आजकालचे घोटाळे १००० कोटी रुपयांच्या पटीतले असतात, त्यावरून राजकारणी लोकांसाठी ही रक्कम चिल्लर खुर्दा सारखीच आहे.
वेगवेगळ्या घोटाळेसिंहांचे फोटो दोन्ही बाजुंना टाकावे.
27 Feb 2011 - 8:09 am | नगरीनिरंजन
एखाद्या व्यक्तिविशेषाच्या सन्मानार्थ नाणं काढलं मम्हणून सरसकट इतर व्यक्तिविशेषांसाठी नाणीच काढावित असे वाटत नाही. तसे करणे म्हणजे कल्पनाशून्यता होईल.
27 Feb 2011 - 10:50 am | प.पु.
मी तर वाचले की या नाण्यावर भारतीय अर्थशास्त्रज्ञ कौटिल्य, राष्ट्रीय फुल कमळ आणि मधमाशी यांची चित्रे आहेत.
संदर्भ -
http://newshunt.com/share?id=8249717
28 Feb 2011 - 3:15 pm | देवदत्त
मी ही वाचल्याप्रमाणे, रिझर्व बँकेला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे नाणे आहे.
27 Feb 2011 - 11:45 am | वेताळ
त्यासाठी काय करावे लागेल?
27 Feb 2011 - 12:23 pm | शिल्पा ब
बसा की कुणाच्यातरी मानगुटीवर ..
28 Feb 2011 - 11:20 am | वपाडाव
अवांतर : पण तुमचं काय जातंय त्यांना कुणाच्याबी मानगुटीवर बसवायला? (ह. घ्या.)
28 Feb 2011 - 11:23 am | वपाडाव
मिपाच्या प्रत्येक सदस्याच्या नावे एक-एक नाणं तर निघायलाचं/काढायलाचं हवं.
प्रतवारी आपण सर्व मिळुन ठरवु. काय म्हंता?
28 Feb 2011 - 11:35 am | मदनबाण
वा... छान काही दिवसांनी सरकारनी काढलेली ही सर्व नाणी चोरीला जातील का ? असा नवा प्रश्न माझ्या मनात आला आहे.
का बरं ?
कारण...
-
-
-
-
-
ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्यांना मिळालेले आणि नंतर चोरीला गेलेले नोबेल पुरस्काराचे पदक परत मिळाले आहे का ?
संदर्भ :--- http://ibnlive.in.com/news/rabindranath-tagores-nobel-medal-lost-forever...
जाता जाता :--- हे भारत माते कशाला तू गुणी /थोर आणि शुरविरांना तुझ्या कुशीत जन्माला घालतेस? इथल्या लोकांना त्यांची किंमत आहे का ?
(शिवजयंती २दा साजरा केली जाणार्या महाराष्ट्रात राहणार एक क्षुद्र जिव)
28 Feb 2011 - 1:25 pm | हितु
मझयाकडे फक्त १० रुपयांचे नाणे आहेत, खिष्यात नाणे ठेवण्या पेक्षा नोट ठेवणे सोईचे पाडते.
नाणे फक्त शो साठी असावेत.
सगळ्यांची नाणी काढली तर १ रुपया ते १००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
एवढी नाणी काढावी लागतील.
आणि मग माझया पॅंट च्या खिष्याला पोते शिवायला लागेल
28 Feb 2011 - 1:32 pm | टारझन
श्श्श्श्शी ... कसं दिसेल ते ?
जाता जाता , ती " विना चिरफाड मरेपर्यंत इलाज केल्या जाईल " ची अॅड आठवली ..
- हेमु
28 Feb 2011 - 3:22 pm | असुर
जाता जाता , ती " विना चिरफाड मरेपर्यंत इलाज केल्या जाईल " ची अॅड आठवली ..
आगागाग्गो!!! टार्याला कधी कुठे काय आठवेल याचा काय नेम नाही! =)) =))
--असुर
28 Feb 2011 - 3:26 pm | परिकथेतील राजकुमार
फुटलो
बाकी आता हे असे नाणे आले ते बरे झाले. एक नाण्यात दारूचे बिल भरायला मोकळे ;)
28 Feb 2011 - 3:33 pm | माझीही शॅम्पेन
प्रा टा का आ
(प्रतिक्रिया टाकून मग मुद्दामन काढली आहे )
28 Feb 2011 - 3:32 pm | माझीही शॅम्पेन
+२ मस्त !
आणखीन जास्त रकमेची नाणी पाडली तर एका नाण्यात अख्खा दारूचा गुत्ता पण विकत घेता येईल :)
28 Feb 2011 - 3:37 pm | परिकथेतील राजकुमार
अहो पण गुत्त्यात शॅम्पेन कशी मिळेल ??
28 Feb 2011 - 7:31 pm | माझीही शॅम्पेन
आयला आम्ही अस बोललोच नाय !
अहो एक निरीक्षण : प्रत्येक परिकथेमध्ये राजकुमार नसतो काही वेळेला डायरेक्ट राजा पण अवतरतो मग खुलासे करत बसाव लागत !
28 Feb 2011 - 7:33 pm | सुहास..
एक नाण्यात दारूचे बिल भरायला मोकळे >>>
हेच मनात आले होते ते रे ;)
28 Feb 2011 - 7:38 pm | नगरीनिरंजन
>>एक नाण्यात दारूचे बिल भरायला मोकळे
एक टागोर में एक क्वार्टर अशी नवी परिभाषा येणार म्हणजे.
28 Feb 2011 - 9:12 pm | विजुभाऊ
कोणाच्या नावाने काढाल हे अगोदर ठरवा
महात्मा फुले , अंबेडकर , यशवन्तराव चव्हाण , कुसुमाग्रज , लो टिळक , गो कृ गोखले , अगरकर की मग ज्ञानेश्वर , तुकाराम , समर्थ रामदास स्वामी , साई बाबा
1 Mar 2011 - 6:58 pm | धिन्गाना
वन्दे मातरम हे राश्ट्रगीत होण्याएय्वजि जनगनमन हे राश्ट्र गीत झाल्याबद्दल " मराठि एकजूट" ह्या ब्लोग वर लेख वाचला होता.टागोरानि इन्ग्लन्ड्च्या राजाच्या स्वागतासाठि हे गीत लिहिले असा आक्शेप आहे."भारत भाग्यविधाता" कोण असेल असा त्यात प्रश्न होता.
1 Mar 2011 - 11:16 pm | माझीही शॅम्पेन
शुध्द लेखनाचा धिंगाणा आवडला
कृपया हलके घ्या :)
9 Mar 2011 - 3:13 pm | धिन्गाना
जनगणमन बद्दल बोला
9 Mar 2011 - 4:53 pm | विनायक प्रभू
मज्जा च आहे भौची,,
आता दिल्ली ला काटा की छापा ची वेळ आली की काय?
9 Mar 2011 - 9:11 pm | विकास
जर ही नाणी देखील केवळ मेजाखालून एकमेकांकडे सरकवायला वापरली जाणार असली, तर वरील कुठ्ल्याही साहीत्यिकाचे, अगदी रविन्द्र नाथांचे देखील चित्र त्यावर नको असेच म्हणेन.
इतके कशाला, त्यावरील अशोकस्तंभ देखील काढून टाकावा, म्हणजे किलकिले "सत्यमेव जयते" पण आपोआप इतिहासजमा होईल... त्याजागी लालू, कलमाडी, पवार साहेब, आदींचे, "या क्षेत्रातील" दबदब्याप्रमाणे योग्य त्या नाण्यासाठी आणि नोटेसाठी चित्र वापरावे असे सुचवू इच्छितो!