रंगोत्सव अंतर्गत कुसुमांजली - काव्य, चित्र, अक्षर रेखाटने स्पर्धा + सांस्कृतिक कार्यक्रम

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
22 Feb 2011 - 8:13 pm
गाभा: 

२०११-१२ हे कुसुमाग्रज ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष!

२६ फेब्रु. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, २७ फेब्रु कुसुमाग्रजांचा जन्मदिवस व आपला सर्वांचा लाडका मराठी भाषा दिन!

ह्या दोन्ही सुवर्णदिनांचे औचित्य साधून " थर्ड बेल एंंटरटेनमेंट " (Third Bell Entertainment) सादर करीत आहे " रंगोत्सव " (पर्व पहिले) - कविवर्य कुसुमाग्रजांवर आधारित साहित्य, काव्य, नाट्य, कला, चित्र, संगीत, नृत्य यांचा संमिश्र आविष्कार " कुसुमांजली " - २ दिवसांचा आनंदोत्सव!!!

प्रदर्शनाचे ठिकाण :

दि. २६ फेब्रु., दि. २७ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

महोत्सवाचे ठिकाण :

दि. २६ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

दि. २७ फेब्रु. : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे

महोत्सवाचे उद्घाटन दि. २६ फेब्रु २०११ रोजी, स. ११ वाजता.

(हस्ते : श्री. राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते)

- महोत्सवातील ठळक वैशिष्ट्ये -

१) कुसुमाग्रजांच्या १०० कवितांवर आधारित चित्र आणि अक्षरे रेखाटण ह्यांची स्पर्धा व त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन.

२) प्रेम, मायमराठी, क्रांती, सामाजिक टीका ह्या विषयांवर आधारित काव्य स्पर्धा.

३) काव्यवाचन याच्यावर आधारीत कार्यशाळा.

पेंटिंग: श्री. रवी परांजपे.

कॅलिग्राफी: श्री. अच्युत पालव.

फाँट: सौ. अर्चना लोथे

काव्यवाचन: सौ. मंजिरी जोशी.

४) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या कवितांवर/ साहित्यावर आधारित काव्यवाचन व अभिवाचनाचा कार्यक्रम.

५) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या गाण्यांवर आधारित सांगीतिक कार्यक्रम.

६) विशेष मान्यवर कलाकारांसह कुसुमाग्रजांच्या नाटकांमधील निवडक प्रसंगांचे सादरीकरण.

७) मराठी भाषा विषयावर परिसंवाद व चर्चासत्र.

८) पारितोषिक वितरण समारंभ.

महोत्सवाचे उद्घाटन दि. २६ फेब्रु २०११ रोजी, स. ११ वाजता.

(हस्ते : श्री. राजसाहेब ठाकरे)

साभार : मनोगत संकेतस्थळ.

प्रतिक्रिया

धन्यवाद सांगितल्या बद्दल

प्राजु's picture

23 Feb 2011 - 1:23 am | प्राजु

उत्तम!!
या कर्यक्रमास जे उपस्थित राहतील त्यांनी वृत्तांत जरूर लिहावा. :)
कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा!

कलंत्रि, माहितिबद्दल धन्यवाद. पोहोचण्याचा प्रयत्न करतो, आणखि कुणि येणार असेल तर सांगा.