सरकारी आकाशवाणी मुंबई केंद्रावर सकाळी ७:१५ वाजता 'दिलखुलास' हा जवळपास ३० मिनिटांचा कार्यक्रम प्रसारीत होतो. राज्यातली सगळी आकाशवाणी केंद्रे त्याचे प्रसारण करतात. निरनिराळी सरकारी खाती अन त्यातील प्रमुख अधिकारी यांची एखादी मुलाखत किंवा त्या खात्याचे हाती घेतलेले कार्यक्रम असा त्या कार्यक्रमाचे स्वरूप असते. थोडक्यात सरकारी योजना कशा प्रकारे आहेत अन त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते किंवा त्या त्या अधिकार्यांनी कसे काम केले याची जंत्री यात सादर केली जाते. सरकारी आकडेवारीही त्यात असते. तरीपण एकप्रकारचा रटाळवाणा कार्यक्रम असतो हे नक्की.
कुठल्याही शहरी किंवा ग्रामीण कुटूंबात आजकाल सकाळची घाई सारखीच झाली आहे. सकाळी शाळेची घाई, कामावर जाण्याची घाई असते. अशा महत्वाच्या वेळी जवळजवळ महत्वाचा अर्घा तास आकाशवाणी वाया घालवते. कोणी म्हणेल की सरकारी योजना सगळ्या लोकांना माहीत होण्यासाठी असले कार्यक्रम असावेत वैगेरे. अहो पण सरकारी आकडेवारीच्या जंजाळात सामान्य माणसाला का अडकवतात ते अधिकारी? अन त्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, आकडेवारीशी कसे खेळले जाते हे सामान्य माणसाला चांगलेच समजते.
हा कार्यक्रम गेल्या २ वर्षापासून चालू आहे. योजना बदलल्या जातील, आकडेवारी फुगवणे चालूच राहील म्हणून हा कार्यक्रमही चालूच राहील अशी आपण सरकारी आकाशवाणीकडून अपेक्षा करावी का?
दिलखुलास आकाशवाणी
गाभा:
प्रतिक्रिया
5 Feb 2011 - 10:20 pm | नीलकांत
सरकारच्या लोकांपर्यंत ह्या योजना नेण्याच्या कामासाठी आकाशवाणीचा हा कार्यक्रम आहे. कुठलेही सरकारी काम ज्या नियमांच्या आधारे होते आणि ज्या परिमाणांत मोजले जाते त्याच परिमाणांत या कार्यक्रमात (किंवा अन्य कुठेही) सरकारी अधिकारी बोलतात.
सरकारी कामांत पैसे व कालमर्यादे सोबतच माझ्यामते किती लोकांना या योजनेचा फायदा होण्याचे उद्दीष्ट्य होते आणि प्रत्यक्षात किती लोकांना फायदा झाला याचा सुध्दा हिशेब असावा. या आधी या हिशेबाचा फायदा झाला नसता. मात्र आता माहिती अधिकारामुळे याचा फायदा होईल असे वाटते.
- नीलकांत
5 Feb 2011 - 10:33 pm | वडिल
प्रतिसाद आवडला. अगदि पटला.
भारतात शेतकरी आणि कामकरी यांच्या साठि काहि योजना आहेत. त्याना हात लागता कामा नये. नुसती प्रगती म्हणजे मोठ्या शहरात मोठया पगारावर काम करणे नव्हे. भारताचा शेतकरी आणि ग्रामिण भाग हा अविकसित आहे. त्या कडे लक्ष देणे महत्वाचे. नुसते सॉफ्टवेअर आणि कॉम्पुटर आणि टिव्हि चॅनल काहि कामाचे नाहित.
( जे युवा जनतेला हवेत "तसे" चॅनल अजुन भारतात उपलब्ध नाहित हे इथे नमुद करावेसे वाटते)
भारत महासत्ते च्या दिशेने प्रवास खरच करत आहे का ? गरीब जनता हि नेहमी गरीबच रहाणार का ?