चेरी केक अनेक प्रकारांनी बनवता येतो त्यापैकी हा चेरी केक तुम्हाला माहित आहेच.
आजच्या चेरी केक साठी साहित्य- १२५ ग्राम बटर, १५० ग्राम साखर, ४ अंडी, २५० ग्राम मैदा,१ चिमूट मीठ,२.५ चमचे बेकिंग पावडर, १/४ कप अॅपल किवा ऑरेंज ज्यूस, १ चमचा लिंबाचा रस + १ चमचा लिंबाची सालं किसून,
५०० ग्राम बरणीतल्या /टिन मधल्या पाकातल्या लाल चेरी
(ह्या चेरी आंबटगोड असतात म्हणून फ्लेवरला वॅनिला किवा तत्सम कोणताही इसेन्स न घालता लिंबाचा रस+ सालं घाला.लिंबाचा इसेन्स मिळाला तर ह्या बरोबर तोही १/२ चमचा घाला.)
कृती- पाकातल्या चेरी चाळणीवर टाकून पाक निथळत ठेवा.
बटर चांगले फेटा,त्यात साखर मिसळा आणि परत फेटा. अंडी फोडून त्यात घाला व फेटा. लिंबाचा रस व किसलेली सालं घाला , लेमन इसेन्स असेल तर तो घाला.
मैदा + बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ एकत्र करा व ते वरील मिश्रणात थोडे,थोडे घाला व फेटा. मिश्रण एकजीव झाले की संत्रा किवा अॅपल ज्यूस घाला.
केक मोल्ड ला बटर लावा, त्यावर वरील मिश्रणातल्या निम्म्यापेक्षा थोडे जास्त मिश्रण घाला. त्या मिश्रणावर चेरीज पसरुन घाला व उरलेले मिश्रण घालून चेरी झाकून टाका.
१७० अंश से ला प्रिहिटेड अवन मध्ये ४० ते ४५ मिनिटे बेक करा.
नेहमीप्रमाणेच- केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी खुपसून पहा. मिश्रण न चिकटता सुई/सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.
अवनचे दार उघडून केक तेथे तसाच ५ मिनिटे राहू द्या.
नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा. आणि त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण गार होऊ द्या.
पिठीसाखरेने सुशोभित करा.
प्रतिक्रिया
7 Feb 2011 - 1:40 pm | ज्योति प्रकाश
मागील केक करुन बघितला छान झाला. हा पण नक्की करुन बघेन्.स्वातीताई पण एक विनंती.माप जरा वाटी चमचा या प्रमाणात दिलात तर बरं होईल बघा जमलं तर्.बाकी फोटू नेहमीप्रमाणे अप्रतिम.
7 Feb 2011 - 2:03 pm | परिकथेतील राजकुमार
स्वातीतै, चार दिवस तू कुठेतरी हवापालट का करुन येत नाहीस? :P
7 Feb 2011 - 2:08 pm | छोटा डॉन
_/\_
हेच म्हणतो.
फोटो नेहमीप्रमाणे अप्रतिम !
मात्र अजुन एक विनंती, केकचे फोटो टाका ... हरकत नाही.
मात्र त्याचे असे पीस करुन त्यावर अजुन काहीबाही लाऊन शेजारी चमचा वगैरे असलेले फोटो नका टाकु प्लीज, खुप जळजळ होते.
- छोटा डॉन
7 Feb 2011 - 2:11 pm | टारझन
हवा पालट करायला पुणे एक छाण ठिकाण आहे असे जाणकार सांगतात ;)
- केकु जी
7 Feb 2011 - 2:16 pm | छोटा डॉन
>>हवा पालट करायला पुणे एक छाण ठिकाण आहे असे जाणकार सांगतात
वरील महाभागाशी सहमत आहे.
पुण्याची हवी खरोखरच छान आहे, मस्त उत्साह वगैरे वाटेल.
- छोटा डॉन
7 Feb 2011 - 2:11 pm | गणपा
वरील दोन्ही महाभागांशी सहमत. :)
7 Feb 2011 - 2:35 pm | नंदन
सहमत आहे :)
8 Feb 2011 - 4:38 am | Nile
आमच्याकडं काय छान हवा आहे सद्ध्या! कुठे पुण्यात त्या प्रदुषणात जाता? वर वीज कधी जाईल याचा पत्ता नाही, म्हणजे रेशिप्या करायचा तर वांदाच. (ह्या लोकांचा तुम्ही रेशिप्या टाकु नये हाच उद्देश आहे हे तर कळलेच असेल तुम्हाला.
म्हणुन आमच्याकडे या, मस्त हवेत एंजॉय करा, भरपुर रेशीप्या करा, मज्जानुं लाईफ! कशी आहे ऑफर? :-)
7 Feb 2011 - 2:14 pm | स्वैर परी
"आई आपण ओव्हन घ्यायचा का? मला केक करायचा आहे!", अस्मादिकांचा मातोश्रीना लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न!
"ओव्हन च खूळ कुणी भरल तुझ्या डोक्यात? एक दिवस केक करशील, आणि त्याला थेट कचर्याचा डब्बा दाखवशील, कारण तो काही अजिबात खाण्यालायक होणार नाहीये. काही नको ओव्हन!", इति मातोश्री!
त्यामुळे स्वाती ताई, गणपा,..., ई. केक बनविण्याचा विडा उचललेल्या मिपाकरांनी कृपया फक्त पाकृ टाकु नये, तर ती अम्हाला पार्सल करुन देखील पाठवावी.
बाकि, स्वाती ताई, मानलं हो तुम्हाला! काय भारी भारी केक करता हो तुम्ही! :)
7 Feb 2011 - 2:42 pm | प्राजक्ता पवार
मस्तं झालाय केक :)
7 Feb 2011 - 2:56 pm | धनुअमिता
मस्तं झालाय केक .फोटो सुध्दा अप्रतिम. पण १ प्रश्न आहे - हा केक अंडी न घालता कसा करायचा हे सांगाल का? कारण मी शाकाहारी आहे म्हणून. आणि ओव्हन नसल्यास केक कसा करायचा हे सुध्दा सांगा,प्लीज.
7 Feb 2011 - 3:29 pm | स्वैर परी
कृपया सांगावे!
7 Feb 2011 - 9:00 pm | निवेदिता-ताई
बाकी केक मस्त....फ़ोटो अप्रतिम.
7 Feb 2011 - 3:29 pm | कच्ची कैरी
मास्टेरशेफ स्वातीताईंचा विजय असो ! मस्त पाकृ.
7 Feb 2011 - 3:31 pm | टारझन
विजय हा शहांचा आहे. असे णमुद करावेसे वाटते. !!
जै हिंद है म्हाराष्ट्र्
7 Feb 2011 - 7:14 pm | रेवती
अग्ग्ग्ग्ग्ग्ग!
अशक्य्....केवळ अशक्य.
तुझ्या धाग्यांवर येणं तरी किती टाळायचं.
एवढ्यात जरा डाएटींग बरं चाल्लय तर आता हे मधेच काहीतरी.
फोटू पाकृ छानच. दोन्ही केकात असलेला फरक तपासून पाहिला.:)
7 Feb 2011 - 9:17 pm | प्राजु
तू खरंच, पुन्हा एकदा भ्रमण मंडळ सुरू करून भटकून ये बरं जरा! केसुंना सुद्धा जरा बरं वाटेल. ;)
भ्रमण मंडळाची ट्रीप झाली की पुढचे काही दिवस तुझे प्रवास वर्णन लिहिण्यात जातील.. म्हणजे मग रेसिपिज लिहिणार नाहीस! ;)
जबरा केक.
8 Feb 2011 - 1:58 am | केशवसुमार
कधीपासून सांगतोय.. भ्रमणमंडळ सुरु करु..
(भ्रमणमंडळाचा आद्य सदस्य)केशवसुमार
म्हणजे पाकृ बंद नको.. विकांताचे केक मिळणे बंद पडून कसे चालेल..
(विकांताला डायेट फाट्यावर मारणारा)केशवसुमार
बाकी केक स्वातीताई एकदम यम्म्म्म्मी झाला होता..
7 Feb 2011 - 9:21 pm | मराठे
अरे काय चाल्लाय काय हे! किती जळवावं एखाद्याला ??? उद्यापासून मिपापुढे बसताना लाळेरं लाउन बसावं लागणार आहे!
8 Feb 2011 - 4:40 am | लवंगी
स्वातीताई आता करून पहायलाच हवा
8 Feb 2011 - 4:12 pm | Mrunalini
मस्त दिसतोय केक. एकदा करुन बघितला पाहिजे.
8 Feb 2011 - 5:13 pm | स्वाती२
अशक्य! तो शेवटा फोटो पाहून इतका जळजळाट झाला. ;)
9 Feb 2011 - 5:23 pm | स्वाती दिनेश
सर्व खवय्यांनो,
धन्यवाद.
येथे विचारलेल्या बर्याच जणांच्या प्रश्नांची उत्तरे केक करताना.. ह्या धाग्यावर मिळतील.
स्वाती