Valentine day च्या निमित्ताने आज एक फ्रेंच पाकृ लिहित आहे.
साहित्यः
दुध - १ १/२ कप (दिड कप)
पिठीसाखर - ८ मोठे चमचे
मैदा - १/४ कप
अंडे - २ पिवळे बलक व १ संपुर्ण
बटर - २ मोठे चमचे
व्हॅनिला इसेन्स - १ चमचा
Pastry sheets - ह्या sheets दुकाना मधे frozen section ला मिळतील.
स्ट्रॉबेरी - २५० ग्रॅम
पिठीसाखर - २ चमचे सजावटी साठी
Skewer - १ सजावटी साठी
कृती:
१. एका बाउल मधे २ अंड्यांचे पिवळे बलक व एक पुर्ण अंडे घ्यावे. त्या मधे ८ चमचे पिठीसाखर टाकुन whisker ने मिक्स करावे.
२. दुसर्या पातेल्यामधे दुध गरम करायला ठेवावे. दुध गरम झाल्यावर गॅस बंद करावा. दुधाला उकळी येउन देउ नये.
४. अंड्यामधे सगळी साखर टाकुन निट मिक्स केल्यावर थोडा थोडा मैदा टाकुन मिक्स करावे.
५. गरम झालेल्या दुधामधील १/२ कप दुध अंड्याच्या मिश्रणा मधे टाकावे व चांगले फेटावे.
६. हे पातळ झालेले मिश्रण उरलेल्या दुधामधे टाकावे.
७. हे दुधाचे पातेले गॅस वर ठेवुन मध्यम आचेवर घट्ट होई पर्यंत फेटत रहावे.
८. थोड्या वेळाने पातेल्या तील मिश्रण पुर्णपणे घट्ट झालेले असेल. गॅस बंद करावा. ह्या मिश्रणात बटर व व्हॅनिला इसेन्स टाकुन मिक्स करावे. आता हे तयार झालेले मिश्रण दुसर्या भांड्या मधे काढुन झाकुन फ्रिज मधे ठेवावे.
९. Frozen pastry sheets थोडा वेळ बाहेर ठेवुन room temprature ला आल्यावर पराठ्याच्या जाडीच्या लाटुन घ्याव्या. ह्या sheets मधुन heart shape चे कटर वापरुन hearts कापुन घ्यावेत.
१०. हे hearts बेकिंग ट्रे वर ठेवावेत. बेक करताना हे फुगु नये म्हणुन त्याला काट्या चमच्याने टोचे मारावेत.
११. Oven २०० degree celcius ला १० मिनिटे preheat करावा.
१२. १० मिनिटां नंतर बकिंग ट्रे oven मधे ठेवुन २०० degree celcius ला १५-२० मिनिटे बेक करावे.
१३. बेक झालेले hearts बाहेर काढुन गार करावेत.
१४. ह्या hearts वर एका बाजुला फ्रिज मधे ठेवलेले क्रिम लावावे व त्यावर स्ट्रॉबेरीचे तुकडे ठेवावेत.
१५. परत एक क्रिम लावलेले heart त्यावर ठेवुन पुन्हा स्ट्रॉबेरीचे तुकडे ठेवावेत.
१६. सर्वात शेवटी क्रिम लावलेली बाजु स्ट्रॉबेरी वर ठेवुन एक heart ठेवावा.
१७. हे सर्व एका डिश मधे ठेवावे. त्या वर गाळणी मधे पिठीसाखर घेउन sprinkle करावी.
१८. सजावटी साठी skewer गॅस वर गरम करुन प्रत्येक heart वर २ सेकंद ठेवावे.
१९. डिश गार करुन serve करावी.
प्रतिक्रिया
14 Feb 2011 - 5:13 am | शुचि
ए काय ग मृणाल, व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी काळजाला अशा चरचरीत डागण्या द्यायच्या? :(
काय चवीत फरक पडतो का?
आणि असला तरी मी नाही देणार ज्जा!! ( जसं काही ही पाककृती मला जमणारे =)) )
14 Feb 2011 - 5:25 am | Mrunalini
हा हा हा.... आणि का नाही जमणार? recipe सोप्पी आहे. try कर, नक्की जमेल. फक्त pastry sheets मिळाल्या पाहिजेत. बाकी काही problem नाही.
14 Feb 2011 - 9:23 am | निवेदिता-ताई
सहमत तुझ्याशी..
14 Feb 2011 - 5:45 am | रेवती
वेगळीच पाकृ.
सध्या मृणालिनीबाई बर्याच दिलसे पाकृ देत आहेत.;)
फोटू छान आलेत.
14 Feb 2011 - 6:44 am | सहज
एकदम 'दिलजले' पाकृ आहे!!
14 Feb 2011 - 10:13 am | पियुशा
व्व्वा !
फुल टू फट्या़क !
14 Feb 2011 - 10:48 am | Nile
लग्नाआधीच्या वॅलेन्टाईनच्या अनेक घायाळ आठवणींना अगदी योग्य आहे! ;-)
14 Feb 2011 - 12:00 pm | कच्ची कैरी
मृनाल सहीच आहेस तु !तुझ्या मुळे मिपा व मिपाकर धन्य झालोत!
14 Feb 2011 - 12:30 pm | पर्नल नेने मराठे
सुरेख दिसतेय !!!
14 Feb 2011 - 1:44 pm | Mrunalini
:) धन्यवाद
14 Feb 2011 - 3:33 pm | पिंगू
गोड आणि जरा डागाळलेला व्हॅलेंटाईन साजरा करायला हिंमत लागते.. (खासकरून रेसिपीवर डाग द्यायला)
- पिंगू
14 Feb 2011 - 4:46 pm | स्वाती२
झकास!