बंगलोर मिसळपाव ओसरी-द्वितीय सत्र.

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
6 May 2008 - 7:35 pm
गाभा: 

बंगलोर मिसळपाव ओसरी-द्वितीय सत्र.
येत्या शुक्रवारी,दि.९ मे २००८ रोजी, संध्याकाळी ७ वा.
आयोजित करीत आहोत.
स्थळ-डेनीज रेस्टॉरंट,जयदेवा उड्डाणपुलाजवळ,जे.पी.नगर,बंगलोर.
सर्व रसिक आणि उत्साहि मि.पा.करांना तीर्थ प्रसादाचे जाहिर निमंत्रण. :D

ओसरी वर होणा-या कार्यक्रमांची रुपरेषा छोटा डॉन हे लवकरच जाहीर करतील.

(स्वागतोत्सुक) अबब

अवांतर-
कार्यक्रमाला येणा-या मि.पा.करांनि "कार्यक्रम" झाल्यावर जाताना स्वतः वाहन चालवायचा धोका पत्करु नये.
पहा मोटार नियामक कायदा १९८५.त्याकरीता खाजगी वाहन वापरावे.रिक्षा वा टॅक्सी....अर्थातच स्वखर्चाने,हयाचि नोंद घावी

मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर.
अध्यक्ष- छोटा डॉन. यांच्या हुकुमावरून

(स्वगत -महाराष्ट्र ते बंगलोर अंतर व प्रवासखर्च पाहता,पुण्या/मुंबईत "बसणे "स्वस्तात होइल हे सांगणे न लगे O:) )

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

6 May 2008 - 7:56 pm | आंबोळी

यावेळी न चुकता फोटु काढा आणि मिपावर चढवा..... तुमच्या ओसरीला आमच्या शुभेछ्छा......

अवांतर : तेवढ मोटार नियामक कायदा १९८५ चे (कार्यक्रम झाल्यानंतरही)लक्षात आसुद्या म्हंजे झाले.

स्वयंभू's picture

6 May 2008 - 8:08 pm | स्वयंभू (not verified)

मी आहेच बैठकीला 8}

(स्वगत -महाराष्ट्र ते बंगलोर अंतर व प्रवासखर्च पाहता,पुण्या/मुंबईत "बसणे "स्वस्तात होइल हे सांगणे न लगे )
असं आम्हाला अंडरएस्टीमेट नका करू अबब राव. मुंबई / पुणे ते बँगलोर प्रवासखर्चा पेक्षा जास्त बिल करून दाखवलं तर ह्यावेळीही बिल तुम्हीच भरणार का? बोला लावता पैज?

अवांतर - डॉन्या मेल्या तुझ्या भरवशावर पैजे लावतोय रे. ऐन वेळी भरवशाच्या म्हशीचा टोणगा नको होउस. वाटल्यास हा आठवडा उपास कर :D

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मानस's picture

6 May 2008 - 8:17 pm | मानस

बंगलोर मिसळपाव ओसरीस अनेक शुभेच्छा ................

बाकी तो कायदा "मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५" असा आहे बहुतेक.

आपले तात्याच नकी सांगतील................... ;) (ह.घ्या)

छोटा डॉन's picture

6 May 2008 - 8:22 pm | छोटा डॉन

इथं तर "अबबरावांनी " समदं जाव्हीर करून टाकलं ...
स्वयंभूची तर वेगळीच तयारी चाललेली आहे, तरिपण "फिकर नॉट" भाउ [ भय्या म्हणजे आजकाल शिवी समजतात ] आपण एकदम तंदुरूस्त आहे [ तंदुरूस्त : तंदुरी खाण्यास दुरुस्त ]

>>वाटल्यास हा आठवडा उपास कर ...
कसला उपास भाउ, मागच्या आठवड्यात कशी लागली होती ते माहित आहे ना ?
च्यायला अफाट जागरणं, बेफाट खाणं;पिणं;फुकणं , त्यात शनिवारी बघितलेली "चेन्नास्वामी वरची बेंगलोर वि. हैद्राबाद मॅच , त्यात प्रेक्षकातल्या सुंदर्‍या व मोहक चिअरलीडर्स्स यांना साक्षी ठेउन घातलेला धिंगाणा ह्यामुळे तब्येतीचा पार बॅन्ड वाजला होता. घसा तर कामचं देईना ...
पण आता ठीक आहे, होउन जाउ दे तिच्यायला ....

>>ओसरी वर होणा-या कार्यक्रमांची रुपरेषा छोटा डॉन हे लवकरच जाहीर करतील.
अरे बापरे, म्हणाजे तुमच्या मनात नक्की आहे तरी काय ?

बाकीचे डिटेल्स सवडीने [ च्यायला ह्या कामाच्या लोड मुळे १० मिनीटे लोडला टेकून झोपायची सोय राहिली नाही. च्यायला कंपनी आहे का सोंग ? ]
आंबोळीशेठ, बाकी ते फोटोचं ह्यावेळी नक्की ...

स्वगत : आता शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे हापीसला कहीतरी चाट मारावी लागणार

मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर.
अध्यक्ष- छोटा डॉन.

[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रभाकर पेठकर's picture

6 May 2008 - 8:27 pm | प्रभाकर पेठकर

बंगलोर मिसळपाव ओसरीस शरीराने जमणार नसले तरी मनाने नक्कीच हजर राहू. अनेक शुभेच्छा...!

विसोबा खेचर's picture

7 May 2008 - 12:06 am | विसोबा खेचर

मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर आयोजित "बंगलोर मिसळपाव ओसरी-द्वितीय सत्र" ला अनेकानेक शुभेच्छा! यावेळेस फोटू पाहायला मिळतील अशी आशा करतो...

मिसळधर्म वाढावा हीच इच्छा!

कार्यक्रमाला येणा-या मि.पा.करांनि "कार्यक्रम" झाल्यावर जाताना स्वतः वाहन चालवायचा धोका पत्करु नये.
पहा मोटार नियामक कायदा १९८५.त्याकरीता खाजगी वाहन वापरावे.रिक्षा वा टॅक्सी....अर्थातच स्वखर्चाने,हयाचि नोंद घावी

तेवढं मात्र सांभाळा रे बाबांनो. अलिकडेच केल्या गेलेल्या काही बदलांनुसार आता कलम १८५ अंतर्गत केलेला गुन्हा हा 'अ-जामिनपात्र' ठरवण्यात आलेला गुन्हा आहे. जजसाहेबांनी नुसता दंड ठोठावून सोडून दिलं तर ठीक, नायतर जेलमध्ये जावं लागेल, जामिनही मिळणार नाही! :)

असो, बंगळूर मिपा ओसरीस पुन्हा एकदा शुभकामना..

तात्या.

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 10:52 am | धमाल मुलगा

मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर.

अरे काय नाव आहे का चेष्टा?

आयला, त्या डुलकीकाढ्या देवेगौडाला आणि त्याच्या चंबू लेकराला हे कळालं तर दोघं लुंग्या सावरत धडाधडा पळत सुटतील की....

शाब्बास रे वाघरांनो...दक्षिण भारत दिग्विजय.... खल्लास!!! लै च आवडलं आपल्याला.

धुमाकूळ घाला...मजा करा...मिसळपावी मरहट्टी ताकद दाखवून द्या....
आणि फोटू मुख्य कार्यक्रम सुरु करण्यापुर्वी काढा...नाहीतर लेको नेहमीची कारणं द्याल...'क्यामेरा थरथरत होता', 'थिथल्या वेटराला लकवा झाला होता' इ.इ. ;)

मोटार नियामक कायदा १९८५.त्याकरीता खाजगी वाहन वापरावे.

फोनाफोनी करुन 'पार्वतीपुरम्' मध्ये काही सेटींग लाऊन ठेऊ का? म्हणजे काही लफडी व्हायची नाहीत...;)

मिपा बेंगलोर ओसरी ला हार्दिक शुभेच्छा !!!!

स्वाती दिनेश's picture

7 May 2008 - 11:41 am | स्वाती दिनेश

पेठकर म्हणतात त्याप्रमाणे मनाने नक्कीच ओसरीत असू..कट्ट्याला भरपूर शुभेच्छा!
भारतात पुण्यनगरीत आणि बंगरुळात कट्टे,ओसर्‍या नुसते भरभरुन वाहत आहेत,:-) म्हणून मग आम्हीही स्फूर्ती घेऊन जर्मनीतील 'बिगंसे' ह्या निसर्गरम्य तरुतळी शनिवारी ३ मे रोजी एक मायक्रो कट्टा भरवला.कट्ट्याला ३ मिपाकर- स्वाती दिनेश,दिनेश आणि लिखाळ हजर होते.सोबत सौ.लिखाळ आणि सौ.नीता व श्री.विपिन चिंचाळकर आणि कुमार निखिल हे अमिपाकरही होते.लवकरच ते ही मिपाकर होतील..:)
कट्टा उत्तमच झाला हे वेसांनल.
स्वाती

धमाल मुलगा's picture

7 May 2008 - 12:18 pm | धमाल मुलगा

अरेच्च्या...
स्वातीताई, मग कट्ट्याचा वृत्तांत द्या ना!

मायक्रो कट्टा भरवला.

:D

सौ.नीता व श्री.विपिन चिंचाळकर आणि कुमार निखिल हे अमिपाकरही होते.लवकरच ते ही मिपाकर होतील..

वा वा वा!!
मिसळपाव मस्तकी धरावा | मिसळपावधर्म वाढवावा|
हल्लकल्लोळ माजवावा| तिन्ही लोकी|
ह्या उक्तिला जागता आहात की !

अभिनंदन!

विसोबा खेचर's picture

11 May 2008 - 1:51 pm | विसोबा खेचर

स्वाती,

तुम्हा सर्व जर्मन कट्टेकरींचे मनापासून अभिनंदन...

आज जगभर मिपाचे कट्टे भरत आहेत याचे संत तात्याबांना समाधान आहे. मिसळपावधर्माचा जगभर प्रसार हे त्यांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे त्यामुळे ते आता सुखाने समाधी घेतील.

आपला,
संत तात्याबा महाराज.

आणि ते जरा फोटू गिटू टाकायचं बगा की हो ह्या वेळी!
नाहीतर बसाल सगळे सुंब होऊन, म्हणतो मी! ;))

चतुरंग

झकासराव's picture

7 May 2008 - 11:23 pm | झकासराव

शुभेच्छा!
जरा पुण्याच्या दिशेने एक नजर टाका आणि आमच्या शुभेच्छा घ्या :)

ब्रिटिश टिंग्या's picture

8 May 2008 - 1:36 am | ब्रिटिश टिंग्या

आमच्याही!

अवांतर - डानराव, फोटो काढा.
अतिअवांतर - फोटो मिपाकरांचेच काढा.
अतिअतिअवांतर - कट्टा झाल्यावर रिक्षा करा अन् गपगार घरी जावा (स्वत:च्याच).
मायक्रो अवांतर - जर्मनीनंतर पुढचा लंबर यु.के.चा! कोण कोण हाये यु.के. मध्ये? माताय ह्या राणीच्या देशात कट्टा भरवुयात अन् महाराष्ट्र (अन् पर्यायाने मिपा) धर्म वाढवुयात!

- (सुचनांकित) टिंग्या :)

केशवसुमार's picture

8 May 2008 - 2:25 pm | केशवसुमार

टिंग्या, :$
लेका आपण राणिच्या देशात केलेल्या मिनीमायक्रो कट्ट्याचा कुणाला पत्याबी नाही लागला :> .. कसे.. दे टाळी.. =D>
(मिनीमायक्रो कट्टेवाला)केशवसुमार :B

ब्रिटिश टिंग्या's picture

9 May 2008 - 12:58 am | ब्रिटिश टिंग्या

केसुशेठ, :$
तो आपला शिक्रेट कट्टा होता ना! आपलं शिक्रेट फोडलं राव तुम्ही......... #o

असो, कदाचित तो मिपाचा सातासमुद्रापार पहिला 'अनधिकृत' 'मायक्रो-मिनी' कट्टा असावा! ;)

अवांतर - आठवतयं का? कट्ट्याच्या नावाखाली आपण लंडनभर उगाच बोंबलत हिंडत होतो :D

(दुसरा मिनीमायक्रो कट्टेवाला) टिंग्या :B

छोटा डॉन's picture

8 May 2008 - 4:10 pm | छोटा डॉन

आता अबबरावांनी येत्या शनिवारी ओसरी जमवायचे मनी योजले आहे त्याला तिढा घालायला खरच मनापासून वाईट वाटत आहे पण सद्य परिस्थीतीची जाणीव करून देणे मी महत्वाचे समजतो ...

ह्या "शनिवारी" आमच्या भागातील म्हणजे जवळपास बेंगलोरच्या ४० % भागात "कर्नाटका विधानसभा मतदार संघात" निवडणूकीसाठी मतदान आहे.
माननीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मतदानाच्या "आदल्या, मतदानादिवशी व दुसर्‍या [कदाचित] दिवशी " त्या भागात "दारूबंदी " असते. आज मी केलेल्या सर्वेक्षणात [ म्हणजे काय मला सकाळ सकाळ लावायची सवय नाही, तरीपण चहा पिताना सकाळी दुकान बंद दिसले व मी चौकशी केली ] या तत्वाचे काटेकोर पालन होत असल्याचे मला आढळून आले. म्हणजे अजून २ दिवस नक्की दारूबंदी ...

तर आता आपल्यासमोर ३ पर्याय आहेत
१. ओसरीचा कार्यक्रम पुढे ढकलणे
२. शाकाहारी [ विना दारू /मटन/ मच्छी ] ओसरी साजरी करणे.
३. दारूची सेटिंग होउ शकते पण रिस्क आहे, आपली तयारी आह का ?
झाला तर पोलीसांशी पंगा होउ शकतो ......

कदाचित ह्यालाच "डेव्हिल्स अलटरनेटीव्ह" म्हणतात .....

माझ्या ह्या मुद्द्यावर समस्त मिपाकरांची मते जाणून घ्यायला मला आवडेल ....
त्यानुसार बाकी आखणी करतो ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

स्वयंभू's picture

8 May 2008 - 4:38 pm | स्वयंभू (not verified)

अरे आपली बैठक शुक्रवारी आहे. टेंशन नको घेउस. फार तर १२ च्या आत संपवावे लागेल. पण त्याची भरपई आपण लवकर सुरुवात करून करू चकतो :D

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/