लिंबाचे सरबत--

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
14 Feb 2011 - 9:00 pm

मदत हवी आहे....
लिंबाचे टिकाऊ सरबत कसे बनवायचे--
कोणी जाणकार सांगतील काय????

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Feb 2011 - 9:45 pm | पैसा

१. मी जाणकार नाही!
२. मी यापैकी कोणतीही कृती करून बघितलेली नाही
३. आपल्या आपल्या जबाबदारीवर करून पहावे! ;)

१८/२० लिंबे, १ किलो साखर

१) लिंबांचा रस काढावा. साखरेचा पक्का पाक करून खाली उतरवावा आणी लिंबू रस त्यात घालून चांगला ढवळावा. गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा. सरबताचं प्रमाणः १ ग्लास पाण्यात १ डाव पाक आणि चवीप्रमाणे मीठ.

२) साखर आणि लिंबू रस एकत्र करून बरणीत भरून ठेवावा. साखर विरघळेपर्यंत पहिले २/३ दिवस रोज आणि नंतर मधे मधे २/३ दिवसानी ढवळत रहावे.

३) साखर आणि लिंबू रस काचेच्या बरणीत एकत्र करून साखर विरघळेपर्यंत बरणी रोज उन्हात ठेवावी.

ही कृती अर्थातच माझी नाही. श्रेयः रसनारंजन, रुचिरा वगैरे.

निवेदिता-ताई's picture

14 Feb 2011 - 10:05 pm | निवेदिता-ताई

धन्यवाद...धन्यवाद....आज लिंबे चांगली व स्वस्त मिळाली म्हणून आणली आहेत .
करुनच ठेवते उद्या भरपुर सरबत.

पिवळा डांबिस's picture

15 Feb 2011 - 4:13 am | पिवळा डांबिस

जाणकार वगैरे माहिती नाही पण मला अशा सरबताची एक रेसेपी माहिती आहे....
दारात लिंबाचं झाड असल्याने दर वर्षी सरप्लस लिंबांचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेंव्हा माझी बायको हे सरबत करून ठेवते...
लिंबं कापून त्यांचा रस काढायचा...
तो एखाद्या कापडातून गाळून एका रूंद तोंडाच्या बरणीत गोळा करायचा....
त्यात साखर घालायची...
आणि बरणीचे तोंड पुन्हा फडक्याने बांधून घ्यायचे (झाकण न लावता). मग ती बरणी रोज उन्हात ठेवायची....
काही दिवसांत साखर पूर्ण विरघळून जाते आणि रसातील अधिकचे पाणी उडून जाऊन पाकासारखे कॉन्संन्ट्रेट तयार होते...
या सर्व प्रकारात कुठेही पाण्याचा थेंबही लागता कामा नये नाहीतर बुरशी येते...
मग ती बाटली झाकण लावून कपाटात ठेवून वेळोवेळी त्यातील कॉन्संट्रेटचे पाणी, बर्फ आणि मीठ घालून सरबत बनवायचे. एक ग्लास सरबताला १-१|| चमचा कॉन्संट्रेट पुरते.
कॉन्संट्रेट वर्षभर टिकते (पुढला लिंबांचा सीझन येईस्तोवर)..
उन्हात ठेवल्यामुळे त्या सरबतात एक सुंदर वेगळीच चव येते...
करून पहा...

मुलूखावेगळी's picture

15 Feb 2011 - 10:14 am | मुलूखावेगळी

माझी आई पण हे नेहमी करते.म्हणुन १ टीप देते.
लिम्बु पिळताना शेवट पर्यन्त गच्च पिळु नका. कारण हे साठ्व्णार असल्याने ते कडसर होते.
तसेही २ महिन्यानंतर हे चवीत बदल होउन वेगळेच बोर लागते कोणीच पित नाही. ;)
तेव्हा जास्त लिम्बे आणि साखर वाया घालवु नका.

आजानुकर्ण's picture

15 Feb 2011 - 10:41 am | आजानुकर्ण

लिंबाच्या टिकाऊ सरबताचे कॉन्सन्ट्रेट बाजारात विकत मिळते. बाटलीवरच प्रमाण दिलेले असते. साधारण एक भाग कॉन्सन्ट्रेट आणि तीन ते चार भाग पाणी एकत्र मिसळल्यास उत्तम सरबत तयार होते. मात्र हे सरबत टिकाऊ असते की नाही याबाबत फारशी कल्पना नाही. बहुतेक वेळा हे सरबत तयार झाल्या झाल्याच पिऊन टाकले आहे.

(जाणकार) आजानुकर्ण

मुलखावेगळी शी सहमत. लिंबाचा रस निघतो तो पर्यंतच काढावा शेवटचा जबरदस्तीने नाही काढायचा तसे केल्यास सालाचा कडसरपणा त्यात उतरतो.

शिल्पा ब's picture

15 Feb 2011 - 11:17 am | शिल्पा ब

लोणचं घाला...खाल तरी..

निवेदिता हायफन ताई ह्यांनी देखील प्रगल्भ लेखनात धप्पकन उडी मारलेली पाहुन डोळे पाणावले.
बोलवा कधी लिंबु सरबताला :) अनायासे उण्हाळा पण सुरु झालाच्चे :)

- अशोक दादा मुनी वर्य पतन

कच्ची कैरी's picture

15 Feb 2011 - 2:46 pm | कच्ची कैरी

चकलीताईंच्या ब्लॉगला भेट द्या तिथे ही रेसेपी नक्की मिळेल !
chakali.blogspot.com