इंटरनेट हिंदू
हा काय प्रकार आहे?
प्रख्यात टिव्ही पत्रकार सागरीका घोषा या विदुषी च्या टंकसाळीतून हा शब्द तयार झाला आहे. तो शब्द आता खालील अर्थाने वापरला जातो.
अन्तरजालावर (ब्लॉग्ज्,फोरम्,सोशल नेटवर्कींग,मायक्रोब्लॉगिंग) सध्या काही ब्लॉगर्स हिन्दू धर्म आणि अति उजव्या
राजकारणाला पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे लोक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराला उपयोगी पडेल आणि त्यांच्या हिडन एजेण्डा प्रत्यक्षात येण्यासाठी तरूण पिढीला तयार करीत आहेत.
काही लोकांच्या मते इंटरनेट हिन्दू ह्या टर्म चा हिन्दू धर्माशी काहीही संबंध नाही. कोणत्याही टीव्हि च्या बातमीची 'दुसरी बाजू ' मांडण्याचा प्रयत्न करणारा तो एक समूह आहे.
काही प्रश्ण मनात येतात.
१) हे सर्व खरे आहे का?
२) काही अगदी कमी संख्येने वावरणारे हे लोक खरेच काही करू शकतील का? त्याचा चांगला/वाईट परिणाम काय होईल?
३) मिपा वर असे काही लोक काही ठारविक आयडी ने वावरत आहेत का?
खालच्या लिन्का पहा.
http://vu-point.blogspot.com/2010/03/who-is-internet-hindu.html
http://www.mediacrooks.com/2011/02/sagarika-ghose-tweets-should-twitter....
http://twitter.com/sagarikaghose/status/9763996589
http://www.mediacrooks.com/2011/02/sagarika-ghose-tweets-should-twitter....
http://www.haindavakeralam.com/hkpage.aspx?PageID=10793&SKIN=M
http://thenethindu.blogspot.com/2011/01/indian-media-vs-internet-hindus....
http://www.imo.in/node/100001
http://www.ciol.com/News/News/News-Reports/Internet-Hindus-fighting-main...
माननीय मिपा करांच्या विचारांची चाहूल घ्यावी म्हणून हा लेखन प्रपंच
इंटरनेट हिंदू
गाभा:
प्रतिक्रिया
22 Feb 2011 - 5:33 am | विकास
प्रख्यात टिव्ही पत्रकार सागरीका घोषा या विदुषी च्या टंकसाळीतून हा शब्द तयार झाला आहे.
कोण या सागरीका घोष? नक्की त्या कुठल्या चॅनलवर प्रख्यात आहेत? (हे प्रश्न खरेच आहेत, उपरोधीक नाहीत).
बाकी त्यांनी ट्वीट केलेले वाक्य विचार करायला लावणारे आहे: "Internet Hindus want to `Islamise' Hinduism: they are enamoured of the extremist version of Islam.." याचा अर्थ त्यांना इस्लाम मधे अतिरेकी प्रकार आहेत आणि ते नसलेल्या हिंदू धर्मात आता ते येऊ लागले आहेत असे म्हणायचे आहे का?
22 Feb 2011 - 6:19 am | बेसनलाडू
आय बी एन!!!
(माहीतगार)बेसनलाडू
22 Feb 2011 - 9:07 pm | कापूसकोन्ड्या
अगदी बरोबर
22 Feb 2011 - 6:14 pm | वाहीदा
"Internet Hindus want to `Islamise' Hinduism: they are enamoured of the extremist version of Islam.." याचा अर्थ त्यांना इस्लाम मधे अतिरेकी प्रकार आहेत आणि ते नसलेल्या हिंदू धर्मात आता ते येऊ लागले आहेत असे म्हणायचे आहे का?
विचित्र अन मजेशिर अर्थ लावला आहे. कायच्या काय ... !
22 Feb 2011 - 6:56 pm | विकास
विचित्र अन मजेशिर अर्थ लावला आहे. कायच्या काय ... !
माझ्या दृष्टीने हा अर्थ नुसताच विचित्र आणि मजेशीर नसून, आक्षेपार्ह आहे. विशेष करून जेंव्हा, "Internet Hindus want to `Islamise' Hinduism: they are enamoured of the extremist version of Islam.." असे एका मोठ्या वाहीनीतील पत्रकार महीला बोलते तेंव्हा. पण मग, या वाक्याचा नक्की काय अर्थ होतो ते समजावून सांगावेत ही विनंती.
22 Feb 2011 - 7:21 pm | वाहीदा
Internet Hindus want to `Islamise' Hinduism: they are enamoured of the extremist version of Islam.."
याचा अर्थ त्यांना इस्लाम मधे अतिरेकी प्रकार आहेत आणि ते नसलेल्या हिंदू धर्मात आता ते येऊ लागले आहेत ?
का बरे ?? असा अर्थ तुम्ही कोणत्या आधारावर लावला हे जरा माझ्या सारख्या पामराला सांगाल का ?
enamoured चा अर्थ माझ्या सारख्या पामराला जो माहीत आहे तो fascinated by असा आहे . ते हिंदू धर्मात येऊ लागले आहे हा अर्थ तुम्ही कसा काय लावला ?? 'ध' चा 'मा' करण्यात काय अर्थ आहे, हे समजविले तर उत्तम :-)
22 Feb 2011 - 8:33 pm | विकास
'ध' चा 'मा' करण्यात काय अर्थ आहे, हे समजविले तर उत्तम
तसा उद्देश नाही. किंबहूना सागरिका बाईंनी इस्लाम अथवा कुठल्याही धर्माबद्दल असे बोलल्याबद्दल आक्षेपच घेत आहे.
enamoured चा अर्थ माझ्या सारख्या पामराला जो माहीत आहे तो fascinated by असा आहे .
बरोबरच आहे हा अर्थ. अगदी मेरिअम-वेबस्टर डिक्शनरीतील अर्थ बघितला तरी काय दिसते?
enamoured past participle of en·am·or (Verb)
1. Be filled with a feeling of love for: "it is not difficult to see why Edward is enamored of her".
2. Have a liking or admiration for: "enamored of New York".
आता या बाईंचे दोन शब्दप्रयोग बघा:
Internet Hindus want to `Islamise' Hinduism : म्हणजे त्यांना म्हणायचे आहे की, (त्यांच्या परीभाषेतील) इंटरनेट हिंदूंना, हिंदू धर्माचे इस्लामीकरण करायचे आहे. म्हणजे जे (म्हणजे "इस्लाम"), "हिंदू धर्म" नाही त्याचे त्यांना ते (म्हणजे "इस्लामीकरण") करायचे आहे.
पुढे त्या म्हणतात -
आता जर वरील डिक्शनरीतील अर्थ अथवा आपणास माहीत असलेला अर्थ घातला तर ते वाक्य काय होते?
they are fascinated by the extremist version of Islam अथवा they are filled with a feeling of love for the extremist version of Islam
आणि असे म्हणणे हे चुकीचे आहे, जे सागरीकाबाईंनी केले आहे आणि ज्याला माझा आक्षेप आहे.
धर्म चुकीचा वापरणार्यांना धर्मांध म्हणत, त्यांच्यावर टिका केली तर समजू शकते, किंबहूना केलीच पाहीजे, त्यांचा विरोध केलाच पाहीजे. पण येथे धर्मांधांवर टिका न करता सरळ सरळ एका धर्मावर टिका केली जात आहे आणि ती देखील दुसर्या धर्माशी तुलना करून. त्यांच्या या खोडसाळपणाचा मी निषेध करत आहे.
माझी समजण्यात जर काही चूक होत असेल तर अवश्य सांगा.
22 Feb 2011 - 8:44 pm | कापूसकोन्ड्या
इन्टरनेट हिन्दू असा धेड्गुजरी शब्द वापरल्याबद्दल आणि त्याचा सोयीस्कर अर्थ लावल्याबद्दल कसे वादंग निर्माण होतात हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामध्ये दुसरा मत प्रवाह पण दिलेला आहे.
खरा प्रश्र्ण आहे की खरेच अशी जमात आहे का? आणि असेलच तर त्यांचा प्रभाव पडणार का?
एकंदरीत विचार करता, मिपावर पण असे काही सदस्य आहेत असे वाटले.
पण त्यांचे म्हणणे आपल्याला पटलेच पाहीजे असे थोडेच आहे?
22 Feb 2011 - 10:51 am | रणजित चितळे
साहेब
जालावर कोणीही लिहू शकतो. वाचणा-यांनी पोशक असे वाचावे व विचारांती निवडावे. त्यावर मनन करुन जे चांगले व जे भावते ते उचलावे.
हिंदू धर्मावर लिहीण्याने बिघडत काहीच नाही. अन्य धर्मीय पण लिहीतच असतात की.
22 Feb 2011 - 10:55 am | विजुभाऊ
एक उगाचच ओढूनताणून केलेला प्रकार वाटतोय.
22 Feb 2011 - 11:11 am | चिरोटा
घोष ह्यांनी उगाचच निर्माण केलेला प्रकार वाटतोय. मुद्दाम वादग्रस्त असे लिहायचे आणि मग प्रतिक्रिया बघत स्वतःचे मनोरंजन करुन घ्यायचे हा हल्ली अनेक पत्रकारांचा पूर्ण वेळ धंदा झाला आहे."बघा, हिंदु धर्मात पण अतिरेकी विचार करणारे लोक आहेत" हे 'बाहेरच्यांना' पटवण्यासाठी हे चालु आहे असे वाटते.
मुळात इंटरनेटवर लिहिणार्यांची खरी ओळख कशी पटवायची?
22 Feb 2011 - 8:53 pm | कापूसकोन्ड्या
ओढून ताणून नाही हो.
हा शब्दसमूह गेले दीड वर्षे प्रचारात आहे. तो शब्द कॉइन करणार्या लोकाना त्याचा आनंद वाटतो आहे, तर वाटू द्या ना. मला तो शब्द विचीत्र वाटला म्हणून मी चार ओळी टंकल्या.
22 Feb 2011 - 9:03 pm | विकास
तो शब्द कॉइन करणार्या लोकाना त्याचा आनंद वाटतो आहे,
मला वाटते वास्तव वेगळे आहे. त्यांना कॉईन करताना आनंद होत नसून भिती वाटत आहे आणि जळजळ तर नक्कीच आहे आणि अर्थातच ती असूदेत.
भारतातील प्रमुख प्रसिद्धीमाध्यमे ही बर्याचदा डाव्या विचारसरणींनी जास्त प्रेरीत झालेली होती. सर्व प्रसिद्धी करायची सत्ता यांच्याच हातात असल्याने कुणाला प्रसिद्धी देयची, कुणाला झाकायचे हे ठरवणे सोयीचे जात होते. पण नंतर आले इंटरनेट आणि प्रसिद्धी आणि संपर्क यांच्यातील मक्तेदारी संपली. जिथे मुबारक टिकू शकला नाही, गडाफीला पळावे लागले तिथे या इंटरनेटच्या जगात माध्यमांना पण आव्हान तयार झाल्या सारखे वाटले तर आश्चर्य नाही. विशेष करून ज्यांना स्वतःचा प्रभाव दाखवण्याची मक्तेदारी आजपर्यंत होती त्यांना. म्हणून मग हा पोटशूळ आणि त्यावेदनांमुळे आपण नक्की काय बोलत आहोत, त्याचे अर्थ काय आहेत याचे देखील भान राहीले नाही... असो.
23 Feb 2011 - 9:24 am | गुंडोपंत
भारतातील प्रमुख प्रसिद्धीमाध्यमे ही बर्याचदा डाव्या विचारसरणींनी जास्त प्रेरीत झालेली होती. सर्व प्रसिद्धी करायची सत्ता यांच्याच हातात असल्याने कुणाला प्रसिद्धी देयची, कुणाला झाकायचे हे ठरवणे सोयीचे जात होते. पण नंतर आले इंटरनेट आणि प्रसिद्धी आणि संपर्क यांच्यातील मक्तेदारी संपली. हेच म्हणतो!
इतकेच नाही तर ही लोकं अनेकदा पैसे देऊन फितवलेली तसेच नको त्या विचार सरणीत पद्धतशीर रित्या अडकवलेली असतात.
उदा. सी एन एन आय बी एन च्या सर्व टिमला अमेरिकन प्रशिक्षण दिलेले असते.
या मूर्ख घोष बाई या प्रशिक्षणाच्या बळी आहेत यात वाद नाही.
22 Feb 2011 - 11:53 am | नितिन थत्ते
लेखातील प्रश्न क्र. १ आणि ३ याचे उत्तर "हो" असे आहे.
यापैकी भाजप आणि संघ यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी ते हे करतात असे वाटत नाही. उलट इंटरनेट हिंदूंचा स्वतःचा अजेंडा - पारंपरिक हितसंबंधांचे समर्थन, त्यासाठी धर्माचे आणि तथाकथित अध्यात्माचे ग्लोरिफिकेशन इत्यादि- भाजप पुरेशा हिरिरीने करीत नाहीत असा तक्रारवजा सूर त्यांच्या लेखनात आढळतो.
प्रश्न क्र २ चे उत्तर माहिती नाही.
सदरचा शोध सागरिका घोष की कोण आहेत त्यांनी नव्याने लावलेला नाही. मी स्वतःही काही सदस्यांशी खरडसंवादात हे विचार व्यक्त केले आहेत.
22 Feb 2011 - 8:58 pm | कापूसकोन्ड्या
"सदरचा शोध सागरिका घोष की कोण आहेत त्यांनी नव्याने लावलेला नाही. मी स्वतःही काही सदस्यांशी खरडसंवादात हे विचार व्यक्त केले आहेत."
एकदम मान्य. तो शोध विचारांचा किंवा वागण्याचा नव्हे तर ''इंटरनेट हिन्दू'' अशा विचीत्र शब्दाचा आहे.
22 Feb 2011 - 9:04 pm | विकास
सदरचा शोध सागरिका घोष की कोण आहेत त्यांनी नव्याने लावलेला नाही. मी स्वतःही काही सदस्यांशी खरडसंवादात हे विचार व्यक्त केले आहेत.
नितिन थत्ते
ड्युप्लिकेट आयडी? ;)
23 Feb 2011 - 9:36 am | गुंडोपंत
यापैकी भाजप आणि संघ यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी ते हे करतात असे वाटत नाही. उलट इंटरनेट हिंदूंचा स्वतःचा अजेंडा - पारंपरिक हितसंबंधांचे समर्थन, त्यासाठी धर्माचे आणि तथाकथित अध्यात्माचे ग्लोरिफिकेशन इत्यादि- भाजप पुरेशा हिरिरीने करीत नाहीत असा तक्रारवजा सूर त्यांच्या लेखनात आढळतो.
तथाकथित अध्यात्माचे या शब्दांवर माझा आक्षेप आहे. थत्ते यांना मानवी अध्यात्माच्या सर्व कल्पना तथाकथित आहे असे म्हणायचे असेल तर ती वेगळी गोष्ट आहे.
श्री थत्ते येथे फक्त हिंदू अध्यात्माला तथाकथित म्हणत आहेत. कारण सरळ आहे कुणीही काहीही म्हंटले तरी कुणी फतवे काढणार नाही, की कुणी प्रार्थनास्थळां मार्फत कुप्रसिद्धीची पद्धतशीर मोहीम चालवणार नाही.
श्री थत्ते यांनी आपला हिंदू अध्यात्माचा अभ्यास आणि अनुभव मांडावा. तो तथाकथित कशामुळे आहे हे द्यावे. तसेच ते हिंदू अध्यात्माला तथाकथित का म्हणतात याचे विवेचन द्यावे अन्यथा आपले शब्द माफी मागून मागे घ्यावेत.
कुणाही लल्लू पंजूने यावे आणि ख्रिस्ती डिसेप्टीव्ह प्रभावाने हिंदू धर्मावर गरळ ओकावी, हे चालणार नाही!
23 Feb 2011 - 9:53 am | क्लिंटन
कोण लल्लू पंजू आहे आणि कोण नाही हे ठरविणार कोण?
अवांतर: कोण हिंदू समर्थक आणि कोण हिंदूद्वेष्टा हे ठरविणार कोण?(मिपावर जरी तो ठेका काहींनी आपल्याकडे घेतला असला तरी). असो.
23 Feb 2011 - 9:58 am | नितिन थत्ते
हा हा हा
सारे जग हिंदूधर्म नष्ट करायला टपलेले आहे असा एक काँप्लेक्स असणे हेही इंटरनेट हिंदूंचे एक लक्षण.
असो मी फक्त हिंदू अध्यात्माला तथाकथित म्हटले हा निष्कर्ष कसा काढला?
हिंदू धर्मावर कोणीही टीका केली तर त्याला ख्रिश्चनांचे कारस्थान म्हणणे हेही इंटरनेट हिंदूंचे एक लक्षण.
23 Feb 2011 - 10:59 am | गुंडोपंत
धर्मांतर करायला येणार्यांसारखे शब्द जंजाळ तयार करू नका.
मुळ मुद्द्याला बगल देऊन भलतेच मुद्दे पुढे करायचे हे तद्दन त्यांचे प्रकार आहेत.
यापैकी भाजप आणि संघ यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी ते हे करतात असे वाटत नाही. उलट इंटरनेट हिंदूंचा स्वतःचा अजेंडा - पारंपरिक हितसंबंधांचे समर्थन, त्यासाठी धर्माचे आणि तथाकथित अध्यात्माचे ग्लोरिफिकेशन इत्यादि- भाजप पुरेशा हिरिरीने करीत नाहीत असा तक्रारवजा सूर त्यांच्या लेखनात आढळतो.
हे तुमचे वाक्य. यात हिंदूंचा स्वतःचा अजेंडा - पारंपरिक हितसंबंधांचे समर्थन, त्यासाठी धर्माचे आणि तथाकथित अध्यात्माचे हे श्ब्द तुमचेच आहेत.
उत्तर देताय की माफी मागताय?
23 Feb 2011 - 11:19 am | नितिन थत्ते
मी हिंदूंचा स्वतःचा अजेंडा म्हटलेले नाही. :)
इंटरनेट हिंदूंचा स्वतःचा अजेंडा असे म्हटले आहे.
इंटरनेट हिंदू म्हणजे बहुतांशी - परंपरेने उच्चवर्गीय, वेल एस्टॅब्लिश्ड असलेले लोक.
23 Feb 2011 - 11:21 am | गुंडोपंत
सारे जग हिंदूधर्म नष्ट करायला टपलेले आहे असा एक काँप्लेक्स असणे हेही इंटरनेट हिंदूंचे एक लक्षण. सार्या जगाचे माहिती नाही पण ख्र्सिती मिशनरीज मात्र नक्की भयावह परिस्थिती आणत आहेत.
हे पाहा पास्टर ऱोजर २००९ मध्ये म्हणतो,
इंडिया गॉस्पेल लीग ने सुमारे ५०,००० चर्चेस महाराष्ट्रात जन्माला घातले आहेत. त्यांचे २०१० चे उद्दिष्ट १००,००० एक लाख चर्चेस रुजवणे हे होते!
I had the privilege of attending two Life Center (a village church building) dedications in the state of Maharashtra and the India Gospel League has been actively involved in the planting of about 50,000 churches in the last 20 years, with a vison to plant 100,000 by 2010.
हे लोक इतक्या सरळ सांगत आहेत आणि तुम्हाला परिस्थिती भयावह वाटू नये? इतके आहे तर कशाला ख्रिस्ती वल्ड विजन भारतात काम करायला येते? हिंदूंचे धर्मांतर उद्दिष्ट आहे!
यात कोंप्लेक्स वगैरे नाही हे सत्य आहे. तुम्ही डोळ्यावर कातडे ओढले तरी चर्च ने ओढलेले नाही. ते काम करत आहेत. आणि उघड उघड सांगत आहेत की आमचा उद्देश धर्मांतरच आहे. आणि काही मूर्ख हिंदू मात्र ' छे ख्रिस्ती धर्मांतर वगैरे असे काही नाहीच' असे म्हणत समाजवादी डबक्यात बसले आहेत!
ते कसे करणार हे ही सांगत आहेत. हे पाहा -
स्ट्रॅटेजी १ प्रत्येक गावात चर्च, त्यासाठी लोकल पास्टर बनवणे (कसा बनवणार? हिंदू धर्मांतरातूनच ना?)
स्ट्रॅटेजी २ - जे आत येतील त्यांना आधी धरा.
स्ट्रॅटेजी ३ - चर्चेसची बेरीज नको गुणाकार करा.
हे सगळे काय सांगते हो साहेब?
22 Feb 2011 - 12:28 pm | अवलिया
१) हे सर्व खरे आहे का?
असु शकेल.
२) काही अगदी कमी संख्येने वावरणारे हे लोक खरेच काही करू शकतील का? त्याचा चांगला/वाईट परिणाम काय होईल?
भविष्य सांगणारे यूयुत्सु किंवा गुंडोपंत अधिक मार्गदर्शन करतील
३) मिपा वर असे काही लोक काही ठारविक आयडी ने वावरत आहेत का?
असु शकतात. त्याचबरोबर हिंदू धर्म, अध्यात्म, भारत, संस्कृती यांचा उल्लेख आला की मळमळणारे इतकेच काय अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याबद्दल वाटेल ते बरळणारे आणि त्या बरळीला षंढाप्रमाणे टाळ्या वाजवणारे लोक मिपावर आहेत.
असो.
22 Feb 2011 - 12:56 pm | नितिन थत्ते
>>इतकेच काय अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याबद्दल वाटेल ते बरळणारे आणि त्या बरळीला षंढाप्रमाणे टाळ्या वाजवणारे लोक मिपावर आहेत.
असे उदाहरण आजवर मिसळपाववर पाहिले नाही.
परंतु सत्य सांगणार्यांना आक्रस्ताळेपणा करणारे आणि शेलकी विशेषणे लावणारे अनेक लोक दिसतात.
22 Feb 2011 - 1:03 pm | अवलिया
>>>>असे उदाहरण आजवर मिसळपाववर पाहिले नाही.
शक्य आहे. तुमचा अभ्यास कमी पडत असेल.
>>>परंतु सत्य सांगणार्यांना आक्रस्ताळेपणा करणारे आणि शेलकी विशेषणे लावणारे अनेक लोक दिसतात.
हे ही शक्य आहे. क्रिया असली की प्रतिक्रिया असते असा काहीसा नियम आहे. आणि सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते.
22 Feb 2011 - 1:14 pm | नितिन थत्ते
>>सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते.
सदर ज्ञान आपल्याकडून मिळाल्यामुळे धन्य झालो.
22 Feb 2011 - 1:15 pm | अवलिया
झालात ना? फी पाठवुन द्या शिकवणीची ! ;)
22 Feb 2011 - 6:23 pm | सुहास..
परंतु सत्य सांगणार्यांना आक्रस्ताळेपणा करणारे आणि शेलकी विशेषणे लावणारे अनेक लोक दिसतात. >>>
सत्य च्या अलिकडे अंतिम हा शब्द राहिला वाटत ..
22 Feb 2011 - 8:41 pm | jaydip.kulkarni
जरा गुगलून बघितलं तर सर्वच धर्मातल्या , नव्हे जातीतल्या सुद्धा अतिरेकी प्रवृत्ती इथे सापडतील ..............
22 Feb 2011 - 10:24 pm | देशीसंत्रा
१) हे सर्व खरे आहे का?
- असेल तर उत्तम होईल. आणि, अशी इंटरनेट-सुशिक्षित तरूण पिढी जर हिंदुत्वाकडे वळत असेल, तर या सागरिकाबाईंसारख्या निधर्मी पत्रकारांचा पोटशूळ उठणारच !
22 Feb 2011 - 11:13 pm | विजुभाऊ
परवा एका चॅनेलवर श्री श्री श्री संत अबु आझमी हे सिमी ही संस्था मुस्लीम विद्यार्थ्याना लग्न ,व्यवसाय वगैरेंबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे असे संगत होता
22 Feb 2011 - 11:58 pm | कापूसकोन्ड्या
हा उत्तम पुरावा!!
त्या व्याख्ये प्रमाणे इं.हि.च्या व्याख्येत ही विचारसरणी पक्की बसते. पण ती विचारसरणी चुकीची की बरोबर ते मात्र सांगता येत नाही.
23 Feb 2011 - 12:28 am | विनायक बेलापुरे
आतंकवादी हिंदू प्रमाणेच हा शब्द प्रचलित करावयाचा असणार. ज्या वाहिन्या किंवा वर्तमानपत्रे स्वतःचे अजेंडे बिनदिक्कत चालवतात तिथे इतका पैसा ओतून पेड न्युज देणे किंवा विखारी प्रचारा विरुद्ध स्वतःची बाजू मांडणे हिंदूना शक्य होत नसावे. म्हणून जिथे जागा मिळेल तिथे हिंदूना लिहिण्याशिवाय , आपली बाजू मांडण्याशिवाय पर्याय नाही.
तसे नसते तर इतके दिवस आतंकवादाला नसलेला रंग एकदम भगवा कसा झाला असता ?
तसाच इंटरनेट हिंदू हा नवा शब्द प्रचलित करायचा असावा इतकाच त्यातून अर्थ निघतो.