रंगिबिरंगी पनिर बुरजी.

जागु's picture
जागु in पाककृती
15 Feb 2011 - 12:18 pm

लागणारे साहित्य:
पनिर
लाल, पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची (चिरुन)
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१ ते २ मध्यम कांदे चिरुन
मटार अर्धा वाटी
कोथिंबीर थोडी चिरुन
मिठ
१ टोमॅटो किंवा १ चमचा लिंबाचा रस.
तेल
थोडा गरम मसाला

ह्या रंग खुलवण्यासाठी वापरलेल्या रंगित सिमला मिरच्या

हे काही लागणारे वरील जिन्नस

क्रमवार पाककृती:
पनिर सुट्टा करुन बारीक करुन घ्या.म्हणजे सोप्या शब्दात कुस्करुन घ्या हो.

तेलावर कांदा, मटार, हिरव्या मिरच्या घालुन शिजु द्या. मटार लवकर शिजावा म्हणुन फोडणीत घातला आहे.

मटार शिजत आला की त्यात टोमॅटो घालुन थोडा शिजवा.

आता सिमला मिरच्या (तिन्ही रंगाच्या), पनिर त्यात घालुन परतवा.

एक वाफ आणुन त्यात मिठ, गरम मसाला, कोथिंबीर घाला व परत एक वाफ आणुन परतुन गॅस बंद करा.

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

15 Feb 2011 - 12:26 pm | कवितानागेश

भाज्या शिजवतानाच त्यात थोडे थोडे मीठ घालत राहिले की, चव पण येते आणि रंग पण टिकतो.
सिमला मिर्ची करताना मे नेहमी असंच करते.

मुलूखावेगळी's picture

15 Feb 2011 - 12:30 pm | मुलूखावेगळी

खुप मस्त रंगिबिरंगी दिसतेय.
परवाच खाल्ली. ती मस्त होती.

पनीर आवडत नसल्याने, पनीरच्या जागी अंडे कल्पले. :)
(पराला अंडे चालते का?)

सहज's picture

15 Feb 2011 - 3:04 pm | सहज

पराला अंडे चालत नसल्यास टोफू घालून, टोफू चालत नसल्यास, पांढरा भात घालून :-)

जागू तै छान दिसतेय भाजी.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2011 - 3:08 pm | परिकथेतील राजकुमार

वा वा अगदी मनातले बोलला रे गणपा :)

अंडे चालवुन घेऊ.

स्वाती२'s picture

15 Feb 2011 - 5:54 pm | स्वाती२

पनीर फक्त ग्रेव्हीत आवडते. त्यामुळे मीही अंडीच वापरते.

स्वाती२'s picture

15 Feb 2011 - 5:56 pm | स्वाती२

प्र. का. टा. आ.

जागु's picture

15 Feb 2011 - 3:09 pm | जागु

मुलखावेगळी, गणपा, सहज धन्यवाद.

सहज आता थोड्या वेळाने खोबरे, तांदळाचे पिठ, साबुदाणा, दुध ह्या गोष्टीपण येतील.

दीविरा's picture

15 Feb 2011 - 3:12 pm | दीविरा

छान आहे दिसायला :) पण मला पनीर आवडत नाही.दूसरे काहितरी घालीन त्यात.

:)

इंटरनेटस्नेही's picture

15 Feb 2011 - 3:14 pm | इंटरनेटस्नेही

चीज चाल्ते का?

चीज प्रेमी, इंट्या.

फेटा चिज चालेल ह्यात. पण चेडर वगैरे वितळून कायच्या काय होईल.

मदनबाण's picture

15 Feb 2011 - 6:44 pm | मदनबाण

वा... पनीर !!! खी खी खी. :)

पण
यक
प्रश्न
पडला
हाय
.
.
.
बुरजी ? की भुर्जी ?

(पनीर प्रेमी)

दोन्ही शब्द बरोबर आहेत.
उगीच शंका कुशंका विचारू नकोस बाणा.
समोर ताटात येइल ते आनंदानं खायची सवय लावून घे.;)

निवेदिता-ताई's picture

15 Feb 2011 - 7:11 pm | निवेदिता-ताई

एकदम छान.......रंगीबेरंगी...मुले खुश...सर्व भाज्या मुलांनी खाल्ल्यामुळे आपणही खुश...

चवीला कशी लागेल याचा अंदाज येत नाहिये.
रंगीबेरंगी फोटू मात्र छान आलाय.

प्राजु's picture

15 Feb 2011 - 9:38 pm | प्राजु

फोटो कातिल आहे..
करून बघेन.
मला अंडे , पनीर दोन्ही चालते.. त्यामुळे दोन्ही करून बघेन. :)

चिंतामणी's picture

15 Feb 2011 - 10:14 pm | चिंतामणी

पाकृ फोटो सगळे छान आहे.

पण सिमिचे प्रमाण जास्त झाले असे वाटते.

सगळ्यांचे धन्यवाद.
चिंतामणी मी प्रत्येकी अर्धी सिमला मिरची वापरली आहे. पण पनीर भरपुर होत.

गवि's picture

16 Feb 2011 - 12:30 pm | गवि

वा..एकदम शाकाहारी ?

पण मस्तच..

लवंगी's picture

16 Feb 2011 - 1:50 pm | लवंगी

पनीर्-अंडे असे दोन्ही एकत्र टाकून करून पाहिन.. ;)

मी पनीर-३ रंगाच्या सिमला मिरचीची अशीच भाजी करते पण सगळ जूलीयन कापून घेते आणी पनिर कुस्करण्याऐवजी छोटे-छोटे तुकडे घालते..