साहित्यः
ब्रोकोली - १ गड्डा
Extra Virgin Olive Oil - ४-५ चमचे
पाणी - ३-४ कप
काळी मिरी पावडर - १ चमचा
मिठ चवीनुसार
चीज किंवा बटर सजवण्यासाठी
कृती:
१. पातेल्यामधे पाणी उकळुन घ्यावे. त्यात थोडे मिठ व ब्रोकोलीचे तुकडे करुन ५ मिनटे शिजवावे.
२. मिक्सरचे ज्युस करायचे भांडे घेउन त्यात शिजवलेली ब्रोकोली, पातेल्यातील पाणी, मिठ, काळी मिरी पावडर व ऑलिव्ह ऑइल टाकुन गरम असतानाच एकदम बारीक सुपच्या consistency प्रमाणे वाटुन घ्यावे.
३. सुप serve करायच्या बाउल मधे कढावे.
४. वरुन १ चमचा ऑलिव्ह ऑइल व चीज किंवा बटर टाकुन गरम serve करावे.
प्रतिक्रिया
8 Feb 2011 - 3:03 am | वडिल
मृणालीनी ताई.
उद्दापासुन मी प्रतिसाद देणं थांबवणार आहे.
कौतुक करायला आता शब्द नाहि उरले.
अन्य मिपाकर प्रतिसाद देतिलच.
8 Feb 2011 - 3:06 am | Mrunalini
नाही नाही हो, अस नका करु. आत्ता कुठे सुरवात झालीये. तुमच्या प्रतिसादा मुळे मला नविन पदार्थ करायला प्रोत्साहान मिळते. :)
8 Feb 2011 - 5:08 am | वडिल
मृणालीनी ताइ,
मी तुम्हाला मिपा चा "धोनी" हि उपाधी देणार आहे. ( किंवा मिपा चा तेंड्ल्या , तुम्हाल जे आवडेल ते कळवणे)
आल्या आल्या पहिल्या ओवर मधे लागोपाठ सिक्सरस मारुन तुम्हि वर्ल्ड कप खिशात टाकला आहेत.
( विरोधी टिम नी जवळ जवळ शरणागती पत्करली आहे !)
8 Feb 2011 - 9:36 am | प्यारे१
>>>>( विरोधी टिम नी जवळ जवळ शरणागती पत्करली आहे !)
आय्ला, हे कसलं वडिल????
गुन्यागोईंदानं र्हायलेत लोकं आनि उगा भांडनं लावायलाय व्हय....????
नवीन पोरगी आल्याली हाय घरात आन करतीया चांगलं चुंगलं म्हून मोट्टी मान्सं बसल्यात थंड.
बघ्त्यात काय बाय करु र्हायली ती. आनि कौतिक बि करत्यात नव्हं ????
उगा कशाला लेकरावानी भांडन लावू र्हायला बे बाप...???
पोरी उगा कुनाचं ऐकू नको बर्का, होव्व्व्व. कामं करीत र्हाय. आनि समदी आपलीच हायेत. इरोदी न्हाय बरं कोनी.
(कुणाच्या शैलीत वाचायचं ते सांगायला हवं का ???????) होव्व्व्व परत म्हनाल सांगितलं न्हाय
9 Feb 2011 - 5:36 am | वडिल
गरीबाची चेष्टा नगा करु साहेब.
काय असल ते करु कि शटल.
8 Feb 2011 - 12:18 pm | टारझन
वडिल हे मिपा चे कृष्णम्माचारी श्रिकांथ आहेत ...
8 Feb 2011 - 3:13 am | शुचि
माझे आवडीचे सूप :)
8 Feb 2011 - 3:17 am | Mrunalini
हो, माझे पण. एकदम सोपे आणि पटकन पण होते. फक्त ५ मिनटे लागतात. :)
8 Feb 2011 - 3:22 am | वडिल
आवडिचे सूप पण तरी एका वेळी जास्त पिता येत नसेल ना ?
8 Feb 2011 - 3:28 am | शुचि
अगदी उंटासारखं नाही पीता येत पण पीता येतं की बरच. भरपूर लोह असतं यात.
8 Feb 2011 - 3:36 am | वडिल
कॅलरीज च काय ?
जाडपणा वाढेल ना.
अमेरीकन मुलं जाड होत आहेत असल्या प्रकारचे खावुन / पिउन.
आता हि साथ भारतात हि पसरणार लवकरच ! ( ओबेसीटि एपिडेमीक)
पाश्वात्त जिवनमानाचं असं अनुकरण करणं कितपत बरोबर आहे हे जाणकारच सांगु शकतील.
8 Feb 2011 - 3:39 am | शुचि
हे बाकी खरं :(
कोणतीही गोष्ट प्रमाणात बरी :(
8 Feb 2011 - 3:28 am | Mrunalini
नाही, जास्त पिता येत नाही. पण डाएट साठी हे सुप चांगला option आहे.
8 Feb 2011 - 4:28 am | वडिल
भारतात ब्रॉकली ची शेती सुरु करायला लागणार आता.
8 Feb 2011 - 5:03 pm | रामदास
छान चारशे किलोचे पीक आले होते. हिरवा फ्लावर म्हणून कुणी घेतलाच नाही. बाजारात जाण्याचा उत्साह नव्हता. नातेवाईक आणि मित्रांची यादी काढून घरपोच केला .
असो .
मला ही रेसेपी आवडली .
9 Feb 2011 - 7:08 am | सहज
नक्की कळवा.
9 Feb 2011 - 7:55 am | विंजिनेर
काय सांगता राव? रिटेल मधे (म. फुले मंडईत) १००रु. किलोने विकतात ब्रोकोली. :(
बारामती भागात होते ही भाजी, जांभळा कोबी इ.
8 Feb 2011 - 4:39 am | लवंगी
हे सूप चांगला उपाय आहे ... :)
8 Feb 2011 - 10:47 am | कच्ची कैरी
क्रीम ऑफ ब्रोकोली सूप पण मस्त लागते ,ही रेसेपी पण छान आहे आजच करुन बघेल.
8 Feb 2011 - 11:51 am | यशोधरा
छान वाटतेय सूप. ब्रॉकॉलीची चव फारशी आवडत नाही, तरीही. :P
पहिला फोटो मस्त आलाय.
8 Feb 2011 - 3:24 pm | Mrunalini
सगळ्यांचे धन्यवाद. :)
8 Feb 2011 - 3:43 pm | परिकथेतील राजकुमार
पाकृ आवड्याच पण फोटू जास्ती आवड्या.
प्रमाणिकपणे सांगायचे तर चेपु वर फार्मव्हिले खेळायला लागल्यावर आयुष्यात पहिल्यांदा ब्रोकोली ह्या प्रकाराशी ओळख झाली.
8 Feb 2011 - 4:03 pm | Mrunalini
धन्यवाद.
हा हा हा facebook = चेहरापुस्तक (चेपु).. मस्तच.....
जाम आवडले.
ROFL
8 Feb 2011 - 6:54 pm | गणपा
पर्याशी सहमत.
बाकी ही भाजी आजवर कधी चाखली नाही. उसातली मुलं या बाजीला नाक मुरडतात अशी ऐकीव माहीती आहे.
इथे मिळते, पण त्यावाटे जाईन का ही शंकाच आहे.
सुप मात्र ए१ दिसतय. पौष्टिकही असावं.
येउंद्या अजुन अश्याच एक से एक सुंदर पाककृती.
8 Feb 2011 - 7:08 pm | Mrunalini
हो, बरेच जणांना ही भाजी आवडत नाही. पण हे सुप छान लागते. आणि पौष्टिकही आहे. ह्या मधे लोह चे प्रमाण खुप असते. + काही क्रिम etc टाकले नाहीये त्यामुळे डाएट साठी पण चांगले आहे.
8 Feb 2011 - 5:27 pm | स्वाती२
सुरेख रंग आलाय! मला खरे तर ब्रोकोलीचे सूप फारसे आवडत नाही पण हे एकदम टेंप्टिंग दिसतेय. :)
9 Feb 2011 - 4:03 am | रेवती
चला......डाएट पाकृ आली.
छान.
9 Feb 2011 - 7:34 am | प्राजु
मला ब्रोकोली नुसती सुद्धा आवडते खायला, आजकाल. :)