अ‍ॅपल पुडींग

स्नेहश्री's picture
स्नेहश्री in पाककृती
26 Feb 2011 - 10:03 am

आज विकेंड.. त्याची तयारी मात्र काल पासुन सुरु केलीय. आज आमच्याकडे मुंज मुलाला केळवण आहे. त्याला आवडेल अस पुडींग आणि अजुन एक डेझर्ट्चा प्लान आहे. एक पुडींग रेडी आहे.. आणि डेझर्ट् रेडी होत आहे. तर आज पुडींग ची रेसिपी देते.

साहित्यः
४/५ सफरचंद
३/४ चमचे साधी साखर (सफरचंदाच्या गोडी नुसार)
१०/१२ मारी बिस्कीटाचा चुरा
व्हिप्ड क्रीम
२ चमचे पिठीसाखर
व्हॅनिला इसेंस
स्ट्रॉबेरी क्रश
सजावटीसाठी:- चेरी, द्राक्ष, जेम्सच्या गोळ्या, चॉकलेट सॉस.

कृती:
१. सफरचंदाची साले काढुन ती किसुन घ्यावीत
२. त्यात साधी साखर घालुन गॅसवर साखर वितळे पर्यंत ठेवावीत मग गॅस बंद करवा व ते मिश्रण थंड होवुद्यात व नंतर त्या मध्ये व्हॅनिला इसेंस घाला
३. व्हिप्ड क्रिम हलके होईपर्यंत फेसुन घ्या.
४. त्याचे दोन भाग करा दोन्ही भागात पिठीसाखर व व्हॅनिला इसेंस घाला
५. एका भागात स्ट्रॉबेरी क्रश घालुन घ्या व दोन्ही क्रिमचे भाग फ्रिज मध्ये थोडे गार होवु देत.
६. ज्यात पुडींग सेट करायचे आहे असे काचेचे भांडे घ्या. ते फ्रिज मध्ये आधीच थोड्यावेळ ठेवुन घ्या.
७. आता त्या भांड्यात १/२ सफरचंदाचे मिश्रण घाला व वरती १/२ बिस्कीटाचा चुरा दाबुन बसवा.
८. त्यावर पांढरे व्हिप्ड क्रिम पसरा व सारखे करुन घ्या.
९. परत उरलेले सफरचंदाचे मिश्रण घाला व वरती उरलेला बिस्कीटाचा चुरा दाबुन बसवा.
१०. आता वरती स्ट्रॉबेरी क्रश घातलेले क्रिम पसरा व ते सारखे करुन घ्या.
११. त्यावर चेरी, द्राक्ष, जेम्सच्या गोळ्या, चॉकलेट सॉस ने साजावट करा
१२. आता भांडे सिलिंग फाईल ने झाकुन ७/८ तासा साठी सेट करा. व नंतर त्याचा आस्वाद घ्या.

काही चित्रे.
apple puding1
puding2
puding3
puding4

प्रतिक्रिया

स्नेहश्री's picture

26 Feb 2011 - 10:24 am | स्नेहश्री
मदनबाण's picture

26 Feb 2011 - 10:59 am | मदनबाण

यम्मी... :)

अय्याया... लाळ गळाली पुडिंग बघून..

- पिंगू

प्राजक्ता पवार's picture

26 Feb 2011 - 2:50 pm | प्राजक्ता पवार

मस्तं आणि सोप्पी पाकृ . सजावटदेखील छान दिसतेय :)

निवेदिता-ताई's picture

26 Feb 2011 - 3:35 pm | निवेदिता-ताई

खूप मस्त.....आणी सोप्पी पण.........धन्यवाद.!!!!!!!!!!

कच्ची कैरी's picture

26 Feb 2011 - 7:08 pm | कच्ची कैरी

मस्त !आणि काहीतरी नविन ,छानच!

आयला कसला खतरनाक फोटू आहे १ न ;)

कविता१९७८'s picture

16 Jul 2016 - 2:30 pm | कविता१९७८

वाह

नूतन सावंत's picture

16 Jul 2016 - 7:15 pm | नूतन सावंत

सुरेख दिसतंय ते पुडिंग.रांगोळीचा फील येतोय.

स्नेहश्री's picture

16 Jul 2016 - 9:24 pm | स्नेहश्री

Thank you KP . Thank You Surangi tai

इशा१२३'s picture

16 Jul 2016 - 10:23 pm | इशा१२३

मस्त! छान दिसतयं अगदी.

इशा१२३'s picture

16 Jul 2016 - 10:23 pm | इशा१२३

मस्त! छान दिसतयं अगदी.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2016 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा

आवडलच.
श्रावणात एखाद्या यजमानानी शिय्राऐवजी हा असला प्रसाद ठेवला तर किती सोय होईल?

त्या शिय्राला कं-टाळलेल्या सत्य नारायणाची, आणी माझीही..! ;) ह्ही ह्ही ह्ही! =))