Stuffed crust chicken pizza

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
16 Feb 2011 - 4:17 am

साहित्यः

मैदा - २ कप
यीस्ट - ८ ग्रॅम किंवा १ छोटे पाकीट
गरम पाणी - १/२ कप
साखर - १/२ चमचा
unsalted बटर - ३ चमचे
बोनलेस चिकन - १ वाटी
टोमॅटो - ४
कांदा - २
सिमला मिरची - १
मश्रुम - १/२ वाटी
टोमॅटो सॉस - २ चमचे
Mozerella चीज - २ पॅकेट
इटालियन herbs - १ चमचा
लसुण - २-३ पाकळ्या
चिली फ्लेक्स - १ चमचा
काळी मिरी पावडर - १ चमचा
मिठ चवीनुसार

कृती:

१. १/२ कप गरम पाण्यामधे ८ ग्रॅम यीस्ट, १ चमचा मैदा, साखर व मिठ टाकुन मिक्स करावे. हे मिश्रण १५-२० मिनिटे झाकुन उबदार जागी ठेवावे.
२. थोड्या वेळाने हे यीस्ट ferment झालेले दिसेल. हे यीस्टचे मिश्रण मैद्यामधे टाकुन त्याची मऊसर कणीक मळुन घ्यावी. ही कणीक परत एका मोठ्या भांड्यामधे ठेवुन, झाकण ठेवुन उबदार जागी १-२ तास ठेवावी.
३. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. टोमॅटो स्वच्छ धुवुन, त्याचे वरचे देठ कापुन उकळत्या पाण्यात टाकावेत. २ मिनिटांनंतर टोमॅटो बाहेर काढुन लगेच बर्फाच्या पाण्यात टाकावेत. असे केल्यामुळे टोमॅटोची साले निघुन येतील. ह्या टोमॅटोची मिक्सर मधे puree करुन घ्यावी.
४. कांदा, सिमला मिरची, मश्रुम हे बारीक चिरुन घ्यावे.
५. चिकनचे छोटे तुकडे करुन घ्यावेत. ह्या चिकनला मिठ व काळी मिरी पावडर लावुन ठेवावे.
६. कढई मधे बटर गरम करावे. बटर गरम झाल्यावर त्या मधे बारीक चिरलेला लसुण टाकुन परतावा.
७. लसुण परतल्यावर त्यात कांदा व सिमला मिरची टाकुन परतावे.
८. थोड्या वेळाने त्यात मश्रुम टाकवे. २ मिनिट परतावे.
९. त्या मधे टोमॅटो puree टाकावी. चवीनुसार काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, इटालियन herbs व मिठ टाकुन मिक्स करावे.
१०. हे मिश्रण ५-१० मिनिटे मंद गॅसवर शिजु द्यावे. नंतर त्यात टोमॅटो सॉस घालावा. मिश्रण सॉसच्या constistancy ला आल्यावर गॅस बंद करावा.
११. मैद्याची भिजवलेली कणिक घ्यावी. ती मुळ size च्या दुप्पट झाली असेल. ही कणीक परत निट मळुन घ्यावी.
१२.त्यातील एक मध्यम आकाराचा गोळा घ्यावा. ह्याची एक पराठ्याच्या जाडीची पोळी लाटुन घ्यावी.
ही पोळी पिझ्झा बेकिंग प्लेट वर ठेवावी. आता पोळीच्या कडेनी चीज पसरावे. चीज पसरवुन झाल्यावर पोळीच्या कडा आत दुमडाव्यात. ह्यामुळे चीज हे पुर्ण पोळीच्या कडांमधे भरले जाईल.
१३. ह्या पोळी वर तयार केलेला सॉस लावावा. त्यावर वरतुन चिकनचे तुकडे पसरावेत. आवडत असल्यास अजुन चिरलेला कांदा, सिमला मिरची, मश्रुम किंवा corn टाकु शकता.
१४. वरतुन सढळ हाताने चीज पसरावे.
१५. Oven २५० degree celcius ला १० मिनिटे preheat करावा.
१६. Preheat केलेल्या oven मधे ही पिझ्झा बेकिंग प्लेट ठेवावी. बेक होण्यासाठी साधारण २०-२५ मिनिटे लागतील किंवा वरतील चीज brown होई पर्यंत बेक करावा.
१७. गरम गरम पिझ्झा कापुन serve करावा. Serve करताना आवडत असल्यास वरुन olive oil, चिली फ्लेक्स किंवा मिरी पावडर टाकु शकता.

pizza

pizza2

प्रतिक्रिया

सुरेख!!
माझा जरा नावडताच प्रकार आहे पण तू केला छान आहेस. मस्त फोटो आला आहे.

गणपा's picture

16 Feb 2011 - 4:43 am | गणपा

माझा लंबर पहिला. (शुचि ताईला तसाही पिझ्झा आवडत नाही. :))

पिझ्झासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जायला एका पायावर तयार आहे.

टारझन's picture

16 Feb 2011 - 10:56 am | टारझन

नाही , माझा नंबर पहिला .. ( गणपा ताईला जरी पिट्झा आवडत असला तरी )


पिझ्झासाठी जगाच्या पाठीवर कुणाच्याही पोटावर पाय द्यायला एका पायावर तयार आहे.

लवंगी's picture

16 Feb 2011 - 1:25 pm | लवंगी

नाही , माझा नंबर पहिला .. ( टारूबाईला जरी पिट्झा आवडत असला तरी )

पिझ्झासाठी जगाच्या पोटावर कुणाच्याही पाठीवर पाय द्यायला एका पायावर तयार आहे.

स्वाती२'s picture

16 Feb 2011 - 5:06 am | स्वाती२

कसला जीवघेणा दिसतोय.
क्रस्ट मधे भरण्यासाठी स्ट्रींग चीज वापरले तर ते चीज भरुन फोल्ड करायला सोपे जाते.

मला पण पिझ्झा खुप आवडतो. :)
@स्वाती२
मी चीजचे छोटे छोटे बॉल्स मिळतात, ते वापरले होते. :)

नेत्रेश's picture

16 Feb 2011 - 8:07 am | नेत्रेश

पण खुप कष्ट घ्यावे लागणार घरी करायला.
त्या पेक्षा डॉमिनो / पिझ्झा हट परवडला, स्वस्त आणी मस्त.

बेसनलाडू's picture

16 Feb 2011 - 8:09 am | बेसनलाडू

आवडीचा पण क्वचितच खाल्ला जाणारा पदार्थ. क्रमवार कृती नेहमीप्रमाणेच छान आणि फोटो तर जीवघेणे!
(खवय्या)बेसनलाडू

सहज's picture

16 Feb 2011 - 8:46 am | सहज

तुमच्या मेहनतीला सलाम!!

पिझ्झा बेस ड्राय, कडा छान क्रंची झाल्या असतील तर हॅट्स ऑफ!

कच्चा पापड पक्का पापड's picture

16 Feb 2011 - 10:46 am | कच्चा पापड पक्क...

ह्याचा कट करुन एक फुटु टाकायला पाहिजे होता.

Mrunalini's picture

16 Feb 2011 - 4:30 pm | Mrunalini

हो, बरोबर आहे... पण काय करनार, पिझ्झा कापल्यावर तेवढा दम धरवला नाही. ;)

Mrunalini's picture

16 Feb 2011 - 4:32 pm | Mrunalini

हो, बरोबर आहे... पण काय करनार, पिझ्झा कापल्यावर तेवढा दम धरवला नाही. ;)

कच्ची कैरी's picture

16 Feb 2011 - 11:17 am | कच्ची कैरी

खालच्या फोटोचा तर मस्त एक तुकडा तोडुन तोंडात घालावासा वाटतोय ,वा मस्त !

यशोधरा's picture

16 Feb 2011 - 12:31 pm | यशोधरा

भारी! बघूनच भूक लागली!

मुलूखावेगळी's picture

16 Feb 2011 - 12:39 pm | मुलूखावेगळी

+१
खुप मस्त

विशाखा राऊत's picture

16 Feb 2011 - 3:17 pm | विशाखा राऊत

मस्त...

Mrunalini's picture

16 Feb 2011 - 4:28 pm | Mrunalini

सगळ्यांचे आभार. :)

आईग्ग!
माझं डाएट फसलं.
मी या धाग्यावर आले नव्हते.
इथे पिझ्झ्याची रेसिपी दिलिये हे मला समजलेले नाही.

Mrunalini's picture

16 Feb 2011 - 7:24 pm | Mrunalini

हा हा हा... gud one :)

प्राजु's picture

17 Feb 2011 - 9:11 am | प्राजु

आई गं!! बाजार उठवला हीने!!
मृणाल... तुझे पाय कुठे आहेत गं..?
घरी पिझ्झा खायला बोलवशील तेव्हा नक्की दाखव तुझे पाय. दर्शन घेईन म्हणते त्यांचं, पिझ्झा खाऊन झाल्यावर. ;)

अशक्य फोटो.. अशक्य रेसिपी..!
स्टफ्ड क्रस्ट कसा करत असतील असा प्रश्न पडायचा नेहमी. आता समजले. :)

:)
नाही ग... अस काही नाहिये. मला पण stuffed crust pizza खुप आवडतो, म्हणुन मग ही recipe शोधुन try केली. एकदम मस्त झाली होती.

५० फक्त's picture

18 Feb 2011 - 12:55 pm | ५० फक्त

छान आम्ही कोंब्डं खात नाही त्यामुळं काहीतरी वेगळं भरावं लागेल यात, असो.

लई मजा चालली आहे, मिपावर खाण्याची, म्रुणालिनी विश्वचषकासाठी मॅच स्पेशल काहीतरी येउ द्या की.

हर्षद.

तुम्ही चिकन खात नसाल, तर फक्त वरतुन जे चिकन टाकले, ते टाकु नका. फक्त कांदा, मश्रुम, corn व चीज टा़कुन oven मधे बेक करा. :)