मी slovakia ला आल्यावर केलेली सगळ्यात पहिली recipe.
साहित्य :
बोनलेस चिकन - ५०० ग्रॅम
ढोबळी मिरची - १/२
कांदा - १/२
दही - ३ चमचे
आले लसुन पेस्ट - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
काळी मिरी पावडर - १/२ चमचा
आचारी मसाला (बेडेकर चा तयार लोणच्याचा मसाला वापरला तरी चालेल) - १ चमचा
बटर - २ चमचे
मिठ चवीनुसार
चाट मसाला चवीनुसार
कबाब भाजण्यासाठी वापरतात, त्या सळ्या किंवा लाकडाच्या sticks
कॄति :
१. चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. त्याच प्रमाणे ढोबळी मिरची व कांद्याचे मोठे तुकडे करावे.
२. चिकनला दही, आले लसुन पेस्ट , लाल तिखट, गरम मसाला , काळी मिरी पावडर , आचारी मसाला व मिठ लावुन १-२ तास marinate करावे. ह्या मधेच कांदा व ढोबळी मिरची टाकुन marinate करावे.
३. oven २५० degree celcius वर १० min preheat करावा.
४. सळ्यांना थोडे बटर लावावे.
५. प्रत्येक सळई मधे ढोबळी मिरची, चिकन आणि कांदा ह्या क्रमाने लावावे.
६. ह्या सळ्या oven मधे ठेवुन २५० degree celcius वर १० min ठेवाव्यात.
७. १० min नंतर oven मधुन काढुन बटर लावावे आणि परत oven मधे ठेवावे.
८. ५-७ min नंतर कबाब तयार होतील.
९. serve करताना वरून चाट मसाला लावावा.
टिप :
१. शाकाहारी लोकांनी ह्या मधे चिकन एवजी पनीर किंवा मश्रुम वापरावे.
२. हे कबाब oven किंवा grill मधे करु शकतो.
प्रतिक्रिया
6 Feb 2011 - 3:49 am | स्वाती२
मस्त!
6 Feb 2011 - 4:14 am | Mrunalini
आभारी आहे.
6 Feb 2011 - 4:37 am | प्राजु
अरे वाह!!
पटकन होणारा प्रकार आहे हा. करेन नक्की.
धन्स मृणा!
6 Feb 2011 - 4:54 am | Mrunalini
हो. पटकन आणि मस्त. :)
6 Feb 2011 - 5:12 am | वडिल
मृणालीनी ताई,
तुम्हि आमच्या मिपा च्या सुपरशेफ गणपा ची विकेट घेणार लवकरच !
केक काय कबाब काय .... मजा आहे.
व्हेज लोकांसाठि किंवा डाएट वर असणारया लोकां साठि काहि पर्यायी रेसेपी सांगा की.
चिकन च्या ऐवेजी बीफ, फिश किंवा मटन चालेल का ?किंवा बटाटे /कांदे? लाकडि स्टिक्स कुठे मिळतील ?
पटकन होत असतील तर सुपरबॉल च्या दिवशी करायला काहि हरकत नाहि.
6 Feb 2011 - 5:25 am | Mrunalini
@वडिल
धन्यवाद, व्हेज लोकांसाठी आपण पनीर किंवा मशॄम वापरु शकतो. चिकन ऐवेजी बीफ वापरु शकतो, पण जर तुम्ही हे grill वर करनार असाल, तर फिश नका वापरु. ते तुटुन जातील. oven मधे फिश वापरु शकतो.
6 Feb 2011 - 6:11 am | शुचि
>> तुम्हि आमच्या मिपा च्या सुपरशेफ गणपा ची विकेट घेणार लवकरच ! >>
वडिल आपण आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीस अनुरुप असे "सनसनाटी" भाकीत वर्तवले आहे त्याबद्दल नवल वाटले नाही.
पण आपण तसे थोडे नवीनच आहात (६ आठवडे) म्हणून लक्षात आणून देऊ इच्छिते -
हा गणपाचा प्रोफाइल
6 Feb 2011 - 6:18 am | वडिल
शुचीताइ...
तुम्हि आगीशी खेळताय...
माझे भकित म्हणजे दगडावरची रेघ आहे.
मृणालीनी ताइ आज ना उद्दा गणपा ला मागे टाकतील.
बाळाचे पाय आम्हि पाळण्यात पहातो हे लक्षात असु दा.
6 Feb 2011 - 6:29 am | Mrunalini
अरे अरे, ह्यात भांडण्या सारखे काय आहे? आता, माझी आणि गणप्याची partnership झाली, तर हा world cup जिंकुन टाकु.
माझ्या english ब्लॉगची लिंक :
@ वडिल
हो, तुम्हि अगदी बरोबर ओळखले. हा फोटो माझ्या मि. नीच काढला आहे. आणि ती प्लेट इथेच घेतली आहे. :)
6 Feb 2011 - 6:31 am | शुचि
नाही ग मृणाल :) सॉरी.
मस्त आहे तुझी रेसीपी. तुलाही मिपावर फुलण्याकरता खूप शुभेच्छा.
6 Feb 2011 - 6:35 am | Mrunalini
अरे, सॉरी काय त्यात?? its k. आणि शुभेच्छांसाठी शतशः आभार.
6 Feb 2011 - 6:37 am | वडिल
मृणाल ताइ..
ज्याना स्वयपाक येत नाहि... त्यांना तुमच्या विषयी जळ-जळ होणं स्वाभावीक आहे.
तुम्हि मागे फिरु नका. गणपा पेक्षा एक रेसेपी नेहमी पुढे रहा. ( हवं तर गुगलुन बघा.. रेसेपीत थोडा फेर फार करुन मराठि तुन इथे टाका). शिवाय तुमच्या कडे चांगला फोटोग्राफर आहेच.
6 Feb 2011 - 6:41 am | शुचि
हाहाहा
वडील तुम्ही फार खोडकर आहात =))
हाहा हसून हसून मरायची वेळ आलीये
7 Feb 2011 - 10:34 am | टारझन
चला रे सगळ्यांनो ... तयारीत र्हा ...
- टारेश पारपोचवी
6 Feb 2011 - 5:34 am | वडिल
मशृम ची एलर्जी आहे आमच्या लेकाला ( स्टिलर्स फॅन ) .. आणि आमची हि... म्हणजे एकदम "अमेरीकन" त्यामुळे पनीर वैगरे असले देसी पदार्थ घरात आणु देत नाहि.. त्यामुळे एकच पर्याय... बीफ.. अस्सल अमेरीकन बीफ.
लाकडि काठ्या कुठे मिळतील ?
स्कुअर्स वापरले तर चालतील का ?
6 Feb 2011 - 5:50 am | Mrunalini
हो. skewers वापरले तरी चालतील. मी पण skewers च वापरले आहेत. तुम्ही पनीर किंवा mushroom च्या जागी बटाटा, brocoli, फ्लॉवर वापरु शकता. नुसता कांदा देखिल छान लगतो.
6 Feb 2011 - 7:52 am | वडिल
टोफु बद्द्ल तुमच काय मत आहे ?
मांसाच्या एवेजी डाएट करणारे लोकं टोफु वापरतात. ते ह्या रेसीपी मधे कसे लागेल ?
6 Feb 2011 - 9:24 am | Mrunalini
टोफु मी अजुन कधी केले नाहीये. त्यामुळे एकदा try करुन बघते.
6 Feb 2011 - 9:44 am | वडिल
तुमचा इन्ग्रजी ब्लॉग बघितला.
मस्त आहे. कलर कॉम्बिनेशन छान जमलं आहे.
6 Feb 2011 - 5:52 am | वडिल
फोटो कोणी काढले ?तुमच्या मि नी च ना?
डिश चा रंग मस्त आहे .. अगदि भगवा + केशरी. ( शिवसेना-भाजप युती टाइप)
तुम्हि नक्कि हि डिश भारतातुन आणली असणार.
6 Feb 2011 - 2:03 pm | कच्ची कैरी
आली रे मृनाली रे आते ही वो सब के मन पे छायी रे !
खरच मृनाली तुझ्या रेसेपीजही खूप छान असतात मला फार आवडतात .
6 Feb 2011 - 2:19 pm | गणपा
चिकन कबाब म्हणजे जीव की प्राण.
सुपरबॉल वाल्यांसाठी अजुन एक मेजवानी.
आम्हाला १९ तारखे पर्यंत वाट पहावी लागणार आहे :)
6 Feb 2011 - 10:53 pm | वडिल
गणपा तुझी मिपावरची मोनोपली संपवली आमच्या मृणालीनी ताईं नी !
7 Feb 2011 - 12:09 am | वाहीदा
गणपा,
तुझे काही आता खरे नाही !
आम्हाला तुम्हा दोघांच्या ही पाकृ ची जुगलबंदी आवडेल
7 Feb 2011 - 1:18 am | Mrunalini
@वडिल आणि वाहीदा
नाही हो, ह्यात कसली जुगलबंदी? उलट मला पण गणप्यांच्या recipes आवडल्या.
6 Feb 2011 - 4:43 pm | दीविरा
कसलेही कबाब आवडतात मला :).
कबाब आणि नान म्हणजे मला मेजवानीच.
6 Feb 2011 - 5:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच भारी....!
-दिलीप बिरुटे
6 Feb 2011 - 5:53 pm | Mrunalini
सगळ्यांचे आभार. ह्या आठवड्यामधे नानची recipe टाकायचा प्रयत्न करते.