साहित्य
२ बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट
१/२ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
३-४ लसूण पाकळ्या बारीक किसुन
२ टीस्पून तेल
१/२ कप ब्रेडक्रंब्ज
१/४ कप परमेजान चिज
किंवा
मोनॅकोटाईप बिस्किटांचा चुरा
कृती
चिकनच्या उभ्या पट्ट्या कापून घ्या. हळद, तिखट, गरम मसाला, लसूण पेस्ट, तेल एकत्र करुन चिकनला चोळून लावावे.
एका झिपलॉक बॅगमधे ब्रेडक्रंब्ज आणि चिज एकत्र करावे. ओवन ३५० फॅ ला गरम करत लावा. बेकिंग ट्रेला फॉईल लावुन त्याला तेलाचा हात लावुन घ्या. आता चिकनचे २-३ तुकडे झिपलॉक बॅगमधे घालून बॅग बंद करुन हलवा. चिजच्या मिश्रणात घोळवलेले चिकन ट्रे वर ठेवा. असे सगळे चिकनचे तुकडे घोळवून घ्या.
ओवन मधे २० मिनिटे बेक करा.
टोमॅटो सॉस किंवा हनिमस्टर्ड सॉस बरोबर सर्व करा.
प्रतिक्रिया
10 Feb 2011 - 9:47 pm | Mrunalini
मस्त. try केल पाहिजे.
10 Feb 2011 - 9:59 pm | nishant
झकास!!
लौकरच try करणार :)
10 Feb 2011 - 10:36 pm | रेवती
प्रकार सोपा वाट्टोय.
आम्ही शाकाहारी असलो तरी आमचा मुलगा मात्र पक्का चिकनखाऊ आहे.
मी फारतर चिकन नगेट्स् आणून फ्रिजरमध्ये ठेवते आणि तो गरम करून घेतो.
हळूहळू त्याच्यासाठी का होइना सोपे प्रकार शिकायला हवेत.
10 Feb 2011 - 10:51 pm | स्वाती२
धन्यवाद मृणालिनी, निशांत, रेवती. :)
अग रेवती, हे चिकन फिंगर्स छान फ्रीज होतात. माझा लेक पण चिकनखाऊ आहे. म्हणून मी हे असे करुन ठेवते. घाईगडबडीत टॉर्टिया किंवा पिटा मधे लेट्युस्,टोमॅटो बरोबर घालूनही खाता येते.
10 Feb 2011 - 11:05 pm | रेवती
हां, ही आयडीया चांगली आहे.
10 Feb 2011 - 11:42 pm | दैत्य
चांगली पाक्रु आहे!.. ..ब्रेडक्रम्स वापरतात हे माहित नव्हतं...
11 Feb 2011 - 2:03 am | प्राजु
मस्तच! मी पण फ्रिज करून ठेवेन. माझा लेकही चिकनखाऊ आहे..
11 Feb 2011 - 2:07 am | शिल्पा ब
मस्त...या मिश्रणात विंग्स केल्या तर चवीत काही फरक पडेल का?
11 Feb 2011 - 3:56 am | स्वाती२
दैत्य, प्राजू, शिल्पा धन्स!
शिल्पा, विंग्ज केल्यास वेळ अॅडजस्ट करावा लागेल. चवीत फरक नाही पडणार पण स्किन मुळे फॅट वाढणार. स्किनलेस ड्रम्सस्टिकही वापरता येइल.
11 Feb 2011 - 4:44 am | विंजिनेर
हल्ली मिपावर छळछावण्या उघडल्यात पाकृ विभागात... येणं नकोसं करून टाकल्ये :)
11 Feb 2011 - 6:39 am | नाटक्या
मस्तच आहे. याच बरोबर गणपाशेट्च्या चिकन विंग्जची आठवण आली.
11 Feb 2011 - 11:09 am | कच्ची कैरी
वा मस्त आहे हं मी पण लवकरच ट्राय करेल.
11 Feb 2011 - 2:48 pm | स्वाती दिनेश
मस्त दिसत आहेत .. एकदम टेम्टिंग..
स्वाती
12 Feb 2011 - 4:09 pm | स्वाती२
पुन्हा एकदा धन्यवाद!