खानदेशी चिकन करी

इरसाल's picture
इरसाल in पाककृती
6 Feb 2011 - 4:16 pm

मंडळी कालच्या प्रयत्नाला मिळालेल्या प्रतिसादाला जागून आज एक नवा प्रयत्न.
ह्या प्रयत्नाला आज घरी आलेले पाहुणेही कारणीभूत आहेत.
माझी सहचारिणी चक्रधर पंथी कुटुंबातून आलेली असल्यामुळे सामिष भोजन तिला चालत नाही आणि माझ्याकडील सगळे नातेवाईक कट्टर मांसाहारी असल्यामुळे जेव्हा कोणी येते तेव्हा असले पदार्थ बनवायची जबाबदारी हि माझी असते.
तर सादर आहे खानदेशी चिकन करी ........................

जरा आटोपशीर आहे म्हणून आणि सगळ्या पायऱ्यांचे प्रकाशचित्र घेवू शकलो नाही.

अर्धा/पावून किलो कोंबडी, पाव वाटी खोबरे,२ मोठे कांदे, हळद, मीठ, जिरे , मोहरी, लसून , आले, तेजपत्ता, कोकणी मसाला , तेजपत्ता, गरम मसाला, थोडा होममेड मसाला इत्यादी.

सुरुवातीला खोबरे आणि कांदे जाडसर कापून त्यांना खरपूस भाजून घेतले.

मिक्सर च्या भांड्यात घेवून त्यात आले, लसून, हळद, गरम मसाला, आणि कोकणी मसाला टाकून बारीक वाटून घेतले.नंतर थोडं पाणी घालून जास्त बारीक करून घेतले.

चिकन स्वच्छ धुवून घेतले.कूकर मध्ये १/१.५ पळी तेल टाकून त्यात थोडी हळद, जिरे आणि मोहरी टाकून तद्तडवून घेतले मग त्यात धुतलेले चिकन टाकून १.५/२ ग्लास पाणी टाकून ३ शिट्ट्या घेतल्या.

तदनंतर कढई मध्ये ३/४ पळ्या तेल टाकले.
आता त्यात २ तेजपत्ते आणि घरीच बनवलेला मसाला (दालचिनी, जावित्री, पत्थर फुल, काळी मिरी , बडी शोप, लवंग, वेलची इत्यादी भाजून मिक्सर मध्ये बारीक वाटलेले ) अर्धा चमचा टाकून सुंदरसा मंद सुवास येईपर्यंत मंद आचेवर तळून घेतले.
ह्याच तळलेल्यात मिक्सर वर बारीक वाटलेलं मिश्रण टाकून छानपैकी तळून घेतले.


https://lh4.googleusercontent.com/_uaopslescoM/TU52IyqWSAI/AAAAAAAAACk/8...
त्याला हळू हळू तेल सुटू लागल्यावर शिट्ट्या घेतलेले चिकन टाकून हलक्या हाताने ढवळून घेतले.वरून चवीनुसार मीठ घातले.

मग झाकण ठेवून एक दणदणीत वाफ काढून वरून कोथिंबीर टाकून वाढायला तयार केले.

काही अवांतर :
खानदेशी भाजीत कोकणी मसाला कसा ? त्याचं अस आहे आम्ही लोक खूप वर्ष कोकणात राहिले असल्याकारणाने तिकडचा मसालाच आवडतो.आणि कोकणासारखे भाजी घट्ट करायला सुद्धा खोबरे वापरले आहे.
खानदेशात भाजी घट्ट करायला एकतर शेंगदाणे (व्हेज व्हर्जन ) किंवा डाळ्या चे पीठ (नॉन व्हेज वर्जन) पण मी डाळ्या वापरल्या नाहीत त्यामुळे एकप्रकारे हा एकत्रित प्रकार आहे.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2011 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी दिसते आहे पाकृती. लंबर तीनचे छायाचित्र भारी आहे.
लंबर तीनच्या छायाचित्रात दिसत असलेले चिकनचे तुकडे
आणि वरीजनल सूप क्या कहने. :)

अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

6 Feb 2011 - 5:26 pm | कुंदन

जबरा पाकृ.
भाजी घट्ट करायला थोडेसे काजु व बदाम टाकले तर अजुन झ्याक लागेल भाजी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2011 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्ही तर तिकडे [डॉलरच्या नादात] चहा ब्रेडवर दिवस काढताय अन म्हणे...
’भाजी घट्ट करायला थोडेसे काजु व बदाम टाकले तर अजुन झ्याक लागेल भाजी. ;)
[मालक हलकेच घ्या]

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

6 Feb 2011 - 5:42 pm | कुंदन

प्र का टा आ

तुला रे काय माहित कुंद्या ! तुझ्या घरात स्वयंपाक घर कोणत्या भागात आहे हे तरी माहित आहे का?

आणि ठाण्याला येतोस तेव्हा वडापाव खाऊन तर चकरा मारतोस सकाळ संध्याकाळ !!

चल ! येवढी माहिती असेल तर २४ तासांत एक भन्नाट पाककृती स्वतः करुन फटू टाक !!

च्यायलेंज तुला !! च्यायचा फुकटचंद ओरपचंद देढेकर !!!

Mrunalini's picture

6 Feb 2011 - 5:38 pm | Mrunalini

एकदम मस्त. माझी आई खानदेशातीलच आहे. पण माझी मामी हे असे चिकन एकदम मस्त करते. फोटो बघुन तिची आठवण आली.

वेताळ's picture

6 Feb 2011 - 6:17 pm | वेताळ

आज घरी कोंबड्याचाच बेत आहे.त्यामुळे फोटो बघताना सबुरीने बघतोय.

पियुशा's picture

7 Feb 2011 - 9:41 am | पियुशा

मस्त दिसते आहे हम्म
:)

कच्ची कैरी's picture

7 Feb 2011 - 3:19 pm | कच्ची कैरी

वा मस्त बनलीय चिकन करी ! मस्त रांधता येस ना भाउ तुले !

प्राजु's picture

7 Feb 2011 - 9:34 pm | प्राजु

वॉव्!!रंग मस्त आला आहे.

लवंगी's picture

8 Feb 2011 - 4:42 am | लवंगी

:)