या वर्षी कोल्टस बाहेर पडल्याने मला टीम नाहिये. नवरा ग्रीन बे च्या बाजुने तर लेक स्टिलर्सच्या. पण असे असले तरी सुपरबॉलच्या निमित्ताने चरणे हे हवेच. तेव्हा खादाडीसाठी पेश करतेय हालपिनो पॉपर्स
साहित्य
१२ हालपिनो मिरच्या
४ औस लो फॅट क्रिम चिझ मऊ करुन
१/२ कप शार्प चेडर चिझ
१/२ चमचा पाप्रिका किंवा १/४ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पावडर
आवडत असल्यास एक लसुण पाकळी बारीक किसून
१/४ कप ब्रेड क्रंब्ज
कृती
एका बोलमधे दोन्ही प्रकारचे चिज, पाप्रिका, जिरे पावडर आणि लसुण एकत्र करुन घोटून एकजीव करा. मिरच्या स्वच्छ धुवुन कोरड्या करा. डेठ काढून मधोमध उभ्या चिरुन त्यातील बीया काढून टाका.
आता त्यात चिजचे मिश्रण भरुन घ्या.
एका बेकिंग ट्रेला फॉईल लाऊन त्याला तेल लावून घ्या. भरलेल्या मिरच्याचा वरचा भाग ब्रेड क्रंब्जमधे घोळवून मिरच्या ट्रे मधे ठेवा.
३०० फॅ. ला ओवन गरम करुन त्यात या मिरच्या ३० मिनिटे बेक करा.
प्रतिक्रिया
6 Feb 2011 - 5:31 am | बबलु
मस्त पाकृ ! तों.पा.सु.
बाकी हालपिनो पॉपर्स खाऊन वर्ष लोटलं. अर्थातच घरी करायचा उत्साह नव्हता.
बिलियर्डस खेळायला गेल्यावर मधून मधून चकणा म्हणून ऑर्डर करायचो. :) :)
6 Feb 2011 - 2:48 pm | बेसनलाडू
काय बोललास मित्रा!! बिलिअर्ड्स चे सगळे दिवस आठवले.
गेले ते दिन गेले :(
(स्मरणशील)बेसनलाडू
हॅलापिन्यो पॉपर्स बाकी लई भारी. जेथे खायचो तेथे ते आप्पे किंवा बटाटावड्यांसारख्या गोलाकार रूपात मिळायचे. आकार एखाद्या ढब्बूसारखा. वरील पॉपर्सचा आकार, रंगरूप एकदम वेगळे आहे.
(खवय्या)बेसनलाडू
7 Feb 2011 - 12:24 am | स्वाती२
हालपिनो पॉपर्स बॅटर मधे बुडवून तळल्या तर वड्याप्रमाणे दिसतात. मी पुर्वी तशा करायचे. पण आता तळणे बंद आहे म्हणून ह्या बेक केलेल्या. :)
7 Feb 2011 - 12:54 am | वडिल
अरे लाडवा..
ते देशी स्टाइलचे वाटतात... तळलेले. शिवाय कॅलरीज जास्त.
बेकिंग मुळे खरी अमेरीकन चव येते.
6 Feb 2011 - 5:56 am | शुचि
फार खाता येत नसतील ना पण? तिखट असतात हालापेनो :(
दिसताहेत मस्त.
6 Feb 2011 - 6:12 am | वडिल
शुचीताइ बघ्.. हि अशी हवी सुपरबॉल रेसेपी...
एकदम अमेरीकन
नाहितर तुझ काय ते देसी भाकरी,खर्डा, वांग्याच भरीत,कांदा, लोणी, मटकी ची उसळ आणि ताक... हॅ
काहितरी अमेरीकन शिका आता.
6 Feb 2011 - 6:54 pm | शुचि
देसी भाकरी,खर्डा, वांग्याच भरीत,कांदा, लोणी, मटकी ची उसळ आणि ताक
.................... आआआआआआआईईईईईईईईईईईईईईईईई गगगगगगगगगगग!!!!!!!!!!!!!!!! तोंपसु
6 Feb 2011 - 10:17 pm | वडिल
करत बसा नुसते आइइइइइइइइइइइ आइइइइइइइइइइइइइइ
तिकडे अमेरीकन मुलं बीया काढलेले हालपीनो खाउन कुठल्या कुठे गेले. तुम्हि बसा खर्डा खात.
म्हणुन भारताची प्रगती होत नाहि.
6 Feb 2011 - 6:16 am | स्वाती२
माझा लेक डझनभर आरामात खातो. बीया काढुन टाकल्याने तिखटपणा कमी होतो. अगदी माईल्ड हव्या असतील तर ४० मिनिटे बेक करायच्या.
6 Feb 2011 - 6:23 am | वडिल
हे असे काहि मेनु वर असेल तर मी सुध्दा अख्खा ट्रे संपवेन
नंतर लिटर भर डाएट कोक आणि केक खाल्ला म्हणजे काही तिखट वाटत नाहि.
6 Feb 2011 - 6:43 am | आत्मशून्य
.
6 Feb 2011 - 7:33 am | रेवती
छान पाकृ, आणि फोटोसुद्धा.
6 Feb 2011 - 12:33 pm | स्वाती दिनेश
फोटो आणि पाकृ दोन्ही ए-वन!
स्वाती
6 Feb 2011 - 2:11 pm | गणपा
आमच्याकडे मिळत नाही ह्या हालपिनो मिरच्या. :(
तेव्हा नुसत्या फटुवरच समाधान.
6 Feb 2011 - 7:15 pm | यशोधरा
लय भारी गं स्वातीताई! :)
7 Feb 2011 - 12:25 am | स्वाती२
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार!
7 Feb 2011 - 3:01 pm | प्राजक्ता पवार
पाकृ व फोटो दोन्ही मस्तं . नविनच प्रकार आहे माझ्यासाठी. आता नक्कीच करणार :)
7 Feb 2011 - 3:12 pm | परिकथेतील राजकुमार
ग्रेट ! आवडली पाकृ.
आधी फोटो पाहून कैरीच्या फोडी कापून ठेवल्या आहेत असे वाटले ;)
8 Feb 2011 - 5:10 am | लवंगी
आधी नाहि पाहिली ही रेसिपी, उगीच दुकानातुन आणले...
9 Feb 2011 - 5:16 am | चित्रा
असे परवा करून पाहिले. छान झाले हलापिनो पॉपर्स.