"तिखट-मिठाच्या पुर्या"

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
5 Feb 2011 - 8:37 pm

साहित्य-- दोन वाट्या कणीक, दोन चमचे बेसन पिठ, दहाबारा लसूण पाकळ्या, दोन चमचे जिरे व दोन चमचे ओवा, लाल तिखट एक चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर भरपुर बारीक चिरुन, मीठ चवीनुसार,
हिंग थोडासाच, तेल तळणीसाठी.

कॄती- - ओवा-जिरे बारीक करुन घ्या, लसुण पण वाटून घ्या, कणीक व बेसन पिठ एक्त्र करुन घ्या, त्यात चवीनुसार मिठ टाका,सर्व वरील इतर साहित्य एकत्र करा, पिठामध्ये एक चमचा कडकडीत मोहन घाला, पिठ घट्ट मळून घ्या, छोट्या पुर्या लाटून कडकडीत तेलात तळुन घ्या.
गरम खा ----गार खा --कशाही चांगल्याच लागतात. प्रवासात नेण्यास उत्तम, पोटभरीचा खाऊ.

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Feb 2011 - 9:37 pm | पैसा

उद्याचा नाश्ता ठरला! बरोबर दही चांगलं लागेल.

शानबा५१२'s picture

5 Feb 2011 - 9:53 pm | शानबा५१२

ह्याबरोबर एखादी चटणी वगैरे सुचवायला हवी कोणीतरी.

निवेदिता-ताई's picture

5 Feb 2011 - 10:37 pm | निवेदिता-ताई

टोमॅटो सॉस बरोबर छान लागतात या पुर्या.....

आंणी चहाबरोबर खाल तर ....अहाहा ....

स्मिता चावरे's picture

5 Feb 2011 - 10:22 pm | स्मिता चावरे

शानबा, या पुर्यांबरोबर चटणीपेक्षा कैरीचं लोणचं फार मस्त लागतं.

स्मिता चावरे's picture

5 Feb 2011 - 10:22 pm | स्मिता चावरे

शानबा, या पुर्यांबरोबर चटणीपेक्षा कैरीचं लोणचं फार मस्त लागतं.

मुलूखावेगळी's picture

5 Feb 2011 - 10:45 pm | मुलूखावेगळी

पुर्‍या मस्तच
मला तर घरची पुरी शिळी पन आवडते
माझी आई ह्यात कनिक तिंबताना दही टाकते चव व्रुद्धीसाठी
आनि २ चमचे साखर ह्याने पुरी टम्म फुगलेली राहते

बाकि सोबत कोरडी तिखट शेण्गादान्याची चटनी
किंवा ही चटनी दह्यात कालवुन पन छान लागते

कच्ची कैरी's picture

5 Feb 2011 - 11:01 pm | कच्ची कैरी

निवेदिता ताई उद्या सकाळी आलेच हं मी खायला .

आत्मशून्य's picture

5 Feb 2011 - 11:05 pm | आत्मशून्य

आपल्या एकदम फेवरीट.

५० फक्त's picture

6 Feb 2011 - 9:16 am | ५० फक्त

ही रेसिपि छान आहे असं मी लिहितो आहे, पण हे जर माझ्या बायकोनं वाचलं तर मला लई मारणार आहे.

असो विनोद बाजुला, हा माझ्या बायकोचा करायला आवडता प्रकार आणि काही कष्ट न करता खायला मिळतो म्हणुन माझा ही.

ह्या पु-या लाटुन झाल्यावर त्यावर लसुण व हिरव्या मिरच्या(मापं आपल्या आपल्या हिशोबाने ) यांची पेस्ट करुन लावावी तळायच्या आधी. लई भारी लागतंय.

हर्षद

पर्नल नेने मराठे's picture

6 Feb 2011 - 2:07 pm | पर्नल नेने मराठे

ह्यात २ चमचे रवा घातलात तर पुर्या ट्म्म फुगतिल...

प्राजक्ता पवार's picture

7 Feb 2011 - 2:54 pm | प्राजक्ता पवार

हा माझादेखील आवडता पदार्थ आहे .

परिकथेतील राजकुमार's picture

7 Feb 2011 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या !!

कोणी करुन घालतय का ?