साहित्यः १ वाटी मटार , १ बटाटा, १०-१२ काजूगर,३-४ लवंगा, २ तुकडे दालचिनी, ३-४ मिरी,१-२ वेलची, १ वाटी ओले खोबरे,१/२ वाटी कोथिंबिर, ३-४ हिरव्या मिरच्या, छोटीशी चिंच, मीठ, १/४ चमचा साखर, २ चमचे तेल, पाणी, १/४ चमचा धणेजीरेपूड.
कृती: बटाटयाच्या चौकोनी फोडी,मटार व काजुगर एकत्र शिजवुन घ्या. ओले खोबरे, वाटी कोथिंबिर, चिंच, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर मिक्सर मध्ये वाटुन हिरवी चटणी बनवुन घ्या. तेलात लवंग, दालचिनी, मिरी,वेलची यांची फोडणी बनवा. यात हिरवी चटणी,धणेजीरेपूड व पाणी घालुन शिजवुन घ्या. नीट शिजली ग्रेव्ही की शिजलेले बटाटे,मटार व काजुगर घालुन एक उकळी येऊ द्यावी.
(मटार उसळीचा फोटो स्वतः काढलेला व इतर सर्व ईंटरनेट वरुन घेतलेत.)
प्रतिक्रिया
12 Feb 2011 - 6:01 pm | Mrunalini
मस्त आहे ग पा़कृ... आणि मला मटार पण खुप आवडतो. हाच मसाला वापरुन मोड आलेल्या मटकीची भाजी पण मस्त लागते.
मला इथे काजुगर नाही मिळत. त्याच्या जागी मी काय वापरु शकते? साधे काजु पाण्यात भिजवुन वापरले तर चालतील का?
12 Feb 2011 - 8:31 pm | इष्टुर फाकडा
चैनीची परमावधी !!!!!
12 Feb 2011 - 8:55 pm | रेवती
मी साधारण अश्याच प्रकारे करते.
आज करणारच. बरेच दिवसांपासून मनात आहे.
13 Feb 2011 - 6:30 pm | पर्नल नेने मराठे
फोटो निट नसल्यामुळे उसळ रटाळ वाटली. कुछ मजा नही आया.
14 Feb 2011 - 10:02 am | अविनाशकुलकर्णी
उसळीत चिंच..प्रकार नविन वाटतो.ट्राय केला पाहिजे