तसा मी कधी कधी जेवण बनवतो.
पण आज म्हटलं कि गणपाने दिलेली पाकृ वापरून पाव भाजी बनवून बघावी म्हणून हा प्रपंच.
तर मंडळी गणपा वंदन करून केलेली पावभाजी
गणपाने सांगितल्याप्रमाणे अपूर्व तयारी म्हणजे
३ बटाटे
थोडे मटार
थोडी फुल कोबी
आणि मग पूर्व तयारी
२/३ कांदे बारीक चिरून घेतले
लगेहाथ टोम्यातोलाही (इची भैना ह्यो तो काय ठीक नाय होवून ऱ्हायला भाऊ ) सुरीचा इंगा दाखवला.
लसून आणि आले मिक्सर मधून काढले आणि त्यात २ हिरव्या मिरच्या पण टाकल्या. खानदेशी माणूस म्हटलं कि .................
आता वेळ झाली कांदा पारदर्शक बनवायची (काही जणांना पारदर्शक गोष्टींचं फार फार आकर्षण असते तो भाग वेगळा)
तर कांदा तेलात तळून पारदर्शक केला आणि मग त्यात आले लसून आणि मिरची चा घोळ बनवून टाकला आणि तो हि चांगला परतून घेतला
ठसका आणायची वेळ आलेली आहे म्हणून त्यात चांगला ३/४ चमचे तिखट टाकले आणि मंद अग्निवायुवर ३/३ मिनिट तळू दिले.
टोमातोची आहुती ......
मग आवश्यकतेनुसार मिठाचा मारा आणि वरून त्यात लोण्याचा गोळा टाकला तो फुर्र्दीशी वितळला कुठे मी आणि कुठे फोटू खीचू यंत्र (शक्तिमान कडून साभार) अशी अवस्था झाली.
मग सरते शेवटी त्यात कोथिंबीर टाकून शेवटचा हाथ फिरवला.
हुशस्स्स्श झालेएकदाचे
आता करा सजावट कठीण काम बाबा
पुन्हा एकदा कांदा चिरला आणि लिंबू कापला.
त्या कांद्यामुळे माझे डोळे पाणावले (सध्या मिपावर डोळे पाणावायची साथ आलेलीच आहे.)तिथे कॅमेऱ्याची काय कथा म्हणून शेवटचा फोटो धूसर झालाय कॅमेऱ्याच्या डोळ्याला पण पाणी आले होते.
गुडगाव मध्ये मुंबईचे पाव मिळत नाही म्हणून दुधाची तहान ताकावर.
तर मंडळी हा माझा मिपावरील पहिला प्रयत्न आहे.आतपर्यंत फक्त वाचनमात्र भूत होतो.
सहकार्य अपेक्षित
.
प्रतिक्रिया
5 Feb 2011 - 7:27 pm | प्राजु
वा वा वा! पु. पा. कृ. शु.!
5 Feb 2011 - 7:38 pm | वेताळ
वर दिलेली पाकृ तुच केलीस ना नक्की?
एकदम झक्कास.........पहिल्या प्रयत्नात षटकार....
5 Feb 2011 - 7:56 pm | नरेशकुमार
आजकाल मीपावर येउच नये असं वाटतं.
तो गनप्या एक, आनि त्याचं बघुन एकशे एक.
आमची लाळ गाळुन गाळून आमचं डीहायड्रेशन करनार आहेत बहुतेक.
5 Feb 2011 - 8:11 pm | निवेदिता-ताई
मस्त मस्त....मस्त....
मला फ़ार आवडते पाव भाजी
5 Feb 2011 - 8:12 pm | निवेदिता-ताई
फ़ोटोही...............झक्कास
5 Feb 2011 - 10:59 pm | कच्ची कैरी
कढईत तर डार्क रंग दिसत होता खाली येत येत कलर उडाला वाटत ,असो.बाकी गैरच भारी बर का जीभाउ .
6 Feb 2011 - 9:16 am | ५० फक्त
श्री. इरसाल,
आपण दोघे गणपाज सकुल ओफ रेसिपि मधले सहविद्यर्थी आहोत हे समजल्यावर छान वाटले. एक अतिशय उत्तम प्रयत्न. होय प्रयत्न्च म्हणेन, चव नाही ना कळाली म्हणुन.
आम्ही जेंव्हा पावभाजी करु तेंव्हा टाकुच फोटो पुन्हा एकदा.
हर्षद.
6 Feb 2011 - 11:21 am | नीलकांत
पावभाजी टेस्टी दिसतेय :( (चाखायला नाही मिळत ना!)
बाकी याट बटाटे आणि मटार कधी घातले ते लक्षातच आले नाही :)
- (खवय्या) नीलकांत
6 Feb 2011 - 11:38 am | सूर्यपुत्र
पाककॄती करता-करता भाजीबरोबर अनुभव कथनाला (क्षीण विनोदांची) फोडणी देणे ऑणि कॅमेर्यॉचे डोळे पॉणावलेले दाखवलेले पाहून आमच्या डोळ्यांतही (हसून-हसून) पॉणी आले.... :)
(ह.घ्या.)
-सूर्यपुत्र.
6 Feb 2011 - 12:56 pm | डावखुरा
आयला राव तुम्हीबी....
6 Feb 2011 - 1:03 pm | यशोधरा
कॅमेराच्या डोळ्यातले पाणी आवडले!
6 Feb 2011 - 2:06 pm | गणपा
हे हे हे चला अजुन एकाला कामाला लावल्याने जिवन सार्थली लागल. ;)
इरसालाची बायको खुष होणार त्याच्यावर.
(जर लग्न झालेल नसेल तर आयटितल्या पोरीं-बाळींनो लक्ष द्या ईकडे.... बकरा हलाल करवाने के लिये बिल्कुल तैयार है :) )
6 Feb 2011 - 3:32 pm | पर्नल नेने मराठे
सिमला मिर्ची घालायची राहिलि कि तुम्ही लोक घालतच नाही?
पावभाजीचा मसाला घातला नसल्याने रन्ग असा आला असावा =))
6 Feb 2011 - 3:05 pm | इरसाल
धन्यवाद मिपाकरहो,
खरतर मला वाटले नव्हते कि प्रतिसाद मिळतील व कोणाला हि पाकृ आवडेल म्हणून. पण छान वाटले.
काही खुलासे
शिमला मिरची नव्हती म्हणून टाकली नाही.
आणि टोमाटो ला बळी दिल्यानंतर जेव्हा सार २/३ मिनिट तळला त्यानंतर म्याश केलेले बटाटे, मटार आणि फुल कोबी हे टाकले.
कदाचित बटाटे जास्त झाले असावेत त्यामुळे रंगाचा फरक वाटतोय
पुनश्च्य धन्यवाद.