आमच्या 'इकडे' सर्वात जास्त आवडणारा हा प्रकार..
साहित्य- दोन उडीद वडे, एक ईडली, झणझणीत सांबार भरपुर, वरुन सजावटीसाठी बारीक शेव, कोथिंबीर.
कॄती-- एक प्लेट घ्या , जरा खोलगट असावी, त्यात वडे व ईडली ठेवा, त्यावर भरपुर सांबार घाला , शेव व कोथिंबीर वरुन पसरावी.
ह ही घ्या मारामारी..
प्रतिक्रिया
10 Feb 2011 - 8:19 pm | Mrunalini
हा हा.. मस्त.... आणि नाव पण मस्त आहे. :)
10 Feb 2011 - 8:41 pm | गणेशा
एकदम झकास.
------------
मारामारी हे नाव बहुतेक गुजर मस्तानी मध्ये पण आहे असे पुसटसे आठवते आहे.
लक्षात येत नाहिये नक्की .. पण ह्या नावाचा पदार्थ (वेगळा) खाल्लेला आहे. बहुतेक मस्तानीच असावी.
10 Feb 2011 - 8:52 pm | रेवती
फोटू चांगला आहे.
मला वाटते मारामारी हा चहाचा कि कॉफीचा प्रकार असतो (ऐकीव).
10 Feb 2011 - 9:04 pm | संदीप चित्रे
पुण्यातल्या अमृततुल्यमधे 'मारामारी' म्हणजे चहा आणि कॉफी एकत्र !
चू भू दे घे !
10 Feb 2011 - 9:38 pm | गणेशा
बरोबर आठवले मला आठवत्च नव्हते कुठे हा प्रकार प्यायला आहे.
मस्तानीत वेगवेगळॅए नावे होती.. बहुतेक ती गुडनाईट होती, उगच तीला मारामारीचे नाव दिले.
...
मुळ मुद्दा
हे पाकृ पण भारीच
10 Feb 2011 - 8:53 pm | संदीप चित्रे
इडली-वडा सांबार :)
10 Feb 2011 - 9:09 pm | स्वाती२
मला पण आवडतं इडली-वडा सांबार. पण शेव नाही घालत मी. :)
10 Feb 2011 - 9:57 pm | मदनबाण
मारामारी हा ज्युसचा प्रकार ऐकुन माहित व्हता... (अननस+संत्रे, किंवा अननस+मोसंबी )
पण हा वडे+इडली वाला प्रकार नविनच कळला... :)
(खाबुराव) :)
10 Feb 2011 - 10:00 pm | गणेशा
ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन.
11 Feb 2011 - 6:59 am | मदनबाण
ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन.
इथे टिचकी मारुन पहा :--- http://www.lifeunordinary.com/2010/03/maramari.html
जालावर शोध घेतल्यास अजुन नवे प्रकार सापडतील... ;)
10 Feb 2011 - 10:14 pm | टारझन
बेदम सुजलो !!
11 Feb 2011 - 11:51 am | स्पंदना
हा हा हा !
किती वेळ लागला मला समजायला! मानल!
12 Feb 2011 - 9:08 pm | दादा बापट
लई भारी
2 Mar 2011 - 12:38 am | हितु
डिश मधील वडे इडली सोबत मारामारी करत असतील, मला पहिले खा मला पहिले खा !
म्हणून या डिश चे नाव मारामारी ठेवलेले दिसते !